Two points - 9 books and stories free download online pdf in Marathi

दोन टोकं. भाग ९

भाग ९


विशाखा तशीच तणतणत हॉस्पीटलला आली. पंडितने तिला टेन्शनमध्ये जाताना बघितलं होतं आणि आता आली तर रागात आली. ते प्रीतीने सुद्धा बघितलं पण मॅमला विचारलं तर परत ओरडतील म्हणून ती पंडित कडे गेली.

" डॉक्टर, मॅमला काय झालंय ?? म्हणजे जाताना एकदम टेन्शनमध्ये होत्या आणि आत्ता आल्यात तर रागात आहेत. " प्रीतीने पंडितला विचारलं.

" ते मला कसं माहिती असणार प्रीती बाई. "

" ईईईईईईईई बाई नका म्हणु डॉक्टर प्लीज 😵😵😫. पण तुम्हाला माहिती असतं ना नेहमी म्हणून तुम्हाला विचारलं. "

" नाही मला आज काय झालंय काहिच माहिती नाही प्रीती ........... बाई 😝 " मध्येच एक पॉझ घेत बाई म्हणाला आणि तिथुन पळून गेला.

विशाखा आत केबीनमध्ये बसली होती.
" नेहमी नेहमी स्वत:चच खरं करतो तो काका. आता काय, आता तर सोबत पण मिळाली आहे ना त्याला. मग कशाला तो माझं ऐकेल ..... असंही कधी ऐकतो म्हणा 😒. एक काका काय कमी होता म्हणून आता ती पण आली 🤦. " तशीच बडबड करत हात टेबलवर ठेवून झोपली.
थोड्या वेळाने उठली. आधी तर कळलंच नाही की केबीनमध्ये आहे ते. परत घड्याळात बघितल तर सहा वाजत आले होते
म्हणजे मी जवळपास दोन तास झोपली होती. बापरे. काका वाट बघत असेल घरी. सायुला पण फोन केला नाही मी. तशीच निघून आले बावळटासारखं.

सायलीला फोन केला पण तीने उचललाच नाही. गाडी घेऊन घरी निघाली. घरी गेल्या गेल्या काकाला विचारलं,
" सायली कुठंय ?? "

" ती गेली घरी. खुप वेळ झाला आता. "

" बरं. " म्हणत हातात फोन घेऊन बसली आणि तिला मेसेज केला की वेळ मिळाल्यावर मला मेसेज कर.

" काय झालं ?? " काकाने डोक्यावरून हात फिरवत विचारलं.

" काहि नाही. कधी कधी पटत तिचं पण कधी कधी पटत नाही. "

" बघ. आता परीला तु प्रेग्नंसी बद्दल सांगुन काही फायदा आहे का ?? तिला काही कळणारही नाही. तसंच छोटीच आहे‌. बरोबर आहे तुझं की मुलांना बाहेरून कशाही पद्धतीने कळण्यापेक्षा आपण सांगितलेलं बरं असतं पण त्या सांगण्याला सुद्धा वेळ यावी लागते. सांगु आपण पण आत्ता नको. अजुन लहान आहे ती. "

" बरं. "

" ऐक मग उद्या रविवार आहे ना. मग परवा सायली सोबत जा आणि परीला ड्रेस, बांगड्या, पैंजण घेऊन ये. पण हां, सगळं हिरवं आणायचं. ड्रेस, बांगड्या सगळंच."

" हे काय मध्येच नवीन 🤨. आणि सगळं हिरवं का ?? तिला तर काळा रंग जास्ती आवडतो ना. "

" रित असते तशी. "

" काहिही फालतुगिरी करतोस रे तु ह्या रितींच्या नावाखाली. काय तर म्हणे चार दिवस शिवायची नाही. मला तर असं नाही करत कधी. "

" पहिल्यांदा असतं तसं. नंतर नाही. आणि फालतुगिरी काय त्यात. करायचं असतं तसं. माझ्या बहिणींना पण आई तसंच करायची. "

" तुझ्या बहिणींना तुझी आई तसं करायची याचा अर्थ असा नाही ना की तु पण तसच करायच 🤨. आणि जरा मला सांग का करतात हे सगळं. मला पण कळुदे जरा. "

" मला नाही माहिती 😵. मी कधी असले फालतु प्रश्न‌ नाही विचारले. मोठ्यांनी सांगितलं की ऐकायचो आम्ही."

" अरे असं कसं. ते काहितरी सांगितलं मग सगळंच डोळे झाकून कसं ऐकत बसायच. थोडी आपलीही अक्कल वापरायला नको का आपण ?? "

" मला नाही माहिती 😤. फालतु प्रश्न विचारुन माझं डोकं खाऊ नको. "

" उत्तर देता येत नाही असं सांग ना सरळ सरळ 😏 "

" बरं. एका मुलाचं स्थळ आलय. काय करायच सांग. "

" मी बाहेर चालले. बाय "

" अगं ऐकून तर घे. लगेच काय पळतेस 😝. "

" बाय बाय. " म्हणत बाहेर गेली. आणि नेहमीसारख गाडी घेऊन फिरायला निघाली.
काकाला बरोबर माहितीये मी कोणत्या विषयावर गप्प बसते. लगेच स्वत:च ब्रम्हास्त्र काढतो तो 😏. काहितरी करायला पाहिजे याचं. आत्ता फक्त विषय काढलाय याने उद्या खरंच कुणालातरी घेऊन यायचा.

शनिवार तर असाही गेलाच होता. रविवार सगळ्या मुलींनी मिळून धिंगाणा घातला होता घरात. काका सगळ्यांच्या मागे ओरडून ओरडून थकला होता पण त्याच ऐकत कोणच नव्हतं. आणि त्यात परीची वेगळीच बडबड चालू होती.
" गप्प बसा रे. सगळ्या घरात पसारा केलात. आवरणार कोण परत. विशाखा तु लहान आहेस का ?? "

" काका, खेळु दे ना. दिदी कुठ सारखी घरात असती. " सगळ्यात बारकी म्हणाली.

" हां तुला तर तेवढंच पाहिजे, नुसतं गोंधळ आणि बडबड. "

" मग काय तर. मी घरी असते तेव्हा कोणच नाही खेळत. आणि आता मला असं कोप-यात बसवून माझ्यासमोर सगळे खेळतायत 😤😤😡. बदला घेणार आहे मी याचा. " परी पण सगळी भडास काढत होती.

" तुझ काय मध्येच. 🤨. "

" माझं काय मध्येच म्हणजे 😕. मला तु असं बसवलं आणि हे सगळे मस्ती करतायत ते पण मला सोडून. किती यातना होतात माझ्या मनाला तुला काय माहिती 🥺🥺. हे म्हणजे उपवासा दिवशी समोर गुलाबजाम आणुन ठेवायचे. 😭😭. मला पण खेळायचय. आता जर कोण मस्ती केली तर मी सगळयांना शिवत असते "

" एएएएएए हि चीटींग आहे राव. त्यात आमची काय चुक आहे. तुला काकानी बसवलं. तु त्याला बोल ना. आमच्यावर अन्याय का ?? नाही नाही. " सगळे मिळुन ओरडायला लागले. एक जण एक, तर दुसरं एक वाक्य असं बोलायला लागले. काका किती गप्प बसवण्याचा प्रयत्न करत होता पण कोणच ऐकत नव्हतं. आणि आख्खा रविवार पोरींनी काकाला कामाला लावला. दिवसभर खायचं, गोंधळ घालायचा. गोंधळ घालून भुक लागली की परत खायचं. काका चांगलाच वैतागला होता. दिवसभर थकुन आज सगळे लवकरच झोपले.
रात्री सायलीच्या मेसेज आला तेव्हा परत विशाखा आणि ती गप्पा मारत बसल्या.

" आज किती कॉल केले उचलले पण नाही तु 😒 "

" अरे माझा मोबाईल नसतो माझ्याजवळ. तर कधी रेंज नसते. "

" मग कधी अर्जंट असेल तेव्हा काय करायचं मी. 😕 "

" मग पंडितच्या फोनवर कॉल करायचा. ट्रेनी आहे तो. नेहमी माझ्या सोबत असतो. त्याला करत जा. " असं म्हणून विशाखा ने सायलीला पंडितचा नंबर दिला आणि उद्याच काम सांगितलं.

सकाळी लवकर उठून विशाखा लगेच हॉस्पीटलला निघून गेली. कारण परत अर्धा दिवस तिचा जाणार होता काकाने सांगितलेल्या वस्तु घेण्यात. चार वाजलेत होते की तसं सायलीच्या मेसेज आला. आणि विशाखा तिला घ्यायला निघाली.
गाडीत तिला पण घेतलं आणि खरेदीला गेल्या. विशाखाला आधीच आवडत नाही त्यात सायली वेळ लावत होती. एक तास झाला नुसते कपडे बघतच होती पण घेत काही नव्हती. शेवटी विशाखाने किरकिर करायला सुरुवात केली तेव्हा कुठे ड्रेस घेऊन बाहेर पडल्या दोघी. तिथुन ज्वेलरीच्या दुकानात जाऊन पैंजण आणि कानातले घेतलं. सगळं सामान गाडीत ठेवून घराकडे निघाल्या.

" काय राव. किती वेळ लावला. चार वाजता निघालो होतो आपण आता सहा वाजलेत. साधे दोन ड्रेस घ्यायला एवढा वेळ ...... "

" हु्मममम 😒. तुझ्यामुळे लवकर उरकल. नाहीतर अजून छान छान ड्रेस बघायला मिळाले असते. मग त्यातुन सिलेक्ट केल असत मी. "

" पण मी म्हणते गरज काय आहे हे सगळं करायची. म्हणजे का करायचं ना असं ?? "

" रित आहे तशी. करतात सगळे म्हणून करायचं. आणि असंही त्याचा काही त्रास तर होणार नाहीये आपल्याला मग काय एवढं. "

" पण का करायचं. ?? आणि हिरवच का घ्यायच ?? "

" आधीच्या काळात मुलींची लग्न लवकर केली जायची. मग लग्न झाल्यावर त्या मोठ्या होईपर्यंत त्यांना माहेरी ठेवलं जायचं. मोठी झाली की वंश वाढवायला तयार आहे अस समजलं जायचं. मग सासरी पाठवताना सुवासिनी म्हणून तिला हिरवी साडी, हिरवा चुडा, पैंजण, कानातले असं दिलं जायचं. कारण आत्तासारख मोबाईल नव्हते. आणि पत्राने कळायला वेळ जायचा मग म्हणून जातानाच तिची हे सगळं देऊन ओटी भरायचे. खरं कारण हे आहे. मग तेव्हापासून मुलगी मोठी झाली की हे करतात सगळ. घरी पण गोड खायला करतात. "

" ओह..‌‌..... तुझ पण केल होत का ?? "

" हो. मग आत्ता कुठे साडी घ्यायच म्हणून आपण ड्रेस घेतला. कळलं का branches. "

" हे काय नवीन 🤨 . "

" अरे शाखा म्हणजे तेच ना. म्हणून branches 🤣🤣 "

" ईईईईईईई खुप बोरींग. बर तुला हे सगळी माहिती कसं काय माहिती "

" मला काय माहिती कसली माहिती 🙄 "

" अगं हेच आत्ता सगळं सांगितलं ना ते. "

" ते होय. ते मी एका पुस्तकात वाचलं होत. "
दोघी तसंच बडबड करत घरी आल्या आणि सगळं सामान काकाला दाखवलं.

" सगळं आणलय बरोबर. फक्त आता उद्याचा स्वीट मेन्यु ठरवा. " काका

" हां. गुलाबजाम ठेवायच. मला आवडतात. " परी पटकन ओरडली .

" नाही हां. मला नाही आवडत 😨. दुसर काही पण ठेवा पण प्लीज ते गुलाबजाम नको. 😣 " विशाखा गुलाबजामच नाव ऐकुन पटकन म्हणाली.

" तुला जामुन आवडत नाहीत 🙄😲😲 " सायलीला धक्काच बसला.

" नाही. अजिबात नाही. 😣😣 "

" काका खरंच हिला जामुन आवडत नाहीत 😲😲 "

" नाही खात ती गोड 😏. आम्रखंड सोडलं तर दुसरं काहिच गोड आवडत नाही. "

" कुठल्या नक्षत्रावर जन्माला आलय हे भुतं 😕. एखाद्याला जामुन कसं काय आवडु शकत नाहीत. " असं सायली ने म्हणल्यावर सगळे हसायला लागले. आणि विशाखा परत चिडली.

" ज्याची त्याची choice आहे. नाही आवडत मला. खुप गोड लागतात ते. 😣😣 " विशाखा सगळ्यांना गप्प करायला म्हणली पण सगळे अजुनच जोरात हसायले लागले.

" तुला ना नवरा गुलाबजामुन आवडणाराच मिळायला पाहिजे मग कळेल. "

" मग काय. मी‌ त्याला विकत आणून देईन. जे खायचय ते खा. फक्त मला खाऊ घालु नको म्हणजे बास.😖 "

" खरंच खुप अवघड आहे रे हिच सासरी. " सायली असं म्हणल्यावर सगळेच हसायला लागले.

" हिच नाही माझचं अवघड आहे. रोज सासुची कंप्लेंट येईल. "

" काका सगळे तुझ्यासारखे नसतात. आणि माझी सासु चांगली आहे खुप. तुमच्या दोघांसारखी खडुस नाहीये ती 🤨 "

" बघुन ठेवलीस की काय 🤭🤭😁 " काका पुढे विचारणारच होता पण विशाखा ने त्याच्याकडे रागाने बघितल्यावर गप्पच बसला. आणि सगळे पटपट उठून आपापल्या कामाला गेले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED