दोन टोकं. भाग ३ Kanchan द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दोन टोकं. भाग ३

भाग ३

विशाखा तर घरी जाऊन तिचाच विचार करत बसली होती पण हॉस्पिटलमध्ये तर हाहाकार माजला होता.
पंडितने कसंबसं त्या माणसाला handle केलं आणि त्याच्या बायकोचं बाहेर काढलेल सामान पण आत नेऊन ठेवलं.
तेवढ्यात प्रीती आली पळत पळत ,
" सर..... सर..... सर..... "

" मागे तर कोणच दिसत नाहीये 🤨 " - डॉ. पंडित

" काय 😳 "

" अगं मला वाटलं मागे कुत्र लागलं की काय पण कोणच नाहीये मागे..... 🤭🤭 "

" 😒😒 "

" खराब होता का ?? जाऊदे, बोल एवढ पळत का आलीस ?? "

" सर, मॅम असं अचानक शांत कशा झाल्या, I mean तुम्ही काय बोललात असं की मॅमनी त्यांचा डिसीजन चेंज केला...... 🤔 "

" खरं तर, हा प्रश्र्न मला पण पडलाय. मॅम पॅन्ट्री मध्ये जाताना तर एकदम रागात गेल्या आणि आलेल्या त्या वेळी एकदम कुल होत्या. आज असं पहिल्यांदा झालंय की मॅमचा राग पटकन शांत झालाय. "

" तेच ना....... सकाळी चहा घेतला नव्हता ना, मग तिथे जाऊन त्यांनी चहा घेतला असेल आणि राग कमी झाला असेल. "

" असेल तसं, बरं त्या तिसऱ्या वॉर्डच्या पेशंटच बिल बनव, बघ किती होतंय "

" हो सर... " तिला काहितती सांगून त्याने हाकलून तर लावलं पण खरच आज पहिल्यांदाच असं झालं होतं. आणि ते कसं काय याचाच विचार करत तो बसला होता.

तिथे तशी अवस्था तर इथे विशाखाची झोप उडालेली. सतत त्या मुलीचा चेहरा तीच्या डोळ्यासमोर यायचा आणि डोक्याच एकच प्रश्न,
ती पहाटे का रडत असेल आणि रडत होती पण आत्ता तर किती फ्रेश दिसत होती...... पण दिसायला कसली भारी आहे ना ती, सकाळी एकदम काकुबाई टाईप वाटली पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये हसली तेव्हा कसली भारी दिसत होती.
आणि त्यात तिचे डोळे 👀........ आईशप्पथ, झकास !! खरंच काहीतरी आहे तिच्या डोळ्यात...... माझा राग लगेच गेला सकाळी....... असं काहितरी गुण सांगून जातात तीचे डोळे. नाव पण मस्त आहे, सायली...... तिच्यासारखचं आहे तीच नाव साधं आणि सिंपल.........
आणि तसच विचार करता करता झोपून गेली ती.

उठली त्या वेळी संध्याकाळ झाली होती. आवरून लगेच हॉस्पिटलला निघाली. आज आपण जेवलो नाही हे सुद्धा लक्षात नव्हतं तीच्या. डोक्यात फक्त तीला परत भेटायचंय आणि तीच्याबद्दल त्या पेशंटला विचारायचय.
विशाखा हॉस्पिटलमध्ये आली त्या वेळेस सहा वाजले असतील. गाडीची चावी वॉचमनकडे देऊन त्याला पार्क करायला सांगून पटकन त्या पेशंटच्या वॉर्डकडे निघाली.
पण जाताना तीची पावलं अचानक थांबली, आपण त्यांना जाऊन सांगणार काय या विचाराने 😟.......
आणि एकटीच बडबडत केबिनमध्ये जाऊन बसली.
" शीट यार, हा तर विचारच केला नव्हता मी 😟. तीने जाऊन विचारणार काय की तुमची बहिण काय करते ?? आणि ती पेशंट म्हणाली का पाहिजे तर काय सांगणार‌. त्या पेशंटने जरी नाही विचारलं तरी तीचा तो अकडु नवरा नक्की विचारेल. शीट मॅन, काय विशाखा तुला साध एवढही येत नाही. मर जा रे तु, मर जा..😖" म्हणत स्वत:च्या कपाळावर मारून घेत होती.

विशाखा स्वत:शीच बडबडत होती आणि ते काहितरी विचारायला येणाऱ्या पंडितने बघितलं.
" मॅडमला काय झालं 😐😟. एकटच बडबडतायत...."

तेवढ्यात विशाखा ने वर बघितलं, पटकन डोक्याचा हात खाली घेतला. मनातच म्हणाली, " परत माती खाल्ली आता हा काय विचार करेल "

" नॉक करून येता येत नाही का दरवाजा 🤨 " तीने त्याला जरा मोठ्या आवाजातच विचारल‌ं.

" सॉरी मॅम...... "

" का आला होतास ते सांग "

" अं........ ते............ विसरलो वाटत " डोकं खाजवत तो म्हणाला. ह्या सगळ्यात तो काय विचारायला आला होता तेच विसरला.

" बर. आठवलं की परत ये. जा आता . "

" हो " म्हणून तिच्या केबीन‌बाहेर आला आणि रिसेप्शनच्या इथे जाऊन विचार करत बसला. आधीही एकदा तो नॉक न करता गेला तेव्हा असलेल्या भडकल्या होत्या जसं ज्वालामुखी पेटतो तसं पण आज काहीच नाही बोलल्या. कसं काय ??? आणि एकट्याच काम बडबडत होत्या काय माहिती ?? मला तर वाटतंय मॅम कुणाच्यातरी प्रेमात पडल्यात. आणि असा विचार करून त्याने जोरात टाळी वाजवली आणि ओरडला
" वॉव 😻👏 ".
दचकून प्रीतीने त्याच्याकडे बघितलं , " काय झालं सर. बरे आहात ना..... "

" ओह....... सॉरी सॉरी..... " म्हणून पंडित तिथून उठून निघाला खरा.
पण भलताच खुश झाला होता. कारण त्याला माहिती होतं, विशाखा लहानपणापासूनच एकलकोंडी राहिलेली आहे आणि त्यामुळे तीचा स्वभाव चिडचिडा झालेला पण मनाने खुप चांगली आहे. एका अनाथ आश्रमात वाढलेली आणि आता आपला अर्ध्याच्या वर पगार तिथे देणारी, मुलांचे भरपूर लाड पुरवणारी आणि हॉस्पीटलमध्ये सुद्धा गरिबांच बिल थोडं स्वत: भरणारी अशी आयुष्यात एकटी राहिलं की काय याची काळजी वाटायची त्याला. पण आता ती कुणाच्या तरी प्रेमात पडलीये म्हणून खुप खुश झालेला ☺️☺️.

तसाच धुंदीत चालत चालत समोरून येणाऱ्या विशाखाला धडकला,
" काय चाललंय. नीट बघून चाल ना..... "

" सॉरी मॅम, ते ....... "

" तेच कुठे लक्ष होत आणि एवढ हसायला काय झालंय. 🤨🤨 "

" कळलय मला ☺️ "

" काय 😳 "

" तुमच ते ........ 🙈." असं म्हणून तो स्वत:च लाजत होता 🤭.

" काय माझं . च्यायला जाऊदे. जा घरी निघ. " असं म्हणून ती त्या पेशंटच्या वॉर्डकडे गेली.

" हाय, आता तब्येत कशी आहे. "

" मस्त आहे ☺️ "

" ह्मममममम बाळ कसं आहे..... " बाळाच्या हातात आपल्या हाताच बोट देत तीने विचारलं.

" छान आहे. मस्त खेळतोय आता. दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय उद्या डिस्चार्ज देतील ☺️ "

ते ऐकून विशाखाचं हसूच पळालं. कसनुस हसून ती बाहेर पडली पण डोक्यात विचार चालूच होते.
" आता मी भेटणार कसं तिला 😟. यार कोण आहे काय माहिती पण आज पहाटे आणि सकाळी भेटली तेव्हापासून तीचाच विचार करतीये मी. आज पेशंटस् पण तपासले नाहीयेत. काय होतंय मला काय माहिती. कोण का असेना. आता मी तीचा विचार अज्जिबात करणार नाही 😏 "
पण कितीही ठरवलं तरीही तीचाच विचार करत होती.

आणि सायली तिथून घरी येऊन आईला सांगत होती की कसं दिदीच्या बाळाला भेटली. आणि बोलता बोलता मध्येच थांबली,
" काय झाला गं 😐 " आईने विचारलं.

" अगं आज...... " सांगताच होती की परत म्हणाली
" काही नाही "
आज ती भेटलेली डॉक्टर अशी काय होती. पहाटे बघितलं तर तिथे सिगारेट पीत बसली होती पण अर्धी संपवली नसेल तोपर्यंत तर टाकून दिली. आज पण किती रागात होती पण याला बघितलं तर माझ्याकडेच बघत बसली. इतकी बावळट दिसते का मी 😟. ती किती छान राहते नाहीतर तिच्यासमोर मी, असं वाटतं जसं मोठ्या बंगल्यामध्ये तुटकी चप्पल 🤦. म्हणूनच ती माझ्याकडे बघतच बसली. श्या.......... काय वाटत असेल तीला. आता मी कधीच जात नसते तिच्यासमोर.
चुकुन पण नाही. उद्या दिदीला डिस्चार्ज देणार आहेत तेव्हा पण नाही जाणार बाबा मी. तीच्यासमोर लाजच वाटती थांबायची आता 😖.