दोन टोकं. भाग ७ Kanchan द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दोन टोकं. भाग ७

भाग ७


विशाखा‌ आता चांगलीच बिझी दिली होती. में महिना, सगळ्यांना सुट्ट्या पण तरीही नेहमीपेक्षा पेशंटस् जरा जास्तीच होते. तिला स्वत:च्या कामातुन वेळच मिळत नव्हता. आता सकाळी ८ ला हॉस्पिटलमध्ये गेले की रात्री १० - ११ वाजायचे तिला घरी यायला.
जवळपास पुर्ण आठवडा ती आश्रमात सुद्धा गेली नव्हती.
आज शनिवार होता, तसं पटपट काम उरकुन ती आश्रमात जाणार होती कारण काका चांगलेच भडकले होते तीच्यावर. तेवढ्यात काकांचाच फोन आला, तो उचलायचा की नाही याचा विचार करेपर्यंत तर फोन वाजून कट झाला. आपण करायचा तर शिव्या मिळतील त्यापेक्षा थोडा वेळ थांबलं तर काकांचं परत करेल म्हणून ती वाट बघत होती पण नंतर काही फोन आला नाही.
त्यांचा फोन आला नाही म्हणून हीने केला तर सारखा बिझी लागायला लागला.

" आयला, एवढ कुणाला बोलत बसलाय हा काका काय माहिती "

आणि ते नेमकं पंडितने ऐकलं,
" काय झालं मॅम ?? एवढ का चिडका आवाज....." असं म्हणेपर्यंत तर विशाखा त्याच्याच अंगावर खेकसली

" मी चिडलीये का ??? मी चिडले ??? कोण म्हणलं मी चिडले ?? सांग ना "

" नाही नाही. एवढ प्रेमाने बोललेल तर आजपर्यंत मी कुणालाच बघितलं नाहीये ☺️ " खोटं हसत तो म्हणाला.

" 😒😕 "

" पण नेमकं झालंय काय ?? म्हणजे मी काही हेल्प करू का ?? "

" अरे हां काका. कधीच फोन करतीये मी पण सारखं बिझीच येतोय 😤 "

" मग कुणाला तरी बोलत असतील ना ते .... "

" नाही‌. एवढ वेळ बोलण्यासारखं त्याच्याकडे कोणच नाहीये. "

" मग परत लावुन बघा ना. "
विशाखा ने परत कॉल लावला आणि स्पीकर वर टाकला तर परत बिझी लागला फोन.

" बघ. परत बिझी 😤 "

" अं...... ते बिझी लागतंय कारण.... " असं म्हणून एक मोठा पॉझ घेतला त्याने.

" कारण.... काय कारण..... पुढे बोल ना.... कसल कारण "

" कारण त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलय. " असं म्हणाला आणि पटकन केबीनबाहेर पळून गेला.

ह्या काकाने मला ब्लॉक केलय 😵😤😤. एवढ चिडत का राव कोण. एक आठवडा तर फक्त नाही गेले त्यात लगेच ब्लॉक करण्यासारखं काहीच नाहीये. हे जरा अतीच प्रेम आहे त्याच. मी काय कुकुल बाळ आहे का, सगळं सांगत बसायला. आणि मला तसं आवडत पण नाही. दिवसभर काय काय केलं हे सांगायला rather than ऐकायला तर अजिबात नाही 😤. उगाच आपलं रटाळ बडबड करत बसायच...... 🥴.
स्वत:शीच बडबडत परत घरच्या लँडलाईन वर फोन केला. तीन रिंग झाल्यानंतर उचलला,

" हॅलो कोण बोलतय ?? "

" परी, काकाला फोन दे. "

" ओह. तु आहेस का ?? काका..... काका.... बघ तुझ्या लाडकीचा फोन आलाय. ( परत फोन कानाला लावत )
आत्ता आठवण आली का आमची 😒 "

" ए....... नकटे. गप काकाला फोन दे. आणि मी तुझ्यासारखी रिकामटेकडी नाहीये. मला भरपूर काम असतात. "

" मी नकटी 😤😤. आता देतच नसते काकाला फोन. जा तुझी काम कर. बाय . " असं म्हणून ठेवून टाकला तीने फोन.

" फोन ठेवला 😯. आता बघतेच हिला. 😤 "


गाडी घेऊन आश्रमात आली. तिला वाटलं नेहमी सारखं सगळ्या पोरी बाहेरच खेळत असतील कारण आता संध्याकाळचे ५ वाजायला आले होते. पण बाहेर कोणच नव्हतं. आता गेली तर हॉल पुर्ण रिकामा.

काका, परी, सियु, गुड्डी, अरे कुठं गेले राव सगळे. कधीच आवाज देतीये एकजण ओ देत नाहीये. किचन पालथं घातलं पण तिथे सुद्धा कोणच नव्हतं. बेडरूममध्ये जाऊन बघितलं तर तिथे पण कोणच नव्हतं. इतक्यात मागच्या बाजुने खिदळण्याचा आवाज आला.
तिकडं जाऊन बघितलं तर काय सायली सगळ्या मुलींसोबत खेळत होती.

" हाय. तु इकडे कसं काय ?? "

" काही जण वेळ देत नाहीयेत आम्हाला आणि दुस-याने दिलं तर problem " मागुन हातात सगळ्यांसाठी खायला आणताना काकाने विशाखा कडे बघुन टोमणा मारला.

" टोमणा 🤨 "

" जबरी लागला ना 😉 " काका हसत म्हणाले. तसं सगळे जण हसायला लागले मात्र सायली सोडून.

" ए नकटे तुला फार हसायला येतंय गं 🤨. फोन दे बोललं होतं ना मी, का नाही दिला तु ?? "

" बोललं नाही गं म्हणाली असं म्हणाव. " इतका वेळ गप्प बसलेली सायली नेमकी म्हणाली. पण जिला तुळशीबाग माहिती नाही तिला पुणेकरांनी व्याकरणातल्या काढलेल्या चुका काय कळणार.......

" कोण काय बोललं. ?? मी तर आत्ताच आले. मी काहीच नाही बोललय काय ?? "
विशाखा ने असं म्हणल्या बरोबर सायली ने कपाळावर हात मारून घेतला 🤦.

तेवढ्यात काकाच म्हणाले,
" तु तिला जे बोलु नको म्हणालीस, तेच ती तीन वेळेस सांगून मोकळं झाली 🤭😅 "

" काय सांगितलं मी 😕 "

" काही नाही. ये पोहे खायला. तुझे आवडीचे कांदेपोहे " काकाने कांद्यापोह्याच नाव काढुन तीच लक्ष तिकडे वळवल आणि विषय तिथेच थांबला.

मस्ती करून, भरपूर खेळून झाल तसं सायली घरी जायला निघाली आणि जाताना विशाखा आली सोडायला. विशाखा तीची गाडी घेऊन सोडायला गेली.
गाडीत जाताना दोघी शांतच होत्या. मध्येच सायली म्हणाली,

" घरी का आली नाहीस ?? काका किती चिडले होते तुझ्यावर....... फोनही करत नाहीस. "

" अरे कामातुन वेळच मिळत नाही. खुपचं बिझी होते मागचा आठवडा आणि फोनवर बोलायला मला आवडत नाही. काय बोलायच असत राव त्यात 😒 "

" खुप वेळ बोलायचं असं नाही म्हणलं मी, बोलायचं म्हणलं. मग ते पाच मिनिटं पण असु शकत ना..... आणि वेळ हा कधी मिळतच नाही. तो काढायचा असतो, आपल्या माणसांसाठी. "

विशाखा गप्पच बसली. पहिल्यांदा असं झालं होतं की तिला कोणीतरी समजवायचा प्रयत्न केलाय आणि तीने शांतपणे ते ऐकून घेतलं.
कसं असतं ना आपलं, आपण तसं तर कोणाचंच ऐकत नाही पण एखादा तरी माणूस असा असतो आपल्या आयुष्यात ज्याचं आपण ऐकतो ते ही कसलीही आडकाठी न करता.......

विशाखा शांतच होती. सायली ने दोन - तीन वेळेस तीच्याकडे बघितलं पण विशाखा ने समोरची नजर हटवलीच नाही. कंटाळून सायली पण खिडकी बाहेर बघत गाणं गुणगुणायला लागली,

कहते हैं खुदा ने इस
जहाँ में सभीके लिये
किसीना किसी को है
बनाया हर किसी के लिये.....

तेरा मिलना है उस
रब का इशारा माँनु
मुझको बनाया तेरे
जैसे ही किसी के लिये.......
❣️
आणि एवढंच बोलून गप्प बसली.

" पुढे बोल ना...... " विशाखा म्हणाली.

" काय म्हणु....... 🙁 "

" ते आत्ता म्हणत होतीस ना ते....... "

" घर आलं. आता next time. Bye ☺️ "
असं म्हणून ती गाडीतून उतरून घरी आली. पण घरी तिच्यासाठी आज तीची आरती निघणार होती हे तिला माहिती नव्हतं.
घरी आल्या आल्या तिला पप्पांनी विचारलं,
" कोणासोबत आलीस गाडीत.... "

" मैत्रीण आहे पप्पा. आत्ताच नवीन झाली आहे. त्यादिवशी तुळशीबागेत गेले होते ना तेव्हा..... चांगली आहे. "

" बरं बरं. तरी पण जरा लांबच रहायचं. "

" हो " म्हणून मान खाली घालून आत निघून गेली. गेल्यावर आईच्या मागे भुणभुण सुरु केली.

" हे पप्पा नेहमी असं काय करतात गं.... कधीच समजून घेत नाहीत. नेहमी संशय घेत राहतात. "

" संशय नाही घेत गं. तुझी काळजी करतात म्हणून तसं ..... "

" वाटलच मला‌. तु पण त्यांची साईड घे 😒 " आणि तशीच तणतणत बाहेर गॅलरीत जाऊन बसली. लक्षात आलं तसं पटकन आत जाऊन मोबाईल घेऊन आली आणि विशाखाला मेसेज केला.

विशाखा सायलीला परत काकाकडे आली. काकांनी तिच्याकडे एक नजर टाकली 🙁.

" काय झालं असं बघायला ☹️ "

" नाही असं कधी येत नाहीस ना. नेहमी तुझ्या घरी राहतेस.... " तुझ्या शब्दावर जोर देत काका म्हणाले.

" आज दिवसभर टोमणेच मारणार आहेस का तु 🤨 "

" टोमणा मारला का मी ?? खरं तर सांगितलं. तु तिथेच असतेस ना नेहमी. "

" आपण दोघांनी मिळून ठरवलं होतं ना मी तिथे रहायला जायचं मग..... "

" एक मिनिट. आपण दोघांनी नाही. तु एकटीने ठरवलं होतं ते. तुला आश्रम सोडायचं होतं. "

" आश्रम सोडायचा नव्हता रे मला. "

" मग का गेलीस. होतो ना आपण सगळे मिळून. छान एक आनंदी कुटुंबासारखे मग..... " तेवढ्यात तिचा फोन वाजला. " जाऊदे तु तुझं काम बघ. या विषयावर आपले मत कधीच नाही जुळणार. " असं म्हणून काका निघून गेले.
विशाखा ने मोबाईल घेऊन बघितलं तर सायलीचा मेसेज आला होता.

" काय करतीयेस " विशाखा ने मेसेज बघितला तर अननोन नंबर वरून आला होता पण डिपी बघून ओळखलं की हा सायलीचा नंबर आहे.

" काही नाही. तु काय करतीयेस आणि एक मिनिट, माझा नंबर कुठून मिळाला 🤨 "

" किती ते प्रश्र्न. आम्ही पुणेकर कस सहन करतो बघ तुम्हा लोकांना. " सायली ने विशाखाला मेसेज केला.

" काही पण. आत्ताच भेटलोत आणि मला सहन करतीयेस 😏. ते नंतर आधी माझा नंबर कसा मिळाला ते सांग. "

" अरे काकांनी दिला. तु त्यांचा फोन उचलत नव्हतीस तर मला करायला लावला. मी केला पण लागला नाही. "

" हो केबीनमध्ये रेंज नसते कधी कधी. बर जेवलीस का"

" नाही अजून. तु..... "

" नाही आता जेवेल. "

" जा जेव मग. नाहीतर परत काका ओरडतील. "

" हो. तु पण जा. बाय "

" बाय "
एकमेकींना बोलुन दोघींचे मुड छान झाले होते.
विशाखा पण आज घरीच राहणार होती कारण उद्या सुट्टी होती आणि त्यामुळे काका फुल खुश होता. काका सोबत सगळ्या पोरी पण........
आणि सायलीचा मुड चेंज झाला म्हणून तीची आई खुश होती.