जुळले प्रेमाचे नाते - भाग-७३ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-७३

"देव तुमचं बाथरूम खुप मोठं आणि आलिशान आहे..."

"म्हणजे काय. माझ्या वडिलांनी ते मोठया डिझाइनर कडुन करवून घेतले आहे. आवडलं ना तुला...."

"हो खरच खूप मस्त आहे.."

"प्रांजल एक बोलु का...??"

"हो बोल ना..."

"प्रांजल मला तू खुप आवडतेस. आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.."

"देवांश तु वेडा आहेस का.. आपण अजून खुप लहान आहोत आणि लग्न वैगेरे तर खूप दूर आहे. मी तुला फक्त माझा मित्र मानते. तस काही ही माझ्या मनात नाही आहे.."


"अग आता लग्न करायचं बोलत नाही आहे. नंतर करू पण तू मला होकार तर दे.. मला तू हवी आहेस.., माझं बनवायचं आहे मला तुला."

"हे बघ देवांश मला वाटत आपण बाहेर जाऊया. मला भीती वाटत आहे."

"तु मला घाबरू नकोस. काही होणार नाहीये..आणि मी तिचा हात धरला. मग मी तिला माझ्या जवळ खेचल आणि किस करण्याचा प्रयत्न केला. पण ती शहाणी.., तिने लगेच माझ्या पायांच्या मध्ये लाथ मारली तसा मी खाली कोसळलो... आणि ती माझ्या हातातून सटकली आणि बाथरूम चा दरवाजा उघडून पळाली. पण मी ही काही कमी नव्हतो. कसा तरी उठुन बाहेर आलो. तिने लगेच अभि ला आणि तिच्या भावाला जाऊन सगळं सांगितलं तसे तिघे ही घाबरले."


"देवांश दादा.., तु माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत का अस
केलंस ती रडते आहे. मी आता काकांनाच सांगणार आहे तुझं हे वागणं.." अभिलाषा मला धमकी देत होती. हे ऐकून तर माझं डोकच फिरत. मी तसाच किचनमध्ये गेलो आणि एक चाकु घेऊन आलो. स्वतःच्या हाताच्या पंजाला मी कापलं.. आणि सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली.."


"तिला जवळ बोलावल पण ती काही येत नव्हती. मग मला तिच्या भावाला त्रास द्यावा लागला. तेव्हा कुठे प्रांजल माझ्या जवळ यायला तय्यार झाली..

"प्रांजल आहे ना तुझा होकार..???" मी तिच्या भावाच्या गळ्यावर सुरा ठेवला तेव्हा कुठे ती मला होकार देणार होती. पण तितक्यातच माझे आई-वडील आणि प्रांजल चा मामा तिथे टपकडे आणि त्यांनी सर्व काही पाहिलं.."


"खरतर ते तेव्हा आले नसते तर आतापर्यंत प्रांजल आणि माझं लग्न झालं असत. झालेला प्रकार त्या अभिलाषा ने माझ्या वडिलांना सांगितला. तेव्हाच ते मला जेलमध्ये पाठवणार होते पण माझ्या आईमुळे मी वाचलो.. झालेल्या प्रकारमुले वडिलांनी प्रांजल आणि तिच्या फॅमिली ची माफी मागितली आणि मला कायमच माझ्या काकांकडे यूएस ला पाठवून दिलं."


"तिकडे ही माझ्यावर ट्रीटमेंट चालू होती कारण मी प्रांजल ला विसरूच शकत नव्हतो. शेवटी कसे तरी वर्ष लोटून शिक्षण पूर्ण करून मी परत इंडया मध्ये आलो. पण तोपर्यंत हिच्या मामाने ही घर बदललं होत. खुप प्रयत्न मारून हिचा
पत्ता शोधला."


"आणि त्यात मला नशिबाने साथ दिली. बाबांचं ट्रान्सफर इथे झालं आणि मला हिची माहिती मिळवण सोपं झालं.. त्यांनतर मी सगळी माहिती मिळवली.. प्रांजलचे फ्रेंड्स कोण आहेत, कॉलेज कोणतं आहे. प्रत्येक क्षण मी तिच्यावर लक्ष ठेवुन असायचो. त्यानंतर एकदा काही मुलांनी तिची छेड काढायचा प्रयत्न केला.. मी जाणारच होतो. तेव्हाच मला माझी ओळख करून द्यायची होती पण हा राज मध्ये आला आणि त्याने तिला वाचवलं.. त्यामुळे मला तिथून जावं लागलं."


"त्यानंतर तिचा झालेला ऍकसिडेंट आणि नंतर हर्षल ने तिला जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न.. ते मी हॉस्पिटलमध्ये निशांत आणि डॉक्टरला बोलताना ऐकल होत. आणि तेव्हाच माझं डोकं फिरत आणि मी त्या संधीचा फायदा घेऊन त्या हर्षलचा ऍकसिडेंट केला. आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली. जरी शंका आली असती तरी ती निशांतवर आली असती कारण शेवटचा हर्षल ला भेटलेला हा निशांतच होता आणि ज्याला सेक्युरिटी ने पाहिलं होतं."


"त्यानंतर तिच्या बर्थडे ला मीच वेगवेगळी गिफ्ट राजच्या घराच्या जवळून पाठवत होतो जेणेकरून सर्वाना राज वर शंका येईल आणि प्रांजल या दोघांपासून दूर जाईल. पण तस काहीच झालं नाही.. आणि शेवटी तुम्ही मला पकडलं.." एवढं बोलून देवांश शांत झाला...


यासर्वात मी अर्थमेली झाले होते.. आतापर्यंत विसरून गेलेलं दुःख परत त्यावरून त्याच व्यक्तीने खपली काढली होती.. मी आईला बिलगुन रडु लागले.. आणि आम्ही बाहेर आलो.

राज ही हर्षलचा खून केला म्हणून देवांश वर धावून गेला. पण मिस्टर गोखल्यांनी आणि निशांतने त्याला पकडलं आणि बाहेर घेऊन आले. बाहेर बाबांनी सर्व फॉर्म भरले आणि आम्ही घरी आलो..

घरच वातावरण खूपच खराब झालं होतं. यासर्वाचा परिणाम माझ्यावर झालेला. पण मला भीती होती ती निशांत माझ्यावर रागावणार तर नाही ना याची... कारण मला त्याला जमवायचं नव्हतं.
मी माझ्या रूममधे बसले असता तो आला....


"हे हनी-बी.. एवढी शांत मला आवडत नाहीस हा तु.. मला माहित आहे की जे काही झालं त्याने तु खूप थकली आहेस.. तुला आरामाची गरज आहे. आराम कर तु.." एवढं बोलून निशांत जायला निघाला.

"निशांत तु रागावलास का माझ्यावर.. तु मला सोडून तर जाणार नाहीस ना..??" मी हुंदके देत विचारलं.



To be continued....