तुझाच मी अन माझीच तू...भाग १ Anuja Kulkarni द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझाच मी अन माझीच तू...भाग १

तुझाच मी अन माझीच तू...भाग १

रात्री चा १ वाजून गेला होता... आभाने आई बाबा झोपलेत ह्याची खात्री करून घेतली.. मग ती तिच्या खोलीत आली आणि खोलीचे दार लाऊन घेतले.. तिचं टेन्शन वाढलं होत.. तिने एकदा कॅलेंडर पाहिले आणि शेवटी कपाटातून प्रेग्नसी कीट बाहेर काढली. आणि तिने प्रेग्नन्सी टेस्ट करायचा निर्णय घेतला.. तिचे हृदय जोरजोरात धडकत होते. तिला खूप टेन्शन आलं होतं. थोड रीलाक्स होण्यासाठी तिने राजस ला फोन लावला. त्याने सुद्धा फोन लगेच उचलला,

"आभा.. इतक्या रात्री फोन? बर वाटतंय ना?"

"टेन्शन आलाय...आत्ता प्रेग्नेन्सी टेस्ट करणारे.."

"ओह.." राजस इतक बोलला आणि एकदम शांत झाला..

"काय होईल रे राजस?"

"चूक झाली.. आता होईल ते बघू..मी येऊ का आत्ता? काहीतरी सोक्ष मोक्ष लावण गरजेच आहे ना.."

"नो नो.. आत्ता कसला येतीयस? १ वाजून गेलाय..आई बाबा झोपलेत.. तू आलास की उगाच काहीतरी शंका यायची त्यांना..." आभा टेन्शन मधेच बोलत होती..

"ठीके..आणि कळलं तर काय? चिंता सोड!! आणि महत्वाचे म्हणजे यु किप काम.. आणि काही झाल तरी खचून जायचं नाही.."

"हो... आता ठेवते रे फोन.." आभा ने लगेच फोन बंद केल.. राजस ची सुद्धा झोप उडली होती...तिने हे राजस ला फोन करून सांगितले पण त्याला ह्या क्षणी राजस ला आभा बरोबर असण्याची कमी जाणवत होती. पण इतक्या रात्री राजस तिच्यापाशी येण शक्य नव्हत. ह्याची तिला जाणीव होती... आभा ला प्रचंड ताण जाणवत होता.. तिच्या मनावर ताण होता.. तिने देवाचे नाव घेतले आणि टेस्ट केली.. तिच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते... सगळीकडे फक्त अंधार आणि नकोशी वाटणारी शांतता होती. आणि त्यात घड्याळाचे काटे पुढे सरकत नव्हते. आता आभा प्रेग्नन्सी टेस्ट रिझल्ट ची वाट पाहत होती.. एक एक क्षण पुढे सरकत होता अगदी संथ गतीने.. आभा ने तिच्या हातची बोटे मोडली...दीर्घ श्वास घेतला आणि तेव्हाच तिच्या डोळ्यासमोर राजस ची भेट आणि जुने दिवस यायला लागले.. आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू यायला लागले आणि तिचा ताण हलका होत होता.. तिच्या विचारांची सुरवात झाली ती ऑफिस च्या पहिल्या दिवसाने...आणि तिने टेन्शन कमी व्हायला लागले..

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आभा राजस बरोबर च्या जुन्या आठवणीत रमली... आणि सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यावर एखाद्या स्लाईड शो प्रमाणे जायला लागला... आभा चा ऑफिस चा पहिला दिवस-

लवकर आवरून आभा ने स्कुटी चालू केली आणि ती ऑफिस ला जायला निघाली.. ती ऑफिस च्या बिल्डींग बाहेर आली आणि तिने ऑफिस बिल्डींग कडे पाहिलं..

"येस येस येस....." ऑफिस ची बिल्डींग पाहून आभा खुश होऊन मोठ्याने बोलली.. तिने २ मिनिटे डोळे मिटून घेतले आणि दीर्घ श्वास घेऊन ती ऑफिस बिल्डींग मध्ये शिरली..

"वॉव.. कसलं भारी ऑफिस आहे...फायनली ड्रीम जॉब अॅट ड्रीम प्लेस..आता नो लुकिंग बॅक..माय न्यू जर्नी बिगिन्स..." आभा ने पूर्ण ऑफिस मध्ये नजर फिरवली. ऑफिस एकदम मस्त होतं. आभा इकडे इकडे पाहत होती.. तितक्यात समोरून पुष्पगुच्छ घेऊन एक मुलगा आला. तिने त्याच्याकडे एक नजर पहिले... त्याने सुद्धा तिच्याकडे पहिले... आभा खूप सुंदर दिसत होती. तिने घातलेला हाय पोनी तिच्या चेहऱ्याला एकदमच सूट होत होता... आणि हाय पोनी मुळे तिचा चेहरा अजूनच उठून दिसत होता... त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. तो सुद्धा काहीतरी पुटपुटला... अर्थात ते आभा ला ऐकू गेले नाही.

आभाने सुद्धा त्याच्याकडे एक क्षण पहिले आणि ती त्याच्याकडे पाहतच राहिली.. तो एकदम रुबाबदार, देखणा आणि आकर्षक... फ्रेंच बिअर्ड त्याच्या चेहऱ्याला खूपच शोभून दिसत होती.. आभाच्या तोंडून नकळत 'वॉव' बाहेर पडले..पण आपण काहीतरी चुकीचे बोललो ह्याची तिला जाणीव झाली...तिने जीभ चावली आणि ती स्वतःशीच पुटपुटली, "अशी मस्त मुलं काम करतांना आजूबाजूला असतील तर अजूनच मज्जा..." आभा हसली.. आणि तिच्या ह्या बोलण्याचा काय अर्थ हे तिला सुद्धा कळल नाही. पण त्या मुलाने कदाचित आभा चे बोलणे ऐकले.. पण त्याला नीट ऐकू आलं नाही म्हणून त्याने आभा ला प्रश्न केला..

"ह काय बोललीस?"

"नो नो.. तूला काही नाही बोलले..."

"ओके नो प्रॉब्लेम.. बाय द वे तू?"

"मी आभा... आज पहिला दिवस.. ऑफिस पाहिलं... छान आहे..."

"मग आहेच ऑफिस मस्त... आणि ऑफिस मध्ये काम करणारे सुद्धा बरका.." पुष्पगुच्छ देत तो बोलला..

"ओह..फुलं? सो नाईस... फुलांचा गुच्छ मला फार आवडतो.. आणि गुलाब माझं आवडत फूल.... थँक्यू..ओह सॉरी विसरलेच... तुझं नाव?" तितक्यात तिच लक्ष त्याने घातलेल्या बॅच कडे गेलं..."ओह तू राजस...पण तुला माहिती की मी आज जॉईन होणारे?."

"येस, मी राजस..आणि तुला माझ नाव कसं कळलं?" राजस ने थोडा विचार केला..."ओह..माझा बॅच पाहून.. मी पण विसरलोच ग.. हा इतका भला मोठा बॅच घालून मिरवत असतो..पण नो पर्याय.. आणि फुलं? नो ग.. तुला म्हणून नाही आणली ही फुले..मी रोज फुलं आणून माझ्या डेस्क वर ठेवतो.. आज तू जॉईन झालीस सो तुला दिली फुलं..तुझा पहिला दिवस मस्त झाला पाहिजे.. "

"ओह माय.. थँक्यू राजस... आणि तू सिनिअर लेवल ला आहेस..... वॉव..!"

"ह.. इथे लास्ट इयर आलो पण आधी आहे थोडा फार अनुभव..."

"ग्रेट...सो यु कॅन हेल्प मी....बर सांग, मी कुठे बसायचे आहे?"

"ह..नक्की.. मी तसा हेल्पिंग आहे.." इतक बोलून राजस हसला.. "हा माझ्या समोर चा डेस्क तुझा आहे..."

"ओह.. गुड गुड! म्हणजे काही शंका आल्या तर तुलाच विचारेन.."

"कधीही.. बाय द वे, आता आपण सारखे समोरासमोर असणार.."

"हो..मग काय झालं? काही प्रॉब्लेम आले तर लगेच सोल्व्ह होतील...बाकी काय?" राजसचा रोख न कळल्यामुळे आभा ने त्याला प्रश्न केला. आभाच बोलण ऐकून राजस हसला...

"असच....पण जस्ट अ वॉर्निंग, जपून राहा.. तुझ्या तोंडासमोर मी सारखा असेन मग माझ्या प्रेमात बिमात पडशील बघ..." राजस हसू कंट्रोल करत बोलला.... राजस पहिल्याच भेटीत एकदम प्रेमाच्या गप्पा मारला लागला ही गोष्ट आभा ला आवडली नाही पण त्याचा आत्मविश्वास पाहून आभा ला एकदम हसूच आलं.

"ओह हो.. डायरेक्ट प्रेमाची भाषा? आज माझं ऑफिस चा पहिला दिवस... आपण काही मिनिटांपूर्वी भेटलो.. तरी इतका आत्मविश्वास?"

"आहे मला आत्मविश्वास लहानपणापासून... आणि गट फिलिंग यु सी.." राजस फुशारकी मारत बोलला.

"ओह वॉव... तुला वाटत असेल की मी तुला पाहताक्षणी प्रेमात बिमात पडेन... पण लेट मी बी क्लिअर... मी इतक्या लगेच मैत्री सुद्धा करत नाही... सो आधी ओळख होऊ दे मग मैत्री.. आधी मित्र तर होऊन दाखव... प्रेम बीम लई वेळ आहे..दिवास्वप्न पाहू नये राजस!! आणि टू बी फ्रॅंक, माझा लव्ह अॅट फर्स्ट साईट वर विश्वास नाही बर का...आणि माझा मित्र होण देखील इतक सोप्प नाही.. फॉर युअर इन्फोर्मेशन मी फार चूझी आहे मित्रांच्या बाबतीत सुद्धा.."

"आखडू आहे अस दिसतंय पण माझा तर विश्वास आहे लव्ह अॅट फर्स्ट साईट वर.. आज पर्यंत खूप जणींना भेटलो.. पण आज आभा ला पाहता क्षणी दिल मे हजारो गिटार बजने लागे.. हे न काहीतरी विचित्र आहे...आधी कधी असं काहीच झालं नव्हत मला.. पण जरा सांभाळून बोलायला हव.. उगाच डोक्यात राग बिग घालून पहायची सुद्धा नाही.." राजस स्वतःशीच पुटपुटला आणि मग तो आभा शी बोलायला लागला, "ओह हो... मैत्रीत पण चूझी आहेस तर... बघू आपण!!"

"काय बडबड करतोस रे तोंडातल्या तोंडात? मगाशी पण काहीतरी पुटपुटत होतास.. "

"तुला कळायला पाहिजे असं काही नाही..."

"मग मनात बोल की.. आणि किती आत्मविश्वास आहे न तुला...आज तर पहिला दिवस आहे माझा... इतकी घाई नको करूस...."

"आणि बर ठीके चल.. दिला तुला वेळ.. बट लेट्स सी बर.. अगदी लव्हर नाही तरी आय फिल फ्रेंड तर होशीलच..मान्य करतो मी जरा जास्ती केल.. पण मैत्री करू शकतेस ना..."

"बघू..आत्ता सांगता येणार नाही.. " आभा आखडूपणे बोलली...

क्रमशः..