Tujhahch me an majhich tu..-7 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग ७

तुझाच मी अन माझीच तू...भाग ७

आभा ला रायन बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती. पण राजस लगेच काहीच बोलणार नव्हता.

"सांगतो ते ऐक ग... उगाच स्वतःला जास्ती भारी समजून वागू नकोस!! मी तुला सकाळीच सांगणार होतो की स्टे अवे फ्रोम रायन...आणि आत्ता पण सांगतो, जास्ती नादी लागू नकोस त्याच्या.. हे ऐक ग.. "

"पण का?"

"आज पहिला दिवस आहे तुझा.. कर की एन्जॉय!! इथे मस्त काम एन्जॉय कर.. बाकी कश्याच्या फंदात पडू नकोस!!"

"ठीके.. मी इथे नवीन आहे सो ऐकते तुझ.. चलो.. माझ खाऊन झालं.. आता मी जाते.. थोड काम करून विल लिव्ह द ऑफिस.."

"ओके...आणि गुड!!"

"बी द वे, थँक्यू फॉर मेकिंग माय डे इंटरेस्टिंग!! पण पहिल्याच दिवशी वडा पाव देऊन माझ्या डाएट ची वाट लावलीस.." आभा हसत बोलली..

"ओह.. यु आर वेलकम!! आणि अजून मस्त वाटेल बघ इथे सेट झालीस की.. आणि तू आहेस की मस्त फिट.. पण मन मारून का जगायचं? जे हवं ते खायचं आणि भरपूर व्यायाम करायचा.. मन हेल्दी हवं आणि बॉडी सुद्धा!!"

"अरे वा.. ह्या विषयात सुद्धा अभ्यास आहे तर.. सो ओव्हरऑल तू ऑल राउंडर आहेस."

"आहेच...कधी काही मदत लागली तर विचारू शकतेस... मी काय तुझ्यासारखा आखडू नाही.."

"नो नीड ऑफ युअर टॉंट राजस.. आय नो माझं वागण चुकीचे नाहीये.. मग मी कशाला दुसऱ्याला खुश करायला वागू ना.."

आभा हे बोलली आणि राजस ने कपाळावर हात मारून घेतला.. आणि आभा ला नमस्कार केला.. राजस चे हे वागणे पाहून आभा ला हसू आले.. मग राजस सुद्धा तिच्या हसण्यात सामील झाला.. दोघे मनसोक्त हसले.. आणि कॅँटीन मधून बाहेर पडले..

आज ऑफिस च्या पहिल्या दिवशी आभा च्या बऱ्याच नवीन ओळखी झाल्या होत्या. आणि तिला हे ऑफिस, ऑफिस मधले लोकं आवडले होते.. खास करून राजस!!त्याचा स्वभाव वेगळा होता.. त्याचं वागण इतरांपेक्षा वेगल्होत.. आपुलकीच होते. आभा ने राजस ला काही दाखवले नव्हते पण तिला राजस बद्दल आकर्षण वाटायला लागले होते.. हे फक्त इनफॅक्चूएशन आहे ह्याची तिला जाणीव होती कारण अर्थात, इनफॅक्चूएशन आणि प्रेम ह्यातला फरक आभा ला व्यवस्थित माहिती असल्यामुळे ती शांततेने वागण्यात यशस्वी होत होती.. आभा ला हे माहिती होते की प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नसते.. प्रेमात एकमेकांना पारखून घेणे महत्वाचे असते ह्याचा अंदाज आभा ला होता.. त्यामुळे ती कोणीतीही घाई अजिबात करणार नव्हती. ती मनोमन हसली.. राजस मात्र स्वतःच्या धुंदीत जगत होता. त्याला सुद्धा फार काही नाही पण किमान आभा शी मैत्री करण्याची मनापासून इच्छा होती. आणि त्याला खात्री सुद्धा होती की आभा त्याच्याशी मैत्री नक्की करणार पण त्याला सुद्धा अंदाज आला होता की आभा इतकी सहज सहजी मैत्री सुद्धा करणार नाही. राजस ला आभा मध्ये एक स्पार्क दिसला होता आणि त्या स्पार्क मुळे तो आपसूकच तिच्याकडे ओढला जात होता. दोघांच्या आयुष्यात खूप काही बदल होणार होते पण बदल कसे आणि काय ह्याची कल्पना दोघांनाही नव्हती.

कॉफी पिऊन फ्रेश झाल्यावर थोडा टाईमपास करून राजस परत कामाला कागल.. आभा ला काहीच काम नसल्यामुळे ती मात्र आता ऑफिस मध्ये थांबणार नव्हती.. तिने तिचा डेस्क स्वच्छ आवरला आणि समोर ठेवलेल्या मूर्तीला नमस्कार करून येणे आपली पर्स उचलली आणि ती जायला लागली.. तिने आजुबाजूला पाहिले.. राजस एकाग्र चित्ताने त्याचं काम करत होता.. आभा ने त्याच्या कडे पाहिलं आणि आपसूकच तिच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल आली..

"राजस कडे पाहिलं की त्यावरून नजर हलत नाही.. काही म्हणा कूछ तो बात है राजस मे.. मजा येणारे इथे काम करतांना... पण आभा बाई, आपलं मेन एम विसरू नका... बाकी सगळ साईड बाय साईड चालू दे.. पण कामावरून मात्र लक्ष विचलित होता कामा नाही..." आभा स्वतःशी बोलली आणि तिच्या चेहऱ्यावर परत हसू आले.. ती ऑफिस मधून बाहेर जायला लागली. तितक्यात समोरून नेहा आली.

"हेलो आभा..."

"हे नेहा..आज काम होत ना तुला? राजस म्हणाला मला.."

"हो ना.. आमचा प्रोजेक्ट लास्ट स्टेज ला आलाय.. सो काम वाढलय.. पुढचे १० दिवस खूप काम असणारे..." कपाळावर हात लावत नेहा बोलली.. "पण मजा येते..."

"ओह... मला अजून काम मिळायचं आहे सो जरा आरामात आहे... सो आता निघातीये.. उगाच थांबून काय करू ना.."

"खर तर मी तुझी सगळ्यांशी ओळख करून दिली असती पण नेमक काम.." नेहा उसासा घेत आभा कडे पाहिलं, "तुझा पहिला दिवस सो कर आज मजा... आणि बाय द वे, हाऊ वॉज युअर फर्स्ट डे? यु एन्जोइड? ऑफिस आवडल ना? आणि आपले कलीग्स? छान आहेत इथले सगळे.." आणि तिने आभा ला प्रश्न केला...

"नो इट्स ओके अग.. झाल्या बऱ्याच लोकांशी ओळखी... आणि आज मजा आली.. तुझ्या बेस्टी बरोबर भांडण मग आता कळतंय छान आहे तो सुद्धा.. हेल्पिंग.."

"आहेच राजस हेल्पिंग! आहेच..आणि हो तसा भांडखोर सुद्धा आहेच.. आणि इगो तर खच्चून भरलाय.. तो शक्यतो हार मानत नाही.. पण तुझ्या समोर त्याचं काहीच चालले नाही... मला तर फार मजा आली होती त्याचा पडलेला चेहरा बघून..." नेहा ने आभा ची टाळी घेण्यासाठी हात पुढे केला, "दे टाळी.." नेहा चे ते वागणे पाहून आभा ला एक मिनिटे काही समजलेच नाही..

"तू राजस ची खास फ्रेंड आहेस ना नेहा.. तरी तुला इतकी मजा का आलीस?" प्रश्नार्थक मुद्रेने आभा ने नेहा ला प्रश्न केला..

"तुला नाय कळणार आभा.. तुझा आज पहिला दिवस आहे.. राजस वाईट नाही पण त्याला सतत वाटत असत की त्याच्यासमोर सगळ्यांनी हांजी हांजी कराव.. पण तू त्याला अजिबात भाव दिला नाहीस.. नेहा आणि आभा राजस बद्दल बोलत होत्या.. राजस आभा चा खास फ्रेंड असल्यामुळे ती त्याच्याबद्दल भरभरून बोलत होती..

"येस येस.. आय नो अबाउट हिज इगो... मला चांगलाच प्रत्यय आलाय.. पण मी स्वतः वर कोणालाही हावी होऊ देत नाही.. "

"मला तेच तर आवडलं आभा... वेलडन..."

"येस.. बाय द वे निघते मी... तू येणारेस की काम आहे तुला?" आभा ने प्रश्न केला..

"मला आहे ना काम.. नाही निघता येणार लगेच.. तू जा... उद्या भेटूच!!"

"येस मी पळते.. आज मजा आली...आणि येस..थँक्यू..." आभा हसून बोलली

"अ.. थँक्यू का?" प्रश्नार्थक चेहऱ्याने नेहा ने प्रश्न केला..

"असच ग..तू कर काम एन्जॉय!!" आभा निघायची तयारी करायला लागली.

"ओके.. हे थांब.. तुझा मोबाईल नंबर देऊन ठेव.. मी विसरलेच तुझा मोबाईल नंबर मागायला.." कपाळावर हात मारत नेहा बोलली आणि हसली.. आणि तिच्या हसण्यात आभा सुद्धा सामील झाली..

"हो की.. आजचा दिवस संपतोय आणि माझ्या डोक्यातून मोबाईल नंबर घ्यायचं डोक्यातूनच गेल.."

"तुझा नंबर दे.. मग मी मिस्ड कॉल देते तुला.."

नेहा ने आभा चा मोबाईल नंबर घेतला.. आणि तिला मिस्ड कॉल दिला.. मग आभा ने नेहा ला बाय केल आणि ती निघाली.. जाता जाता तिने एक कटाक्ष राजस कडे टाकला पण तो काम करत होता आणि त्याला डिस्टर्ब करावं अस आभा ला वाटलं नाही... ती फक्त हसली... आणि पर्स खांद्याला अडकवली... आणि चालायला लागली.. ती राजस च्या इथून पास झाली.. तिच्या परफ्युम च्या सुगंधामुळे राजस चे लक्ष विचलित झाले.. त्याने मान वर करून पाहिले.. पण आभा ला पाहून मान खाली वळवली..त्याला त्याच काम पूर्ण करायचे होते.. आणि तो परत कामाला लागला.. राजस च्या ह्या वागण्यामुळे आभा थोडी खट्टू झाली पण पुढच्या क्षणी ती परत नॉर्मल झाली आणि तिथून निघून गेली.. पण राजस च्या मनात एक वेगळाच प्लान शिजायला लागला होता.. तो स्वतःशीच हसला आणि परत कामाला लागला..

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED