तुझाच मी अन माझीच तू...भाग ५ Anuja Kulkarni द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझाच मी अन माझीच तू...भाग ५

तुझाच मी अन माझीच तू...भाग ५

रायन फार काही चांगला नाही हे आभा ला जाणवले होते आणि त्यामुळे रायन शी बोलतांना आभा चा आवाज मध्ये थोडा चढला होता तेव्हा राजस चे तिच्याकडे लक्ष गेले होते... आणि तो आभा रायन ला काय प्रतिसाद देते हे पाहत होता. आभा ने रायन ला भिक घातली नाही हे पाहून राजस ला हसूच आलं. रायन तसा ऑफिस मध्ये फेमस होता तो त्याच्या अॅऱोगंट आणि केअरलेस वागण्यामुळे.. पण राजस ला तो कसा आहे हे सुद्धा चांगले माहिती होते... त्याने आभा ला वॉर्न करायचा विचार सुद्धा केला होता पण त्याने तो विचार झटकला.. काही सांगायला गेलो तर आभा त्यालाच काहीतरी सुनावेल अशी खात्री राजस ला होती सो त्याने आभा च्या जवळ पास राहायचा निर्णय घेतला होता.

आभा साठी ऑफिस चा पहिला दिवस फारच इंटरेस्टिंग झाला होता.. सकळी राजस आणि आत्ता रायन!! हे होण साहजिक होतं कारण आभा एकदम आकर्षक होती. तिचे डोळे एकदम बोलके होते आणि तिला पाहून तिच्याकडे न बोलणारे स्वतःला बावळट समजायला लागायचे.. आभा च्या येण्यानी ऑफिस मधले बरेचसे लोकं सावधान मोड मध्ये राह्यला लागले होते. बरेच जण आभा येऊन बोलेल ह्याची वाट पाहत होते. पण रायन आणि राजस एकदम वेगळे आहेत ह्याची जाणीव तिला झाली होती.. राजस ला भेटल्यावर तिला एक पोझीतीव्ह फिलिंग आले होते आणि त्या विरुद्ध रायन ला भेटून तिला थोडे नकारात्मक फिलिंग आणि नजरात्मक व्हाईब आली होती.. ती आता रायन च्या जास्ती नादी लागणार नव्हती पण इतक्या सहज सहजी रायन तिचा पिच्छा सोडणार नव्हता.. आभा ला ह्या बाबतीत काहीच अंदाज नव्हता पण राजस मात्र आता अलर्ट झाला होता..पण त्याने उघड उघड आभा ला काहीच कळू दिले नाही. पण त्याला आभा शी जरा बोलायचं होत. त्याने घड्याळ पाहिले.. घडल्यात ४ वाजून गेले होते.. आणि त्याला कॉफी ची तल्लफ आली होती... तो त्याच्या डेस्क वरून उठला आणि आभा च्या डेस्क समोर येऊन उभा राहिला.. ती काहीतरी वाचत बसली होती.. अजून तिला काम मिळायचे होते पण तिने काहीतरी नवीन शोधून काढाल होत आणि ते ती वाचत होती..

"काय करतीयेस?"

"थोड वाचतीये.."

"ह? तुला अजून काहीच काम नाही ना दिलंय?"

"येस... पण जरा अपडेट करते स्वतःला.. वेळ फुकट काशाल घालवू ना?" आभा हसून बोलली..

"नाईस... वेळ वाया घालवत नाहीस.. मी तर पहिल्या दिवशी एकदम आरामात होतो.. म्हणजे काम मिळेपर्यंत... मी तर कॉमिक्स वाचत बसायचो..." राजस स्वतःशीच हसून बोलला, "बाय द वे, यु विश टू हॅव्ह कॉफी? कॅन यु कम विथ मी?" राजस ने आभा ला प्रश्न केला.. आभा ने त्याच्याकडे पाहिलं.. आणि ती हसली..

"आत्ता तू एकदम नॉर्मल वागलास.. सो आय लाईक्ड इट... नॉर्मल वाग मग कधी तरी आपण फ्रेंड्स होऊ शकतो.." आभा ने त्याच्याकडे एक टक पाहिलं आणि ती बोलली.. आभा च बोलण ऐकून राजस ने विचार करतोय अशी अॅकटिंग केली आणि तो बोलायला लागला,

"ओह हो.. मी आत्ता फ्रेंड शिप बद्दल काही बोललो देखील नाही.. तरी तू का बोलातीयेस? आय थिंक, तुझ्या मनात आहे माझ्याशी फ्रेन्डशिप करायचं.. पण तुझा आखडू स्वभाव मान्य करू देत नाहीये.. करेक्ट का?" आता मात्र राजस ने हसू कंन्ट्रोल केले नही.. पण आभा मात्र कावरी बावरी झाली.."

"असं काही नाहीये.. मी तुला फक्त हिंट दिली मी कधी फ्रेन्डशिप करू शकते.." सावरासावर करत आभा बोलली..

"हो हो.. कळलं.. फ्रेन्डशिप व्हायची असेल तर होणारच ग.. त्याच टेन्शन नाही.. तुला वाटल मी तुझ्या फ्रेन्डशिप च्या योग्य आहे तर कर माझ्याशी मैत्री... मी आता अजिबात फालतू काही बोलणार नाहीये.. आणि हे खूप सिरिअस होऊन बोलतोय..पण आत्ता फ्रेन्डशिप पेक्षा जास्त गरज कॉफी ची आहे ग..कॉफी ची तल्लफ मैत्री करण्यापेक्षा जास्त महत्वाची आहे..." राजस ने आभा ला मिश्कील उत्तर दिलं. "येतीयेस का? म्हणजे येच ग..प्लीज! बोअर निशा ला काहीतरी काम पूर्ण करायचं आहे सो ती येत नाहीये...आणि मी एकटा नाही पीत कॉफी... कॉफी ची मजा कोणाबरोबर असताना येते ग."

"ओके ओके.. फॉर अ चेंज आय अग्री.. एकट्याने कॉफी पितांना बोअर होत.. आणि मला सुद्धा कॉफी हवीये आत्ता.. आय वॉज थिंकिंग टू गो टू ड्रिंक कॉफी...पण मला तल्लफ बिल्लफ येत नाही!!" आभा हसली, "आणि तू इतका कसा बदललास रे.. सकाळी तर किती डेस्पो होतास फ्रेन्डशिप साठी... आणि आता फ्रेन्डशिप व्हायची असेल तर होणारच असं बोलतोयस.."

"मी लाईन मारून पाहिली ग सकाळी.. पण तू अगदीच भाव नाही दिलास.. आलो मग नॉर्मल ला.. सो जस्ट युअर कलीग नाऊ.. खडा टाकून पाहायचा... इफ इट वर्क्स देन ग्रेट.. नाहीतर नॉर्मल वागायचं!! सो बदलायचा प्रश्न नाहीच.. आणि नो हर्म इन ड्रिंकिंग कॉफी विथ अ कलीग... बरोबर?"

"येस... आले चल.." राजस चे बोलणे ऐकून आभा ने पुढे काही न बोलता लॅपटॉप बंद केला आणि ती उठली..

आभा आणि राजस कॅन्टीन मध्ये गेले. कॅन्टीन पूर्ण रिकाम होत.. आणि ते पाहून राजस खुश झाला.. तो लगबगीने कॉफी आणायला गेला राजस कॉफी घेऊन आभा समोर येऊन बसला..

"हे.. मी आणली असती की माझी कॉफी!! आणि व्हाय यु पेड फॉर माय कॉफी?"

"चिल ग आभा... उद्या तू दे माझ्या कॉफी चे पैसे.. आणि माझी आणणार होतोच मग विचार केला, आज तुझा पहिला दिवस.. सो आणून देऊ आभा ला कॉफी.. ऑफिस मध्ये वेलकम करो कॉफी देऊन!!" राजस ने एकदम गुड बॉय स्माईल दिली.. आभा ने सुद्धा त्याच्याकडे पाहत एक छोटी स्माईल दिली..

"थँक्यू... आणि उद्या आठवण कर मी देईन तुझे पैसे.. "

"पैसे पैसे अति करतेस ग तू.. आणि इथे स्वस्त मिळत.. सो डोंट थिंक, तू माझ बरंच देणं आहेस.. तू आज काही देण लागत नाहीस कधी पुढे झालं तर मात्र मला माहिती नाही.." भुवया उंचावत राजस बोलला आणि मनात हसला..

"ह? कधी पुढे झालं तर मात्र मला माहिती नाही? तुझा रोख नाही कळला.."

"असच म्हणालो ग... मला पाहायचं होत.. तू किती नीट ऐकतेस.." राजास ने विषय बदलला... राजस च्या बोलण्यावर आभा ने कपाळावर हात मारून घेतला..

"ठीके.. आणि व्यवहारात आणि नात्यात चोख पाहिजे रे राजस.. आणि कोणाचं काही ठेवायचं नाही.. नाहीतर नंतर त्रास होऊ शकतो.. मी अशीच आहे... आणि शक्यतो बदलत नाही.."

"ओह मिस फिलोसोफर.. जरा वाग नॉर्मल! इतका विचार कोण करत ग? कोणीच नाही... तू काय स्वतःला फार भारी समजतेस का?"

"ह?? भारी तर समजतेच!!" आभा नाटकी हसत बोलली,

" पण सोड असले विचार.. चिल्ड राहायचं.. जास्ती टेन्शन नाही घ्यायचं.. त्रास तुलाच होईल बघ.. आहे तो क्षण जगून झाल की विसरून जायचं बघ.." कॉफी चा घोट घेत राजस बोलला...

"अरे बापरे.. आहे तो क्षण? आहे तो क्षण जगून झाल की विसरून जायचं बघ ? माझ्यापेक्षा जास्ती फिलोसोफीकल आहेस तू..."

"आहेच मग... फक्त स्वतःला भारी समजू नकोस!! ऐक, बदल हा गरजेचा असतो... सो बदल तुझा हा स्वभाव... नाहीतर तुलाच त्रास होईल.. मी बघ... सकाळी हार्ट ब्रोकन होतो पण आता आहे की नाही नॉर्मल? आयुष्य मस्त असत.. ते मस्तच जगायचं... जास्ती त्रास नाही करून घ्यायचा.." राजस ने नकळत आभा चा हात हातात घेतला आणि तो बोलला.. आभा ह्यावेळी चिडली नव्हती पण तिने हळूच राजस चा हात बाजूला केला.

"ओके... करते ट्राय.. आणि आता तू झालास मिस्टर फिलोसोफर.. माझ्यापेक्षा भारी लेक्चर देतोस..नी अपिलिंग लेक्चर!!" आभा मनापासून हसली..

क्रमशः..