Tujhch me an majhich tu..Bhag 4 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग ४

तुझाच मी अन माझीच तू...भाग ४

राजस चा आवाज बदलला होता.. त्याच हे वागण एकदम अनपेक्षित होते आणि नेहा त्याच्याकडे पाहत चेहरा वेडा वाकडा करत होती... ती राजस ला नीट ओळखत होती आणि त्याच्या तोंडून सॉरी येणे किती अवघड आहे ह्याची जाणीव तिला होती... तिचं लक्ष आता पूर्णपणे आभाकडे होतं. तिला राजस ला काय उत्तर देते ही तिला पहायचं होत..तिची उत्सुकता शिगेला पोचली होती..आणि खर तर नेहा हे सगळ खूप एन्जॉय करत होती. खूप रेअर अशी गोष्ट आज झाली होती.. सो नेहा ला मजा येत होती.. राजस चे बोलून झालं आणि राजस ने स्टॅच्यु ऑफ केला... आभा रीलाक्स झाली.. पण राजस चे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर मनात काय चालूये हे कळल सुद्धा नव्हत. आभा ने थंडपणे राजस चे बोलणे ऐकून बोलायला लागली..

"स्टॅच्यु काय? दॅट वॉज चाईल्डीश.." आभा वैतागून बोलली..

"असू दे चाईल्डीश..पण तू स्टॅच्यु झालीस ना.. माझ काम झालं... तुला चाईल्डीश वाटत होतं तरी तू काही काळ शांत का झालीस..? सांग सांग... का झालीस अगदी पुतळ्या सारखी स्तब्ध..??" राजस ला थोड हसू येत होत.. पण ह्यावेळी हसणे योग्य नाही हे त्याने जाणले आणि त्याने आपले हसू कंट्रोल केले.. मग आभा बोलायला लागली..

"झालं चुकून.. झाले मी स्पेलबाऊंड..." आभा आपल्या वागण्यावरून ओशाळली.. पण राजस मात्र हसला..

"गुड गुड... ते तरी ऐकलस माझं..आय लाईक्ड इट...पण उगाच का हर्ट का केलास माझा इगो?"राजस जरा गुर्मीत बोलला..

"चिल राजस.. एक काहीतरी ऐकल म्हणून स्वतःला ग्रेट समजू नकोस!!! तुझा इगो मी हर्ट का करू? मी फक्त मला काय वाटत ते सांगितलं. आणि आय स्टिक टू वॉट आय टोल्ड यु इन द मॉर्निंग.. मी लगेच कोणाशी मैत्री करतच नाही.. पण मी कोणालाही इग्नोर करत नाही.. तू नेहा ला जे बोललास ते चुकीच नव्हत. मैत्री करणे हा सर्वस्वी माझा निर्णय आहे...नो वन कॅन फोर्से मी.. मी लोकांना पारखते ते ही माझ्या अंदाजात..मला वाटलं के मैत्री होऊ शकते, खूप छान बॉंड होऊ शकतो तरच मी पुढे जाते.. माझ्यासाठी मैत्री हे खास नातं आहे.. आणि खास नाती मी मनापासून जपते.. मी नाही करू शकत कोणाशीही मैत्री.. आय होप तू समजू शकतोस राजस." आभा इतक बोलली. तिचे बोलणे ऐकून राजस ला काहीतरी जाणवलं.. पण त्याने ते बोलणे टाळले.. आभा पुढे काही सांगतीये का ह्याची राजस वाट पाहत होता पण आभा मात्र ती बोलायची थांबली...

"कळलं कळलं.. मी सॉरी! उगाच जास्ती जवळ आलो..मला नाही जाणवलं की तुझ्याकडे काही सिक्रेट्स असू शकतात..तू जे म्हणशील ते बरोबर!! मी चुकलो... आजचा दिवसच खराब आहे.. असो... तू डबा नीट खा बाई.. उगाच अर्धवट डबा खाऊन गेलीस तर मला कसतरी होईल.. माझ्यामुळे कोणी न जेवता बसले तर मला ते नाही आवडणार... इफ यु वॉंट आय विल लिव्ह.. तू आणि नेहा खावा डबा... मी कल्प्रीट आहे... नाऊ आय होप यु अंडरस्टॅँड.." राजस इतक बोलून गप्प झाला.. त्याच बोलण ऐकून आभा आधी आश्यर्य वाटले की राजस ला काय कळले तिच्या भूतकाळा बद्दल पण नंतर तिला जाणवले ते कसे होईल आणि मग मात्र तिला मनापासून हसू आलं. आभा परत जागेवर बसली.. आणि बोलायला लागली,

"नो नो.. इट्स ओके.. दुसरीकडे जागा नाहीये आणि यु कॅन सीट हिअर!! नो प्रॉब्लेम!! आणि मी उठले कारण माझ पोट खरंच भरलंय.. मी कधीच जेवणावर राग काढत नाही.. आय नो माझ्या आई ने किती कष्ट करून स्वयपाक केलाय आणि अन्न हे पूर्णब्रम्ह आहे... सो डोंट वरी अबाउट मी.. माझ पोट फुल्ल झालाय पण तुमच दोघांच होईपर्यंत थांबते इथेच..तुंम्ही खावा निवांत...."

इतक बोलून आभा शांतपणे बसून राहिली.. आज झालेला प्रकार तिच्यासाठी सुद्धा अनपेक्षित होता. हे पचवायला तिला थोडा वेळ हवा होता.. ती काहीतरी विचार करत होती हे नेहा ने हेरले..

"आभा.. बरी आहेस ना.. आज उगाच वाद झाला तुझा आणि राजस चा.. "

"नो इट्स फाईन.. नो वरीज.. आणि भाजी संपवली तरी चालेल..." मग आभा ने भाजीचा डबा राजस कडे पास केला.."थोडी खाऊन बघ.. माझी आई छान करते भरलं वांग!! टेस्ट कर.." आणि मग ती राजस कडे पाहून हसली..

"नको आहे मला ग.."

"ओह रिअली?"

"होच.. भांडण झालं आणि तुझ्या डबा कसा खाऊ?"

"बट यु वॉंट टू टेस्ट इट न? आणि भांडण कुठे.. वाद म्हण.. मला काही पटल नाही तर मी वाद करतेच.. वाद हेल्दी असतो.." आभा हसली.. पण राजस सुद्धा हट्टाला पेटला होता. इच्छा असूनही आभाच्या डब्यातली भाजी खाणार नव्हता...

"नो नो आत्ता नकोय.. आणि येस... तू करून आणलीस भाजी तर मग खाईन..." आणि राजस ने त्याच्या डबा उघडला.. त्यात त्याची नावडती भाजी होती पण तरीही तो आभाच्या डब्यातली भाजी खाणार नव्हता. लकीली नेहा ने सुद्धा त्याच्यासाठी भाजी ठेवली होती सो आज साठी त्याचा प्रश्न सुटला होता..

"ओके.. तुझी मर्जी!! पण मला नाही येत स्वयपाक.. सो छोड दो.." आभा हे बोलली पण तिला ही गोष्ट लागली मात्र होती. पण तिने चेहऱ्यावर एकही भाव येऊन दिला नव्हता. तिला राजस बद्दल एक गोष्ट कळली होती की राजस फार हट्टी तर आहेच पण इगो सुद्धा खच्चून भरला आहे..

राजस आणि नेहा ने जेवण आवरले आणि तिघे परत आपापल्या डेस्क वर काम करायला आले. ता राजस काही काळ आभा चा विचार करणार नव्हता. त्याने लॅपटॉप ऑन केला.. आणि काम चालू केल.. आभा सुद्धा झालेला प्रकार विसरून तिचं काम करायला लागली होती..

राजस ने मन लाऊन काम केले.. पण आभा ला अजून काम मिळाल नसल्यामुळे ती टाईमपास करत बसली होती.. तितक्यात तिची नजर समोर बसलेल्या रायन कडे गेली.. रायन पण तिच्या सारखा टाईमपास करत बसला होता... त्याने सुद्धा आभा कडे पाहिलं आणि तो हसला.. मग तो जागेवरून उठून आभा च्या डेस्क समोर आला..

"हे स्वीटी.. लुकिंग सेक्सी.." आभा ने त्याचे बोलणे ऐकले आणि ती जरा ऑकवर्ड झाली.. पण नंतर मात्र तिचा मूड बदलला..

"ह..कोण आहेस तू?"

"ओह आय फर्गोट टू टेल माय नेम.. मी रायन!! रायन डिसोझा.. आणि तू आभा राईट?

"ओह.. हाय रायन!! पण जान न पेहचान!! सेक्सी काय म्हणतोस..? पहिल्याच भेटीत इतक जवळ आलेलं मला आवडत नाही..सो प्लीज डोंट क्रॉस युर लिमिट्स!!" आभा स्पष्टपणे बोलली..

"अरे चिल.. आज रोज भेटणार आपण... सो रोज भेट होईलच!! आणि सेक्सी म्हणल तर इतक काय?"

"बाकीच्यांना आवडत असेल.. पण मला नाही! सो प्लीज..." आभा चा आवाज थोडा चढला होता.

"ओके.. नवीन जॉईन झालीस ना आज?"

"हो.." आभा थोडी वैतागून बोलली...

"मी कॉफी प्यायला जातोय.. येतेस का माझ्याबरोबर?" रायन ने प्रश्न केला.. आभा हो म्हणेल याची त्याला जणू खात्रीच होती पण झाले उलटेच..

"नो रे रायन... मी मगाशीच पोटभर जेवले आणि मी जास्ती चहा कॉफी घेत नाही... सॉरी ह! बट यु कॅरी ऑन.." चेहऱ्यावर खोटी स्माईल आणत आभा बोलली.. आणि मग रायन कडे तिथून जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.. सो तो निमुटपणे तिथून निघून गेला.. पण अर्थात रायन आभा ला इतक्या सहजासहजी सोडणार नव्हता.. पण आभा ला याची काहीच कल्पना नव्हती.

रायन शी बोलतांना आभा चा आवाज मध्ये थोडा चढला होता तेव्हा राजस चे तिच्याकडे लक्ष गेले होते... आणि तो आभा रायन ला काय प्रतिसाद देते हे पाहत होता. आभा ने रायन ला भिक घातली नाही हे पाहून राजस ला हसूच आलं. रायन तसा ऑफिस मध्ये फेमस होता तो त्याच्या अॅऱोगंट आणि केअरलेस वागण्यामुळे.. पण राजस ला तो कसा आहे हे सुद्धा चांगले माहिती होते... त्याने आभा ला वर्ण करायचा विचार सुद्धा केला होता पण त्याने तो विचार झटकला.. काही सांगायला गेलो तर आभा त्यालाच काहीतरी सुनावेल अशी खात्री राजस ला होती सो त्याने आभा च्या जवळ पास राहायचा निर्णय घेतला होता.

क्रमशः..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED