Preem mhanje prem asat..2 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम म्हणजे प्रेम असत- २

प्रेम म्हणजे प्रेम असत- २

“आय नो जय, मला सगळ कळतंय.. तू अशी गम्मत नाही करणार....आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे..माझ तुझ्यावर प्रेमही आहे.. पण प्रेम वेगळ आणि लग्न वेगळ!!! तू असा निर्णय घेतलास कसा त्याच मला आश्यर्य वाटतंय... माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे पण... तू समजून का नाही घेत रे?”

“शट अप ग रितू!!! सारख सारख पण काय? आता परत काय झाल रितू.. मी तुला कितीवेळा सांगितलय....माझ तुझ्यावर किती प्रेम आहे आणि माझ्यासाठी तू किती महत्वाची आहेस.. तरी तू परत परत तोच विषय का काढतेस? खर सांगू का.... आता मला कंटाळा आलाय तेच तेच सांगून! तुला माझ्याबरोबर संसार करायचा नसेल तस स्पष्ट सांग.. मग लक्षात ठेव, ह्यापुढे कधीच तुला भेटणार नाही बघ..बस झाला तुझा टाईमपास..आणि मी तुझ्याशिवाय कोणाशी लग्न करणार नाही..ह्याची सुद्धा खात्री ठेव.. पण आत्ता होकार दिला नाहीस तर नंतर तुझ्याकडे पाहणार सुद्धा नाही...आणि हे खूप सिरिअसली बोलतोय... सो डोंट टेक मी लाईटली..” जय च्या बोलण्यातला राग रितू ने हेरला आणि ती एकदम हळवीच झाली.. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू आले..

“ए मी टाईमपास करते आहे का रे? माझी मनस्थिती समजून घे की.. तुला काय, तू खूप अनुभवी..खूप फर्म आहेस आय नो... तुझे निर्णय तू सहसा बदलत नाहीस पण तू म्हणालास लग्न करू तेव्हापासून मला तुझ्या निर्णयावर डाऊट येतोय! मला आशा आहे की कधीतरी तू निर्णय बदलशील.. पण तू तर सारखे तेच तेच बोलतोस.. आणि तू अश्या निर्णयावर कसा येऊ शकतोस? मैत्रीपर्यंत ठीक आहे पण लग्न? मी बराच विचार केला काल रात्र भर!! यु नो,हल्ली रात्रभर मला झोप लागत नाही तुझ्याबद्दल विचार करून.... म्हणजे तसे बरेच दिवस मला झोप लागताच नाहीये.. तू जेव्हा मला सांगितलस तुझ माझ्यावर प्रेम आहे तेव्हापासूनच! म्हणूनच मी आज तुला भेटायचं ठरवलं... आणि तुला बोलावून घेतलं.. तू वेळ काढून आलास म्हणून बर झाल..”

“तू टाईमपास करत नाहीस ना.. मग गुड!! आपण चांगले मित्र तर आहोतच.. त्यात काही शंका नाही! पण हे नाते अजून पुढे नेले तर काय प्रॉब्लेम आहे? मला सांग तुला माझी मैत्री चालते मग तुझा लग्नाला नकार का?"

"मैत्रीला कधीच ना नाही रे.. पण लग्न प्लीज नको!!" रितू बोलली पण तिचे बोलणे ऐकून जय मात्र चिडला.. आता तो सगळे स्पष्ट बोलणार होता आणि तश्याच तयारीनिशी तो आला होता..

"ह..." जय ने थोडा विचार केला. मग तो बोलायला लागला, "तस पाहायला गेल तर मला माहितीये तुला काय चिंता खातेय... पण खात्री मात्र नाही... आज बोलच तू.. मला ही ऐकू दे.. आज तूच सांग! मलाही बघू दे,तू मला किती ओळखल आहेस... आणि मी तुला किती ओळखतो! आता बोल,मन मोकळ कर.. तुला जे जे वाटतंय ते ते सगळ बोल! आणि ह्यापुढे मी त्या विषयावर बोलण ऐकून घेणार नाही हे लक्षात ठेव...”

“अ..अ...” थोड चाचरत रितूनी बोलायचा प्रयत्न केला पण ती काही बोलू शकली नाही!

“काय झाल..बोल कि आता! मी ऐकतोय सांगितलं तुला.. काय आहे मनात स्पष्ट बोल! आज सगळ स्पष्ट होऊन जाउदे.. सारख सारख तेच तेच नकोय आता... आता काय तो सोक्ष मोक्ष लाऊनच टाकणारे मी...” थोड चिडून जय बोलला..

“अ..अ...” थोड चाचरत रितूनी बोलायचा प्रयत्न केला पण ती काही बोलू शकली नाही! आपले प्रॉब्लेम इतक्या स्पष्टपणे बोलणे खरंच खूप अवघड असते...

“काय झाल..बोल कि आता! मी ऐकतोय सांगितलं तुला.. काय आहे मनात स्पष्ट बोल! आज सगळ स्पष्ट होऊन जाउदे..” थोड चिडून जय बोलला..

“हो..२ मिनिट वेळ तर दे! कुठून चालू करू कळतच नाहीये! आणि जय,तू डॉक्टर आहेस. मी नाही! मी नाही तुझ्याइतकी मनानी खंबीर... आणि मला वेळ लागतो मन मोकळ करायला! तुझ्यासारखी मी पटापट बोलून मोकळी नाही होऊ शकत!”

“ओके... टेक यूअर टाइम.. मला सगळ माहिती आहे! अजून काय वेगळ सांगणार आहेस बघू... काही नवीन असेल तर ते ऐकयला मी उत्सुक आहे.... आय नो,तुझ्याकडे काही वेगळ नाहीये बोलायला! आय डोंट नो,व्हाय आय अॅम वेस्टींग माय टाइम...” जय वैतागला...आणि थोड वैतागूनच बोलला..ह्या आधी जय अश्या प्रकारे वागल्याच रितू ला आठवत नव्हते. जय च्या अश्या वागण्याने रितू भलतीच बावरून गेली.

“तू वैतागला आहेस जय? आय नो.. मी आहेच त्रास दायक.. अस काय बोलतोयस? तू सांग..मी काही बोलूच नको का? फक्त मनात कुढत राहते! ठीके??”

“सॉरी.... तू काही बोलत नाहीयेस आणि महत्वाच म्हणजे मला सगळ माहितीये..पण तुझा हट्ट आहे तुला मला सगळ सांगायचय आणि काही बोलत सुद्धा नाहीयेस म्हणून जरा वैतागलो”

“यू आर अ डॉक्टर ना?”

“हाहा.. आहेच प्रसिद्ध डॉक्टर! आणि मी डॉक्टर आहे म्हणून तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये? तस सांग कि स्पष्ट....पण हे लग्न न करायचं कारण असू शकत नाही! हाहा!”

“तू हसतो आहेस जय? मी सिरिअस आहे खूप! सिरिअस होऊन ऐक! मी काय बोलायचा प्रयत्न करतीये आणि तू काय बोलतोयस? चुकीचा अर्थ काढण्यात हुशार आहेस...” रितू चिडून बोलली...

“ओह माय गॉड.... तूच तर ते बोललीस... मी मनानी काही बोललो नाहीये! मी चुकीचा अर्थ काढायचा प्रश्न कुठून आला? आत्ता माझी काही चूक नाहीये.. उगाच मला ब्लेम करू नकोस.. आणि मी सिरिअस होऊनच ऐकतो आहे...”

“ओके..माझीच चूक.. मी नीट नाही बोलले..खुश? आता स्पष्ट बोलते..तुला माझा पास्ट माहितीये.. भविष्यात काय होऊ शकत हे हि माहिती आहे... तरीही तुझा असा निर्णय.. ती गोष्ट मला खटकती आहे....”

“आय अॅम अ डॉक्टर ना? मला तुझ्यापेक्षा जास्ती कळत ना? हे तरी पटतंय ना कि ह्यावर पण तुझ काही म्हणण आहे? असेल तर आत्ताच बोल... न कसला पास्ट? ”

“हो आहेच माझ म्हणण.. मी अडाणी नाहीये! आय नो, मला कधीही काही होऊ शकत... आज किंवा उद्या कधीही मरण येवू शकत.. एकदा मरणाला परतवून लावण्यात यश आल म्हणजे नेहमीच अस होईल का? पहिला अपघात म्हणजे हिंट असू शकते कि माझ मरण जवळ अल आहे? आत्ता मी बरी आहे पण मला कधीच काही होणार नाही ह्याची मला खात्री नाही.. मग कशाला उगाच अस्कायचं ना नात्यात? आणि मला काही झालं तर तेव्हा तुला एकट सोडून मला आनंदानी जाताही येणार नाही मला.. मी गेल्यावर एकटा कसा राहशील? तू आहेस खूप ब्रेव... पण मी नाही! कश्याला अडकतोस माझ्यात इतका? तुला माझ्यापेक्षा चांगल्या छप्पन मिळतील रे...तू खूप छान आहेस.. पण तुझ्यासाठी मी योग्य आहे?” रितू च्या डोळ्यात पाणी आल.. आणि ती रडवेली होऊन बोलली.. “किती स्पष्ट बोलायला लावतोस रे..”

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED