Prem mhanje prem ast..-8 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम म्हणजे प्रेम असत- ८

प्रेम म्हणजे प्रेम असत- ८

दोघे बराच वेळ शांत बसून होते.. झालेला प्रकार अनपेक्षित तर होताच पण त्यामुळे जय आणि रितू जरा गोंधळून गेले होते. जय पेक्षा रितू जरा जास्तीच.. असं काही होईल ह्याचा रितू ला अंदाज सुद्धा नव्हता. अर्थात, जय ने तिला काही गोष्टींची जाणीव आधीच करून दिली होती पण ते खरच जय च्या आयुष्यात होऊ शकत ह्यावर रितू चा विश्वास नव्हता.. पण कधीकधी डॉक्टर च्या आयुष्यात सुद्धा वादळ येऊ शकत.. आणि ह्या गोष्टीची जाणीव रितू ला झाली होती.. रितू परिस्थितीला अगदी शांतपणे सामोरी गेली होती खरी..पण तिच्या मनाने मात्र धकसा घेतला होता. दोघे जरा वेळ शांत बसून राहिले..पण भीतीने तिच्या हृदयाचे ठोके मात्र जोरजोरात चालू होते..

त्यांच्या आजूबाजूचे लोकं सुद्धा पांगले होते आणि झालेला प्रकार विसरून सुद्धा गेले होते. पण रितू च्या मनातून मात्र झालेला प्रकार जात नव्हता.. जय ने कॉफी ची ऑर्डर दिली आणि त्याने रितू चा हात घट्ट धरून ठेवला. त्याला पूर्ण जाणीव होता की झालेल्या प्रकारामुळे रितू पूर्ण शेक झाली असेल.. हा प्रकार तसा अनपेक्षित होताच आणि त्याचा परीन्म रितू च्या मनावर होणे साहजिकच होते. रितू जरा शांत झाली आणि मग तिने च बोलायला चालू केले,

"काय शॉकिंग झाल रे आत्ता... एकदम अनपेक्षित.. मला तर जबर धक्का बसलाय..बघ हृदयाचे ठोके." रितू झालेला प्रकार आठवून आठवून परत घाबरत होती..

"काम डाऊन रितू. आता त्या बाई गेल्या.. आणि खर तर तू आज इतक्या सुंदर रित्या हाताळलस.. मी तर पुरता गोंधळूनच गेलो होतो..तू होतीस सो सगळ स्मूथ झालं.." जय ने परत रितू चा हातावर गोंजारलं.. आणि डोळ्यातून थँक्यू सांगितले..

"तुझ्यासाठी काहीही पण तू म्हणला होतास तेव्हा मला खोट वाटल होत पण आज डोळ्यासमोर असं काही पाहून मला धक्काच बसला रे.. आणि सुंदर रित्या हाताळला म्हणजे काय जय?"

"नेहमी असं होत नाही... सो यु डोंट वरी.. आणि मी माझ काम चोख आणि नीट करायचा प्रयत्न करतो नेहमी.. आणि मला काही बोलायची गरज पडलीच नाही त्या बाईंसमोर.. तुझ्या बोलण्याने त्या एकदम शांत झाल्या.. पण रितू, मला माहिती नव्हती तुझी ही साईड.. छान वाटल बघ एकदम!! माझ्या बाजूने उभी राहिलीस.. कधी कधी कोणाची अशी भक्कम साथ सुद्धा किती गरजेची असते ह्याची जाणीव झाली मला.. " जय ने रितू कडे पाहून मनातले सगळे बोलून दाखवले.. त्याची बोलण्याने रितू खुश झालीच..

"नेहमीच रे जय..माझ्यासाठी तू नेहमीच असणार मग मी का नाही? फक्त तुझ्याकडून काहीतरी मिळण्याची अपेक्षा कशी करेन.. थोड माझ्याकडून देणारच ना.."

"ओह हो.. माझी रितू इतकी स्ट्रॉंग आहे आणि स्वतःला उगाच विक का दाखवत असते काय माहिती..." जय रितू शी उपहासाने बोलला.. रितू ने त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहिली आणि ती जरा चिडलीच...पण आता वातावरणातला स्ट्रेस थोडा कमी झाला होता.. जय ने ह्यावेळी सुद्धा टेन्शन कमी केले होते.. आता रितू चा मूड मस्त बदलला होता आणि ती जरा भांडायच्या मूड मध्ये आली होती... आता झालेला प्रकार रितू च्या डोक्यातून गेला होता.. आता फक्त होते ते जय आणि रितू फक्त!!

"मी विक आहे अस कधी दाखवते रे जय? फक्त मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता सो मी जरा अलिप्त राहायचे.. उगाच कोणाच आयुष्य माझ्यामुळे पणाला लगाव हे मला पटत नव्हत यु सी.. पण "जय द मॅजिशीयन" ने जादू केली माझ्या आयुष्यात.. जादूची कांडी फिरवलीस रे तू माझ्या आयुष्यात.." रितू उठली आणि तिने जय चे गाल ओढले.. "आय लव्ह यु रे..."

"ए काय करतेस... एक तर आपण आत्ता बाहेर हॉटेल मध्ये आहोत.. इथे लोकं आहेत आणि आता कुठे गेली ग तुझी भीती?"

"आता आपण ऑफिशीयली लग्न करणार आहोत ना.. तू माझा आहेस!! मी का घाबरू लोकांना.. आणि तसही, इथे मला कोणी ओळखत नाही.. सो लोकांना घाबरून मी माझ आयुष्य खराब का करू ना? मला ही शिकवण आत्ताच मिळाली आहे आणि मी चांगल्या गोष्टी विसरत नसते. आणि माझ्या शिक्षकाला एक छोटीशी हग.. ती आत्ता नाही..पण हग एकांतात असतांना.."

"अरे वा.. ट्रीट मिळणार म्हणजे मला.. आणि अश्या मस्त मस्त सरप्राइज मिळणार असेल तर ये बंदा और बहुत कुछ आपको सिखाएगा.." जय खूप लाडाने बोलला आणि त्याच बोलण ऐकून रितू एकदम खूशच झाली.

"तुझ्या बरोबर असले न जय की मी एकदम मोकळी असते. हा आपल्या दोघांचा वेळ मला नेहमीच हवा हवासा वाटत असतो... आय लव्ह यु माय स्वीट जय!! ओढू का परत गाल? तू खूप गोड आहेस रे.. तुझ्यावर खूप प्रेम येतंय.." रितू ने हात पुढे केला आणि गाल ओढायची अॅक्शन केली..

"नो नो रितू.. प्लीज गाल नको ओढूस. आणि गुड गुड... अशी रितू बघायचीच होती मला.. मस्त चार्मिंग...आणि मोकळी.. मस्त वाटत.. आणि आता मला अशीच रितू नेहमी हवी आहे.. माझी रितू. आता आपण दोघे नेहमीच एकत्र असणार.. बाय द वे, माझे गाल दुखायला लागले.. मी ह्याच उट्ट काढतो की नाही बघ.. सोडत नाही तुला आता.. काही दिवस जाऊ दे मग फक्त तू आणि मी... बघू कोण वाचवतंय तुला.. तू आधीच माझा खूप पेशंस पाहिलास.. एकदा लग्न करून माझी बायको झाली की बघ..." जय हसत बोलला.. पण त्याच्या बोलण्याने रितू जरा विचारात पडली..

"ए जय.. मला धमकी? काय करशील सांगच.. मला माहिती पाहिजे आणि मग मी माझा निर्णय आत्ताच बदलेन की नाही बघ.. आणि मी माझा निर्णय बदलला तर मै किसीकी न सुनुंगी.."

"हो का... बघू ह... आणि काय करणार हा बिचारा जीव ग.. जो तुझ्या आकंठ प्रेमात बुडलेला आहे.. तू म्हणशील ती पूर्व दिशा.. आणि मी फक्त खूप खूप प्रेम करेन तुझ्यावर.. तुला माझ्या भावना समजणार नाहीत कदाचित.. आयुष्यात सगळ्यात महत्वाचे काय असते ते मला चांगले माहिती आहे.. मी शक्यतो कोणाला दुखवत नाही बाईसाहेब.. आणि आमच्या राणी साहेबांना दुखवायची हिम्मत तरी आहे का माझी?" जय बोलला आणि त्याने एक छोटीशी फ्लाईंग किस रितू ला दिली. दोघे एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले होते.. झालेल्या प्रकारामुळे दोघांचे नाते अधिकच घट्ट झाले होते. जय ला रितू त्याच्यासाठी जगाशी भांडू शकते ह्याची जाणीव झाली होती आणि त्यामुळे जय खूप समाधानी होता. आता दोघे एकमेकांमध्ये मिसळून गेले होते.. आता दोघे फक्त एकमेकांसाठीच होते. बाकीच्या कोणाचीही गरज त्यांना लागणार नव्हती..

"मी पण जय... तुझ्यामुळे मी माझ आयुष्य लागायला लागले जय... तुला माहिती नाही तू माझ्या आयुष्यात येण्यानी मला काय मिळाल आहे..." जय रितू हे बोलणे ऐकून हसला पण नंतर त्याने मानेने नकार दर्शवत बोलायला चालू केल..

"अ ह.. माझी आयुष्यात तुझ्या येण्याने मला सगळच मिळाल आहे. म्हणजे आता अजून काही पाहिजे असं काही वाटत नाही.. ता माझ्याकडे सगळ आहे.. माझी लाडाची आणि खूप प्रेमाची रितू माझ्या बरोबर आहे..."

"तू ना जय.. आपण एकमेकांच्या आयुष्यात आल्याने आपल आयुष्य अजूनच मस्त करू.. तू माझा भूतकाळ विसरायला मला जी मदत केलीस ना.." रितू ने तिची जुनी टेप पुन्हा चालू केली... तिचे बोलणे ऐकून जय गालातल्या गालात हसला आणि त्याने पटकन रितू च्या तोंडावर हात ठेवला...आणि तो बोलयला लागला.

"हे मला पाठ झालंय.. काहीतरी नवीन सांग.. आपण आपल्या नवीन आयुष्य बद्दल बोलू.. चालेल?" आणि एकदम दोघे जोरजोरात हसायला लागले.. इतके की आजूबाजूचे लोकं त्याच्याकडे पाहायला लागले..

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED