प्रेम म्हणजे प्रेम असत- ११ Anuja Kulkarni द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम म्हणजे प्रेम असत- ११

प्रेम म्हणजे प्रेम असत- ११

रितू ला माहिती होते की तिचे विचार कदाचित न पटणारे आहेत पण तरीही ते तिच्या मनाविरुद्ध काही होऊ देणार नव्ह्ती. रितू ने आपल्या आयुष्यात काही निर्णय खूप आधीच घेतले होते. आयुष्य फक्त काही गोष्टींवर अवलंबून असते ही गोष्ट तिला पटायची नाहीच..आणि जय चा तर प्रश्नच नव्हता.. जय चे विचार सुद्धा एकदम फॉरवर्ड होते.. तो समोरच्याचे विचार नीट ऐकून घ्यायचा आणि मगच मतं मांडायचा.. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती होते ती म्हणजे रितू. रितू ला प्रश्न विचारून जय शांत बसून राहिला.. रितू ने जरा विचार करत होती.. आणि शेवटी ती बोलायला लागली...

"ओके.. आई व्हाव असं वाटत नाही अश्यातला भाग नाही रे.. असं म्हणतात, आईपण ही दैवी देणगी.. आहेच ते बरोबर.. जे आई करू शकते ते दुसर कोणी करू शकत नाही... पण तसही माझी मानसिक स्थिती पाहता मला आईपण किती झेपेल ह्याची मला खात्री नाहीये.. मला सतत एक प्रकारची भीती वाटत असते..मरणाची भीती..आणि मी एक बाई आहे.. पण फक्त मला बाळाला जन्म देता येतो म्हणजे मी बाळाला जन्म दिला पाहिजेच अश्या विचाराची मी नाही.. मातृत्व ही खूप सुंदर गोष्ट आहे.. मी मान्य करते पण प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते ना..? त्याचा विचार कधीच होत नाही.. काही बायकांना मुलं हवी असतात पण काही प्रोबेल्म मुळे मुलं होत नाहीत.. त्यांच्याकडे वेगळे पर्याय असतात... पण मी स्वतःला ओळखते.. मला माहितीये काही जबाबदाऱ्या मला झेपणार नाहीतच.. ज्या जबाबदाऱ्या झेपणार नाहीत त्या त्या मी शक्यतो घेत नाही.. म्हणूनच तर लग्न सुद्धा करायचे नव्हते मला.. पण तू भेटलास..आणि शेवटी लग्नाला मी तयार झाले..मला आवडत मुलांमध्ये राहायला.. लहान मुलांमध्ये राहिलं की मन प्रसन्ना होतं पण आपल्या बाळाची जबाबदारीरी किती पेलेल त्याची खात्री नाही मला..सॉरी जय!! आणि हा विषय पुन्हा नको काढूस जय..प्लीज.. कधी कधी मला स्वतःची लाज सुद्धा वाटते.. एक साधी जबाबदारी पेलायची सुद्धा हिम्मत माझ्याकडे नाहीये.." रितू बोलता बोलता थोडी रडवेली झाली... तिने तिची मते स्पष्ट पणे जय समोर मांडली.. आणि रितू चे विचार ऐकून जय ला तिच कौतुक वाटल.. आधी समाजाला घाबरणारी रितू तिचे विचार इतक्या स्पष्टपणे मांडते आहे ही गोष्ट जय ला आवडली. त्याच्यासाठी समाजापेक्षा त्याची रितू जास्त महत्वाची होती.. आणि रितू चे मन जपणे हीच जय ची प्रायोरिटी होती... रितू हेच त्याचे आयुष्य होते.. आणि त्याला खात्री होती की फक्त दोघे सुद्धा सुखाने राहू शकतात..

"रडतेस काय? यु आर ब्रेव.. आणि ब्रावो बायको.. तुझे विचार उत्तम आहेत.. शेवटी आई ही बाळच्या जास्ती जवळ असते.. तुला मातृत्व झेपत नसेल तर.. करेक्ट!! पण सॉरी का? तू तुझी मते इतकी खंबीपणे मांडतेस... आय लव इट.. माझ्याकडून तुला कसलीही जबरदस्ती होणार नाही.. खात्री ठेव..बाय द वे,सगळ मान्य पण तुझ्या मनातून अजूनही मरणाचे विचार गेलेले दिसत नाहीयेत.. ते घालवणे हे माझे पाहिलं एम आहे आता.. पण तुझे बाकीचे विचार खरच वाखाखण्याजोगे आहेत.. मी खूप खुश झालोय रितू.. सगळ्यांसारख आयुष्य जगलं कीच संसार सुखाचा होतो हा विचार तू कुठेतरी मोडून काढायचा प्रयत्न करतीयेस, म्हणजे आनंद कोणत्याही एकाच गोष्टीवर अवलंबून नसतो.. सगळ्याच गोष्टी मानण्यावर असतात..आणि तुझे विचार या बाबतीत फार क्लिअर आहेत आणि तुझा हा स्पष्टवक्तेपणा वर मी तर जाम खुश आहे. आणि तुला लहान मुलं आवडतात ना? आणि लाज वाटायची काय गरज नाही ग.. आयुष्य तुझ आहे... बाळाला जन्म तू देणार आहेस.. सो तुझी मते सगळ्यात जास्ती महत्वाची.." जय रितू चे मुक्त विचार पाहून खूप आनंदून गेला आणि बोलला..

"थँक्यू जय!! लहान मुलं खूप आवडतात.. माझी इच्छा आहे लहान निरागस मुंसाठी काही कराव.. आणि ओह वॉव.. तू खूप मस्त आहेस रे जय! तू माझ्या मताला किंमत देतोस आणि कोणतीही जबरदस्ती करत नाहीस.. आणि तुझा पुरुषी अहंकार आपल्या नात्यात आणत नाहीस.. म्हणुनच मी तुझ्या इतकी प्रेमात आहे.. आणि भीती तर आहेच... ती एकदम कशी जाईल? मी एकदम कशी बदलेन रे...आणि मला खरच खात्री नाहीये जबाबदारी किती झेपेल ह्याबद्दल...सो आपण बाळ नकोच!! पण अर्थात समाजाची भीती आहेच... लग्न झालं की लोकांनाच बाळाची काळजी वाटायला लागते.. म्हणजे १ वर्ष झालं अजून गुड न्यूज कशी नाही असले प्रश्न चालू होतात. लग्नाला २ वर्ष झाली आणि तरी बाळ झालं नसेल तर काही प्रॉब्लेम आहे का असे प्रश्न.. आणि शेवटी १०० उपाय सजेस्ट केले जातात... मला ह्या प्रश्नाची भीती वाटते जय.. आणि मी विक बनते... पण मला बाळाला जन्म द्य्याचा नाहीये..."

"ठीके.. मी सांगितलं आहे.. तुला कोणतीच जबरदस्ती नाही.. आय नो.. तुझी मते बरोबर आहेत.. झेपत नसेल ती जबाबदारी घेऊन त्या बाळाचे नीट सांगोपन नाही झाले तर? आय अग्री.. पण डोंट थिंक अबाउट एनी वन.. म्हणजे कोण काय म्हणेल, लोकांना कशी सामोरी जाईन असले विचार नको..संसार आपला आहे तो आपण आपल्या मर्जीने जगू शकतो... पण कोणालाही स्पष्टीकरण द्यायला बांधिल नाही.. तुला कोणी काही विचारलं तर तू कोणाला काही उत्तर द्यायची गरज नाही... नाऊ चीअर अप..पण एक सांग, आज तू इतक्या स्पष्टपणे कसे मांडलेस विचार?"

"आय लव्ह यु लव्ह यु जय.. हे सगळ स्वप्नवत आहे.. हल्ली कोण करत कोणाचा विचार? आणि हे स्वप्न तुटणार नाही ना जय?"

"ओह हो.." जय ला रितुचे बोलणे ऐकून हसू आले.. आणि त्याने हळूच रितू ला एक छोटासा चिमटा काढला..

"आऊच... काय जय? चिमटा का काढलास? आधीच थंडी आहे आणि दुखत ना..."

"तूच म्हणालीस ना स्वप्न तर नाही ना हे.. सो तुला फक्त दाखवलं की हे स्वप्न नाही.. तर सत्य आहे.." जय हसत बोलला.. "आता सांग.. आज इतकी खुलून कशी बोललीस?"

"स्वप्न नाही.. ओके ओके.. आता सांगते... ऐक! सिक्रेट आहे ह..."

"सांग सांग.. छान बदल आहे हा आणि कारण माहिती पाहिजे मला.."

"एक खूप छान माणूस आहे माझ्या आयुष्यात..मे बी यु नो हिम ह... बघ म्हणजे माहिती असेल तर... त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदललं.. आणि आय लव्ह हिम.." रितू हे बोलली आणि परत जय च्या गळ्यात पडली...

"उह ओह.. कोण आहे तो खास माणूस?" डोळे मिचकावत जय बोलला

"डॉक्टर जय.. जो माझा खूप आणि खूप लाडका नवरा आहे.."

"वा वा.. पण इतका खास आहे डॉक्टर जय? म्हणजे मला इतका काही खास नाही वाटत.." डोळे बारीक करत जय बोलला...

"हेलो... तो माझा आहे आणि त्याच्याबद्दल एकही वाईट शब्द खपवून घेणार नाही.." लटक्या रागात रितू बोलली..

"ऑ..आय लव्ह यु टू ग.. अशीच रहा नेहमी जवळ. आणि नवीन नाती बनवण्यापेक्षा मी आहे ती नाती सदा टवटवीत ठेऊन तुला नक्की खुश ठेवेन ग.."

"येस येस.. आता मी जाते.. ब्रेकफास्ट ची तयारी करते.." इतक बोलून रितू उठायला लागली.. पण तिला बेड वर बसवून घेत जय बोलला..

"तू कर आज आराम... आज ब्रेकफास्ट मी करतो.." जय बोलला आणि त्याचे बोलणे ऐकून रितू खुश झाली..

जय आणि रितू चे आयुष्य इतरांपेक्षा थोडे वेगळे होते.. ते हळुवारपणे फुलत होते.. त्यांच्या नात्यात कोणतीही जबरदस्ती नव्हती त्यामुळे ही नातं वेगळ तर होताच पण दोघांसाठी खास सुद्धा होतं.. संसारात दोघेही खुश होते..

क्रमशः..