प्रेम म्हणजे प्रेम असत- १० Anuja Kulkarni द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम म्हणजे प्रेम असत- १०

प्रेम म्हणजे प्रेम असत- १०

पाहता पाहत दिवस पटापट पुढे सरत होते.. काही दिवसातच दोघांनी लग्न केलं.. रितू आणि जय ह्या दोघांचे नाते इतरांपेक्षा जरा वेगळेच होते.. दोघांना नात्यात सगळ्यात जास्त महत्वाची होती ती एकमेकांची साथ आणि ओथंबून वाहणारे प्रेम.... बाकी जय खूप समजूतदार होताच... आणि स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याला माणसाची किंमत जरा जास्तीच होती.. आणि तो आपल्या वागण्या बोलण्यावरून ते रितू ला सतत दाखवायचा...तो शक्यतो रितू दुखावली जाणार नाही ह्याकडे आवर्जुन लक्ष द्यायचा.. रितू सुद्धा आता भूतकाळ विसरून तिचं नवीन आयुष्य नव्या जोमाने चालू करत होती... पण रीतू च्या मनाच्या कोपऱ्यात तिचा भूतकाळ घर करून मात्र बसला होताच... तरी रितू च्या मनाने उभारी मात्र घेतली होती. दोघांचा सुखी संसार चालू झाला... अगदी दृष्ट लागेल असा सुखी संसार... त्या दोघांवर जळणारे खूप होते.. ती गोष्टा कळूनही दोघांनी जगण बंद केल नाही.... काही लोक मागून नाव ठेवत होते..काही समोर! तरीही जय स्वत:च्या निर्णयावर ठाम राहिला.. लग्न सोहळा साधे पणाने झाला होता आणि रितू च्या इच्छे प्रमाणे वाचलेले पैसे गरजू लोकांना दिले होते. ह्या गोष्टीत जय ने पुढाकार घेतला होता.. आणि जय चा खरेपण पाहून रितू भलतीच खुश झाली होती. लग्नाची गडबड संपली आणि दोघांचे नॉर्मल आयुष्य चालू झाले.. जय त्याचा कामात बिझी झाला.. रितू ने सुद्धा तिचे काम चालू केले होते. दोघे एकदम आनंदी होते पण संसार म्हणले की भांड्याला भांड लागणारच.. दोन भिन्न स्वभावाचे लोकं एकत्र आले की थोडे वाद, रुसवे फुगवे आलेच.. रुसवे फुगवे आणि भांडणाशिवाय कोणताही संसार सुखी होऊच शकत नाही... इतर कोणत्याही कपल प्रमाणे दोघांच्या आयुष्यात तो गोल्डन दिवस उजाडलाच.. पण दोघांमध्ये वाद होईल का हा महत्वाचा मुद्दा होता.

जय सकाळी सकाळी लवकर उठला.. कालचा दिवस जय साठी जरा ताणाचा होता. ऑपरेशन मध्ये थोडी कॉमप्लीकेशन झाली होती. आणि त्याचा ताण जय वर आला होता.. त्याने डोळे उघडले. शेजारी चाचपडून पाहिलं.. त्याला रितू ला मिठीत सामावून घ्यायचं होत.. पण शेजारी रितू नव्हती.. त्याला त्या क्षणी एकदम राग आला... जय ला राग क्वचितच यायचा.. पण ह्यावेळी तो चिडला..

"रितू.. कुठे आहेस? ये इकडे." जय ने रितू ला हाक मारली... पण त्याला काहीच उत्तर आले नाही.. मग जय ला अजूनच राग आला.."रितू.. आत्ताच्या आत्ता इथे ये.. आय नीड यु निअर मी... राइट नाऊ.." जय ओरडून बोलला.. त्याच्या आवाजाने रितू जराशी घाबरलीच..

"ओरडू नकोस रे जय.." रितू स्वयपाक घरातून उत्तर देत बोलली.. "आणि आले आले... हो रे जय....आले.." इतक बोलून रितू स्वयपाक घरातून बाहेर आली.. आणि जय च्या जवळ गेली.. "काय झालं जय.. आज इतक्या लवकर उठलास? आणि ओरडा आरडा करत? आणि हा घे गरम गरम चहा.."

"कुठे होतीस ग रितू? मला आज तू हवीयेस मला माझ्या जवळ.. मला किती बोलायचं आहे.. आणि आय नीड अ टाईट हग..तुझ्या मिठीत माझे सगळे ताण हलके होतात.."

"ओह .. ते कधीही नवरोबा!!! मी लवकर उठले आज... सो काम करत होते स्वयपाक घरात..तुझ्यासाठीच चहा केला रे..." जय ला आपण रितू वर उगाच चिडलो ह्याची जाणीव झाली.आणि आपली चूक सुधारत तो रितू शी बोलायला लागला,

"ओह सॉरी! मला कळल नाही... आणि अरे वा.. आज उठल्या उठल्या चहा? बेड टी... वास तर कसला मस्त येतोय चहा चा..."

"ह मग.. लाडाचा आहेस तू.. मी तुला नेहमीच सांगितल आहे तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस.." जय चे गाल ओढत रितू बोलली..

"ए दुखतंय ग.." जय ओरडून बोलला आणि मग हसला..रितू ला डोळ्यासमोर पाहून त्याचा ताण एकदमच हलका झाला होता..आणि रितू सुद्धा त्याचा ताण कमी करण्यास तत्पर होतीच....

"ओह हो... आमच्या जय ला दुखलं.. ठीके आता काय कारायचं.."

"काय करायचं म्हणजे काय?" जय काही न कळून बोलला. रितू ने डोळे मिचकावत जय कडे पाहिलं..आणि हळुवार पणे त्याच्या गालावर एक छोटीशी किस दिली.. रितूच्या अश्या वागण्याने जय खूशच झाला..

"रितू... तू कसली गोड आहेस ग.. माझा कालचा दिवस जरा स्ट्रेसफुल होता. माझी चिडचिड होत होती..मला तू हवी होतीस शेजारी.. इथे.. " स्वतःच्या शेजारी बोट दाखवत जय बोलला" पण तू शेजारी नव्हतीस.. मग मला रागच आला.. "

"सॉरी!" थोडी ओशाळून रितू बोलली.. "पण मी उठतांना तुला छोटीशी किस देऊन उठले होते..कळल नाही तुला जय?"

"हो? मला तर कळलंच नाही..मग आता आय नीड वन मोर किस ह.."

"येस येस.. जय माय डीअर!!.." इतक बोलून रितू ने हलकेच तिचे ओठ जय च्या ओठांवर चिकटवले.. आणि क्षणार्धात दूर झाली.."बास?"

"अ ह.. ये दिल अभी भरा नाही.." रितू ला जवळ ओढत जय बोलला..

"उठ आता जय.. आपल्याला हॉस्पिटल मध्ये जायचं आहे."

"काम तर आहेच ग.. आज तुझ्याजवळ रहाव वाटतंय..आज तुझ्यासाठी घरी थांबू?.." जय ने हग देण्यासाठी दोन्ही हात पुढे केले. आणि रितू ला टाईट हग दिली.. दोघांमधला सगळा ताण कुठच्या कुठे पळून गेला..

"आता फक्त तूच आहेस रे माझ आयुष्य.. तुझी काळजी तर घेतलीच पाहिजे ना? आणि सुट्टी? नो नो जय... तुझी गरज किती लोकांना आहे... तू संध्याकाळी आलास क सगळा वेळ तुझ्यासाठी..ओके?" रितू बोलली आणि जय णी काहीतरी विचार केला... तो एकदम सिरिअस झाला..

"ओके.. रितू तू माझ्यावर इतक प्रेम करतेस तरी तुला आपलं बाळ नकोय? असं का? आपल्या दोघांचा एक अंश ह्या जगात यावा असं तुला वाटत नाही?" बोलायची ही वेळ योग्य आहे का ते जय ला माहिती नव्हत पण त्याला रितू च्या मनातलं जाणून घ्यायचे होते. रितू ने जय चे बोलणे ऐकले आणि तिचा मूड एकदमच बदलला.. ती लगेच जय पासून दूर झाली.

"नो जय.. आय लव्ह यु.. पण.... मी तुला आधी सुद्धा सांगितलं होत.. मला स्वतःच्या आयुष्याबद्दल खात्री नाहीये आणि मग मी एका जीवाला जन्म का घालेन.. बर्डन म्हणून नको कोणताही नातं.. अगदी आई पण सुद्धा!! ही गोष्ट मी लपवून ठेवली नव्हती तुझ्यापासून..तरी आता हा विषय का? आपण दोघच राहू शकत नाही? तुला काही प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुला काही प्रॉब्लेम असेल तर आपण ह्या नात्याबद्दल पुन्हा विचार करू..तुला मिळेल दुसरी कोणी छान.. जी तुझा वंश पुढे नेईल.."

"ए बाई.. तू कुठून कुठे जातीयेस.. असाच आला ग विचार.. वंश बिंश हे कुठून आणलास.. आणि तुला सोडून देईन?? हे असले फालतू विचार तुझ्या मनात कुठून आले? मी आज मध्ये जगतो बघ.. आणि तुला दुखवून काहीच नकोय मला... आपण ह्या आधी ह्या विषयावर खोल वर जाऊन कधी चर्चा केलीच नाही ना ग.. सो फक्त तुझे विचार मला ऐकायचे आहेत..आणि रितू, हा फक्त एक प्रश्न आहे...तुझ्या मनाविरुद्ध तुझ्यावर काहीही लादणार नाही...तुझ्याशी नाही तर कोणाशी बोलणार ना..तुला नाही वाटत आई व्हावस? आपण पण कोणाला जन्म द्यावा.. त्या बाळाची काळजी घ्यावी मग पुढे जाऊन आपली पण कोणीतरी काळजी घेईल उतार वयात.. म्हणजे हेच तर असतात ना महत्वाचे मुद्दे..." जय हसत बोलला.. पण रितू मात्र जरा विचारात पडली.. जय ने विचारलेल सगळे प्रश्न बरोबर होते सो त्याच्या प्रश्ना वर रितू ने जरा विचार केला.. आणि ती बोलायला लागली,

क्रमश: