डॉक्टरांनी पेपरवर काही औषधें देखील लिहली आणि ती कसे घायचे ते अनिलला समजावून सांगितले, अनिलने डॉक्टरांची फी विचारून पैसे दिले आणि क्लीनिकच्या बाहेर पडला.
ह्या वेळेस अनिलने मनाशी एकदम पक्क केलं की डॉक्टरने जे काही सांगितलं ते आचरणात आणायचे आणि सगळे औषधें वेळेवर आणि पूर्णपणे घायचे.
औषध बाजूच्या फार्मसी मधून विकत घेऊन अनिल बाईक जवळ आला, औषधांची पिशवी खिशात खोचली आणि बाईक वर टांग टाकून एका किक मधेच बाईक सुरु करून क्षणात तिकडून निघाला, बाईक रस्त्यावरून आज जरा धीम्या गतीनेच चालत होती, अनिल आजूबाजूंच्या झाडा झुडपांना, दुकानांना, रस्त्यावरून चाललेल्या बस, कार, बाईक खूप न्याहाळून पाहत होता, त्याच्या डोक्यात वेगळेच विचार सुरु होते, जणू काय त्याचे डोळे त्याच्या मेंदूला विचारात होते कि रस्त्यावर जाणाऱ्या बस मधले, गाड्यां मधले, बाईक वरचे सगळे माणसे किती नशीबवान आहेत, ते सगळे किती खुश आणि धड धाकट आहेत आणि मीच असा का, असंख्य प्रश्नांचा गोंधळ डोक्यात घेऊन घर कधी आलं ते त्याला स्वतःला देखील कळलं नाही.
बाईकचा साइड स्टॅन्ड डाव्या पायाने खाट करून खाली पाडून त्याने गाडी आडवी केली आणि दाराचे कुलूप उघडून आत गेला, शर्टचे बटणे उघडत उघडत किचन मध्ये शिरला, फ्रीझ मधून पाण्याची बॉटल काढून प्यायला सुरवात करणार तेवढ्यात उभे राहून ढसा ढसा पाणी पिणे हानिकारक असते असे कुठे तरी वाचलेले किंवा ऐकलेले त्याच्या अचानक लक्षात आले आणि तसा तो बॉटल घेऊन हॉल मध्ये आला, शर्ट काढून हँगरला टांगले आणि सोफ्या वर बसून टी व्ही च्या रिमोटचे बटण दाबले, टी व्ही वर छान रोमँटिक हिंदी गाणं सुरु होत, ते ऐकत अनिल पाण्याचे चार घोट प्याला.
त्याच्या चेहऱ्या वरून आणि अवस्थे वरून स्पष्ट कळून येत होत कि त्याला सविताची अतिशय उणीव भासत होती, तीच नसणं त्याला टोचत होत, त्याला तिची, तिच्या सोबतीची, तिच्या प्रेमाची खरंच खूप गरज होती, तो एका अर्थे पोरखा झाला होता, आपल्या भूतकाळाच्या आठवणींनी त्याच्या मनात गोंधळ उडवायला सुरवात केली. त्याला सविताची एक एक गोष्ट आठवत होती, तीच वागणं बोलणं, घरात वावरणं त्याला खडा न खडा आठवत होता, आणि आता तीच त्याच्या आयुष्यात नसणं जणू एखाद्या सापाच्या डंखाने शारीरात विष पसरावे तसे त्याच्या शरीराला आणि मनाला दुःखाच्या विषाने भरून टाकत होते, तो एकटा पडला होता, त्याच्या डोक्यात सुरु असलेल्या युध्दाची कल्पना फक्त त्याला आणि कदाचित फक्त डॉक्टरला होती, तो एकटाच ते महायुध्द लढत होता आणि त्यात सविताच नसणं आगीत तेल ओतल्यासारखं काम करत होत, निस्तब्ध अनिल एकटाच सोफ्यावर बसून विचारात गुंगलेला होता, चेहरा भावनाहीन होता आणि नकळत त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांचा बांध तुटला आणि अश्रूंच्या धारा त्या दगड झालेल्या चेहऱ्या वरून वाहू लागल्या, नकळत शेजारीच असलेल्या टेबलचा ड्रॉवर त्याने खोलून पेन आणि वही काढली आणि मनातल्या सगळ्या भावना, सगळ्या वेदना कवितेच्या रूपाने कागदावर उतरवल्या.
स्वर नाही गाण्याला,
चव नाही पाण्याला,
कसा जगू तुझ्या वीणा,
सर नाही जिन्याला,
हे सर नाही जिन्याला ग, सर नाही जिन्याला, सर नाही जिन्याला ग, सर नाही जिन्याला.
पडलो असल मी,
झडलो असल मी,
काय सांगू किती येळा,
रडलो असल मी,
मन नाही थाऱ्यावर,
उडतंय वाऱ्यावर,
डोकं माझं मानत नाही असं तुझ्या जाण्याला,
हे सर नाही जिन्याला, सर नाही जिन्याला, सर नाही जिन्याला ग, सर नाही जिन्याला.
असल मी येडा ग,
लंगडा घोडा ग,
पण तुझ्या साथी बिना,
वाढे धरपडा ग,
कोणी नाही जोडीला,
शोधी बडबडीला,
जीभ माझी तरसली तुझ्या हातच्या खाण्याला,
हे सर नाही जिन्याला, सर नाही जिन्याला, सर नाही जिन्याला ग, सर नाही जिन्याला.