mitranchi maitri books and stories free download online pdf in Marathi

मित्रांची मैत्री

मित्रांची मैत्री

सुरेश आणि रमेश दोघे जिवलग मित्र होते. त्यांचे घर जवळ जवळ नव्हते मात्र अधून मधून ते दोघे एकमेकांच्या घरी नेहमी येत असत आणि जात असत. त्यामुळे रमेशच्या घरातील सर्वच जण सुरेशला ओळखत होते तर सुरेशच्या घरातील सर्वचजण रमेशला ओळखत होते. त्यांच्या मैत्रीची कहाणी संपूर्ण गावाला माहीत होती. जिथे रमेश तिथे सुरेश हे ठरलेले समीकरण होते. दोघे ही एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत होते. मिळून अभ्यास करणे, मिळून शाळेला जाणे, मिळून खेळणे सारं काही त्यांचे मिळून मिसळून होत होते. दिवाळी व उन्हाळी सुट्टीच्या काळात त्यांची ताटातूट होत असे तरी ते एकमेकांना फोन करून दिवसातून एकदा तरी बोलत असे. असे एक दिवस जात नसे की त्यांचे बोलणे झाले नाही. दिवाळी च्या सुट्टीत सुरेश आपल्या मामाच्या गावी गेला होता. सायकल चालवत असतांना तो पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाल्याची बातमी रमेशला कळल्यावर तो खूप दुःखी झाला आणि त्याला भेटण्यासाठी तडफड करू लागला. पण काही उपाय नव्हता. शेवटी दिवाळी सुट्ट्या संपल्या आणि दोघांची भेट झाली तेंव्हा रमेशला हायसे वाटले. अभ्यासात दोघे ही हुशार होते. शाळेत त्यांची सिंसीयर आणि इंटेलिजन्स विद्यार्थी म्हणून ओळख होती. त्यांच्यात कधी भांडण झाले असे ऐकण्यात नव्हते. दहावीच्या परीक्षेत दोघांनीही प्रथम श्रेणीचे गुण मिळविले त्यामुळे सर्वाना आनंद झाला. कॉलेजच्या शिक्षणासाठी दोघांना जवळच्या शहरात जाणे आवश्यक होते. घरातल्या वडील मंडळींनी विचार करून दोघांसाठी एक खोली किरायाने घेतली आणि तेथे त्यांना शिक्षणासाठी ठेवले. जेवण्यासाठी मेसची व्यवस्था करण्यात आली.दोघे ही एकच कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. रमेश जो की दिसायला जरा सुंदर होता, त्याला हळूहळू कॉलेजची हवा लागू लागली. सुरेशसोबत तो फार कमी वेळ राहू लागला. त्याच्या मैत्रीत अंतर होऊ लागले. रमेशला दुसरे मित्र मिळाले होते, जे की नेहमी रमेशला वेगळ्या वाटेने घेऊन जात होते. सुरेशने त्याला वेळोवेळी टोकण्याचा प्रयत्न केला होता पण रमेश ऐकण्याच्या मनःस्थिती मध्ये मुळीच नसायचा. यातच त्याचे कॉलेजमधील एका मुलीसोबत प्रेम जडले होते. त्या मुलीचे वर्तन चांगले नाही हे सुरेशला माहीत होते म्हणून त्याने रमेशला तसे सांगितले पण तो ऐकायला तयार नव्हता. ती रमेशसोबत रोज फिरायची, फिक्चर पहायची, हॉटेलात जेवायची हे रोजचे झाले होते. रमेशच्या घरून तो मागेल तेवढा पैसा येत होता. कॉलेजची फीस, ट्युशनची फीस, पुस्तके, वह्या या नावाखाली तो घरी पैसे मागायचा आणि घरचे देखील पैसे पाठवायचे. रमेश पूर्ण बदलून गेला हे त्याच्या घरी कळाले तर त्यांना काय वाटेल याची सुरेशला मनातून भीती आणि चिंता वाटत होती. रमेशचे डोळे वेळीच उघडायला लावणे आवश्यक होते. पहिले वर्ष असेच संपले होते. दुसरे वर्ष अत्यंत महत्वाचे होते. काही ही करून रमेशला त्या रस्त्यावरून आणावे लागेल म्हणून सुरेश विचार करून एक प्लॅन तयार केला. ज्या मुलीवर रमेश प्रेम करत होता, ती फक्त पैशासाठी रमेश सोबत होती. तिचे खरे प्रेम दुसऱ्याच मुलांवर होते हे सुरेशने आपल्या मोबाईलमध्ये शूट करून बंद केला. ती क्लिप रमेशला दाखविला आणि त्यावर विश्वास बसावा म्हणून बरोबर दुसऱ्या दिवशी तेथेच नेऊन त्याला ते दृश्य त्याने दाखविला. रमेशला ते सहन झाले नाही. त्याने सरळ त्या मुलाजवळ गेला आणि जोरात थप्पड मारून निघून गेला. काही दिवस प्रेमाच्या विरहात दुःखात राहिला होता. या काळात सुरेशने रमेशचा खूप सांभाळ केला. अनेकवेळा तर तो वेडा झाल्यासारखे वागायचा पण सुरेशने त्याला वेळीच समजावून सांगितले म्हणून पुढचा अनर्थ टळला. त्याने अभ्यासावर लक्ष देण्यावर भर दिला. रमेशला कॉलेजला जावे असे वाटत नव्हते. तेंव्हा घरच्या घरी सुरेश कॉलेजमध्ये शिकविलेले त्याला घरी शिकवू लागला. हळूहळू त्याचे अभ्यासात लक्ष लागू लागले. मन लावून अभयस करू लागला. शेवटी एकदाचे परीक्षेचा दिवस उजाडला. सुरेशचा नंबर त्याच कॉलेजमध्ये आला होता तर रमेशचा नंबर मात्र दुसऱ्या कॉलेजमध्ये आला होता. सुरेश रोज रमेशला सोडून परीक्षेला जायचं. सर्व पेपर खूप चांगले गेले. त्याच आनंदात ते दोघे गावी परतले. सुट्ट्याच्या कालावधीत ते दोघे नेहमी सोबत राहत. कॉलेजमधली कोणतीही बाब सुरेश कोणाला सांगितले नाही, तशी शपथ त्याने रमेशला दिली होती. निकालाचा दिवस उजाडला. रमेशला सुरेश पेक्षा दोन टक्के जास्त गुण पडले होते. रमेशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते अश्रू फक्त सुरेशसाठीच होते हे फक्त रमेशच जाणत होता. पुढे रमेश डॉक्टर झाला तर सुरेश इंजिनिअर झाला. आज ही ते दोघे वर्षातून एकदा भेटतात आणि मागील दिवस आठवून एकमेकांवर हसत राहतात.
- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED