जुळले प्रेमाचे नाते-भाग-७५।। Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते-भाग-७५।।

"काय बोलतेस...?? प्राजु एवढं काही झालं आणि तुला आम्हाला एका शब्दाने सांगावस ही नाही का ग वाटलं.." प्रिया आणि वृंदा चांगल्याच भडकलेल्या माझ्यावर..

"अग काय आणि कोणत्या तोंडाने हे सांगायचं मी.. तो दिवस जरी आठवला तरी मला भीती वाटते. नको ग ते दिवस.. आणि त्या आठवणी..." मी डोळ्यातलं पाणी पुसण्याचा प्रयत्न करत बोलले.. जे अभिने पाहिलं आणि माझ्याजवळ येऊन तिने मला घट्ट मिठी मारली..
किती बर वाटतं नाही...!! जवळच्या व्यक्तींची ती मायेची ऊब...

"गाईज आता तुम्ही तिला काहीच बोलु नका.. खरतर हे झालं तेव्हा तिने मला कॉल केला होता. मला ही अपेक्षा नव्हती की देवांश दादा एवढ्या खालच्या थराला जाईल. त्याक्षणी मी कॅनडा ला होते शिक्षणासाठी म्हणुन येऊ नाही शकले. ती तुम्हाला सांगणार होती पण मीच नको सांगितलं. सॉरी गर्ल माझ्यामुळेच ती काही बोलली नाही." अभि समजावणेच्या भावात बोलली. तशा दोघीही गप्प झाल्या.

"सॉरी प्राजु.. पण तू एकदा बोलली असतीस तर आम्ही ही आलो असतो ना तुला काही मदत लागली असती तर आम्ही केली असती. म्हणून जरा चिडलो आम्ही.." वृंदा काळजीने बोलताच प्रियाने ही आपली मान डोलावली.

"सॉरी गर्ल. यात प्राजु ची काहीच चूक नाही आहे. मीच तिला नको बोलले होते.." अभिने सगळं काही सांभाळून घेतलं होतं.

खरतर अस काही आमचं बोलण झालंच नव्हतं. पण त्याक्षणी तिने माझ्या मनातलं ओळखलं आणि दोघींना समजावलं.

"बर मग सगळं ठीक झालं ना की अजून काही नवीन ट्विट्स..??" प्रियाच्या या वाक्यावर मात्र आम्ही सगळेच हसलो..

"हो ग बाई.. बस एवढेच ट्विट्स.. नंतर अस झालं की..."
आणि मी पुढे बोलु लागली.

आम्ही सगळे गणपतीच्या मंदिरात गेलो. छान दर्शन ही घडलं. त्यातून बाहेर पडायला मला वेळ लागत होता. काही, दिवस ट्रीटमेंट ही घेतली. सोबत आई-बाबा.., निशांत आणि राज होतेच. सर्वांनी सांभाळून घेतलं. तीन ते चार महिने झाले असतील. मी देखील बऱ्यापैकी नॉर्मल झाले होते.

असच कॅन्टीनमध्ये टीपी चालू असता राजने टेबलावर दोन इनविटेशन कार्ड ठेवले.

"हे कसली कार्ड.." मी ते हातात घेत राज ला विचारलं..

"अग शनिवारी माझा बर्थडे आहे. आणि तुम्हा दोघांना यायच आहे. फक्त दोघांना नाही तर तुमच्या फॅमिली सोबत यायच आहे तुम्ही... " राज हसुन सांगत होता.

"गाईज प्लीज यार. आणि तसही डॅड एक गिफ्ट देणार आहेत. आणि मला तुम्ही तिथे हवे आहात.." राजच्या आग्रहाला आम्ही नकार देऊ नाही शकलो.

कॉलेजनंतर मी घरी आले आणि राजने दिलेलं कार्ड मी आईला दाखवलं..
"अरे वाह..!! हे कार्ड तर खूप छान आहे. राज चांगलाच श्रीमंत आहे." आई ते कार्ड न्याहाळत बोलत होती.

"हो ग आई.. त्यांचा प्लॅट केवढा मोठा आहे माहीत आहे का...???!! आपल्या घरासारखे दोन ते तीन घरं जुळून होतील एवढ मोठं आहे त्याच घर. त्यात अजून काही प्रॉपर्टी नक्कीच असेल. मुंबई ब्रांचमध्ये बाबा काम करतात. पण त्यांचा खुप मोठा बिजनेस आहे फॉरेनला.."

"आणि त्यात शनिवारी पार्टी कुठे आहे माहीत आहे का.. अलिबाग च्या फार्महाऊस वर... सो तुम्हाला ही बोलावल आहे आणि आपण सगळे जाणार आहोत. आपली ही एक पिकनिक होईल " मी आईला डोळा मारत बोलले. त्यावर आई देखील गोड हसली..

"हुशार मुली पळ आधी फ्रेश हो आणि जेवायला ये." आईच्या या वाक्यावर मला भुकेची जाणीव झाली आणि मी माझ्या रूममधे पळाले. फ्रेश होऊन बाहेर आले आणि गप्पा मारत आम्ही जेवुन घेतलं.. आज लवकर आल्याने आम्ही खूप दिवसांनी गप्पा मारल्या.

"आई विचार करते की आज निशांतच्या घरी जाऊन येऊ.. हे जे काही प्रकरण झाल त्यापासून मी आजी-आजोबांना भेटले ही नाही आहे. खूप रागावले असतील..." मी जरा दुःखी चेहरा करत बोलले असता आईने माझे दोन्ही गाल एका हाताने दाबले...

"नाही ग रागावणार आई-बाबा. बस एकदा भेटुन ये... नाही तर एक काम कर त्यांना आज आपल्याकडे बोलावून घे. छान गप्पा मारत बोलण होईल आणि तु छान अस चिकन बनव म्हणजे ते खुश होतील. शेवटी त्याच्याकडेच जायचं आहे तुला लग्न करून..." आता आईने मला डोळा मारला. आणि मी चांगलेच गोरी मोरी झाले होती. एकदम टमाटर सारखे लालेलाल....

"काही ही असत हा आई तुझं..." मी लाजतच स्वतःच्या रूममधे पळाले. आत जाऊन मी बेडवर स्वतःला झोकून दिलं.. अजून ही मी लाजत होते.. का नको लाजू.. आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत आपल्याला आपलं आयुष्य घालवायला मिळणार आहे. यासाठी देवाचे किती आभार मानू हेच कळत नव्हतं.

ठरल्याप्रमाणे मी निशांतला कॉल करून आजचा प्लॅन समजावला.. त्याने ही घरी विचारून आम्हाला होकार दिला. हे जाऊन मी आईला सांगितलं. मग मी आणि आई कामाला लागलो. कारण खुप दिवसांनी आज घरात काही तरी प्लॅन होत होता.

काही वेळाने बाबा आले. त्यांनी ही एक इनविटेशन कार्ड आणलं होत. ते कार्ड सेम होत जे मला राजने दिल होत. ते बाजूला ठेवून आम्ही आजच्या प्लॅन वर लक्ष द्यायचं ठरवलं.

मी, आईला जेवण बनवण्यात मदत करत होते. आज बाबा ही आम्हाला मदत करत होते. तोच दरवाजावरील बेल वाजली आणि निशांत..,आजी-आजोबा आले. ते येताच बाबांचं किचनमधलं काम संपल होत. ते आता बाहेरच्यांना पाणी देण. अजून काही काम असेल तर आणि मेन काम म्हणजे त्यांच्या सोबत गप्पा मारत बसणं. हे सर्वात मुख्य आणि महत्त्वाच काम बाबा करत होते.

मी आत काम करत असता निशांत आला. आज कॉलेजमध्ये निशांत आणि माझी भेट झाली होती. पण आता संध्याकाळचा हा निशांत वेगळा होता. शांत.., त्याच्या नजरेत एक वेगळीच नशा होती. आकर्षित करण्याची. ते नाही का पौर्णिमेच्या चंद्रात असते. अगदी तशीच होती ती नशा.., ते आकर्षण. त्याला बघून कोणीही त्याच्या प्रेमात पडाव असाच होता तो. पण त्याच प्रेम फक्त माझ्यावर होत आणि यासाठी मी देवाचे नेहमीच आभार मानत होते.

निशांत येताच त्याने आम्हाला मदत करायला सुरुवात केली. निशांत कोशिंबीरसाठी कांदा, काकडी, गाजर, लिंबू कापत होता. तर मी पीठ मळत होते. बोलता बोलता माझ्या चेहऱ्यावर एक केसांची बट उगाचच रेंगाळत होती. जिला मी फुंकर मारून उडवण्याचा प्रयत्न करत होते खर.!! पण ती ही किती शहाणी बघा...! बिलकुल जायला बघत नव्हती.

हे निशांत बघत होता आणि गालातल्या हसत ही होता. तेवढ्यात आईला बाबांनी हाक मारली आणि आई बाहेर गेली. आई बाहेर गेल्याच बघून निशांत माझ्या जवळ आला आणि आपल्या हाताच्या एका बोटाने हळुवारपणे ती बट माझ्या कानामागे नेऊन ठेवली. तो स्पर्श होताच मन मोहरले... पोटात असंख्य फुलपाखरांचा थवाच उडाला.. माझ्याकडे बघून निशांत परत जाऊन आपलं काम करत उभा राहिला. मी देखील त्याला बघत होते आणि तो स्पर्श आठवुन लाजत होते.

त्यानंतर आम्ही मिळून पुऱ्या केल्या. बाकी सगळं झालं असल्याने आम्ही जेवायला बसलो. निशांत माझ्या समोरच्या खुर्चीवर बसला होता.

"आजी-आजोबा कसे आहात..." खुप दिवसांनी मी आजी-आजोबांना पाहिलं होतं. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही जेवत होतो. पण माझी नजर होती ती निशांतकडे. का... कोण जाणे पण आज त्याच्यावर जरा जास्तच प्रेम येत होतं.

जेवण जेवुन आम्ही किचन आवरलं आणि हॉलमध्ये गप्पा मारत बसलो. सगळे गप्पा मारत आहेत म्हणून मी आणि निशांत खाली गार्डनमध्ये गेलो. रात्रीची निशब्द रात्र.. त्यात हिवाळ्याची थंडी. आणि मी विसरलेल माझं स्वेटर.. पण बोलतात ना आपल्या आवडत्या व्यक्तीचं लक्ष बरोबर तुमच्यावर असत. मी थंडीने कुडकुडत असताना त्याने मला त्याच जॅकेट दिल. त्या जॅकेट ची मज्जाच काही वेगळी होती. त्यात होती ती मायेची ऊब..

त्या निरभ्र आकाशाखाली मी आणि निशांत चालत होतो. आज तो बोलत होता आणि मी शांतपणे ऐकत होते. त्याच बोलण मनात आणि त्याला डोळ्यात साठवत होते. आपल्यावर प्रेम करणारा आणि जीव लावणारा आपला असा कोणी तरी नेहमीच जवळ हवा असतो. आज मला माझा "जिवलगा" मिळाला होता.

सहज लक्ष आकाशात गेलं आणि तो चंद्र दिसला. असंख्य ताऱ्यांपासून तो वेगळा होता. एका कोपऱ्यात बसलेला. जर तो चंद्र नसता ना तर त्या ताऱ्यानाही आज किंमत नसती. आकाशात खूप तारे आहेत पण खरं सौंदर्य तर तो चंद्र आहे..

आपलं आयुष्य ही असच असत. असंख्य तारे आपल्या ओवती-भोवती फिरत असतात. पण आपण त्यात न गुंतता आपल्या चंद्राला शोधलं पाहिजे जो आपल्यासाठी आयुष्यभर जोडीदार म्हणूम साथ देईल. अगदी त्या चंद्रासारखा...

"हनी-बी... आईसस्क्रीम घेऊन जाऊया का..??" निशांतच्या त्या वाक्यावर मी भानावर आले.. मी मानेनेच होकार दिला आणि आम्ही चालत निघालो. समोर चालताना अचानकपणे त्याने माझा हात धरला. तो स्पर्श.. ज्या रस्त्यावर आम्ही चालवत होतो तिथे गाड्या येत जात असल्याने त्याने माझा हात धरला होता. आजकाल निशांत जर जास्तच पजेसिव्ह झाला होता.

आम्ही शॉपवर पोहोचताच त्याने माझा हात सोडला. तिथुन आम्ही सर्वांच्या आवडत्या आईसस्क्रिम घेतल्या आणि निघालो..

घरी येताच आम्ही मिळून आईसस्क्रीम संपवली. आईसस्क्रीम खाता खाता ही गप्पा रंगल्या होत्या. पण त्यानंतर ते जायला निघाले. मी दुरूनच निशांतला बाय केलं. आणि घरी जाऊन मॅसेज करायचा इशारा केला. बुक केलेली कार येताच ते निघाले. त्यांना सोडायला आम्ही खाली गेलो होतो. निशांतची गाडी दूरवर जाईपर्यंत मी बाय करत होते. शेवटी आईने मला हाक मारताच आम्ही आमच्या घरी आलो.

मी वर येताच स्वतःच्या रूममधे निघून गेले आणि त्याला मॅसेज केला...
"खडूस आज काय एवढं करून आला होतास.. इतका हँडसम दिसत होतास की... तुझ्यावरच प्रेम अजुनच वाढलं आहे. आय लव्ह यु खडूस..." असा मॅसेज करून मी मोबाईल बाजूला ठेवला. लगेच मोबाईल ची रिंग वाजली आणि त्याच नाव मोबाईल झळकल..

"काय करणार तु एवढी गोड दिसत होतीस की तुला बघून माझा चेहरा खुलला होता." त्याच्या अशा मॅसेजवर मी त्याला रिप्लाय करत होते आणि लाजत होते. असच आमचं चालू होत. काही वेळाने त्याचा मॅसेज आला की ते घरी पोहोचले.

मग त्याला गुड नाईट, बाय करून मी मोबाईल ठेवला. आणि अंगावर पांघरूण घेतलं. डोळे बंद केले आणि मला गार्डनमधला शांत, हसरा निशांत आठवला आणि मी माझे डोळे उघडले...

"देवा काय होतंय मला.. आज एवढी का आकर्षली जाते आहे निशांतकडे... मला पुन्हा नव्याने प्रेम तर होत नाही आहे ना..???!!.." स्वतःशीच बोलत मी चादर डोक्यावर ओढून घेतली आणि प्रेमाच्या स्वप्नांमध्ये स्वतःला झोकून दिलं.

तिथे होतो फक्त मी आणि माझा खडूस.. तोच शांत, हसरा निशब्द करणारा माझा निशांत...

to be continued.....


(कथेचा पार्ट कसा वाटला नक्की सांगा. कथा काल्पनिक आहे.)


स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.

©हेमांगी सावंत(कादंबरी)