विभाजन - 2 Ankush Shingade द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

विभाजन - 2

विभाजन

(कादंबरी)

(2)

ही देवळं पाडण्यानं व जबरदस्तीच्या धर्मपरीवर्तनानं मजबुरीनं जरी येथील मुस्लीम वगळता इतर धर्म चूप बसले असले तरी त्यांच्याही मनात असंतोष खदखदत होता. सामान्य माणसांमध्येही छोट्या छोट्या स्वरुपात आपल्या धर्माबद्दल आत्मीयता जाणवतच होती. फरक एवढाच होता की ते ती गोष्ट बाहेर काढत नव्हते.

१८५७ चा उठाव होवून गेला होता. हिंदी सैनिक हारले असून पूर्णतः इंग्रजांचा भारतात जम बसला होता. मुघल साम्राज्य हे पूर्णतः दुबळे झाले होते. त्यामुळं काही काळासाठी का होईना तमाम हिंदूस्थानीय वासीयांना चूप राहणे भाग होते. कारण हे इंग्रजही मुस्लिम राज्यकर्त्यांच्याच नीतीचे होते. फरक एवढाच होता की हे सुधारणावादी होते.

१८५७ चा राष्ट्रीय उठाव यशस्वी झाला नसला तरी या उठावाने इंग्रजांना एक चपराक जरूर दिली. ती म्हणजे धार्मीरतेची. त्यांनी ठरवलं की येथील लोकांच्या धार्मीकतेला ठेस पोहोचविण्याऐवजी त्या कशा वृद्धींगत होतील, त्यासाठी प्रयत्न करावा. १८५७ च्या राष्ट्रीय उठावातून धार्मीक बाबीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण ब्रिटीशांनी अवलंबले. तसेच भारतीय समाज एकसंध होणार नाही हेही धोरण त्यांनी अवलंबले. तसेच भारतीय समाजात असलेल्या जाती, धर्म, पंथ, वंश, प्रदेश या कारणावरुन नेहमीच संघर्ष कसे होतील?एकमेकांची मने एकमेकांविरुद्ध कसे आणि केव्हा कलुषीत होतील या दृष्टीने हे इंग्रजी शासन प्रयत्न करु लागलं. त्यानुसार ते धोरण राबवू लागले. त्यातच स्वतःच आग लावून ती आग विझविण्यासाठी आपण किती चांगला प्रयत्न करतो आहोत हेही इंग्रज दर्शवू लागले. पण त्यांची ही दोहरी नीती आपल्या लक्षात आली नाही.

काही काळ बरा गेला. त्यानंतर इंग्रजांना वाटलं की आपला या देशात अंमल सुरु झालेला असून आता या देशाला घडवणं आपलं काम आहे. हे लक्षात येताच त्यांनी या देशातील तमाम नागरीकांना शिक्षण देण्याच्या योजना आखल्या. मग इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारासोबतच त्यांनी नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान आणलं. यामुळं भारतात धार्मीक, आर्थीक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात बदल होण्यास मदत झाली.

इंग्रज भारतात येण्यापुर्वी येथील तमाम समाज रुढी, परंपरा, जातीयता यामध्ये गुरफटला होता. इथे केशवेपण, बालविवाह, सतीप्रथा या प्रथा सर्रास सुरु होत्या. मग जेव्हा येथील समाज इंग्रजांमुळं साक्षर बनला, तेव्हा येथील समाजाला आपल्या कमतरता समजल्या. मग देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजाला, समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मुलन करण्याची गरज आहे. हेही समजले. पण धार्मीक विषय काही समजला नाही.

येथील तमाम भारतीय समाज आपल्या लेखनीद्वारे जनजागृती करु लागला. पण आपल्या धर्मातील धार्मीक रुढी परंपरा ही तेवढ्याच तो जपत होता. त्यामुळं कोणी त्यांच्या धर्माला काही म्हटलंच तर ते त्यांना पटत नसे. कापण आधीपासूनच हिंदू मुस्लिमांचा द्वेष करीत असे. तर मुस्लीमही हिंदूचा द्वेष करीत असे. ते भारतीय स्वातंत्र्यानिमित्याने एकत्र आले होते. पण त्यांच्यात आजही धार्मीकतेबाबतीत असंतोष खदखगतच होता.

इंग्रजांनी तमाम भारतीयांना शिक्षण दिल्यानंतर येथील समाज शिकला. त्यांना या समाजात रुढ असलेल्या ब-याचशा वाईट रुढी, कर्मकांड व प्रथा आवडल्या नाहीत. त्या दूर व्हाव्या यासाठी त्यांनी नव विचाराने प्रेरीत असलेला धर्म स्थापन केला. त्याला समाज संबोधल्या जाई. ब्राम्होसमाज, प्रार्थनासमाज, सत्यशोधक समाज, आर्यसमाज हे त्या काळातील काही समाज होय. या नव विचाराच्या तत्वानुसार पुढे स्रीविषयक समाजसुधारणा झाल्या. हुंडापद्धती, केशवेपन, बालविवाह, विधवा विवाहास विरोध ह्या सा-या कुप्रथा ह्या विविध समाजाने विरोध करून बंद केल्या. सतीबंदीचेही कायदे बनले. तसेच आता स्रीयांनाही शिक्षण घेता येवू लागल्याने मुलीही शिक्षण प्रवाहात आल्या.

महिला ह्या मागासलेल्या असून त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. तेव्हा त्या महिलांनी पुढे यावं. जर पुरुष घडवायचा असेल तर महिलांनी पुढं येण्याची गरज आहे असे गृहीत धरुन महिलांच्या शिक्षणासाठी म. फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पं. ईश्वरचंद विद्यासागर, विष्णुशास्री पंडित व विरेशलिंगम पतलु यांनी प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविवाह संमती कायद्यावर परखड मते मांडली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेला विरोध केला. ताराबाई शिंदेनी स्री विषयक विचार मांडले. धोंडो केशव कर्वे यांनी विधवा व परितक्तांनी आपल्या पायावर उभं राहावं म्हणून अनाथ बालिकाश्रम उभारला.

मोहम्मद लहान होता. तसा तो आता लहानाचा मोठा होत चालला होता. तो त्या इंग्रजांची नीती पाहात होता. त्याचबरोबर त्यांचे वागणेही पाहात होता. इंग्रज आपल्या बापाला कसे प्रलोभन देतात हेही तो लहानपणापासून पाहात होता. त्याला वाटत होतं की इंग्रजांनी आपल्या देशातून जावं. आम्हाला सुखी राहू द्यावं. तो वडीलांनाही तसं सांगत होता. पण वडील काही त्याचं ऐकत नव्हते.

मोहम्मद लहानपणापासूनच हिंदू मुसलमान दंगे पाहात होता. काहीतरी कुणीतरी धर्माबद्दल काही बोलल्याचे कारण पुढे करीत लोकं भांडायला त्याच्या वस्तीत जेव्हा येत. तेव्हा मोहम्मद चा बा आपल्या लहानशा घरात अगदी लपून बसत असे. मात्र ही मारायला येणारी मंडळी गावची नसायची. गावातील माणसं शांत राहात असत. ती भांडत नसत.

गावात ज्याप्रमाणे मुसलमान राहात होते. त्याचप्रमाणे गावात हिंदूही राहात होते. बौद्ध आणि शिखही गुण्यागोविंदानं राहात होते. कुणाचं कुणाशी वैर नसायचं. ती गावातील माणसं एकमेकांना मदत करीत असत. नव्हे तर एकमेकांच्या घरी समारंभाला येणेजाणेही गावातील मंडळी करीत असायची. तसंच मोहम्मदलाही आपल्या कार्यक्रमात बोलवायची. मोहम्मदच्याही घरी जेव्हा मुंज असायची. तेव्हा मोहम्मदचा बा गावाला आमंत्रण द्यायचा. मग जे मांस खात असतील, त्यांना मटनाचं जेवन व जे खात नसतील त्यांना साधं जेवन करायचा. मात्र अशा दंग्याच्या काळात गावची मंडळी मोहम्मदच्या बाला आपल्याच एक कुटूंबातला समजून अंतर देत नसत.

मोहम्मद लहान होता. तसा तो आता लहानाचा मोठा होत चालला होता. तो त्या इंग्रजांची नीती पाहात होता. त्याचबरोबर त्यांचे वागणेही पाहात होता. इंग्रज आपल्या बापाला कसे प्रलोभन देतात हेही तो लहानपणापासून पाहात होता. त्याला वाटत होतं की इंग्रजांनी आपल्या देशातून जावं. आम्हाला सुखी राहू द्यावं. तो वडीलांनाही तसं सांगत होता. पण वडील काही त्याचं ऐकत नव्हते.

मोहम्मद लहानपणापासूनच हिंदू मुसलमान दंगे पाहात होता. काहीतरी कुणीतरी धर्माबद्दल काही बोलल्याचे कारण पुढे करीत लोकं भांडायला त्याच्या वस्तीत जेव्हा येत. तेव्हा मोहम्मद चा बा आपल्या लहानशा घरात अगदी लपून बसत असे. मात्र ही मारायला येणारी मंडळी गावची नसायची. गावातील माणसं शांत राहात असत. ती भांडत नसत.

गावात ज्याप्रमाणे मुसलमान राहात होते. त्याचप्रमाणे गावात हिंदूही राहात होते. बौद्ध आणि शिखही गुण्यागोविंदानं राहात होते. कुणाचं कुणाशी वैर नसायचं. ती गावातील माणसं एकमेकांना मदत करीत असत. नव्हे तर एकमेकांच्या घरी समारंभाला येणेजाणेही गावातील मंडळी करीत असायची. तसंच मोहम्मदलाही आपल्या कार्यक्रमात बोलवायची. मोहम्मदच्याही घरी जेव्हा मुंज असायची. तेव्हा मोहम्मदचा बा गावाला आमंत्रण द्यायचा. मग जे मांस खात असतील, त्यांना मटनाचं जेवन व जे खात नसतील त्यांना साधं जेवन करायचा. मात्र अशा दंग्याच्या काळात गावची मंडळी मोहम्मदच्या बाला आपल्याच एक कुटूंबातला समजून अंतर देत नसत.

बंगालची फाळणी झाली होती. ह्या भागाचा राज्यकारभार करता येणे शक्य नाही हे कारण पुढे करुन इंग्रज व्हाईसराय लार्ड कर्झननं बंगालची फाळणी केली होती. या बंगालचे दोन भाग बनवले होते. पूर्व बंगाल व पश्चिम बंगाल. पुर्व बंगालमध्ये मुस्लीमांनी राहावं तर पश्चिम बंगालमध्ये हिंदूंनी राहावं असं इंग्रज सरकार ठणकावून सांगत होते. ह्याच फाळणीतून भारत पाकिस्तान विभागणीची बीजे रोवली गेली.

जुम्मन हा शिकला नसला तरी त्याला ही फाळणी बरी वाटत नव्हती. हे इंग्रज आपला आपापसातच वाद लावू पाहात आहेत असं जुम्मनला वाटत होतं. कारण लोकसंख्येच्या आधारावर केलेली ही बंगालची फाळणी म्हणजे अखंड हिंदूस्थानावर पुढील काळात येणारं संकट होतं.

मोहम्मद वयानं लहान जरी असला तरी त्याला या गोष्टी समजत होत्या. कारण वर्गामध्ये शिक्षणासोबतच तो इतिहास शिकत होता. त्याचबरोबर तोही अभ्यासक्रम शिकत होता. जो इंग्रजांच्या हिताचा होता. तसेच हे इंग्रज प्रत्येक वर्गामधून फुट पाडण्याच्याही गोष्टी शिकवीत होते.

विद्यार्जनात दलितांना बसायला वर्गात जागा मिळत नव्हती. त्यातच वर्गात बसायचं असेल तर दूर पोते टाकून बसवले जाई. तो पोताही घरुनच आणावा लागत असे. अर्थात हे शिक्षण इंग्रजांचं जरी असलं तरी भेदभाव होताच. तसेच ज्याप्रमाणे दलित सवर्ण भेदभाव होता. त्याचप्रमाणे हिंदू मुसलमान भेदभाव ही होता.

जुम्मनशेठ पर्यंत चांगलं चाललं. जुम्मनचे संबंध गावात चांगले सलोख्याचे होते. गावात जुम्मननं कधीच भेदभाव पाहिला नाही. अशातच त्याचा मुलगा मोहम्मद हा शालान्त पास झाला व त्याला पुढचं शिक्षण देण्यासाठी त्यानं आपल्या मुलाला शहरात टाकलं.

मोहम्मद शहरातल्या शाळेत जावू लागला. तिथे एकाच वर्गात हिंदू मुलं तर होतीच. त्याचबरोबर मुसलमान मुलंही होती. त्यांच्यात चर्चा चालत असत. त्या चर्चा मोहम्मद ऐकत असे. त्या चर्चांचा परिणाम त्याच्यावर होत होता. त्यातच कधीकधी हे मुसलमान मुलं हिंदू मुलांशी भांडत असत. चांगलं डोकं फुटतपर्यंत ही मुलं भांडत असल्यानं मोहम्मदला साहजिकच हा हिंदू हा मुसलमान हे समजून घ्यायला वेळ लागला नाही.

शहरातील शाळेत शिकतांना मोहम्मद शहरातील वातावरणाशी रुळला. त्याला चांगलं वाईट याची कल्पना नव्हती. तो शालान्त पास झाला असला तरी त्याचं वय कोवळंच होतं. त्यातच त्या कोवळ्या वयात मुलं अशा भेदभावाच्या गोष्टी का करतात? ते त्याला कळत नव्हतं. तसा तोही त्या गोष्टी कान लावून ऐकत होता.

स्वातंत्र्यासोबत स्वायतत्तेच्या गोष्टी समाजात जोर धरत होत्या. आपली आत्मीयता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचसोबत त्या गोष्टीही स्वस्थ बसू देत नव्हत्या. मोहम्मदही बाकीच्या मित्राच्या गोष्टीत वाहावत गेला. तोही त्यांच्यासोबत त्या गोष्टी करु लागला.

मोहम्मदची मित्रमंडळी ह्या स्वायतत्तेच्या गोष्टी करीत असत. कारण त्यांच्या घरी होणा-या गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर होत होता. ती मुले आपल्या घरच्या वातावरणानं बिघडली होती. ती शिकणं सोडून समाजाच्या भेदभावाच्या गोष्टी करीत होती.

या सर्वांचा परिणाम भारत पाकिस्तान फाळणी होण्यात झाला. इंग्रजांना भारतात भारत व पाकिस्तान वाद धुमसत ठेवायचा होता. ते वरवर जरी दाखवत असले, तरी त्यांना भारतात हिंदू आणि मुसलमान यांचे भांडण तेवत ठेवायची होती. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मते त्यांनी भांडण मिटवण्याच्या काम केलं नाही. १९४२ ला आंदोलन झालं. यात मुस्लिम लीगने आंदोलनांमध्ये भाग घेतलेला नव्हता. त्यांना असं वाटत होतं की भारतीय राष्ट्रीय सभा ही आपल्या लाभाची नाही. त्यामुळे त्याचे एकूण काम तमाम भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देणे असलं तरी तेही आपल्या लाभाचं नाही. परंतू भारतीय राष्ट्रीय सभा मुस्लिम आणि हिंदू महासभा हे दोन्ही पक्ष मानत नव्हते आणि म्हणूनच मुस्लिम लीगने१९४२ च्या उठावात भाग न घेणे हे गोष्ट कुठेतरी भारत-पाकिस्तान निर्मितीला कारणीभूत ठरली. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तान हा मुसलमानांचा देश भारत हिंदूचा. अशा प्रकारचा बनाव हिंदू महासभा व मुस्लिम लीगने लोकांच्या मनात भरवला होता.