Vibhajan - 5 books and stories free download online pdf in Marathi

विभाजन - 5

विभाजन

(कादंबरी)

(5)

महात्मा गांधी हे देशाचे प्रेरणास्थान होते. त्यांना वाटत होतं की हिंदू आणि मुसलमान यांनी एकत्र अधिवास करायला हवा. भावाभावासारखं राहायला हवं. देशाचे विभाजन करू नये. विभाजनाला त्यांचा विरोध होता. गांधीच्या मनात होतं की माझी जी आत्मा आहे. माझी आत्मा, माझी आत्मा मुस्लिमांना आणि हिंदूंना वेगळे मानत नाही. त्यांची संस्कृती सुद्धा विभिन्न मानत नाही. जर मी हिंदू आणि मुसलमान असा जर भेद केला तर त्या ईश्वराला नकार देण्यासारखे होईल. असं महात्मा गांधीच्या म्हणणं होतं. पुष्कळ सालापर्यंत गांधी आणि त्यांच्या अनुयायांनी बराच प्रयत्न केला की हिंदू आणि मुसलमान ह्यांनी एकत्र राहावे. राष्ट्रीय सभा सोडून जाऊ नये. परंतू काही जणांना वाटत होते की आमची संस्कृती वेगळी आमच्या धर्माचं वेगळं असं पाकिस्तान बनाव. त्यामुळेच महात्मा गांधी बद्दल त्यांच्या मनात आणि बहुल मुसलमानांच्या मनात रोष निर्माण झाला होता.

१९३९ मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा केला. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्याने नंतर १९३९मध्ये राष्ट्रीय सभेच्या योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. वर्धा येथे १४जुलै१९४१ रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. मुंबईचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारणीने मंजूर केलेला ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आपण स्वतंत्र आहोत असे प्रत्येकाने समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपण भारताला स्वतंत्र तरी करू नाहीतर मरुन तरी जावू असे मत मांडले.

१९४२ मध्ये भारतीय राष्ट्रीय सभा भगीरथ प्रयत्न करीत असताना गांधींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने सिद्ध होण्याचे स्फूर्तीदायक आव्हान केले. प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरले. मिरवणुका काढल्या. सरकारनं लाठीचार्च केला तरी लोक घाबरले नाहीत. काही ठिकाणी असणारे पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्रात कच-यासारखे लोक ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले गेले. महाराष्ट्रात चिमूर आष्टी इत्यादी अनेक गावातून नेटाने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले. शाळकरी मुलांवर गोळीबार केला. या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल शशिधर घनश्याम हे विद्यार्थी हुतात्मे झाले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.

आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्याकडे आले. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कुपलानी, एस एम जोशी, मगनलाल बागडी, उषा मेहता, छोटूभाई पुराणीक, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यासारखे अनेक नेते आघाडीवर होते. रेल्वेमार्गाची तोडफोड करणे. तारा तोडणे, पूल उध्वस्त करणे इत्यादी मार्गांनी आंदोलकांनी सरकारी यंत्रणा विस्कळीत केली. संपूर्ण भारतात आंदोलनाचे पडसाद उमटले. सिंध प्रांतात हेमु कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटीश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचे वृत्त कळताच आपल्या साथीदारांसह रेल्वेमार्ग उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्न केला. न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांच्या आजाद दस्ता नागपूरच्या जनरल आवारी यांनी लालसेनेच्या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडले. मुंबईला विठ्ठल जय हरी उषा मेहता व त्याच्या साथीदारांनी गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले. त्याला आजाद व्हिडिओ म्हणत. त्यावर राष्ट्रभतींची गीते गायली जात. देशातील आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जात. देशभक्तीपर भाषण प्रक्षेपित केली जात. त्यामुळे आंदोलन चालवण्याचे जनतेला बळ मिळेल अशी त्यांची भुमिका होती. अशी प्रक्षेपण केंद्र कोलकता, दिल्ली पुणे या ठिकाणी होती. १९४२ च्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेक अज्ञात लोकांनी बलिदान केले. आंदोलकांची संख्या इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंग अपुरे पडले. सानेगुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देशभक्ती गीतांनी आंदोलनकारांचा उत्साह वाढवला. या आंदोलनाला आँगष्ट क्रांती असं म्हटलं आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढा व्यापक झाला होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत होता. त्यांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकार विविध योजना तयार करू लागलेे. राष्ट्रीय सभेचे उभारणी धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर झाली होती. राष्ट्रीय आंदोलनात सर्व जाती-धर्माचे लोक सामील झाले होते. ही चळवळ कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. त्यांच्या परिणाम मुस्लिम लीगची स्थापना होण्यात झाला १९३० ला डॉक्टर मोहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. पुढे चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली. बॅरिस्टर महंमदअली जीना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. राष्ट्रीय सभा ही केवळ हिंदुंची संघटना आहे तिच्यापासून मुसलमानांना काही फायदा होणार नाही असा प्रचार सुरू केला१९४५ मध्ये भारताचे व्हॉईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली. या योजनेत विविध तरतुदी होत्या. यात केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम दलित व अल्पसंख्यांकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल व कार्यकारी मंडळात हिंदू-मुस्लीम सदस्यांची संख्या समान राहील अशा काही प्रमुख तरतुदी होत्या. या योजनेवर विचार करण्यासाठी शिमला येथे भारतीय प्रमुख राजकीय पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचविण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा आग्रह केला. त्यामुळे ही योजना यशस्वी होऊ शकली. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश राज्यकर्ते अनुकूल बनले. प्रधानमंत्री पार्लमेंटमध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले गेले. त्यामुळे भारतीय जनतेच्या भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला. अल्पसंख्यांकाचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आले. १९४६ च्या मार्चमध्ये पँथिक लॉरेन्स आणि अलेक्झांडर या मंडळाने भारताच्या संदर्भात इंग्रजी योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली. तिला त्रिमंत्री योजना म्हणतात. या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या. तसेच मुस्लिमांची स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही म्हणून मुस्लिम लीगहीे असंतुष्ट होती. त्यामुळे त्रिमंत्री योजना कोणत्याही स्वरुपात मान्य झाली नाही. पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले. त्यानुसार १६ ऑगस्ट१९४६ हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले. या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशांमध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. नौवाखाली येथे भीषण थांबवण्यासाठी गांधीजी आपल्या प्राणांची पर्वा न करता तेथे गेले. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मुस्लिमांनी मुस्लिम पाकिस्तानची मागणी करीत असताना करेंगे तो मरेंगे अशा प्रकारच्या नारा दिला. त्यामुळे देशात हिंसाचार यांच्या डोंब उसळलेला असताना यांनी हंगामी सरकारची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरू हे या सरकारचे प्रमुख होते. हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीगने घेतला होता. काही काळानंतर मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाले. परंतू मुस्लिम नेत्यांनी भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारच्या कारभार सुरळीत चालू शकला नाही. इंग्लंडचे पंतप्रधान अँटनी यांनी जून १९४८ पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले होते. भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताचे व्हाईसराय म्हणून नियुक्ती केली गेली. त्यांनी भारतातील प्रमुख नेत्यांबरोबर विचारविनिमय केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली. विरोध होता देशाच्या राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा. परंतू मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीच्या जोर धरला. यामुळे दुसरा पर्याय उरला नाही. राष्ट्रीय सभेने अत्यंत नाईलाजाने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली. माऊंटबँटन योजनेच्या आधारे १८ जुलै १९४७ रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात येतील. त्यानंतर त्यांचा ब्रिटिश पार्लमेंटवर कोणताही अधिकार राहणार नाही. संस्थांनीकांचे स्वामित्व संपुष्टात येईल. त्यांना भारतात अथवा पाकिस्तानात सामील होता येईल. तेव्हा स्वतंत्र अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार १५ ऑगस्ट१९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तर १४ ऑगस्ट१९४७ च्या मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती. रात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र संपल. युनियन जैक खाली उतरून त्याच्या जागी भारताचा तिरंगा फडकवण्यात आला. दीडशे वर्षाच्या गुलामीतून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आनंद निर्भेळ नव्हता. देशाची फाळणी झाली. त्यावेळी झालेल्या भयानक हिंसाचारामुळे भारतीय जनता दुखी होती. स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी न होता गांधीजी बंगालमध्ये जिवाचे रान करत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शांतता नांदावी असा विचार त्यांच्या मनात होता. भारत स्वतंत्र झाला तरी स्वतंत्र लढा अद्याप संपलेला नव्हता.

टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरु केली होती. त्याचं कारणंही तसंच होतं. त्यांच्या मतानुसार या भारतातील तमाम लोकांना एकत्र करुन त्यांना मनात स्वातंत्र्याबद्दलच्या गोष्टी भरणे. जेणेकरुन येथील सर्वसामान्य लोकांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलची ज्योत निर्माण होवू शकेल. पण याचा परिणाम मुसलमान लोकांवर विपरीत प्रमाणावर होवू लागला. त्यांना वाटत होतं की टिळकांनी गणेशोत्सव परंपरा साजरी करायला लावून हिंदूंना सशक्त केलं आहे. तसं पाहता गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आणून हिंदूना सशक्त करणे हा उद्देश टिळकांचा नव्हता. त्यांना वाटत होतं की आपण इंग्रजांशी कशासाठी लढतो?पण टिळकांचं गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा रास्त जरी असली तरी गैरसमजुतीच्या या प्रकारात हिंदू मुसलमान भेदभावाची बीजे रुजली गेली. कालांतरानं टिळकांनी शिवजयंतीही साजरी करण्याची परंपरा सुरु केली. त्यामुळं साहजिकच मुस्लिमांमध्ये टिळकांबद्दल असुया निर्माण झाली. स्वातंत्र्याचा मुद्दा जागच्या जागीच राहिला. नव्हे तर ज्या शिवरायानं आमच्या पुर्वजांना समाप्त केलं. त्या शिवरायांची शिवजयंती साजरी होतांना व ते दृश्य मुस्लिम बांधव बघत असतांना त्यांच्या काळजात धस्स झालं. ही मंडळी ते १८५७ चं स्वातंत्र्यसमर पार विसरली. नव्हे तर आता आपणही स्वातंत्र्यसमरासाठी कंबर कसायची असा विचार काही काळ त्यागून ते इंग्रजांच्या झाशात गेले. काही काळ त्यांनाही वाटायला लागलं की आपण जर इंग्रजांना मदत केली तर उद्या आपल्याला स्वातंत्र्यानंतर चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतील. नव्हे तर त्या गोष्टीतून आपल्याला हिंदूंवर वचक निर्माण करता येईल.

मोहम्मद शालान्त पास होवून शहरातील महाविद्यालयात रुळला खरा. त्याचबरोबर ते स्वातंत्र्य मिळावं असंही त्याला वाटू लागलं होतं. पण त्याचबरोबर लगतच्या मुलांच्या आकांक्षेनुसार त्याच्याही मनात स्वायत्ततेची गोष्ट आकार घेवू लागली होती. स्वातंत्र्यापेक्षा आपल्याला आपला हक्क मिळावा असं मोहम्मदला वाटत होतं. तोही विचार करीत होता त्या लोकांच्या बोलण्याचा. जे नेते धर्माच्या नावानं वेगळं राज्य मागत होते. वेगळी पोळी शेकू पाहात होते. नव्हे तर वेगळी चूलही मांडू पाहात होते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED