विभाजन - 6 Ankush Shingade द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विभाजन - 6

विभाजन

(कादंबरी)

(6)

अशातच एक दिवस टिळक मृत्यू पावल्याची बातमी कानावर आली. सारा देश हरहळला. देशानं एक नेता गमावला. भारतीय नेत्यांसह इंग्रजही हळहळले. कारण ज्या माणसानं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळविणारच. अशी घोषणा केली होती. तो असामी आता या जगात नव्हता. नव्हे तर ज्यानं स्वातंत्र्याचं रणशिंग क्रांतीच्या रुपानं फुंकलं होतं. तो टिळक या जगात नव्हता. ते पाहून काही लोकं जरी हळहळले असले तरी काही लोकं नक्कीच खुश झाले होते. त्यांनी पेढे वाटले होते.

टिळक गेले. एका युगाचा अंत झाला. आता क्रांतीची चळवळ कोणी पुढं न्यायची हा प्रश्न जनमाणसात होता. कारण त्या समद्या लोकांचा आधार गेला होता. अशातच महात्मा गांधींच्या रुपानं परत एक नेता या देशाला मिळाला.

गांधीजी विदेशातून बैरीस्टरची पदवी घेवून देशात परतले होते. त्यांनी आपले उच्च राहणीमान त्यागले होते. त्याचबरोबर साधी राहणीमान म्हणून पंचाला प्रथमस्थान दिलं होतं. शिवाय ते अहिंसा अहिंसा म्हणत होते. त्यामुळं त्यांच्यावर कसा विश्वास ठेवावा असं लोकांना वाटत होतं. त्याचं कारणही तसंच होतं. ते कारण म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ ही क्रांतीशिवाय शक्य नाही असं लोकांचं म्हणणं होतं.

मोहम्मदनंही टिळकांचा मृत्यू अनुभवला होता. त्यानंही टिळकांच्या मृत्यूवर मिठाई वाटतांना लोकांना पाहिले होते. त्याच्या मनात प्रश्न पडला होता की टिळकांच्या मृत्यूवर लोकांनी, लोकांनी मिठाई का वाटली असावी?

मोहम्मदच्या मनातला प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. तसा तो एक दिवस गावाला आला व संधी मिळताच एक दिवस तो आपल्या बाला म्हणाला,

"अब्बा, तुम स्वतंत्र्यता मानते हो न?"

"हा, मानता हूँ। मगर क्या मसला है बेटा?"

"आप टिळक को मानते हो न?"

"हा, मानता हूँ। मगर क्या बात है बेटा?"

"बात यह है कि टिळक मरनेपर लोगों ने मिठाई क्यो बाँटी होगी?"

"बेटा, उन्हे खुशी हुई होगी।"

"मगर कोई मरने के बाद इतनी खुशी क्यो हुई होगी?"

"वह अंग्रेज है न।वे तो खुश होगे ही।"

"अब्बा, बात अंग्रेजों की नही है।"

"फिर किसकी बात है बेटा?"

"बात अपने ही लोगों की है।"

"मतलब?"

"अपने ही लोगों ने टिळक मरनेपर मिठाईयाँ बाँटी।"

"कौन है वे लोग?और उन्होने ऐसा क्यो किया?"

"पता नही अब्बा।"

"अं जाने दो बेटा। हर किसम के लोगों की हर किसम की बाते।"

मोहम्मदनं आपल्या बापाची गोष्ट ऐकली. त्याला कारण कळलं नाही. तसा तो चूप बसला. पण ते विचारचक्र त्याच्या मनात होतेच.

मोहम्मद दोनचार दिवस मिळालेल्या सुट्ट्या आटोपून तो परत शहरात आला. तो शिकू लागला. तसा तो मिठाईचा प्रश्न त्याला सतावू लागला. अशातच त्याची गाठ शफीनाशी पडली.

शफिना पाहायला सुंदर होती. ती त्याच्याच महाविद्यालयात शिकत होती. तिच्याही मनात स्वातंत्र्याबद्दल ज्योत पेटली होती. तशी बोलता चालता त्याचा संपर्क वाढला.

शफिना मोहम्मदची चांगली मैत्रीण बनली होती. तशी संधी साधून एक दिवस मोहम्मद शफिनाला म्हणाला,

"शफिना, एक बात पुछू?"

"पुछ।"

"टिळक का जब देहांत हुआ।तब लोगों ने मिठाईयाँ क्यो बाँटी?"

"मतलब?"

"टिळक जब गुजर गये।तब लोगों ने मिठाईयाँ बाँटी लोगो में।इसका मतलब मुझे अभी भी समझ में नही आ रहा है।"

शफिना बोलली,

"हो सकता है कि लोग टिळक जी से नाराज हो।"

"मगर क्यो नाराज होगे? और नाराज अपने ही लोग!मगर क्यो नाराज होगे?"

"हो सकता है कि उन्होंने जो गणेशोत्सव और शिवजयंती मनाने की परंपरा चालू की थी। उससे नाराज होगे।"

"मतलब?"

"उन शिवजयंती कथा गणेशोत्सव से हिंदू धरम को बढ़ावा देने की बात थी।"

"नही नही। उसमें तो समाज जोडने की बात थी।"

"यह हम जानते है। लोग थोड़े ही जानते है।"

मोहम्मद जे समजायचं ते समजला. तो चूप बसला. तसा तो शिकत होता त्या स्वातंत्र्याच्या गोष्टी आणि त्याचबरोबर शिकत होता त्या भेदभावाच्या गोष्टी. ज्या गोष्टी भारत पाकिस्तान निर्मीतीला पोषक होत्या.

म. गांधीनी अहिंसक मार्गाचा अवलंब करीत स्वातंत्र्याची लढाई सुरु केली होती. सत्य, अहिंसा, सत्याग्रह, उपोषण, हरताळ हे त्यांच्या सत्याग्रहाचे तत्व होते. समाजात एकता निर्माण व्हावी म्हणून ते लढत होते.

ही अहिंसक मार्गाची लढाई असली तरी या लढाईत लोकं सहभागी होत होते. म. गांधीनी आयोजित केलेलं असहकार आंदोलन तसेच दांडीयात्रा यशस्वी झाल्या होत्या.

लोकांना स्वातंत्र्याच्या नावावर एकत्र करणे ही तारेवरची कसरत होती. त्यातच सगळे लोक अडाणी होते. या अडाणी लोकांना एकत्र करीत असतांना गांधीजींनाही खुप कष्ट शोसावे लागत होते. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. तर बाकीची मंडळी ही आपआपल्या स्वार्थासाठी लढत होते. अशातच ब्रिटीश सरकारनं प्रांतीक निवडणूका घेतल्या. खरं तर ह्या निवडणुका ब्रिटीश सरकारनं घ्यायला हव्या नव्हत्या. कारण यामुळं लोकांमध्ये मतदानाबाबत फुट पडणार होती. त्यातच डॉ बाबासाहेबांनी दलित मतदारसंघ मागीतला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेले विभाजन गांधीजींना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी या विरुद्ध येरवडा तुरूंगात आमरण उपोषण केले. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागण्या पूर्ण न करता मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली. १९३२ मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे एक करार झाला. हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. १९३५ चा कायदा बनला. त्या कायद्याने भारतात ब्रिटिश शासीत प्रांत आणि संस्थान यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. त्यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशाचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता. संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास सत्ता राहणार नव्हती. त्यामुळे स्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला. म्हणून या कायद्यातून राज्याची योजना अमलात आली नाही. १९३५ च्या कायद्यानुसार राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही. तरीही या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदेमंडळांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले. १९३७मध्ये देशातील ११ प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या.

त्यापैकी आठ प्रांतात राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले. त्यांची मंत्रीमंडळे सत्तेवर आली. इतर प्रांतात संमीश्र मंत्रिमंडळे अस्तित्वात आली. कारण तिथं स्पष्ट बहुमत नव्हतं. या मंत्रीमंडळाने राजबंदी मुक्तता, दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना, दारुबंदी, शेतक-यांसाठी कर्ज निवारण, मुल्योद्योग शिक्षणाची व्यवस्था इत्यादी कामे केली.

मोहम्मद शिकत होता. बघता बघता त्यानं आपलं शिक्षण पुर्ण केलं. तसा तो भारतीय स्वातंत्र्यात सहभाग घेवू लागला.

भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करीत असतांना त्याला राष्ट्रीय सभा आवडायला लागली. त्या माध्यमातून तोही भाषणं देवू लागला. त्याचबरोबर त्यानं शफीनाशी विवाह केला. त्याला दोन मुलंही झाली. एकाचं नाव युसूफ व दुसरी मुलगी होती. तिचं नाव झरीना ठेवलं. ही मुलं मात्र विवाहाच्या ब-याच वर्षानंतर झाली.

एकदा मोहम्मद पत्नीसमवेत अंगणात बसला होता. तसं कोणीतरी हिंदू गृहस्थ त्याला येवून म्हणाला,

"मोहम्मद भाई, तुम्ही मुसलमान का बरं असं वेगळं राज्य मागत आहात?"

"म्हणजे?"

"मिया बैरीस्टर जिना आमच्या धर्माचं वेगळं राज्य द्या अशी मागणी करतात आहे असं ऐकलं. "

"हो, मीही तसंच ऐकलं आहे. "

"मग समजा तुम्हाले वेगळं राज्य जर भेटलं तर तुम्ही आपल्या वेगळ्या राज्यात जाल नाय का?"

"कशाला? मी त्या मताचा नाही मिया. "

"म्हणजे?"

"मिया पाहा, मी या गावात राहलो. लहानाचा मोठा झालो. माझा आजा पडदादा, एवढंच नाही तर आमचा वंश याच गावात वाढला. आमच्या कित्येक पिढ्या या गावात गेल्या. आमचा जन्म या मातृभुमीत झाला. या अखंड हिंदूस्थानात. मग आम्ही का बरं आमची मातृभूमी सोडावी?"

"पण बॅरीस्टर जिना तर पाकिस्तान हवा म्हणतात. "

"त्या जिनाचं जावू दे रे. कोणीतरी त्याच्या मनात धर्माचं खुळ भरवलंय. त्याचबरोबर त्या धर्मानुसार धर्माचं वेगळं राष्ट्र बनविण्याचं खुळ आलं त्याच्या डोक्यात. "

"पाकिस्तान जर वेगळा झाला तर काय होईल रे?"

"काय होणार?आम्ही तुम्हाला ओळखणार नाही. "

"म्हणजे?

"म्हणजे पाकिस्तान बनल्यावर आमची स्वतंत्र्य भुमी असणार. तिथं तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं नसणार. मदत करायला कोणी नसणार. नवीन माणसं, नवीन जागा. इच्छा नसेल तरी राहावंच लागणार नवीन भुमीत. "

"हो का. "

"हो. "

मोहम्मदला नवीन राष्ट्र पसंत नव्हतं. त्याला मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा दोन्ही आवडत नव्हत्या. १९३७ चं सावरकरांचं भाषण त्यानं ऐकलं होतं. ते भाषण त्याला हिंदू आणि मुसलमानात फूट पाडणारं वाटत होतं. आता दोन राष्ट्र बनणारच. हं ठीक आहे. संस्थानं मिटावीत. संघराज्य बनावं. पण दोन राष्ट्र! त्याला तो प्रश्न बेचैन करीत होता.

आजपर्यंतचा इतिहास त्यानं वर्गात गिरवला होता. हिंदू मुसलमान दंगे त्यानं गिरवले होते. हे दंगे कोणत्या आधारावर झाले हेही तो शिकला होता. हिंदू मुसलमान भाऊ भाऊ असणारे हे घटक आज धर्माच्या नावानं वेगळं राष्ट्र मागणं त्याला आवडत नव्हतं. आपण जर कोणाची खोडी केली नाही, तर कोणी कशाला आपल्या वाट्याला जाईल असं त्याला वाटत होतं.

गझनी, बाबर, अकबर यांचा इतिहास त्यानं अभ्यासला होता. बाबरानं बाबरी बांधली हेही त्याच्या अभ्यासातून सुटलं नव्हतं. पण आपल्या पुर्वजांनी केलेल्या चुकीची शिक्षा आपल्याला का मिळावी असं त्याचं मत होतं.

मोहम्मद लहानपणापासूनच या गावात राहिला होता. त्याचे ऋणानुबंध या गावात जुळले होते. त्या गावातील लोकांनी कित्येक वर्षापासून त्याला मदत केली होती. त्याच्या बानंही त्यांना मदत केली होती.

हिंदू महासभेचं झालेलं भाषण आणि त्यातच मुस्लिम लीगचं झालेलं भाषण तमाम हिंदू मुसलमानात फूट पाडणारी गोष्ट होती. त्यातच १९४२ ला झालेल्या चलेजावच्या सभेत हिंदू महासभा व मुस्लिम लीग सहभागी न झाल्यानं चलेजावचा उठाव करतांना राष्ट्रीय महासभा एकटीच पडली होती.

मुस्लिम लीग मध्ये जसे मुसलमान होते. तसेच मुसलमान राष्ट्रीय महासभेत होते. ७ आँगष्ट १९४२ला मुंबईच्या गवलिया टँक मैदानावर जेव्हा राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात मौलाना अबुल कलाम हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष बनले होते. या अधिवेशनात अबूल कलाम आझाद यांनी ब्रिटीशांनी भारत सोडून जावे अशी भुमिका मांडली होती.

ब्रिटिश सरकारविरुद्ध भारतात विविध मार्गांनी आंदोलने झाली. त्यातील एक मार्ग सशस्त्र क्रांतीचा होता. सन १८५७ पूर्वी इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेले उठाव १८५७ चा स्वातंत्र्यलढा यातुनच १९४२ च्या आंदोलनाची बीजे रोवली गेली.

महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची धारणा झाली. त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्या प्रशिक्षण घेतले. ब्रिटिश सत्तेविरूद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले. हे बंड यशस्वी झाले. ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या तुरुंगात केली. सन १८८३ साली त्यांचा मृत्यू झाला.