विभाजन - 1 Ankush Shingade द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

विभाजन - 1

विभाजन

(कादंबरी)

(1)

विभाजन कादंबरी
लेखक अंकुश शिंगाडे नागपूर 9373359450
कृपया कादंबरी वाचून एक फोन अवश्य करा.
टिप- ही कादंबरी काल्पनिक असून या कादंबरीचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

विभाजन...

भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही, त्यासाठी इथे भारतीय नेत्यांना फार मोठा त्याग करावा लागला. कित्येक क्रातीकारक लढले. शहीद झाले. काहींची नावं इतिहासात नाहीत. काहींची आहेत. पण जे जे या देशासाठी लढले. त्यांच्या प्राणांच्या बलिदानाचा इतिहास भारत देश विसरू शकत जरी नसला तरी आजही काही लोकं त्यांना शिव्या हासडतांना दिसतात. ही या देशाची शोकांतिका आहे. निदान आपण तरी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही करु शकलो नाही. आताही करण्यासारखे असूनही करु शकत नाही. हे सगळं विसरुन त्यांना शिव्या देण्याचं नव्हे तर बदनाम करण्याचं काम नेहमी काही लोकं करीत असतात.

खरं तर नऊ अॉगष्ट हा क्रांती दिन म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. पण असे असले तरी या दिवसासाठी आठ ऑगस्टलाही जास्त महत्व आहे. याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबई मध्ये एक प्रस्ताव पारित केला. त्या प्रस्तावानुसार नऊ ऑगस्टपासून आपण चलेजाव भारत छोडोचं आंदोलन करु असं ठरलं होतं. प्रत्येक नेत्यांनी रस्त्यावर उतरुन अहिंसक मार्गाने स्वातंत्र्याचा उठाव करु असंही ठरलं होतं. त्याला कारणंही तसंच होतं.

१९३९ ला द्वितीय महायुद्ध सुरु झालं. त्या महायुद्धात जर्मन फौजांनी इग्लंडवर सरशी केली. त्यावेळी येथील भारतीय नेत्यांना इंग्रजांनी म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला मदत करा. बदल्यात आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देवू. पण ज्यावेळी युद्ध संपलं, तेव्हा त्या इंग्रजांनी भारतीयांना दगा देत त्या स्वातंत्र्य देण्यापासून माघार घेतली. त्यामुळं पर्यायानं भारतीय नेत्यांची मनं नाराज झाली. म्हणून त्यांनी चलेजावचा उठाव करण्याचं ठरवलं.

या संदर्भात आठ अॉगष्टला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक होण्यापुर्वी त्याच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक चार अॉगष्टला झाली. आपल्याला इंग्रजांनी धोका दिला या विषयावर ती बैठक होती. आपण अहिंसक मार्गानं उद्या रस्त्यावर उतरु हेही विषय होते. परंतू याला बैठकीतील काही लोकांची सहमती झाली नाही. त्यातच काँग्रेसचे जेष्ठ नेते सी राजगोपालाचारी यांनी याच विषयाच्या संदर्भात पार्टी सोडली. त्यामुळं चार अॉगष्टला झालेली बैठक निष्फळ झाली. त्यामुळं त्याच्याच चार दिवसानं म्हणजे आठ अॉगष्टला परत बैठक भरली. तिही याच विषयावर.

या बैठकीतही हाच विषय होता. पण याही बैठकीत हिंदू महासभा, मुस्लिम लीग व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की अहिंसक मार्गानं जरी आपण आंदोलन करीत असलो तरी इंग्रज आपल्याला सोडणार नाहीत. ते आंदोलन दडपवून टाकण्यासाठी बळाचा वापर करतील गोळ्या झाडतील. मग त्यात कित्येक भारतीय लोकं मरतील. म्हणून हे आंदोलन नको. पण आंदोलन जर केलं गेलं नाही तर या देशातून इंग्रज कधीच जाणार नाही असं तत्कालीन भारतीय नेत्यांना वाटत असल्यानं त्यांनी काही संघटनांचा विरोध होवूनही आंदोलन छेडलं. आठ अॉगष्टला प्रस्ताव पारीत झाला व नऊ अॉगष्टला आंदोलनाला सुरुवात झाली.

हे आंदोलन भारतीयांसाठी नवं नव्हतं. यापुर्वीही दहा मे १८५७ ला देशात असंच आंदोलन झालं होतं. तो १८५७ चा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिद्ध आहे. यात बहादूरशहा जफर, नानासाहेब, राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई व तात्या टोपे यांचे विशेष योगदान आहे. तो इतिहास येथील भारतीयांना माहित होता. तसेच तंट्या भील उर्फ भीमा नायक, चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगूरू, सुखदेव यांनाही देश विसरला नव्हता. त्यांनी केलेलं प्राणांच बलिदान येथील भारतीयांच्या रक्तात होते. याच बलिदानाचा इतिहास आळवू आळवू देश गांधीजींच्या नेतृत्वात एकत्र झाला होता. मग कित्येक नेते लढले. नेत्यांची धरपकड होताच साता-यात नाना पाटील, नागपूरमध्ये मगनलाल बागडी, सेलोकर गुरुजी यांनी मोर्चा सांभाळला. तसेच यामध्ये बरीच मंडळी शहीदही झाली. तसेच चिमूरमध्येही बरीच मंडळी शहीद झाली.

१८५७ ते १९४२ पर्यंतचा इतिहास रक्तरंजीतच होता. कित्येक भारतीय अहिंसक मार्गानं जरी इंग्रजांचा विरोध करीत असले तरी ते गोळ्या झाडत असत. सायमन कमीशनमध्ये लाला लजपतराय यांनी सायमन गो बैक म्हणत मिळवणूक काढताच त्यांना लाठीमार करुन घायाळ केलं होतं, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जालियनवाला बागेतही तेच घडलं. म्हणून आठ अॉगष्टला झालेल्या बैठकीत प्रस्ताव पारित झाल्यानंतर करो या मरो असा आदेश देत नेत्यांनी चलेजाव भारत छोड़ो चं आंदोलन छेडलं. ही भारतीयांची इंग्रजांना एक चपराकच होती.

प्रस्ताव पारीत होताच व उद्या आंदोलन छेडणार आहे हे माहित होताच इंग्रजांनी येथील भारतीय नेत्यांना कैद केलं. महात्माजींना पुण्याला आगाखान पैलेसमध्ये ठेवलं. नेहरू तसेच इतर नेत्यांनाही पकडून देशातल्या वेगवेगळ्या तुरुंगात ठेवलं. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की आता प्रत्येकजण नेता आहे. इंग्रजांना घाबरु नका. प्रतिकार करा. स्वतःला स्वतःचा नेता समजा.

शेवटी नऊ ऑगष्टपासून सुरु झालेल्या अहिंसक आंदोलनाला पांगविण्यासाठी इंग्रज सैनिकांनी निरपराध भारतीयांवर जालियनवाला बागेसारखा गोळीबार केला. त्यात निरपराध माणसे मरण पावली. कित्येक आंदोलन करणारी आणि न करणारीही. त्यामुळं चिडून जावून येथील भारतीय लोकांनी टेलिफोनच्या तारा तोडल्या. कित्येक पोलिसठाणे जाळले. सरकारी इमारती जाळल्या. कित्येक लोकं भुमीगत झाले. यात कित्येक विद्यार्थीही शहीद झाले.

जेव्हा ह्या घटनेची माहिती महात्मा गांधींना झाली. त्यांनी तुरुंगातच एकवीस दिवसाचं उपोषण केलं. त्यातच त्यांचं स्वास्थ बिघडलं. त्यातच ते मरण पावतील व पुन्हा देशात रोष वाढेल याचा विचार करुन इंग्रजांनी त्यांना १९४४ मध्ये तुरुंगातून सोडले.

आंदोलन यशस्वी झाले नाही. मग काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला हिंदू महासभा, वामपंथी दल व मुस्लिम लीग नावे ठेवू लागली. पण महत्वाचं सांगायचं झाल्यास १९४२ चं आंदोलन यशस्वी जरी झालं नसलं , १८५७ सारखं........ तरी त्या झालेल्या आंदोलनातून इंग्रजांना एक शिक मिळाली. ती म्हणजे आता या देशातून गेल्याशिवाय उपाय नाही. त्यांनी त्यानंतर वेगवेगळ्या बैठका घेतल्या. ज्यांनी या आंदोलनाला मदत केली नाही. त्यांनाही विचारणा करुन शेवटी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निश्चय केला. त्यात काही अटीही टाकल्या.

बहुतेक आजही कोहीनूर भारताचा हिरा इंग्लंडमध्ये आहे. शंकुतला एक्सप्रेसचे पैसे आजपर्यंत इंग्लंडला जात होते. कदाचित अशाच तर अटी नव्हत्या इंग्रजांच्या की त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिलं. या देशात हिंदू मुस्लिम भांडणं नसतांना इंग्रजांनी दोघांच्याही धर्म भावना भडकवून ज्या चाली चालल्यात. त्या चालीतून भारत पाकिस्तान बनला. तसेच अजूनही हा भारत पाकिस्तान वाद भारतात धुमसतच होता स्वातंत्र्य मिळालं तरीही........ अन् आम्ही भारतीय कालही आपापसात लढत होतो. मी हिंदू, मी मुस्लिम म्हणत. आजही लढत होतो स्वातंत्र्य मिळाल्यावरही.

कोणत्याही देशात वाईट गोष्टी घडल्याच तर त्या ते ते धर्मीय मंडळी त्या त्या धर्मांनीच केल्या असे भांडतो नव्हे तर या देशाच्या एकात्मत्तेला तोडण्याचे काम करतो. एवढंच नाही तर या देशातील शांतता भंग करतो. नेत्यांच्या आश्नासनात फसतो. नेत्यांबरोबर आपणही आपल्या महापुरुषांना शिव्या द्यायला लागतो. पण याचा विचार करीत नाही की त्या नेत्यांनी त्या काळात जे काही कार्य केले, ते अतुलनीय होते. ते नसते तर देश स्वतंत्र्यही झाला नसता. आपण गुलाम असतो इंग्रजांचे आणि आपली पिढीही गुलाम राहिली असती. देशाला स्वातंत्र्य कधीच मिळालं नसतं आजही. कारण कालच्या नेत्यात जी लढण्याची ताकद होती. ती आजच्या नेत्यात दिसत नव्हती. हे नेते फक्त आश्वासन देवू शकत होते. शिव्या हासडू शकत होते. पण देशात शांतता निर्माण करु शकत नव्हते.

हिंदू महासभा व मुस्लीम लीग. दोघंही पक्ष. कट्टर धार्मीकता पाळणारे पक्ष होते. मुस्लीम लीग मुस्लीमांनी आपल्या धर्मीयांसाठी मागण्या मान्य करुन घेण्याच्या विचारातून काढला होता. तर हिंदू महासभा ही हिंदूचे हक्क अबाधीत ठेवण्यासाठी बनली होती. नव्हे तर त्यानंतर डॉ बाबासाहेबांनी ही दलितांच्या हक्कासाठी दलित हक्क परीषदही बनवली होती.

१८८५ ला अँनी बेझंट ला अग्रस्थानी मानून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली गेली. या नुसार या राष्ट्रीय काँग्रेसनं एक उद्दीष्ट्य ठरवलं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. त्यावेळी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं हिंदू मुसलमान असा भेदभाव केलेला नव्हता. स्वातंत्र्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य असं त्यांचं म्हणणं होतं.

इंग्रज भारतात आले मुठभर. पण त्यांनी आपल्या अक्कलहुशारीनं या देशावर राज्य केले. कारण आपला मुर्खपणा याला कारणीभूत आहे. आम्ही आज जरी भारतीय असलो तरी त्यावेळी हिंदूस्थानी होतो. आम्ही त्यांची नीती समजू शकलो नाही. नव्हे तर आपापसात भांडत राहिलो. हा उठाव होण्यापुर्वी इंग्रजांनी दुहेरी राजनीती लढवून या हिंदूस्थानात राहणा-या तमाम भारतीयांमध्ये भेदभावाची रेषा ओढली. कारण आम्ही ब-याच वर्षापासून या देशात राहणारे हिंदू मुसलमान भांडत होतो. तेच इंग्रजांनी पाहिलं.

इंग्रजांनी या देशावर राज्य करण्यासाठी येथीलच लोकांचा उपयोग करुन घेतला. त्यांनी येथीलच लोकांना सैन्याच्या नोक-या दिल्या व त्याच सैन्यांकडून त्यांच्याच भावाबहिणीवर गोळ्याही झाडायला लावल्या. पण आपण गोळ्या कुणावर झाडतो, हे साधं गणित येथील लोकांना समजलं नाही. ते मतलबासाठी व स्वार्थासाठी आपल्याच भावाबहिणींवर गोळ्या झाडत राहिले.

१८५७ चा उठाव जगजाहीर आहे. कारण हा उठाव होण्यापुर्वी मुस्लिमांना डुकर निषिद्ध होता तर हिंदूंना गाय. पण ब्रिटीशांनी ज्या बंदूका आणल्या. त्या बंदूकांना गाईचं व डुकराचं काडतूस लावलेलं होतं. ज्या बंदूकांना डुकराची चरबी लावलेली होती. त्या बंदूका जाणूनबुजूून मुसलमानांना देण्यात आल्या होत्या. तर ज्या बंदूकांना गाईच्या चरबीचं कारतूस लावलं होतं. त्या बंदूका हिंदू सैनिकांना देण्यात आल्या होत्या. त्यातून धर्मभावना ह्या भडकल्या व त्यातून १८५७ चा उठाव झाला. पण हा उठाव यशस्वी झाला नाही.

१८५७ चा राष्ट्रीय उठाव हा अशाच प्रकारच्या धर्मभावनेतून झाला असला तरी आमचा या हिंदूस्थानात राहणारा भारतीय बांधव सुधारला नाही. तो पुढेही हिंदू मुसलमान हीच भावना ठेवत भांडतच राहिला. हिंदूस्थानात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांनी इंग्रजी शासनामुळे कळ शोषली कंपनीच्या सत्तेमुळे त्यांचे सर्व स्तरातून शोषणही झाले.

इंग्रजांनी केलेले शोषण एकप्रकारे बरे. पण इथेच राहणा-या हिंदूस्थानातील तमाम माणसांनी मला काहीही म्हणायला नको असा अहंम बाळगणारा आमचा मतलबी हिंदूस्थानीय रहिवासी. पुर्वीपासूनच असा हिंदू मुसलमान भेदभाव करीत होता.

हिंदू मुसलमान ऐक्य तोडण्याची सुरुवातच मुळात सातव्या शतकापासून झाली. या सातव्या शतकात इथे आलेल्या महम्मद गझनीने हिंदूस्थानातील हिंदूंच्या श्रद्धेचे स्थान असलेले सोमनाथाचे मंदीर तोडले नव्हे तर या मंदीरात असणारे सोनेही लुटून नेले. त्यानंतर इथे सत्तेवर आलेल्या अलाऊद्दीन खिलजी, महम्मद तुघलक, तसेच कुतूबुद्दीन ऐबक या मुस्लीम शासकांनी येथील इतिहासच बदलविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धर्मांतरासोबतच येथील मंदीर तोडली. त्या ठिकाणी आपल्या मज्जीदी उभ्या केल्या. कित्येक बौद्ध विहारही तोडली. तिथेही मज्जीदी उभारल्या गेल्या. तमाम हिंदू आणि बौद्ध धर्मीय मंडळी शांतताप्रिय असल्यानं ते चूप बसले. चूप बसणंही आवश्यक होतं. कारण तोंडातून ब्र ही काढायची हिंमत नव्हती. समजा कोणी ब्र जरी काढला तरी त्याचा शिरच्छेद केला जाई. हाताची बोटं छाटली जाई. नव्हे तर शरीराचे एखादे अंगही. एवढ्यावरच मुस्लीम शासक चूप बसत नसत तर ते अशा ब्र काढणा-या लोकांची खरेदी विक्रीही करीत त्यांच्या आया बहिणीवर अत्याचार, बलत्कार केला जाई. अशा विषम परिस्थितीत हिंदूच नाही तर तमाम येथील सर्वच धर्म फसले होते. कोणी आपल्याला काही म्हणायला नको म्हणून मांडलिकपणही स्विकारत असत.