Wawar books and stories free download online pdf in Marathi

वावर


अनेक तत्ववेत्ते यांचा वावर आमच्या जीवनात आजही आहे.मनाचा वावर सर्वत्र असतो. मुळात मन हे इतके चंचल आहे की ,मनात येणाऱ्या गोष्टी ही तितक्याच चंचल असतात.आपल्या मनाला संभ्रम पडतो की, आपला व मनाचा वावर नेमका कुठे आहे? मन एकीकडे आहे वाटत असतानांच, कधी दुसरीकडे जातं, समजत नाही.
झटक्यात मनाच्या हिंदोळ्याचा वावर इकडून तिकडे झुलत असतो. यात कोणाचा वावर कुणीकडे हेच कळत नाही. एकाच वेळेस आपण असंख्य गोष्टी करतो. मनाचा वावर शरीरातही असतो शरीरा बाहेरही असतो. माणूस प्रेमाचं नाटक करता करता, त्याचा वावर अचानक वासनेच्या प्रांतात कधी होतो हे त्यालाही कळत नाही. माणसातला राक्षस जागा कधी होईल सांगता येत नाही. मनाचा वावरच असा आहे की मुह मे राम बगल में छुरी.
अनिर्बंध वावर रोखण्यासाठी संयमाचा लगाम हवांच. वावर हा चांगल्यातून चांगल्या कडेच व्हायला हवा. कुठेही वावरायला मिळतं म्हणून स्वच्छंदीपण, स्वैराचार येऊ शकतो. मनाला वावर करण्याचे स्वातंत्र्य हवं ,पण वावरात स्वातंत्र्य, स्वैराचार यांच्या अतिरेकाने अनेक प्रश्न निर्माण होतात.
संस्कारांचा योग्य वावर आजूबाजूलाअसेल तरच व्यक्तिमत्व घडतें. घरात काही गोष्टींचा वावर आवश्यक आहे. घरात आई-वडील,, बहिण, भाऊ प्रत्येकाचं असणं एक संस्कार देऊन जातं. माणसांचा वावर असतो तो संस्कारातून आलेला असतो आणि त्यामुळेच आपण आपल्यात एक मूल्य रुजून घेतो. अनुवंशिकता चांगली असेल तर आपणही चांगले होतो. प्राप्त परिस्थितीत आपल्या वरही चांगल्या वातावरणाचा वावर असेल तर परिणाम चांगला होऊ शकतो.
आपल्या भोवतालचा वावर चांगला असेल तर आपण सुध्दा चांगलें होतो.
आपल्या गुणसूत्राचा वावर ठरवतो,आपण कोण होणार.
बाह्य परिस्थितीत हि कोणत्या गोष्टीचा वावर आपल्या आयुष्यात करून घ्यायचा, ह्याच्यावर सुद्धा व्यक्तिमत्त्वाचा विकास अवलंबून आहे.
भवताल महवाचं आहे .अनेक दृश्य-अदृश्य गोष्टीचा वावर आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकाचे मूल्य वेगळे, संस्कार वेगळे, विकार वेगळे. आत्मा अदृश्य असला तरी तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतो. आपले पूर्वज, आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्ती,आपल्यात शरीराने नसल्या तरी मनाने त्यांचा वावर असतोच.
कोणत्या गोष्टीचा वावर होऊ द्यायचा व कोणत्या गोष्टीचा नाही हे आपल्या हातात जरी असलं तरी, काही गोष्टींचा वावरआपल्या हातात नसतो.
असंख्य विचार चांगले-वाईट, असंख्य स्वप्न यांचा वावर मानवाच्या आयुष्यात सतत चालू असतो. अनेक गोष्टीचा वाद, दुःखदायक असतो, अनेक गोष्टींचा वावर सुखावह असतो.तो वैभव, समाधान देतो.अशा वेळेस जीवनात ही घडी अशीच राहू दे असं वाटतं. पण काळानुसार बदल स्वीकारायला हवा.
माणसे नाहीसे होतात पण त्यांच्या विचारांचा पगडा नकळत आपल्यामध्ये असतो. वावर कृती करायला भाग पाडतो. चांगल्या गोष्टीचा वावर असेल तर चांगलीच कृती घडते. विकृत गोष्टींचा वावर असेल तर विकृती निर्माण होते. वावर चा अतिरेक व्यसनाकडे नेतों ,आणि व्यसन माणसाला संपवतं.
चांगल्या वाचनाच्या वापराने व्यक्तिमत्व परिपक्व होते. विचारांचा ,आचारांचा वावर चांगला असेल, तर विवेकानंद निर्माण होतात. अतिरेकी संघटनांचा वापर असेल तर ओसामा बिन लादेन निर्माण होणार. अनेक गोष्टींचा वापर आपल्या हातात नाही पण त्याचा वापर आपल्या हातात निश्चित आहे.
चांगुलपणाचा वावर चांगली व्यक्ती निर्माण करते.
जसा वावर तसा संस्कार. कोणत्या गोष्टीचा वावर आपण होऊ देतों, याच्यावर आपल्या आयुष्याच्या गुलमोहर होणार की निवडुंग होणार हे ठरतं.
तंत्रज्ञानाचा वावर एवढा वाढला की मरणासन्न माणसाला वाचवण्याचे लाईव्ह चित्रीकरण करून वायरल करण्यात धन्यता मानली जात आहे.
कुटुंबात भावनेचं पालनपोषण नाही. माणसात घरांचा वावर कमी झाला. नाती समजावून सांगावी लागतात. मुलें पोकळीत वाढत आहेत. घरात वावर आहे तो फक्त यंत्रांचा. यंत्राचा वावर असेल तर भावनाशून्य, कोरडी माणसें रोबोट सारखी होतील.हे थांबायला हवं.
चांगल्या गोष्टींचा वावर, शांवर प्रमाणे अंगावर घ्यायला हवा. वावरचा शांवर किती, कसां, केंव्हा, किती वेळ घ्यायचा हे प्रत्येकावर अवलंबून आहे.
दुःखाचा वावर असूनही यशोशिखराकडे जाण्यांतच खरं कौशल्य आहे. प्रतिकूल परिस्थितीत, संघर्षाच्या मुशीतून अनेक महिला, पुरुष सामर्थ्यवान ठरलें आहेत.
भवतालचा वावर प्रतिकूल असला तरीही त्याच्यातून आरपार जाऊन, त्याला छेद देऊन यश गाठलंच पाहिजे, यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे.
अपेक्षित वावर नेंच येणार आहे व्यक्तिमत्त्वाला आकार. अनेक गोष्टींचा वावर आहे म्हणून तर आयुष्याला आकार आहे.
डॉ. अनिल कुलकर्णी
940 380 51 53 मोबाईल.anilkulkarni666@gmail.com


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED