Express latent .. books and stories free download online pdf in Marathi

व्यक्त अव्यक्त..

व्यक्त, अव्यक्त....

नात्यांच्या व्यक्त होण्यात वय आड येत नाही.अव्यक्त नातं अनेक समस्या निर्माण करतं. माणसांनी निसर्गा कडून व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. निसर्ग किती भरभरून बोलतों, भरभरून व्यक्त होतो.हातचं राखून ठेवत नाही. व्यक्त होतो तो निसर्ग.अव्यक्त राहतात ती माणसे. अव्यक्त राहतात म्हणून तर गुपितें आहेत.
व्यक्त होण्याने प्रेम होतें, युद्ध होतें, दंगल होतें, सामंजस्याने व्यक्त झाले की प्रश्न सुटतात. व्यक्त होणं हे केवळ अव्यक्तहिमनगांचे टोक आहे.खूप साचल्यांवर माणसं व्यक्त झाल्याशिवाय राहत नाहीत पत्राने असो व सोशल मीडिया च्या माध्यमातूनअसो.
कोण कोणाशी किती व्यक्त होतं, कोण कोणाशी किती रत होतं हा ज्याचा त्याचा प्रश्न. शरीर आणि मन हे कुठे व्यक्त होईल, कुठे रत होईल सांगता येत नाही.
माणसांची तार जुळायची त्याच्याशीच जुळतें. ह्या तार जुळण्याला काहीच तार्किकता नाही. जशी प्रेमाला तार्किकता नसतें. प्रेमातच माणसे व्यक्त होतात. शरीराचा व्यापार तेजीत असला की मनाचा शेअर बाजार कोसळतो. मनाची गुंतवणूक शरीराच्या जोखमी वर अवलंबून असते. Investments are subject to market risk प्रमाणे.व्यक्त होण्यात उद्ध्वस्त होण्याची भीती असते म्हणूनही माणसें व्यक्त होत नाहीत. एखादा पुनःप्रत्ययाचा आनंद पुन्हा पुन्हा हवा असा वाटतो कारण व्यक्त होण्याची हीच एक जागा हक्काची असते.
माणसे जेवढी देवाजवळ व्यक्त होतात तेवढी कुणाजवळही व्यक्त होत नाहीत. कारण देवाजवळ क्रॉस चेकिंग नाही. माणसांच्या मुक्त होण्यात स्वार्थ असतो, तसा फुलांच्या व्यक्त होण्यात नसतो. फुल देवासाठीही व्यक्त होतांत, स्त्रीच्या सौंदर्यवृद्धीसाठी व्यक्त होतांत, मृत्यूशय्येवर ही आदराने नतमस्तक होतांत.व्यक्त होण्यासाठी आपलं निर्माल्य आहे हे त्यांना ठाऊक असतं.
माणसांना व्यक्त होणें फिक्स डिपॉझिट वाटतं. जिथे व्याज जास्त तिथेच आपण गुंतवणूक करतो. स्वार्थ पाहून माणसं व्यक्त होतात. मला काय मिळेल यातच त्यांचे जीवन व्यस्त असते.देवासमोर नवस बोलताना ही माणसे गुंतवणूक करतात, असं झालं तर तसं करेल.व्यक्तहोण्यातही व्यापार असतो. गणिकेचं. व्यक्त होणं पैसा आणि शरीरासाठीअसतं.
प्रेमात व्यक्त होणं निर्व्याज असतं.माणसे व्यक्त होऊ शकतात म्हणूनच आस्वाद घेऊ शकतात, परीक्षण करू शकतात, समीक्षा करू शकतात, टीका करू शकतात, चर्चा करू शकतात तो त्यांचा एक बौद्धिक खुराकच आहे.
प्राणी आणि वनस्पती यांच्या व्यक्त होणं याला मर्यादा आहेतआपल्या दृष्टीने, पण त्यांच्या दृष्टीने ते व्यक्त होतातंच.प्राणी आणि वनस्पती निसर्गानुसार व्यक्त होतात निसर्गाविरुद्ध नाही.
माणसांचं तसं नाहीये ते निसर्गाविरुद्ध ही व्यक्त होतात, निसर्गाला उध्वस्त करून विजय मिळवण्यात, स्वतःचा विनाश कधी करून घेतात हे त्यांच्याही लक्षात येत नाही. माणसांच्या व्यक्त होण्यात विनाशही आहे.स्वतःच्या व्यक्त होण्यातून निर्माण झालेला एक विषाणू संपूर्ण मानव जात उधवस्त करू शकतो. मानवाची जीवनशैली बदलवू शकतो. व्यक्त होण्याच्या पद्धती बदलू शकतो. माणसाला स्थानबद्ध करू शकतो. व्यक्त होण्यात माणसा माणसातील जवळीक अडसर ठरतेय. माणसाच्या प्रगती समोर प्रश्नचिन्ह उभारु शकतो.
आनंद, दुःख या माणसांच्या व्यक्त होण्याच्या जागा.भावनेच्या संपत्तीवरून माणसांच व्यक्त होणं ठरतं.कोणी भावनाप्रधान तर कोणी निर्विकार, भावनाशून्य.
अनेकांना भावना असतात पण त्या ते व्यक्त करू शकत नाहीत,त्या अव्यक्तच राहतात.
अनेक भावना लॉकरमध्ये असल्याप्रमाणे सुरक्षित तर असतात पण उपयोगाच्या नसतात,त्या आहेत यातंच समाधान.
अनेक अव्यक्त भावनांनी माणसे लगडलेली असतात. अनेक अव्यक्त भावनांचे ओझे घेऊन माणसे जगतांत.
शेवटच्या श्वासापर्यंत माणसाजवळ एकच गोष्ट असते ती म्हणजे अव्यक्त भावना. प्रेम करायला व्यक्तंच व्हायला पाहिजे असं नाही, अव्यक्त राहूनही अनेक गोष्टीवर, अनेकजण प्रेम करतात. अनेक गोष्टीवर प्रेम करण्याची आपल्याला मुभा आहे पण काही ठिकाणी 'अटी लागू' हे पाळावं लागतं.
व्यक्त, अव्यक्त होण्यातून संस्कृती कळते, विकृती कळते. व्यक्त होण्यात बंधन आहे. कोणी कसेही व्यक्त नाही होऊ शकत. अव्यक्त राहण्यात बंधन नाही. अव्यक्त राहून अनेक डाव साधता येतात.
मनाचा थांगपत्ता लागू द्यायचा नसेल तर अव्यक्त सारखं साधन नाही. अव्यक्त प्रेम मुदतीची ठेंव असते, आहे याचं केवळ समाधान.
मनाच्या श्रीमंतीत अनेकांना स्थान असतं आणि तेअसायलाही हवं. कुठे, काय, कसं किती व्यक्त व्हायचं याचं गणित जमलं पाहिजे. व्यक्त होण्याचे ही मापदंड ठरलेले असतात. माणसें व्यक्त होत नाहीत हीच आजची समस्या आहे, व्यक्त झाली तरी, सत्सदविवेक बुद्धी, तत्त्वं गुंडाळून व्यक्त होतांत.
विखुरलेल्या,पोखरलेल्या, उध्वस्थ ढगांवर क्षणिक आनंदाचा इंद्रधनू दाखवल्याप्रमाणे व्यक्त होतात..
कसं चाललयला मस्तं उत्तर देऊन किती दिवस फसवणार.आपलं दुःख झाकून ठेवायची सवय लोकांना असतें. काही जागा अशा असतात की तिथेच फक्त दुःख व्यक्त करता येतं. अशा जागा जेवढ्या जास्तं तेवढा माणूस श्रीमंत.पण विश्वासाने पाय धरावेत, विश्वास टाकावा अशा जागांच जेव्हा दुर्मिळ असतात,तेव्हा व्यक्त होणे कठीण असतं. श्रद्धा-अंधश्रद्धा यांना हातात घेऊनच देवाजवळ व्यक्त होतां येतं.
काही विचार व्यक्त होण्यास कारणमीमांसा, तार्किकता खुंटीला टांगून ठेवावी लागतें.अंधश्रद्धेची हतकडी ही, लोकांना गजरा वाटतें, त्याला तुम्ही आम्ही काय करणार? एकाची श्रद्धा दुसऱ्यासाठी अंधश्रद्धा असू शकते. व्यक्त होण्याला मर्यादा आहेत, म्हणून अनेक तत्वज्ञान, विचार अव्यक्तं राहिले आहेत. काळाच्या उदरात गडप झाले आहेत. माणसे जेंव्हा व्यक्त होतात तेव्हा तो त्यांचा उत्तुंग आविष्कार असतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्त होण्याचा अविष्कार बदलतो. लहानपणीचा व्यक्त होण्यातला निरागसपणा मोठेपणी अव्यक्त व्यवहार म्हणून उरतो.
पूर्वी मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी,रडण्यासाठी भाडोत्री माणसे आणली जायची आता ईमोजी आहेत,रीप म्हणलं की झालं. सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागल्यापासून माणसें निष्क्रिय झाली आहेत. ईमोजी, गुगल यामुळे भावना व्यक्त करायची संधीच मिळत नाही. संवाद साधायची संधी मिळत नाही. कट पेस्ट संस्कृती आली आहे. मनात विचाराचे तरंगतच उमटू द्यायचे नाहीत. कुणाच्या तरी भावना, कोणाला तरी पाठवायच्या. कसले नाते संबंध अन काय?माणसांचे एकमेकाकडे जाणे नाही, संवाद नाही. भावना होणार कुठे व्यक्त ? निर्वात पोकळीत का?घरात मोबाईल तुम्हाला व्यक्त होऊ देत नाही. संवाद नसणे हा व्यक्त होण्यातला मोठा अडसर आहे.
कुठें किती, कसं व्यक्त व्हायचं, कुठे अव्यक्त राहायचं हा मनाचा खेळ ज्याला जमलां, तोच यशस्वी जीवन जागला.
शारीरिक आणि मानसिक आयसोलेशन मध्ये माणसें व्यक्त होणार नाहीत. जिथे व्यक्त होणं नसतं तिथे जीवन नसतं. जीवन नसणं म्हणजे मृत्यूच. व्यक्तअव्यक्तचा संघर्ष मृत्युनंतरच संपतो.
व्यक्तहोण्यासाठी जीवन रसरसून जगावं लागतं. जीवनातलें सुंदर क्षण कॅमेरांत टिपावेंं लागतात तरच व्यक्त होता येतं.
आणि निरागस आठवणी वर व्यक्त व्हायला कुणाला आवणत नाही? व्यक्त व्हायला आठवणीसारखी जागा नाही.
डॉ.अनिल कुलकर्णी

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED