I am not angry with you ... books and stories free download online pdf in Marathi

तुझसे नाराज नही जिंदगी...

डिअर जिंदगी....
तुझसे नाराज नही जिंदगी...
आलो उल्लंघुनि, दुःखाचे पर्वत!हे तुकोबांनी म्हणल्या प्रमाणे मजुरांनी भान विसरून जीवनावर नाराज न होता व्यवस्थेवर विजय मिळवला.
जिवनाशी नाराजी नाहीच. ध्येय गाठयची इच्छाशक्ती असेल तर कसेही गाठता येते. पायात काही नसलं तरीही रस्ता पार करता येतो. अनेक गोष्टी नाहीत म्हणून रस्ता कशाला सोडायचा.रस्ते ,वाहन लॉक झाले तरी इच्छाशक्तीमुळे मजुर हजारो किलोमीटर चालून पोहोचलेच.
इच्छाशक्ती लॉक डाऊन न झाल्यामुळेच शक्य झाले. मृत्यू मुळे जगण्याची इच्छा लॉक होऊ शकते, इच्छाशक्ती नाही.
अनवाणी पाय खाचखळ ग्याला जुमानत नाहीत.
ध्येयाकडे चालणाऱ्या पाया साठी रस्ता स्वर्ग असतो.
इच्छाशक्ती दांडगी असेल तर जीवनाविषयी तक्रार राहत नाही. इच्छाशक्तीने मांझीने डोंगरातून रस्ता बनविला. कुठे तक्रार आहे. इच्छाशक्ती पुढे तक्रार टिकत नाही.
विचारही केला नव्हता की जीवन दुःखा सोबत जगायचे आहे, तरीही पण तक्रार नाही. दुःखाचा डोंगर कोसळत असतानाही माणसेजीवन जगतात, जीवनात नवीन पहाट येईल या आशेने तक्रार न करता. दुःखाने माणसं ओळखता येतात., नवीन नातेसंबंध कळतात,निर्माण होतात.
जीवना तू इतकं भरभरून दिले आहे की मिळालेल्या जीवनाचेआम्ही आभारच मानायला हवेत. प्रत्येक दिवस हा आयुष्यात मिळालेला बोनस असतो. जीवना तुझ्याशी नाराज राहून कसं चालेल. यशाच्या शिखराकडे जाताना खाचखळगे येणारच . जीवना आम्हाला तु अस्तित्व दिले आहे .अस्तित्वाशिवाय आस्वाद नाही. जीवन भरभरून जगता आलं पाहिजे.
दुःखद आठवणी मनाच्या टिपकागदने टिपता आल्या पाहिजेत. कुणी कोणत्या आठवणी जपायच्या कोणत्या टिपकागदाने टिपायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण दुःख किती दिवस कुरवाळत बसायचं.जीवनाचा नुसता आनंद घ्यायचा नसतो तर पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायचा असतो. माणसं सुखद आठवणी वर जगतात. जीवनावर नाराजी नको. जीवन संपवणाऱ्या लोकांवर नाराजी हवी. जीवन संपवणारे अनेकांनासंपवूनजातात,
उध्वस्त करून जातात.
व्यवस्था बदलता येत नसेल तर मनाची अवस्था तर नक्कीच बदलता येते. नाराज व्हावं पण निराश होऊ नये. नाराजी दूर करता येते नैराश्य नाही. आठवणी भरती-ओहोटी सारख्या असतात. कधीकधी इतक्या उचंबळून येतात की माणसें स्वतःची राहत नाहीत. प्रवाहाबरोबर वाहून जातात.

जीवनातले प्रसंग जीवनांत ही घडी अशीच राहू दे असेच असले पाहिजेत. घडी मोडली तरी पुन्हा नव्याने जीवनाची घडी हवी हवीशी असावी अशीच वाटली पाहिजे.घडी मोडावी ही लागते, आहे त्यापेक्षा चांगली बनवण्यासाठी. ठोकळा होऊन जीवन जगू नये.
ऑक्टोपस प्रमाणे दुःखापासून आक्रसता आलं पाहिजे व सुखाला बाहूपाशात घेता आलं पाहिजे.
आनंदाच्या मागे लागू नका. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. आनंद मानण्यावर आहे म्हणतात. आनंद मानलाच नाही तर निराशा येणारच. माणसे दुसऱ्याला फसवू शकतात मी खूप आनंदी आहे जीवनात, पण स्वतःला नाही फसवू शकत.
खरी कारणे, खरे संवाद माणसात झाले असते तर आत्महत्या घडल्याच नसत्या.
तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू परेशान हू तरीही जीवन जगता आले पाहिजे.
आयुष्यात वाट पाहता आली पाहिजे नाहीतर वाट लागते.आयुष्याच्या संध्याकाळी अनेकांच्या प्रतिभा बहरल्या आहेत, अनेकांनी कर्तुत्व दाखले आहे.प्रचंड अपयश आलेल्या नीच जीवनात यश मिळवले आहे. नैराश्यावर स्वार होणारे जीवनात यशस्वी होतात. नैराश्या समोर हार मानणारे जीवन गमावून बसतात. अनेकांच depression has become a way of life .
अशा वेळेस लक्षात ठेवायचं Beautiful Life inspire others life.
जीवनाविषयीच्या अनेक गाण्यांनी जीवन समृद्ध केले आहे, दुःख व्यक्त केले आहे, आनंद व्यक्त केला आहे, समाधान व्यक्त केले आहे. कुणाला जिंदगी एक सफर सुहाना वाटतं तर कुणाला जिंदगी का सफर ये कैसा सफर म्हणून दुःख ऊगाळाव वाटतं.
जिन्दगी देने वाले सुन तेरी दूनिया से जी भर गया.
ये जिंदगी के मेले दुनिया मे कम ना होंगे
अफसोस हम ना होंगे.अशी समिश्र भावना तुझ्याबद्दल आहे.
सगळं चांगलं चाललेलं असताना सुख पायाशी लोळण घेत असताना depression तुझ्याकडे येण्याचा महामार्ग झाला आहे. शरीरात मन एका ठिकाणी नसतो प्रत्येक पेशीत पेशिला मन असत. पेशीकडे माणसं लक्षच जात नाही पैशाकडे लक्ष जाते येशील उपाशी राहतात त्यांना भावनेने गोंजारलं जात नाही.
सगळे बुद्ध्यांक याला महत्व देतात भावनांक याकडे कोणीही लक्ष देत नाही माणसे भावनेनी जेवढी चिंब भिजत ती एवढी टवटवीत राहतील शहारुन मिळतील बहरतील दुसऱ्यांना बहरवतील.
प्रत्येक घराची मालिका झाली आहे टीआरपीच पाहिला जातो. मालिकेतल्या पात्रांच्या भावना जपल्या जातात. घरातले लोक प्रेमाच्या बाबतीत उपाशीच राहतात नैराश्य पायदळी तुडवत आलं पाहिजे. ध्येय असेल तर हजारो किलोमीटर माणसे चालतात अनवाणी पायाने.
भारलेल्या माणसाची नैराश्याची पाटी कोरी असते. नैराश्य रोजचच आहे आयुष्य एकदाच मिळतं. तुलना करण्यात तोल सावरता येत नाही.
जीवनात माणसाना सद्बुद्धी दे. तुझाच
जीवन रसरसून जगणारा.
डॉ.अनिल कुलकर्णी.anilkulkarni666@ gmail.com




इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED