कॉलेज फ्रेइन्डशिप - 5 Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कॉलेज फ्रेइन्डशिप - 5

भाग 5

निशा ने तर ठरवलंच होतं, काही झालं तरी रोहित चा पिच्छा काही सोडायचा नाही. त्या रात्री देखील ती रोहितच्या मागे मागे त्याच्या रूम पर्यंत पोहचली. रोहित ची उच्च नसताना त्याला तिला रूम मध्ये घ्यावं लागलं, कारण त्याला बाहेर सगळ्या समोर कोणताही तमाशा करायचा नव्हता. त्याने तिला खूप समजून सांगण्याचा प्रत्यन केला , पण ती काय मानायला तयार नाही. तिला फक्त एकाच माहित होतं कि तिला रोहित आवडतो सो , त्याला हि मी आवडलीच पाहिजे, त्या साठी ती वाट्टेल ते करायला तयार होती. इव्हन तिने रोहित आणि सायली मध्ये देखील खूप वेळा भांडण लावून दिलं होतं, रोहित तिच्या या स्वभावाला चांगलाच ओळखून होता, त्यामुळे कधी त्यांच्यातील भांडण टोकाला गेली नाहीत.

पण त्या रात्री निशा ला सांभाळणं भर कठीण जातं होत. रोहित ला खूप राग येत होता कारण तिची एकसारखी गाडी फक्त त्या एका विषयावर येत होती, ज्या साठी रोहित अजिबात interest दाखवत नव्हता. शेवटी ती नं राहून सायली वर वळली.

निशा - असं काय आहे तिच्यात कि तिला आणि त्या ओंकार ला तिच्या शिवाय दुसरं कोणी दिसत नाही, आहे कोण ती हा हा बोल ना. एक लो क्लास मुलगी जिला कधी कोना शी काही घेणं देणं नाही. स्वतःला काय समजते काय माहित. ४ मुले काय विचारतात तर स्वतःला जास्त हुशार समजायचं .

ती एका दमात सगळं काही बोलून रिकामी होती , पण तीच हे सगळं ऐकून रोहित ला खूप राग येतो आणि तो त्यीच्यावर धावून जातो.

रोहित- तुला जे समजायचं ते समज पण सायली विषयी एक पण चुकीचा शब्द मी ऐकणार नाही.

निशा- का ? कोण लागते तुझी ती ? ती तर तुला भाव पण देत नाही, तिला तर तो ओंकार आवडतो, तो पण आवडतो कि नाही हे पण माहित नाही.

रोहित- हा तिचा प्रश्न झाला, कोण आवडतं, कोना सोबत राह्यचं, याच्याशी तुझा काही एक सम्बन्ध नाही So stay away from her, and it’s good for you. कारण ओंकार ला काय वाटत तिच्या विषयी मला माहित नाही, पण जर तू तिच्या विषयी काही बोललीस किंवा तिला hurt करायचा प्रयत्न जरी केलास ना तर माझ्या सारखा वाईट कोणी नसेल.

निशा- करणार मी करणार तू काय करणार ते कर, कारण जर तुला मी नको असेल तर मग माझ्या जागी दुसरी कोणी नाही.

आता मात्र रोहित ची तळपायाची आग मस्तकात जाते, आणि न राहून त्याचा हात उचला जातो.

निशा खूप रागात असते, आणि रोहित कडून मिळालेल्या reaction वरून खूप hurt झालेली असते.

या सगळ्यात रोहित ला माहीतच नसतं दरवाज्याच्या बाहेर उभं राहून कोणी तरी आपलं ऐकत आहे.

हे सर्व सायलीच्या कानावर पडत, ती खूप दुखी होते. ती रोहित ला खूप चांगला मित्र मनात असते. जर कॉलेज सुरु झाल्या पासून तिला कोणी समजून घेतलं असेल तर तो रोहित होता, ती खूप अपसेट होते. त्यात ओंकार तिच्या समोर येतो. तिला काय बोलायचं आहे किंवा तिचा चेहरा पाहून ती खूप दुखी आहे हे देखील त्याला समजत नाही. त्याच्या हातात एक गुलाब असत , ते घेऊन तो गुढघ्यावर बसतो आणि तिला प्रोपोस करतो. तिला या सगळ्या गोष्टी खूप अचानक होत आहे हे समजत असत पण जे रोहित बोलला असतो ते आठवत आणि ती पटकन ओंकार ला हो बोलून बसते. तिचा होकार ऐकून ओंकार तर असा खुश झालेला असतो कि तो सगळयांना ओरडून सांगत सुटतो. पण सायली मात्र तिच्या च विचारात असते त्या विचारत ती तिच्या रूम मध्ये येते. निशा सायलीचे रूम पार्टनर असते, ती आत येते तेव्हा तिला निशा अंधारात रडत बसलेली दिसते, सायलीला तिच्या जवळ जावं असं वाटत होत पण तिला तो सगळं प्रकार आठवतो आणि ती तिच्या बेड वर जाऊन पडते.

खूप प्रयत्न नंतर तिला पहाटे झोप लागते. पण त्यात Alarm वाजतो कारण सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून त्यांना पुढच्या डेस्टिनेशन ला पोहचायचं असत. इथे रोहित आणि ओंकार दोघे देखील सायलीचे वाट पाहत असतात. सायलीला यायला उशीर होतो.

झोप न झाल्याने डोळे लाल झाले असतात. ती रोहित कडे बघत देखील नाही आणि ओंकार शेजारी जाऊन बसते. रोहित एक cute smile देतो, ती त्याला इग्नोर करते. त्याला कळत नाही नक्की काय झालं आहे. त्याला वाटत कि झोप न झाल्याने तिची चीड चीड होत असावी.

या सगळ्यात ओंकार उठतो कोणी प्रोफेसर आजू बाजूला आहे का बघतो आणि announce करतो आजची कॉफी माझ्याकडून because she said yes. तो सायलीला जवळ करत बोलतो.

रोहित एकदम शॉक होतो, त्याला काहीच समजत नाही.

आता मात्र त्याला तो कधी एकदा सायली शी बोलतो आणि हा काय प्रकार आहे हे विचारायचं असत.

सायली मात्र त्याच्या कडे पाहत देखील नसते. काय होणार पुढे, सायली रोहित च्या भावना समजू शकेल का ? कि ती देखील सानिका सारखी रोहित ला एकटी सोडून जाणार.?

बघू या मग काय होईल ते…..

Byeeee