रागावरही प्रेम करा Ankush Shingade द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रागावरही प्रेम करा

7. रागावरही प्रेम करा

राग ही नवीन विचाराची जननी आहे. रागावरही प्रेम करावे. त्यालाही आपलं मामावं. दूरावू नये. मात्र रागाला अंगलट करु नये.

आम्हाला राग येतो. तो एवढा येतो की तो सहन होत नाही. त्याचा उद्रेक होतो. मग उद्रेकातून विनाश होतो. हा विनाश होवू नये. म्हणून आपण रागावर प्रेम करुन त्या रागाला शांत करण्याचा प्रयत्न करावा. कारण आम्ही माणसं आहोत.

राग, लोभ, मद मत्सर हे आपले शत्रू. तेव्हा त्याचा द्वेष केल्यास आपल्याला हानी होते. परंतू यावर प्रेम केल्यास विजय प्राप्त होतो. हा विजयच पुढे आपल्या उन्नतीसाठी लाभदायक ठरतो.

रामायणात कैकेयीनं रामाला वनवास दिला होता. त्याचा लक्ष्मणाला राग येत होता. त्याचा राग रामालाही येतच असेल. तरीही रागावर नियंत्रण करुन नव्हे तर प्रेम करुन राम वनवासात गेला. त्या क्षणाला विधीलिखीत मानलं. त्याचा परीणाम हा झाला की अत्याचारी रावण मारला गेला अर्थात मरण पावला. हा रागावर प्रेम केल्याचाच परीणाम.

रावण ही विद्वान होता. सारे शास्र, वेद विद्या त्याला पाठ होत्या. पण त्याच्याच कुबूद्धी भरलेली होती. तो निरपराधांची हत्या करायचा. त्याने केलेल्या साधुच्या हत्या प्रचलित आहेत. त्यांनी अशाच केलेल्या साधुच्या हत्येतून रक्त गोळा करुन ते रक्त जनकपुरीतील भुमीत टाकलं. त्या रक्तानं अपवित्र झालेली जनकपुरीतील भुमी बंजर झाली होती. तिथं कोणतंच अन्न पिकत नव्हतं. तेव्हा सीतानं जन्म घेतला व ती बंजर झालेली भुमी सुपीक बनली. असा आहे. रागाचा परीणाम. रावणाला साधूचा राग येत असल्याने त्याने केलेल्या साधुच्या हत्या त्याच्या नाशाश कारणीभूत ठरल्या. महाभारतातही तसंच झालं.

महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती. वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात

सर्वदूर विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती. एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात निजली होती..

तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले. त्याला पाहून तिला राहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली. ती म्हणाली,

"सख्या असा तर मी विचारच नव्हता केला. असं कसं झालं?"

भगवान कृष्ण म्हणाले,

"पांचाली नियती खूप निष्ठुर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही तर सर्वच कौरव संपले. द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता?"

द्रौपदी त्यावर म्हणाली. कारण तिच्या मनात भयंकर राग होता. कौरवांचा. तिचा भरदरबारात अपमान झाला होता.

"कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?"

त्यावर क्रिष्ण म्हणाला,

"नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव

सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही. "

त्यावर द्रोपदी म्हणाली,

"कृष्णा, मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का?"

क्रिष्ण म्हणाला,

"नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता!"

द्रौपदी म्हणाली,

"क्रिष्णा , मी काय करू शकत होते?"

कृष्ण म्हणाला,

"तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू त्याचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोललीस की 'अंधे का पूत्र अंधा' व खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केला नसता तर तुझं वस्रहरण झालं नसतं. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती. तू राग बाळगला म्हणून हे सगळं घडलं. नाहीतर घडलं नसतं. "

महत्वाचं म्हणजे आपण आपले असे शब्द बोलू नयेत की दुस-याला त्या शब्दांचा राग येईल. शब्दच आपले कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा. नाहीतर त्याचे दुष्परीणाम फक्त स्वत:लाच नाही तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात. जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे. म्हणून बोलतांना भान ठेवणं महत्वाचं असतं. बेलगाम बोलण्यानंच नाती तुटतात व प्रपंचात महाभारत घडतं.

म्हणून राग आलाच तर त्याच्यावर प्रेम करीत त्याचं पालनपोषण करावे. जेणेकरुन तुमचा राग काहीवेळानं शांत होईल व तुम्ही रागासोबतच स्वतःमध्ये शांती वदवू शकाल.