लिव इन... भाग - 3 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लिव इन... भाग - 3

रावी च्या मनात सारखे प्रश्न उभे राहत होते, हा अमन ऐन मौक्यला तिथे कसा पोहचला ? तो तिथे आला , त्या मुळे जरी आपला आज जीव वाचला असेल ,तरी सूध्हा हा तिथे ऐन मौक्याला आला, म्हणजे हा घरी गेलाच नाही, मझ्याशी खोट बोलला . मझ्यावर पाळत ठेवत होता .....आणि हे सगळ आपल्याला कस कळल नाही ..... आपण एवढ मूर्ख कस निघालो . रावी च्या मनात अनेक प्रश्न उभे राहत होते, खरंतर ऐखदा मुलगा असा वागला असता, तर ऐखद्या मुलीला आनंद च वाटला असता, पण रावी जरा वेगळी होती . तिला तीच आयुष्य तिच्या हिमितिवर जगायचं होत, बिनधास्त, कोणाच्या ही धाकाखाली तिला तीच आयुष्य जगायचं नव्हत . ती जशी आहे तस ....,तिला जे जे आवडत, ते सगळ तिला तिच्या आयुष्यात करायच होत .त्यामुळे तिला समीर जे वागला, त्या पेक्षा अमन जे वागला, त्याच वाईट वाटत होत . हा न विचारता, आपल्या आयुष्यात डोकावूच कसा शकतो ....त्याला कोणी एवढा अधिकार दिला .... ...रावी च डोक खूप फिरले होते, पण तिने शांत रहयचेच ठरवले ....
रावी चे घर आले होते, घर जवळ येताच रावी गाडी तून उतरली, आणि सरळ घरात चालत गेली , तो तिला सोडवण्यासाठी एवढ्या लांब आला, पण तिला त्याचे काही च नव्हते, तिने जातांना साधे त्याला, बाय सुधा केले नाही . की मागे फिरून तो परत गेला की, नाही हे सूध्हा पहिले नाही . अमन ला रावी अशी काय वागली, काही कळाले नाही, कदचित मगाशी जे जाहाले, त्याचा तिला धक्का बसला असेल . रावी, काही मागे वळून पहीना ...मग अमन ने हळूच पाऊले माघे घेतली . आणि तो परती च्या प्रवासाला निघाला . जातांना त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले ....आज आपण रावी साठी हे का केले? पण, आपण जे वागलो त्यामुळे खूप भारी वाटतय ....पण, त्या पेक्षा ही जास्त हे सगळ आपण रावी साठी करतोय, ह्या चा अभिमान वाटतोय . पण, एवढ अस, का वाटतंय? अजून ही मन रावी कडे धावतय. अस, वाटतंय, धावत तिच्याकडे जावे, आणि तिला घट्ट मिठी मारावी, आणि म्हणावे, मला तुझी खूप काळजी वाटते ..... का, ते नाही माहीत? पण ,तूझ्या साठी मी नेहमीच अस अनपेक्षित रित्या येईन, पण, तुला काही होऊ देणार नाही .
अमन ला विचार करता करता पुणे कधी आले काळालं च नाही . त्याला स्टेशन वरती नेह्यला त्याचे बाबा आले होते .बाबा ना पाहून अमन ला खूप आनंद जाहला . तो बाबा च्या गाडी वर बसला, आणि तो आणि बाबा दोघे घराकडे निघाले . घरी जाताना बाबा त्याला कॉलेज बदल ,त्याच्या अभ्यासाबदल खूप प्रश्न विचारत होते . पण त्याच त्याच्या बोलण्या कडे फारस लक्ष नव्हत. बाबांच्या ते लक्षात आले, पण त्यानी सध्या तरी त्याविषयी बोलण टळल. अमन आणि बाबा दोघे घरी आले . अमन ला पाहतच त्याच्या बहिणीने माकड उड्या मारत त्याला मिठी मारली .त्याच्या आईने आरतीने त्याला ओवळले. गोड गोड पेढा भरवला ... आई ने अमन चे केलेले कौतुक सोहळा पाहून, त्याला आपण अएखदी लढाई करून आलोय अस, वाटत होत . खरंतर आपण आज जे काम करून आलोय, ते ऐखाद्या लढाई पेक्षा कामी नव्हते, आज जर आपल्याला रावी चा संशय आला नसता, आणि आपण गाडीतून पहिल्या च स्टेशन वर उतरलो नसतो ,तर रावी च काय जाहाले असते . माझी रावी ह्या जगातून उठली असती . कोणाला तोंड दाखवायला तिला जागा राहिली नसती . माझी ....रावी... हे मी काय बोलतोय? ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे . फक्त मैत्रीण ........त्याच्या दोन्ही मनाची चालणारी भांडणे त्याच्या तोंडावरून स्पष्ट दिसत होती . कदचित त्याच्या छोट्या बहिणी च्या हे लक्षात आले असेल, म्हणून ती त्याला चिढ्व्न्या च्या उदेषाने म्हणाली,....दादा, तुला ....तिथे एखादी मुलगी मैत्रीण वैगरे नाही ...जाहली ना ....? परत थोड्या वेळाने अजून चिडवण्याच्या द्रुष्टीने ती म्हणाली .... माझा दादा एवढा छान दिसतो, आणि त्याची एक सूध्हा मैत्रीण नाही, अस, होणारच नाही ....प्लीज, दादा सांग ना ...मला ....? आपल्या छोट्या बहिणी चे बोलणे ऐकून अमन, जरा चाचर ला च, आणि दुसरा विषय काढण्याच्या उदेषाने म्हणला, तुला काही काम नाही का? आई ला सांगू का? तू मला त्रस्स देतेस म्हणून? आई ने मला आराम करायला सांगितला आहे? अमन च बोलण ऐकून त्याची छोटी बहीण घाबरली, , नको ...नको ...दादा आई ला सांगू ..आई रागवेल मला ...चल जाते मी ...तू आराम कर ......अस म्हणून त्याची छोटी बहीण आसावरी निघून गेली . आता अमन खोलीत एकटाच होता, तो घरी आल्यामुळे त्याला खूप छान वाटत होते, पण तरीही कॉलेजची, होस्टेल ची, मित्रमैत्रिणी ची सगळ्यांची आठवण येत होती . आणि ...खास करून रावी ची .....
अमन जुन्या आठवणीत रमलाच होता की, आई ने त्याला आवाज दिला .....अरे, अमन जेवायला ये ....तूझे बाबा कामावरून आलेत, पाने मांडलीत ....जेवण पण वाढून जाहाले.... ये लवकर ..... आईचा आवाज ऐकून अमन त्याच्या खोलीतून निघून बाहेर किचन मधे आला .खोलीत आणि किचन मधे काही फारस अंतर नव्हत. खोली च दार उघडले, की आले किचन, ऐन मीन तीन खोली च घर .....बेडरूम, किचन आणि हॉल....... त्याच कर्ज ही त्याच्या बाबा च्या डोक्यावर होत . अमन आल्यामुळे बेडरूम अमन ची जाहली होती .... सगळे पंगत करून जेवायला बसले ....अमन चे घरचे ब्राह्मण असल्यामुळे त्याच्या घरी नेहमी शह्करी जेवण च बनत .अमन च्या आई ने सगळा स्वयंपाक अमन च्या आवडीचा च बनवला होता, अळू वडी, वरण,भात पापड, लोण च, खीर, पुरी, वरण भाता वर साजूक तूप ......सगळ कस साग्रसंगीत केल होत .... समोर आवडीचे जेवण दिसताच अमन नी ताव मारायला सुरवात केली, हे सगळ तो खूप मिस करत होता ....जो पर्यंत ताटात ले जेवण संपत नाही, तो पर्यंत त्यानी वरती बघितलेच नाही . त्याची ही गंमत बघून सगळे हसू लागले .अमन च्या ते लक्षात आले, मग, तो ही हसत म्हणला, कुठे ही गेले तरी, आई च्या हातची चव काही मिळत नाही .सगळे, पुन्हा एकदा मोठ्याने हसू लागले .
अमन घरी आल्यापासून, घरच वातावरण खूप छान जाहाले, होते, घरात अमन च्या मित्र मैत्रिणी ची ये-जा चालू जाहली होती, अमन ची आणि त्याच्या बहिणी ची सतत भांडणे ,हसी मजाक चालू होती . आई रोज एक नवीन पदार्थ बनवत होती . बाबा ही घरी येताना रोज नव नवीन पिक्चर च्या सीडीज आणत होते .सगळ कस खूप छान चालले होते .पण, तरीही अमन च लक्ष मात्र घरात कमी च होते . त्याच्या मनात कसली तरी चढ़ा ओढ चालली होती . त्याच्या आई आणि वडील दोघांच्या ही ते लक्षात आले होते .आई ने बाबांनी ह्या बदल अमन शी बोलायच ठरवल .संध्याकाळी, आसावरी घरी नाही, आणि अमन चा मूड ही चांगला आहे, हे पाहून अमन च्या बाबानी विषय कढ्लाच .