Live in .... Part-7 books and stories free download online pdf in Marathi

लिव इन.... भाग- 7

आता अमन ला मात्र काहीच कळेना ...रावी, सोहम च्या बाबतींत जे वागली ....ते त्याला अजिबात पटल नाही ...आणि आता जे वागते ...ते तर अजून च पटत नव्हते . तीच एकटे बसणे ...मूल तिला चिड्व्तात ...सगळ सगळ्या मुळे त्याला खूप त्रस्स होत होता . पण, नाईलाज असल्या सारख तो सगळ सहन करत होता .शिवाय आता गँग मधले त्याचे आणि रावी चे दोघांचे मित्र ही आता रावी ला नावे ठेवत होती .अमन ला ते सगळ नव्हते आवडत पण, त्याच्या कडे काहीच ई लाज नव्हता . कारण, रावी मुळेच हे सगळ होत होत .....
परीक्षा जवळ आली होती ....हे आता शेवट च वर्ष होत .सगळे मन लावून अभ्यास करत होते .अमन तर रात्र रात्र लब्ररी मधे बसून अभ्यास करत असे .त्याच्या बरोबर कधी रीधीमा असे, कधी गँग मधील आणखी कोणीतरी ...,पण, त्यादिवशी त्याच्या सोबत कोणीच नव्हते . त्याचा लायब्ररी त अभ्यास करून झाला होता .आणि तो आता होस्टेल वर निघाला होता ....रात्री चे नऊ वाजले होते .....अमन गडबडीत निघाला .होस्टेल कॉलेज च्या जवळ असल्यामुळे त्याला होस्टेल वर पौह्चय्ल काही फारसा वेळ लागणार नव्हता .तो होस्टेल च्या जवळच येत होता ...पाहतो तो काय ? एक मुलगा, एक मुली ला त्रस्स देत होता . अमन ने पुढे जाऊन त्या मुलीची मदत करायची ठरवली .पाहतो तो काय .....ती मुलगी दुसरी तिसरी कोण्ही नसून रावी होती .अमन मदतीला धावल्यामुळे तो मुलगा पळून गेला. पण, अमन मदतीला धावून आल्यामुळे रावीला मात्र खूप आनंद जाहला .थोडस हायस वाटल .तिला पण त्याच्या सोबत खूप बोलायच होत .पण गेले कितेक दिवस ती संकोच करत होती
शेवटी तो मुलगा गेल्यावर ....अमन रावी वर खूप चिडला. ऐत्क्या दिवसा चा सगळा राग त्याने तिच्या वर काढला . अगं, रावी एवढ्या रात्री ..,तू एथे ,काय करतेस? रावी, ही त्याला म्हणाली, अरे, काही नाही मी होस्टेल, वर चाललेले तेवढ्यात ही अचानक मुले आली ..,आणि मला त्रस्स द्याला लागली . तीच बोलण पूर्ण होतय न होतय तोच अमन तिला म्हणला ... तुला, किती वेळा सांगितलय, रात्री ची एकटी फिरत जाऊ नको ....आणि कधी जायच झलच, तर मला सांगत जा ...मी येत जयील ...तूझ्यासोब्त, पण तू कधी ऐकलंस माझ ..........अमन च्या बोलण्यावर दोघे ही शांत जाहले..... दोघांना ही काय बोलावे काहीच कळेना ... यावर मग थोड्या वेळाने अमन च बोलला, तू अह्मल विसरलीस पण मी अजून ही नाही विसरलो तुला .....तू आता अह्म्ला तूझे मित्र मानत नाही, पण, आह्मी अजून ही तुला आमची गोड मैत्रीण च मानतो ....मी आणि आपली गँग ... अमन च बोलण ऐकून ....रावी म्हणाली ,खरंच ..... अमन, खरंच तुम्हाला सगळ्यांना मनापासून सॉरी .. मी तुमच्याशी खूप वाईट वागले ,.... तुम्हाला कोणाला सोहम बदल काहीच संगितले ....नाही .....तीच बोलण मधेच थांबवत अमन तिला म्हणला, का संगितले नाही ...मला ऐकायचय ...की, तू मला हे सगळ का नाही संगितले .....तुला सगळ ऐकय्चेच आहे, तर मी सांगते सगळ तुला ......त्या दिवशी समीर च ते प्रकरण जाहा, तेव्हा, तू मला सोडायला मुंबई ला आलास.... अगदी घर पर्यंत आला होतास, तरी मी तुला घरात ये, अस सूध्हा म्हंटल नाही ....का? माहीत आहे तुला ....कारण, तूझा मला खूप राग आल्ता . तू मला न कळू देता, मझा पाठलाग केला . मला नाही आवडल ...मला माहीत आहे, की तू जर तिथे आला नसता, तर कदचित त्या दिवशी ...मझ्या सोबत काय जाहले ,असते काय माहीत? पण, मी ते सगळ सहन केल असत, कारण मला कोणावर अवलंबून रहायचे नाही ...मी आई बाबांना सोडून एथे शिकायला आले, कारण मला स्वातंत्र्य हवं होत, कोणाची ही ढवळा ढवळ नको होती, मला बिनधास्त जगय्चय, जे मला पहिजे ते मिळवायचय, खूप पैसा कमवायचय, श्रीमंत व्हायचंय.... सगळ जग फिरायचे आहे ..... पण, त्या दिवशी च्या वागण्यामुळे मला खूप वाईट वाटले, मी घरी गेल्ते, तिथे पण मझ्या मनात राहून राहून तो एकच विचर येत होता ... त्या एका प्रसंगावरून फक्त हा विचार डोक्यात येत होता .एक मुलगी एकटी कधीच आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाही का ...? तिला नेहमी एका पुरुषाचा आधार च लागतो का? खूप विचार केल्यावर माझ्या मनाने उत्तर दिले, नाही .... एक मुलगी तिच्या हुशारीने सगळ जग जिंकू शकते ...तिला एका पुरुषाची गरज नाही, तिची स्वप्न पूर्ण करायला ....मग, काय .... पुढचे दिवस खूप चांगले गेले, तो निर्णय घेऊन एक आत्मविश्वास च आला मझ्यात, ........मी बिनधास्त जायचे कुठेही ..एक दिवशी आमची फेमिली आणि मी आह्मी पंजाब ला एका लग्नासाठी गेलो .......खूप श्रीमंत फेमिली होती ती .....खूप छान तिथली अरेंजमेंट होती ....मला फार आवडली होती .....तिथेच माझी आणि सोहम ची भेट जाहाली ,भेट म्हणजे त्याचे बाबा आणि माझे बाबा, एकमेकाचे चांगले मित्र, त्यामुळे लग्नाच्या नीमीतने आह्मी त्याच्या च घरी राहिलो होतो, तिथे सोहम ची आणि माझी गट्टी जाहाली . आह्मी खूप चांगले मित्र जाहलो. त्याने मला सगळ पंजाब दाखवले. लग्नात पण खूप मज्जा आली .पंधरा दिवस कसे गेले कळलंच नाही .... मग आह्मी परत मुंबई ला यायला निघालो, त्यावेळी सोहम नी मला त्याच माझ्यावर प्रेम आहे हे संगितले ..... पुन्हा, तेच मला ह्या सगळ्याचा राग येत होता, एक मुलगी एका मुलाशी जर दोन शब्द प्रेमाने बोलली, त्याला पाच सहा वेळा फोन केला, दहा बारा वेळा मेसेज केला, की मूल मोकळी होतात, एका मुलीला सांगायला की तूझ मझ्यावर खूप प्रेम आहे ...एका मुलीची आणि मुलाची नुसती निखळ मैत्री नसू शकते का? त्याच्या नात्याला प्रेमाचे लेबल लावायची काय गरज? .....रावी बोलून थोडी शांत जाहाली, तिच्या डोळ्यात तो राग, संताप दिसत होता .... मग, अमन ने च तिला धीर दिला आणि, पुढे काय जाहाले, म्हणून विचारले .... रावी स्वतःला सावरून, म्हणाली, मी सरळ त्याला नकार दिला ....पण, तो पर्यंत घरातील, सगळ्यांना ही गोष्ट माहीत जाहली होती ....सगळे मला चिडवू लागले होते . सोहम च्या आई बाबा ना मी सुन म्हणून पसंद होते .आणि मझ्या आई बाबांना सोहम जावई म्हणून पसंद होता . कारण ही तसच होत, सोहम चे आई बाबा आणि माझे आई बाबा एकाच कॉलेज मधे होते .ते चौघे ही पक्के मित्र आहेत .त्याची मैत्री अजून घट्ट व्हावी, म्हणून त्यानी चौघांनी हा निर्णय घेतला होता .मग काय मला ही त्यांना फारसे काही बोलता येईना .पण, जेव्हा आई बाबांना मी सोहम ला नकार दिलेला समजला .तेव्हा ते दोघे मझ्यावर खूप चिढ्ले, मला एथे शिकायला पाठवत नव्हते .तुमच्या कोणाचा ही फोन आला तरी, मला तो घेऊन देत नव्हते .पण, मला अस आयुष्य नव्हत जगायचं ......मग मी पण ठरवल, काही करून ह्या सगळ्यातून बाहेर पडायचे होते ....पण, सोहम च्या भावना ही दूख्वय्चा नव्हत्या. म्हणून, मी सोहमशी बोलायच ठरवले, त्याला माझ्या मनातील सगळ संगितले ....मी त्याच्या वर प्रेम करत नाही ....पण आपली मैत्री अशीच राहील ....कदचित नंतर प्रेम ही होईल .पण, आता मला थोडासा वेळ हांव...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED