लिव इन.... भाग- 9 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

लिव इन.... भाग- 9

अमन ला रीधीमा च खरच खूप वाईट वाटले ... खरंतर त्याला रीधीमा ही खूप चांगली मुलगी वाटायची ....कोणत्याही मुलाने तिच्या प्रेमात पडावे, अगदी तशी ....जो कोण्ही मुलगा तिच्याशी लग्न करेल ...तो अयुषात खूप सुखी होईल .त्याच घर प्रेमाने पुरेपूर भरून टाकील ....असा स्वभाव होता तिचा .पण, अमन ला मैत्री च्या पलीकडे काहीच वाटत नव्हते . ह्यात अमनची तरी काय चुकी? हे मन खूप वाईट असते, एकाच्या मनात प्रेम निर्माण करते ....तर एकाच्या मनात ....असो ....पण, अमन ने ठरवले, काही जाहाले, तरी तो रीधीमा ला एकटे सोडणार नाही .तिने मझ्यावर प्रेम केले, ह्याची एवढी मोठी शिक्षा तिला देणार नाही . तिला नीट समजवून सांगेन .तिच्या साठी एक चांगला मुलगा बघेल ....जो तिच्यावर खूप प्रेम करतो असा ..... पण, त्या आधी गँग मधील सगळ्याना हे समजून संगितले पहिजे, की माझ रीधीमा वर प्रेम नाही ....आणि आता पर्यंत मी जे तिच्याशी वागलो, ते फक्त मित्र या नात्याने च वागलो, कोणतीही स्वार्थी भावना त्यात कधीच नव्हती .हवं तर, ते सगळे रीधीमा ला विचारू शकतात. मी तिला कुठलही वचन दिलेले नाही . जर रीधीमा नी ऐकल मझे तर सगळे गँग ऐकेल .....आणि मग रावीला सुढ्ह कोणी काही बोलणार नाही . आणि सगळ पूर्वी प्रमाणे होईल .
मग काय ....अमन निघाला, लायब्ररीत ....तिथे रीधीमा ची नजर जरी पुस्तकात दिसत असली ..तरी तीच लक्ष मात्र पुस्तकात नव्हते, हे स्पष्टच दिसत होते ...अमन तिच्या जवळ गेला ....तिला खुणेनेच सांगत म्हणला, रीधीमा मला बोलायचय तुझाषि, प्लीज बाहेर ये .....त्याला परत खुणेनेच नाही म्हणून, रीधीमा ने दर्शवल. पण, अमन ने तिला रिक्वेस्ट केली, आणि ती तयार जाहली . रीधीमा हळूच, लायब्ररी च्या बाहेर आली ...आणि गडबडीत च अमन ला म्हणाली, बोल, अमन ....काय काम आहे? मला खूप काम आहे .... रीधीमा... सॉरी, मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचय .. ...पण, एथे नाही .......कँटीन मधे जाऊन बोलूयात ....खरंतर ...रीधीमा ला अमन चा खूप राग आला, होता ...त्याच वागण तिला पटल नव्हत... पण अमन सोबत वेळ घालवायची एक सूध्हा संधी तिला जाऊ दयची नव्हती ...त्यामुळे ती तयार झाली ...मग, अमन आणि रीधीमा दोघे कँटीन मधे आले ... अमन ने दोन बर्गर आणि कोल्ड्ड्रिन ची ऑर्डर दिली .बर्गर रीधीमा ला खूप आवडतात, हे अमन ला माहीत होते, त्यामुळे त्याने त्याची ऑर्डर दिली होती . आणि बर्गर आवडत असल्यामुळे रीधीमा नकार देऊ शकत नव्हती ..त्यामुळे समोर आलेली प्लेट पुढे ओढत, रीधीमा अमन ला तस न दाखवत त्याच्याकडे खूप आत्मविश्वासाने बघत म्हणली, बोल, अमन ....काय? बोलायचय तुला ...मला तरी नाही वाटत? आपल्या मधे आता महत्वाचे असे बोलायचे काही राहिले आहे .पण तरीही मला ऐकायला आवडेल, तुला काय बोलायचे आहे ते ... रीधीमा ने बो संधी देताच अमन बोलू लागला .... रीधीमा तू माझी खूप चांगली मैत्रीण आहे ...आणि ती ह्या पुढे चांगली मैत्रीण कायम राहणार .....पण .....म्हणजे ....तू मझ्यावर रागावलीस ...हे मला समजतय ....पण, मी तुला कधीच फसवले नाही .... मला माहीत च नव्हते ... की, तू मझ्या विषयी असा विचर करतेस म्हणून? .....पण .....सॉरी ...खरच ....अमन ला काय बोलायचे आहे ..हे रीधीमा ने ओळखले .त्याला शांत करत रीधीमा म्हणाली .... अमन मला समजलय तुला काय बोलायचय ते? पण, तू त्याबदल काही मनला लावू नकोस .त्या बदल मी तूझ्यावर नाही रागवले, फक्त थोडस वाईट वाटले .....ते पण, सगळ होईल व्यव्सतीथ... जसा वेळ जयील तसा .....आणि प्रेम मला जाहाले, तुला ते जाहाले नाही ...म्हणून मी तूझ्यासोब्त काय बदला घेत थोडीच फिरणार आहे ? सॉरी, माझ पण थोड चुकल ...खरच सॉरी ....पण मला थोडा वेळ दे .....सगळ पहिल्यासारख होईल ...ह्याची गारंटी नाही देत ...पण ह्यांच्या पेक्षा चांगली नक्कीच होईल ....तीच बोलण ऐकून अमन ला ही थोडस हायस वाटल ....मग दोघे ही निखळ हसले ... त्या हसण्यात मैत्री होती .....
अमन जो विचार करत होता, तसच जाहाले, अमन ने रीधीमा ला सम्ज्व्ल्या मुळे ती ही शांत जाहाली .... तिने गँग ला समजावले ...आणि रीधीमा खुश आहे हे बघितल्यावर, गँग ने अमन आणि रावी ...दोघांना ही माफ केले, आणि परत त्यांना गँग मधे घेतले ...मग काय परत फिरणे, परत पार्ट्या ....सगळ पूर्वी सारख घडू लागले.... सगळे खुश होते ...पण रावी थोडी दुखी होती ....कारण, गँग मधे गेल्यापासून ... सोहम तिला खूप त्रस्स देत होता ... पण, तिने त्याबदल कोणालाच काही संगितले नाही ...अमन ला सूध्हा काही संगितले नाही ... कारण तिने मनाशी ठरवल होत, की काही जाहाले, तरी कोणाचीही ह्या प्रकरणात मदत घ्याची नाही .... पण, हे सगळ करताना तीच मन मात्र थोडाफार अमन चा विचार करयला लागल होत . अमन ला आपण मित्र मानले ....आणि त्याने प्रतेक वेळी आपली मैत्री निभावली .....खूप चांगला मुलगा आहे तो ....त्यला माणसांची कदर आहे .त्याने आपल्याला गँग मधे घ्यावे ...म्हणून आकाश पाताळ एक केले .... आणि आणखी काय हवं असत, एका मुलीला ......तिच्या तोंडातून नकळत शब्द निघून गेले .लगेच भानावर आल्यासारखी करत, तिने हसत च स्वतहाच्या मनाला प्रश्न केला ....हे काय बोलतेस? आणि हा कसला विचार करतेस? ....ऐत्के वाईट अनुभव येऊन सूध्हा ..... अमन खूप चांगला मुलगा आहे ..,आणि त्याच्या अयुषात रीधीमा ची च जागा आहे .ती खूप प्रेम करते अमन वर ... शेवटी तो मित्र म्हून माझ ही कहितरि कर्तव्य आहेच ना? जेव्हा पासून तिला समजले, होते की अमनवर रीधीमा प्रेम करते ....तेव्हा पासून तिचा एक च प्रयत्न चालू होता, की काही जाहाले, तरी अमन आणि रीधीमाला एकत्र आणयचे.. जेव्हा जेव्हा अमन सोबत ती असे, त्या त्या वेळी ती रीधीमा चा विषय काढे. ती त्याला कशी पर्फेक्ट आहे ...तीच त्यांच्यावर किती प्रेम आहे . सारख सारख त्याला पटवून देत होती . अमन ही ते ऐकायचा आणि मजा म्हणून घ्याचा आणि सोडून दय्चा. पण, तिने प्रयत्न सोडले नव्हते.
ई कडे सोहम मधे आणि रावी मधे जी काही भांडणे जाहली होती ....त्या बदल त्या दोघांच्या घरच्याना समजले होते .रावीचा बिनधास्त पणा, तीच वागण आधीच तिच्या घरच्यांना आवडत नव्हते ...त्यामुळे तीच काहीच ऐकून नघेता तिला च वाईट ठरवून त्यानी तिला आता च्या आता कॉलेज सोडून घरी ये ...म्हणून संगितले .पण, रावी ला हे सगळ सोडून घरी नव्हते जायचे .हे तीच शेवटचे वर्ष होते .आणि महिन्याच्या अंतरावर परीक्षा आल्या होत्या . आणि आता तर खरी वेळ आली आहे ,आपली स्वप्ने पूर्ण करायची ....कॉलेज पूर्ण झल्यावर तिला कितीतरी संधी चालून येणार होत्या .. त्यामुळे तिने घरी जाणे टळले .आणि त्याचाच परिणाम असा की, तिच्या आई वडिलांनी तिची साथ सोडून दिली .त्यानी तिला घरी येऊन नाही दिले .तिच्याशी बोलणे टाळले. आता रावी एकटी पडली होती .पण, तिची गँग मात्र तिच्या पाठीशी उभी होती .खास करून अमन . .....