मन हे पाऊसवेडे - तू आणि मी शब्दांकूर द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मन हे पाऊसवेडे - तू आणि मी

सायंकाळी गजबजलेलं मार्केट.. ती चिल्लर खरेदी करत होती... हातात पिशवी होती तिच्या..साडी सांभाळत जाता जाता .. तिने विचार केला ..झालं सर्व खरेदी करुन... चला जावं.. तेवढ्यात तिला गुलाबाची फुलं विकणारा मुलगा आग्रह करायला लागला... आग्रहाखातर तिने गुलाबांचा बंच घेतला अन लगेच दिसलेला गजरा आवडी खातर... आभाळ भरून आले होते.. तिला वाटलं पाऊस येणार .. छत्री बघितली पण पर्स मध्ये नव्हती.. ती स्वतःवरच चिडली आणि लगबगीने
निघणर.. तर पावसाचा थेंब आसुसून डोकावला...आणि पावसाचा कोसळणारया धारामधून तिला वाचता नाही आलं....
चिंब भिजलेला रस्ता एकदम सुनसान झाला.. ती चालत होती

लाल रंगाची शिफॉनची साडी लाल ब्लाऊज.. खोल गळ्याचं... गळ्यात मोत्याचा कंठा काणात मोत्याचे टाॅप्स..लांबसडक केस.. कमरेवर विसावलेले... एकेरी पदर.. गुलाबवेडे मधाळ लाल लिपस्टिक... ओघळत जाणारे पावसाचे थेंब.. ओली चिंब झाल्याने अंगाला चिकटलेली साडी... रस्ता सुद्धा बेभान व्हावा असं गव्हाळ गोरं लाघवी सौदर्य...

त्याची बाईक खराब झालेली.. पावसात बसलेला दुरुस्त करत.. पण होईना .. इकडे तिकडे पाहत कोणी दिसेल तर..तेवढ्यात ती आली.. त्याचं लक्ष गेलं अन तो मंत्रमुग्ध होऊन गेला... भानावर येत त्याने विचारलं इथे दुरूस्त करून घ्यायाला दुकान आहे का?

ती नाही म्हणाली अन् समोर निघाली.. तीची ओलाचिंब प्रतीकृती बघत राहीला तो... मग धावत जावून म्हणाला ..कुठे होटेल वगैरे...तीने बघितलं.. म्हणाली थोडावेळ विश्रांती घ्या चला...तो फक्त मागे चालत राहीला रोबोट सारखा...

दार उघडून तीने त्याला बसायला सांगितले व बेडरूम कडे गेली.. साडीचा ओलाचिंब पदर बाजूला सारला.. तिला कुणाच्यातरी श्वासाचा भास झाला ... दचकून मागे वळून पाहिले अन त्यांचा बाहूपाश आवळला गेला.....तिला तो ऊष्ण स्पर्श हवाहवासा वाटायला लागला... आणि त्याचा पाठिवरचा हात एक एक आवरण दुर करत ओठांवरचं मध प्राशन करू लागला... श्वासांची गती वाढू लागली व एकमेकांमध्ये.. विलीन होण्याची पण.. आणि.....
‐------------------------
लाल नववारी साडी मागे गोंदळवलेला बॅकलेस ब्लॉऊस , गळ्यात मोत्याचा कंठा, कमरेला कंबरपट्टा लांब रेशमी केस... पायात पैंजण , हातात लाल बांगड्या .... गुलाबाचा सुगंध रुणझुणतावर मोमबत्तीतून निघणारा तो किणकिणत प्रकाश

त्यात मागे आशाच्या आवाजात... मालवून टाक दीप

खाली पसरलेली गुलाबाच्या पाकळ्यांची चादर ... बाहेर रुणझुणता पाऊस ... काचेच्या तावदानावरून ओघळणारे पावसाचे थेम्ब जणूं ऐकायला आलेत हे शब्द ... भरून आलेल आभाळ ... गुलाबाचा गंध त्यात मिसळणारा स्पर्शाचा सुगंध

मोत्याच्या कंठ्याचा तुटलेला मणी ...किणकिण करत फ्लोअरवर पडून आलेला आवाज ...तुटलेला कंबरपट्टा ...अन मागून येणारे शब्द .. मनावर रुजणारा आवाज

गारगार या हवेत, घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग !


उघडलेला खिडकीचा काच.. त्यातून येणार गार हवेचा झोत ... पावसाचे येणारे तुषार ... अचानक दिसणारा चंद्र ... हलकेच उजाडणाऱ्या तारका तिचा घसरलेला पदर ... उगाच तुटलेला गोंडा ... शहरलेला थंड वारा ... तिच्या स्पर्शाने ... अन मागून येणार आशाचा आवाज

दूरदूर तारकात बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !


गेलेल्या पावसाचा उडालेला थेम्ब ... नाभीच्या खोलीवर थरथरनारा शहारा ...चंद्राचा डोकावणारा प्रकाश... खिडकीचा उगाव किणकिणाट आवाज ...पायाच्या स्पर्शाने कनकिननारे पैंजण ... बोटाच्या रेघांनी पसरणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्या .... उगाच मंद होणार मेम्बत्तीचा प्रकाश तिच्या सुवासाने लवलवणारी तीही ज्योत ...अन मागून येणार आशाचा आवाज

हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल ?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग ?


मंद होत गेलेला वारा ... सरसरणारे श्वास ... सरकणाऱ्या पाकळ्या ... सुटलेले बांध ... तुटलेले बंध ...कानाच्या पाळीवरून सरसररेला स्पर्श ... तुटणारा झुमका ... ... सुटलेला गोंडा ... सरकेल आंबा दिढीला होणाररा दिठीचा स्पर्श ...शहारले ओठ आणि मागून येणार आशाचा आवाज

काय हा तुझाच श्वास ? दर्वळे इथे सुवास !
बोलरे हळू उठेल चांदण्यावरी तरंग