Pair Your Mine - Part 13 books and stories free download online pdf in Marathi

जोडी तुझी माझी - भाग 13


घराच्या जवळच अगदी एक खूप छान गार्डन असतं. डॉक्टर निघून गेल्यानंतर गौरवी आणि विवेक तयार होतात आणि त्याच गार्डन मध्ये जातात. तिथे एक बेंचवर बसून दोघेही जण गार्डन ची सुंदरता न्याहाळत असतात. बोलायचं असत पण शब्द सुचत नाहीत.

इकडे तिकडे बघता बघता अचानक दोघांची नजरानजर होते आणि क्षणभरासाठी दोघेही एकमेकांत गुंतून जातात. पण लगेच भानावर येत तो नजर फिरवतो आणि पुन्हा इकडे तिकडे बघू लागतो. तीने मात्र तिची नजर त्याच्यावरच रोखून ठेवली असते. त्याची चलबिचल बघून तीच सुरुवात करते,

गौरवी - विवेक, तू काही विचारणार होतास ना? विचार न मग.

विवेक - अ... अ.. हो म्हणजे अग गेले 8 दिवस घरी राहून मला खूपच कंटाळा आला. पण गेल्या कित्येक दिवसांपासून तू मात्र घरातच असते तुला कंटाळा नाही का आला?

गौरवी - ( किंचित हसते) यायचा ना रे, घरात बसायची अजिबात सवय नव्हती मला त्यामुळे आणखी जास्तच कंटाळा यायचा.

विवेक - मला माफ कर गौरवी, मी खरच खूप वाईट वागलो ग तुझ्याशी, आई बाबा म्हणायचे तसच तुझ्या समाजदारपणाचा फायदाच घेतला मी. तू एक स्वच्छंदी उडणारी, मनमोकळं जगणारी, आईबाबांची एकुलतीएक लाडाची मुलगी आणि मी मात्र तू जे कधी आयुष्यात बघितलं नसेल, कधी विचारही केला नसेल असे दिवस तुझ्यापुढे मांडले, आणि तुही कुठलीही तक्रार न करता ते जगले. इतकी कशी ग समजदार आहेस तू?

गौरवी - विवेक पुरे ना ते आता, झाले दिवस गेलेत ना, आता पुन्हा पूर्वीसारखं म्हणजे लग्नाच्या आधी जस राहायचो आपण तस जगुयात ना. (त्याचा हात हातात घेत त्याच्या डोळ्यात रोखून बघत ती बोलली)

गौरवी - आणि घरात राहायचं म्हणशील तर तुला एक सांगायचं होतं, पण प्लीज चिढणार नाहीस ना आधी वचन दे, प्लीज रागावू नको.

विवेक - नाही चिढणार ग आता खूप चिढून रागवून झालं खूप त्रास देऊन घेतला मी तुला आता मात्र मी तसं नाही वागणार.

गौरवी - इकडे आल्यानंतर सुरुवातीला बरेच दिवस मी घरातच बसुन काढलेत रे काय करावं सुचतच नव्हतं. घरातली काम आवरलं की मग खूपच कंटाळा यायचा, एक दिवस असच मी घराबाहेर पडले, पण कुठं जाऊ काय करू काहीच सुचत नव्हतं. पण आजूबाजूला काय आहे ते तर बघुयात म्हणून मी चालत चालत गेले तर तिथे मला एक हिंदू मंदिर दिसलं. मला खूप आनंद झाला, मी आत गेले आपले सगळे देवीदेवता तिथे होते आणि खूपच प्रसन्न अस वातावरण होतं, तिथे मला खूप फ्रेश वाटलं. मग तू निघून गेल्यावर काम आवरलं की मी रोजच मंदिरात जाऊ लागले. हळूहळू तिथे येणाऱ्या काही लोकांबरोबर माझी ओळखही झाली. रोज दिवसाचा एक तास तरी मी तिथे घालवायचे. तुला सांगायचं होतं पण तू नेहमी घाईतच असायचा आणि आपलं बोलणं तरी कुठे व्हायचं नीट? अगदी कामपुरत बोलून तू निघून जायचास, अस घाईत असताना तुला सांगणं मला बरोबर नाही वाटलं आणि तुला आधीच देवावर फारसा विश्वास नाही त्यामुळे तू चिढशील म्हणूनही घाबरत होते. तसाही कामाचा ताण जास्त होता तुला आणि त्यात मी आणखी ताण देणं योग्य नाही वाटलं मला. तुझ्यापासून हे लपविल या साठी मला खरच माफ कर.

विवेक - बस बस गौरवी आणखी किती लाजिरवाणी करशील मला, यात माझीच चूक आहे आणि तू कशाला माफी मागतेय.

तेवढ्यात गौरवीच फोन वाजतो. फोन मंदिरातल्या ओळखीच्या काकांचा असतो ज्यांनी तिला विवेकला हॉस्पिटल मध्ये नेण्यात मदत केली होती. गौरवी एकदा विवेक कडे बघते आणि एक मिनिट म्हणत फोन उचलते.

गौरवी - नमस्ते काका, कसे आहात?

काका - मी छान आहे बेटा, तू कशी आहेस आणि विवेकची तब्येत कशी आहे? हॉस्पिटल मधून घरी आणलं का त्याला ? मी तुझ्या फोनची वाट बघत होतो, पण तुला वेळ नसेल मिळाला म्हणून आज मीच करून बघितलं.

गौरवी - हो काका मी छान आहे आणि विवेक ही बरा होतोय आता, त्यादिवशीसाठी तुमचे आभार मानायचे राहूनच गेलेत, फोन करणार होते पण खरंच वेळ नाही मिळाला, विवेकला तिसऱ्या दिवशीच सुटी दिली होती पण बेड रेस्ट सांगितली होती. आज जरा कंटाळा आला घरात बसून म्हणून जवळच्या गार्डन मध्ये आलो होतो दोघे फेरफटका मारायला. त्यादिवशीसाठी खूप खूप धन्यवाद काका, तुम्ही नसते तर... मला काही सुचतच नव्हतं.

काका - अग हे सगळं राहू दे बेटा, तू पोरीसारखीच आहे ना आम्हाला. बर विवेकच्या भेटीला यायचं होतं, तो जरा बरा झाल्यावरच जावं म्हंटल, आता ठीक असेल तर उद्या येऊ शकतो का आम्ही?

गौरवी - हो काका या तुम्ही उद्या. ठीक आहे उद्या भेटू.

काका - ठीक आहे बेटा, काळजी घे.

विवेकला कळतच नाही कोण काका आहेत हे. तो तिला विचारतो,
विवेक - तुझे काका इथे राहतात , मला महिती पण नाही.

गौरवी - नाहीं रे हे तर मंदिरात ओळखी झालेले काका आहेत. आपल्याच घराजवळ राहतात ते. त्यादिवशी यांनाच मी मदतीला बोलावलं होतं तुला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी.

विवेक - ohh अच्छा, खरं तर मी तुला यांच्याचबद्दल विचारणार होतो, मला वाटलं इथे कुणीच ओळखीचं नसताना तू अस फोन करून कोणाला बोलावलं, पण बघ विचारायची गरजच पडली नाही.. काय म्हणालेत ते कसं काय फोन केला?

गौरवी - अरे त्यांना तुला भेटायला यायच होतं. तब्येत कशी आहे तुझी विचारत होते.

विवेक - अच्छा, चांगलं आहे, गौरवी मी इतक्या दिवसांपासून इकडे राहतोय पण कधीच कुणाशी ओळखी नाही झाली आणि तूझी तर छान ओळखी झाली. बर आणखी एक विचारायचं होतं..

गौरवी - विचार ना

विवेक - तू आपल्या दोघांच्या घरी काही कळवलं का माझ्याबद्दल? माझ्या वागण्याबद्दल किंवा accident बद्दल.

गौरवी - नाही विवेक मी नाही सांगितलं काहीच, उगाच ताण घेतील रे ते, आणि काही करता येणार नाही म्हणून आणखीच हतबल वाटेल त्यांना, म्हणून नाही सांगितलं.

विवेक - बरं केलं खरच. thank you गौरवी..

गौरवी - आतापर्यंत sorry म्हणत होता आता thank u म्हणतोय अरे पुरे आता नको ही औपचारिकता आपल्या नात्यात.

विवेक - औपचारिक नाही ग खरच मनापासून म्हणतोय.

गौरवी - बर ठीक आहे. बराच वेळ झाला आपल्याला तू पेशंट आहेस, निघायचं का आपण?

आणि ते दोघेही घरी परत जायला निघतात.

----------------------------–----------------------
क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED