जोडी तुझी माझी - भाग 19 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 19


गौरवी विचार करत ऐरपोर्टवरच कॉन्टॅक्ट लिस्ट चाळत बसली होती.. आणि बघता बघता तिची बेस्ट फ्रेंड रुपाली वर ती थांबली.. तिला फोन केला तर ती ऑफिस मध्ये होती.. पण गौरवीचा फोन बघून लगेच उचलला..

गौरवी - हाय रुपाली, कुठे आहेस?

रुपाली - हाय, गौरवी मी ऑफिस मध्ये आहे, किती दिवसांनंतर बोलतोय आपण.. तू कुठे आहे आली का इकडे? आपण भेटुयात हं खूप दिवस झालेत तुला भेटून...

गौरवी - तीच सगळं बोलणं टाळत, रुपाली मला तुझ्या कडून एक मदत हवी होती..

रूपालीला गौरवी थोडी गंभीर असल्याचं समजतं, आणि ती ही

रुपाली - गौरवी तू बोल तर डिअर, काय झालंय? तू एवढी नाराज का वाटते आहे?

गौरवी - रुपाली मी भारतात आली आहे पण मला घरी जायचं नाहीय, काही दिवस तुझ्या कडे राहत येईल का ग? जर तुला काही त्रास होणार नसेल तर...

रूपालीला तीच बोलणं ऐकून ती खूप जास्त दुःखी आहे हे कळतं..

रुपाली - अग कधीही गौर.. पण काय झालंय नीट सांगशील का? ते जाऊ दे तू आता कुठे आहेस ? मी तुला घ्यायला येते.


गौरवी - मी एअरपोर्ट वर आहे मी येते कॅब घेऊन तुझ्याकडे, तू लगेच नको येऊ ऑफिस झालं की ये तसाही मला यायला 3 4 तास लागतील..

रुपाली - ठीक आहे जवळ आली की फोन कर मी ऑफिस मधून निघेल..

गौरवी - ओके.. thank u dear..

रुपाली - तू ये मग बोलूयात आणि आभार वगैरे राहू दे..

रूपालीच ऑफिस मध्ये लक्षच लागत नाही आणि ती लवकरच घरी येते, ती एकटीच राहत असते.. थोडावेळातच गौरवी तिच्या घरी पोचते.. लगेच विषय नको म्हणून रुपाली तिला फ्रेश व्हायला सांगते आणि चहा टाकते.. दोघीही चहा चा कप घेऊन गॅलरीत येऊन बसतात... गौरवी शांत असते काहीच बोलत नाही... रूपालीला आता मात्र तीच अस शांत राहणं फार त्रास देत असतं.. आणि ती हळूच विषय छेडते..

रुपाली - गौरवी तू ठीक आहे ना?

गौरवी - हो ग आता थोडी ठीक आहे...

रुपाली - काय झालंय? म्हणजे तू भारतात आली पण घरी जाऊ शकत नाही आई बाबांना भेटू शकत नाही..

गौरवी - तस काही नाही आहे ग रूप, पण मी इकडे येण्या आधी त्यांना कळवलं नाही ना , अचानक कशी जाऊ म्हणून तुझ्याकडे आले..

गौरवी नजर चोरातच सगळं बोलत असते, रुपाली तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला पुन्हा विचारते, "काय झालंय?" आणि एवढ्या वेळपासून आवरून ठेवलेले अश्रू पुन्हा गळायला लागतात ,ती रूपालीला मिठी मारून खूप रडत असते, रुपाली सुद्धा तिला मोकळं होऊ देते.. थोडावेळणी शांत झाल्यावर गौरवी रूपालीला सगळं सविस्तर सांगते... हे सगळं ऐकून रुपलीला धक्काच बसतो.. तिच्या मनात विचार येतो इतकं कस सहन करू शकते गौरवी...

इकडे विवेक त्याच्या ऑफिसच्या मित्राकडे राहतो, त्याच नाव राहुल.. अचानक अस राहायला आल्यामुळे त्याला नाईलाजाने त्याला सर्व सांगावं लागतं.. तो ही त्याला समजून घेतो..

त्याच्या डोक्यात अजूनही गौरवीचाच विचार सुरू असतो, कुठे गेली असेल राहायला? मग अचानक त्याला मंदिरात ओळखी झालेल्या गौरवीच्या काकांची आठवण होते.. आणि तो लगेच हातात फोन घेतो पण त्याच्या कडे त्यांचा फोन नंबर नसतो... त्यांच्या घराचा पत्ता सुद्धा त्याला माहिती नसतो.. त्याला त्याचाच राग येतो की साधं फोन नंबर पण घेतला नाही त्यादिवशी भेटायला आले तर... काय करावं त्याला सुचत नसतं... "का शोधू गौरवी तुला?" डोळ्यांच्या कडा पानावत तो मनातच बोलत असतो...

त्याची चलबिचल आणि मनाची अवस्था राहुल बघत असतो.. विवेकला अस बघून राहुललाही वाईट वाटतं.. तो 2 कॉफी कप हातात घेऊन त्याच्याकडे येतो... एक त्याला देतो पण तो

विवेक - नको मला

राहुल - अरे घे, जरा बरं वाटलं तुला... केव्हाच बघतोय काय एवढा विचार करतोय?

विवेक - (कप घेत) गौरावीला कुठे शोधू काळात नाहीय रे? कुठे गेली असेल ? हा देश हे सगळं नवीन आहे तिच्यासाठी...

राहुल - (थोडा विचार करत) अरे त्यादिवशी तू त्या काकांबद्दल सांगितलं होतं ना तुझ्या अकॅसिडेंटच्या वेळेला गौरवीने ज्यांना बोलावलं होतं.. त्यांच्याकडे विचारलं का?
विवेक - नाही रे माझ्याकडे त्यांचा नंबर, पत्ता काहीच नाहीये, का शोधू मी त्या काकांना?

राहुल - कायsss? तो आश्चर्याने ओरडतो.. असो ते तिला मंदिरात भेटले होते बरोबर

विवेक - हो..

राहुल - अरे मग मंदिरात जाऊन बघ ना ते तिथे येतच असतील , त्यांच्याशी भेट झाली की विचार, आणि मला तर वाटत कदाचित गौरवी पण मंदिरात येत असावी... भेटू शकते तुला..

विवेक - (एकदम खुश होऊन) अरे वाह काय मस्त आयडिया दिली यार तू!!... माझ्या तर डोक्यातच नाही आलं हे.. उद्या लगेच जातो मी मंदिरात.. thank u मित्रा..

राहुल - अरे, आभार काय म्हणतोस, वहिनीला शोध.. आणि होत असे कधी कधी जास्त ताण असला की काही सुचत नसतं..

विवेक - हम्मम

राहुल - बर मला सांग त्या आयशाच्या बाबतीत काही कळलं का? म्हणजे तिने अस का केलं? आणि कुणाच्या भरवशावर केलं?

विवेक - नाही रे पण मी माहीत करून राहील.. आधी गौरवी मला भेटू दे.. बघ ना राहुल मी मंदिरात कधी जात नाही मला विश्वास नाही आणि आवडत पण नाही पण देवाने कशी परिस्थिती माझ्यापुढे आणलीय की मला आता मंदिरात गेल्याशिवाय पर्यायच नाही..

राहुल - हम्म... नियती आहे boss.. अशीच खेळते ती..
बरं चलं बराच वेळ झालाय, झोपुयात अजून उद्या कामावर जावं लागेल ना...
-------------------------------------------------------------------
क्रमशः...