Jodi Tujhi majhi - 26 books and stories free download online pdf in Marathi

जोडी तुझी माझी - भाग 26


रुपाली गाडी घेऊन गेट पर्यंत येते पण तिला गौरवी दिसत नाही, ती इकडे तिकडे बघते तेवढ्यात पुढे तिला गौरवी एका गाडीपुढे उभी दिसते आणि लगेच गौरवीच अक्सीडेंन्ट होतो... रुपाली तिची गाडी तिथेच उभी करून गौरवी जवळ पळत जाते... अक्सीडेंन्ट झाला म्हणून आजू बाजूचा बराच जमाव तिथे जमा होतो, त्यात संदीप आणि विवेक दोघेही असतात, रुपाली गौरावीला मांडीवर घेऊन गालावर हलकेच मारत उठवण्याचा प्रयत्न करते पण डोक्याला मार बसल्यामुळे गौरवी बेशुद्ध झाली होती, गौरावीला बघून विवेक एकदम शॉक होतो पण स्वतःला सावरत तो जमवातून पुढे येऊन तिच्याजवळ जातो.. तो ही गौरवीला हाक मारत असतो पण तिचा काहीच रिस्पॉन्स मिळत नाही

रुपाली - आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला हवं लवकर..

विवेक - हा.. हो हो ... च.. च... चल लवकर...

गौरवीला या अवस्थेत बघून थोडं घाबरल्यामुळे त्याचे शब्द अडखळतच बाहेर आले..

विवेक तिला उचलून घेतो, संदीपही लगेच गाडी काढतो, विवेक गौरावीला गाडीत बसवतो, आणि रुपलीच्या मांडी वर गौरवीच डोकं ठेवतो..

संदीप गाडी सरळ हॉस्पिटलकडे पळवतो रस्त्यातच तो त्याच्या एका मित्राला हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना कल्पना द्यायला सांगतो,

हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर डॉक्टर लगेच तिला चेक करतात, तिला ICU मध्ये शिफ्ट केल्या जातं डोक्याला जबर मार लागला असतो आणि आतल्या आत रक्तप्रवाह झालेला असतो, विवेक बाहेर बसून रडत असतो त्याला गौरावीसाठी खूप वाईट वाटत असतं, इतकं सोसलय तिने तरी अजून हे बाकी होताच का? आज पहिलाच दिवस होता ना तिचा जॉबवरचा त्यात ही आडकाठी...

तेवढ्यात डॉक्टर तीच ओपरेशन करायचं म्हणतात, विवेक फॉर्मवर सही करतो आणि ओपेशन सुरू होत, आता त्याला वाटत की घरी कळवायला हवं आता हे सगळं... त्यांना आणखी अंधारात ठेवायला नाही जमणार आता... तो संदीप आणि रुपलीला तिच्या जवळ थांबवून घरी जातो.

तिच्या आई वडिलांना सुद्धा तो घरीच बोलावून घेतो, आणि त्यांना सगळं सांगतो, पण आयेशा बद्दल सांगायचं मात्र तो टाळतो, यावर घरचे सगळे त्याच्यावर खूप चिडतात, पण परिस्थिती अशी होती की फार प्रश्न उत्तर करण्याची ही वेळ नव्हती, आणि तो सगळ्यांची माफी मागतो आणि त्या सर्वांना घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो... गौरवीच ओपरेेशन सुरूच असतं, सगळे डॉक्टरांची बाहेर येण्याची वाट बघत असतात... पण विवेक मात्र तिथे कुठेच दिसत नाही...
तो मंदिरात गेलेला असतो, गौरावीसाठी प्रार्थना करायला...

मंदिरात तो देवाशी भांडत असतो,
विवेक - काय लिहून ठेवलायस रे तू तिच्या नशिबात? आतापर्यंत सोसतच आली ना ती, अजूनही आहेच का काही? किती त्रास देणार आहेस तिला? तुला अकॅसिडेंन्ट च करायचा होता तर माझा का नाही केलास? मी तर किती चूका केल्यात आयुष्यात त्याची सजा तिला का मिळतेय? ती इतकं तुला मानते तुझी पूजा करते ते कमी आहे का ? तिला काही झालं ना तर तुला माझं ही काही बर वाईट करावच लागेल, नाही तू केलंस ना तर मी करून घेईल.. तिला आता मी आणखी अश्या परिस्थिती नाही बघू शकत... तू ईश्वर आहेस ना रे काहीही करू शकतो, मी भीक मागतो तुला, प्लीज माझी गौरवी मला सुखरूप परत कर... तिला लवकर बर कर देवा, तिला लवकर बर कर...

एवढं बोलून तो गुडघ्यांवर बसून जोरजोरात रडत असतो, रुपाली त्याला शोधत येते, आणि त्याच्या मागेच थांबते.. त्याच पूर्ण बोलणं रुपाली ऐकते, त्याला तस पाहून रुपलीलाही थोडं वाईटच वाटलं, पण तरी ती विवेकला बोलते, कारण आज त्याच्याचमुळे हे सगळं झालं असत , तिच्या मैत्रिणीला सगळा त्रास होत असतो...

रुपाली - आपला दोष देवाच्या माथी मारताय जीजू? तिने जे काही सोसलाय ना त्याच कारण फक्त तुम्ही आहात, फक्त आणि फक्त तुम्ही...

विवेकला रुपलीचा आवाज येताच तो डोळे पुसून उभा राहतो आणि तिच्याकडे वळतो,

विवेक - मला सगळं मान्य आहे, खूप मोठा गुन्हा मी केलाय पण तिला शिक्षा का मिळतेय? मला हवी ती शिक्षा दे म्हणावं ना ग...

रुपाली - तुम्हाला हा जो त्रास होतोय ज्या पच्छतापाच्या आगेत तुम्ही जळत आहेत ना हीच तुमची शिक्षा आहे जीजू.... असू द्या हे सगळ, ते देवाच काम आहे तुम्हाला शिक्षा देणं... कदाचित गौरवीने मनापासून जी तुमच्यासाठी व्रत वैकल्ये केलीत ना त्याचाच असर असेल हा...की तो तुम्हाला शिक्षा नाही देऊ शकत... ते जाऊ द्या मला एक विचारायचं होतं...

विवेक - हा विचार न मग..

रुपाली - तुम्ही अकॅसिडेंन्ट झाला तिथे कसे काय हजर होतात? काही तुमचा प्लॅन तर नव्हता हे सगळं अस करण्याचा?

रुपालीला विवेकला घटनास्थळी पाहून संशय असतो मनात पण एकांतात विचारू म्हणून ती शांत असते आणि आता तो एकटाच दिसतो म्हणून ती त्याला स्पष्टच विचारते...

विवेक - रुपाली, प्लेज असा संशय घेऊ नकोस ग, मी एक का करेल हे सगळं असं? मी तर तिच्याशी बोलायला आलो होतो , जेव्हा मी तिथे आलो मला माहिती नव्हतं की गौरवीचा अकॅसिडेंन्ट झालाय पण जेव्हा बघितलं पाया खालची जमीन सरकल्याचाच भास झाला..

रुपाली - मी तुम्हाला बोलले होते की मी तिच्याही बोलते आधी मग पुढचं बघू, तुम्हाला तेवढाही धीर नाही निघाला का जीजू, तुम्ही आमच्या ऑफिस बाहेर काय करत होतात?

विवेक - अग मला नव्हतं माहिती तिथे तुमचं ऑफिस आहे, मी संदीपच्या घरी राहतोय आणि तिथे एक हॉटेलमध्ये नाशता करायला आलो होतो, ते हॉटेल संदीपच आवडत आहे आणि त्याच्या घरापासून जवळ.. पण मला एक प्रश्न पडलाय गौरवी अशी रस्त्यावर का पळत होती?

रुपाली- मलाही नाही माहिती ते तिला शुद्ध आल्यावरच विचाराव लागेल, चला आपल्याला आता तिथे असायला पाहिजे डॉक्टर येतील केव्हाही बाहेर... आणि माफ करा मी संशय घेतला तुमच्यावर...

विवेक - असू दे त्याच काही नाही , चल लवकर...

मंदिर हॉस्पिटलमध्येच असत ते लगेच OT जवळ येतात, डॉक्टर अजून बाहेर आलेले नाहीत.. बघून रुपाली बेंचवर गौरवीची आईच्या बाजूने बसते आणि विवेक तिथेच येरझाऱ्या घालत असतो.. विवेकच्या आई गौरावीच्या सुखरुपतेसाठी देवाचा धावा करत असते.. विवेकच्या आई आणि गौरवीची आई दोघीही रडत असतात आणि रुपाली आणि संदीप त्यांना सांथवन देत असतात...


क्रमशः...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED