Jodi Tujhi majhi - 28 books and stories free download online pdf in Marathi

जोडी तुझी माझी - भाग 28



अगदी घाबरलेल्या अवस्थेत गौरवीने डोळे उघडले, ती मानसिक दृष्ट्या स्थिर नाही हे डॉक्टरांना जेव्हा ती शुद्धीवर येत असते तेव्हाच कळलं होतं, पण ती अर्धवट शुद्धीत सारख विवेकच नाव घेत होती, त्यामुळे डॉक्टरांनी विवेकला गौरवी जवळ थांबायला सांगितलं... कदाचित ती विवेकला समोर बघून शांत होईल असा अंदाज डॉक्टर बांधतात...

गौरवी शुद्धीवर येते आणि समोर विवेकला बघून शांत होते... विवेक तिच्याशी बोलतच असतो... पण गौरवीने डोळे उघडले बघून तो लगेच डॉक्टरांना हाक मारतो, डॉक्टर जवळच असल्यामुळे लगेच येतात नि गौरावीला तपासतात... डॉक्टर जवळ असल्यामुळे गौरवी काहीच बोलत नाही फक्त विवेक कडे एकटक बघत असते... आणि विवेकच पूर्ण लक्ष तिच्याकडे आणि डॉक्टरांकडेच असत.. ती काही बोलत नाहीये त्याच्या लक्षात येतं आणि तो तिला बोलत करण्याचा प्रयत्न करतो..

विवेक - गौरवी कस वाटतंय तुला? सगळं ठीक होईल नको काळजी करू, तू बोल ना काहीतरी...

खरं तर विवेकला पाहून गौरावीला खूप आनंद होतो, थोडावेळासाठी मागच सगळं विसरून ती त्याच्या कडे जाण्यासाठी खूप आतुर असते.. हे तिच्या डोळ्यातल्या भावना स्पष्ट सांगत असतात, विवेकलाही त्या कळतात पण ही एवढी शांत का आहे हेच त्याला कळात नाही,' जर राग असता तर डोळ्यात दिसला असता पण या डोळ्यात काही वेगळाच आहे... मला अस का वाटतंय की गौरवीची डोळे मला सांगताहेत की मला जवळ घे म्हणून... ' विवेक मनातच विचार करत असतो..

विवेक - मी इथे आलेलो आवडलं नाही का तुला? तू ठीक तर आहे ना काही त्रास होतोय का तुला? गौरवी काहीतरी बोल ना ग तुझं अस गप्प बसणं फार बोचतय ग मनाला. बोल ना ग काहीतरी...

डॉक्टर ती आता सुरक्षित आहे सांगून निघून गेलेत.

गौरवी - विवेक, मला तू...

पुढे ती काही बोलणार पण तिला बघायला सगळे आत आले, आणि त्या सगळ्यांना बघून तिला जर आश्चर्यच वाटलं की हे सगळे इथे कसे काय, त्याच आश्चर्याने ती बघत होती तेव्हा गौरवी च्या आईने सांगितलं की विवेकने सांगितलं आम्हाला सगळं आणि तोच आम्हाला घेऊन आला आहे इकडे...

वि बाबा - गौरवी बेटा, कस वाटतेय तुला?

गौरवी - खूप बरं वाटतेय बाबा...

इतक्या दिवसांनी सगळ्यांना बघून गौरावीला खूप आनंद झाला होता आणि गौरवीच्या डोळ्यात पाणी आलं.. पण गौरवी ने ते लपवण्यासाठी दुसरीकडे बघितलं आणि हातच्या अंगठ्याने डोळ्यांची कोर पुसत होती...

वि बाबा - बेटा, काळजी करू नकोस आम्ही तुला कुठलाच प्रश्न विचारणार नाही, आणि तू जे म्हणशील तेच होईल...

तिला जरा हायस वाटलं, तिला पुन्हा हेच टेन्शन आलं होतं की मी सगळ्यांना उत्तर काय देऊ.. पण विवेकचे बाबा बोलले आणि तिला जरा मोकळं वाटलं..

विवेक - अं... तुम्ही सगळे बोला तोपर्यंत मी आलोच डॉक्टरांना भेटून...

गौ बाबा - थांब मी ही येतो,

विवेक - बाबा तुम्ही थांबा ना गौरवी जवळच तिला जरा बरं वाटेलं आधार वाटेल, आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर ती बोलू शकेल... माझ्यासमोर बोलणं कदाचित तिला अवघड होईल म्हणून मी ...

गौ बाबा - हम्म तू म्हणतो ते बरोबर ठीक आहे जा तू...

तो बाहेर निघून जातो आणि आतापर्यंत कसतरी अडवून ठेवलेला आसू तो खोली बाहेर पडताच त्याच्या डोळ्यातून निघतो, तेच पुसतच तो डॉक्टर कडे जातो आणि गौरवीच्या तब्येतीची सवित्तर चौकशी करतो, तिला काय खाता येईल, काय पथ्य, काय काळजी घ्यायची अशी सगळी माहिती विचारून घेतो..

या सगळ्यात डॉक्टर एक सांगतात की तिला जास्तीत जास्त आराम करावा लागेल आणि अजिबात कुठलाच ताण नको... कारण शुद्धधीवर येताना ती मानसिकदृष्ट्या थोडी विचलित होती... आणि थोडासा ही ताण तिला अस्वस्थ करू शकतो हे तिच्यासाठी अजिबात योग्य नाही...

इकडे एवढे सगळे आत बघून नर्स जरा चिढते, पेशंटला आराम करू द्या म्हणून सगळ्यांना बाहेर काढते, आत फक्त गौरवीची आई होती...
गौ आई - बेटा कसं वाटतंय?

गौरवी - ठीक आहे आई मी, तुम्हा सगळ्यांना बघून खूप आनंद झाला पण मला इथे कुणी आणलं आणि रुपाली कुठे आहे?

गौ आई - तुला विवेक आणि रुपलीनेच इथे आणलं, रुपाली इथेच होती आतापर्यंत आताच थोडावेळ झाला फ्रेश होऊन येते म्हणून घरी गेलीय... बर मला एक खर खर सांगशील?

गौरवी - इथे आल्यावर आम्हाला का सांगितलं नाही हेच ना?

गौ आई - अ... तो प्रश्न तर आहेच पण त्या आधी मला सांग तू विवेकला माफ केलंय का? तुमच्या दोघांमध्ये काय झालंय नाही माहिती आम्हाला.. पण भांडण झालंय हे तर नक्की आहे, तेव्हाच तू इकडे आली होतीस. मी तुला कारण नाही विचारणार कारण तुला ते आम्हाला कळू द्यायचं नव्हतं म्हणूनच तू आम्हाला न सांगता रुपालीकडे राहत होती...
मला फक्त एवढं सांग की जर विवेकने माफी मागितली तुझी तर तू त्याला माफ करशील का?

आता गौरावीला काय झालं होतं ते सगळं आठवतं, थोडावेळासाठी विवेकला स्वतःच्या जवळ बघून तिला विसर पडला होता पण आता परत ते सगळं आठवतं,

गौरवी - आई मला नाही माहिती मी त्याला माफ करेल की नाही... अजून तरी विचार नाही केला..

गौ आई - तूमच्या भांडणाचं कारण तुला च माहिती आहे, तु त्याला माफ कर असं म्हणत नाही मी तुला फक्त एकदा शांततेने त्याचं म्हणणं ऐकून घेशील... त्या दिवशी तुझा अकॅसिडेंन्ट झाला आणि तू शुद्धधीत नव्हती तेव्हा.....
.
.
.
.आणि गौरवीची आई त्यादिवशीच त्याच सगळं ऐकलेलं तिला सांगते...

तो रडत होता, ऐकून गौरावीला वाईट वाटतं...

गौरवी - ठीक आहे आई... आता सोड ना तो विषय, तू कशी आहेस? बाबा कसे आहेत?

गौ आई - आम्ही चांगले आहोत बेटा.. तू आराम कर मी घरी जाऊन तुझ्यासाठी डब्बा करून आणते..

रुपाली - आत येत..त्याची गरज नाही काकू मी आणला आहे डबा, तुम्ही घरी ज फ्रेश व्हा आराम करा नंतर या मी आहे तोपर्यंत गौरावीजवळ..

गौरवी - तुला सुटी आहे का ऑफिसला?

रुपाली - हो आज पूर्ण ऑफिसलाच सुटी आहे... रविवार आहे आजचा...

गौ आई - कशाला ग डबा वगैरे आणत बसली आम्ही आणला असता ना...

रुपाली - हो काकू फक्त आजच्या दिवस मग उद्यापासून तर तुम्हालाच करायचंय...

तेवढ्यात विवेक आत येतो.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED