प्रेम म्हणजे प्रेम असत- १५.. शेवटचा भाग.. Anuja Kulkarni द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

प्रेम म्हणजे प्रेम असत- १५.. शेवटचा भाग..

प्रेम म्हणजे प्रेम असत- १५.. शेवटचा भाग..

“ऐक,मी “आपल घर” ह्या नावानी एक संस्था काढलीये...... त्यात ज्या मुलांना आई वडील नाहीत त्यांचा तिथे खूप चांगल्या पद्धतीनी सांभाळ करायचा.. आणि सगळी जबाबदारी सांभाळायची तू! कारण मी हॉस्पिटल मध्ये बिझी असणारे... तुला मदत लागली तर मी नक्की असेन तुझ्या बरोबर पण तू सगळ काम पहायचं!! आणि मी त्या मुलांना अनाथ म्हणणार नाही कारण ती आपल्या बरोबर असणार आहेत...त्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आई मिळणार आहे... आपण आपल्या मुलांना नवीन आयुष्य द्यायचं..... त्याच शिक्षण, इतर सगळ तू पाहायचं!!!! फक्त तुला खूप काम कराव लागणार आहे... आजच सकाळी एक गोंडस मुलगी आलीये आपल्या घरी... आता तुला एक नाही...खूप बाळ मिळतील!!! मध्ये मी खूप बिझी होतो,आठवतंय ना? तेव्हा हेच सगळ काम करत होतो! तुला तिथल सगळ काम पहाव लागेल! त्याची जबाबदारी तुझी.. आवडेल आणि जमेल न?"

रितू जय च बोलण शांतपणे ऐकत होती.. जय बोलत होता त्याचा तिनी कधी विचारही केला न्हवता...त्याच बोलण संपल आणि ती खूप खुश झाली. अनपेक्षितपणे तिच्या आयुष्यात आता एक वेगळाच आनंद दस्तक देणार होता... ते तिच्यासाठी एक खूप मोठ्ठ सरप्राईज होत... ती आनंदानी बोलली..

“.. थोड अवघड आहे पण जमेल नक्की जमेल!!"

"तुला जमेलच ग..."

"येस.. जय...खूप सुंदर सरप्राईज दिलं आहेस!! माझ्याकडे शब्द नाहीयेत जय...हे असं काही फक्त तू आणि तूच करू शकतोस.. सो ओन्ली आय लव्ह यु सो मच!! तू इतक प्रेम करतोस माझ्यावर?"

"काही शंका आहे का रितू.... आयुष्य एक असत... जर मी ते पूर्ण जगलो नाही तर काय उपयोग? आणि मी तुझ्यावर प्रेम करतो..मग इतक तर करू शकतोच ना?" एक फ्लाईंग किस देत जय बोलला..

"आय लव्ह यु.. तुझ सरप्राईज अस काही असेल असा मी विचारही केला न्हवता... खूप सुंदर कल्पना आहे तुझी!!! तू माझ्यासाठी इतक करतोयस? जय,थॅंक यु सो मच!! माझी मनापासून इच्छा होती,काहीतरी केल पाहिजे गरजू मुलांसाठी! आता एका नाही मी बऱ्याच मुलांची आई होऊ शकणार!! ओह माय गॉड.. पण झेपेल ना ही जबादारी?"

"म्हणजे काय रितू.. आय नो यु... तू खूप जिद्दी आहेस..सो मनात काहीही शंका नको रितू बाई.."

"ग्रेट!! आणि आपल्याकडे आलेली बाळं अनाथ राहणार नाहीत ह्याची जबाबदारी माझी!!!! मी खूप खुश आहे! खूप मस्त सरप्राइज दिलस तू मला!!” आनंद रितू चे डोळे पाणावले.. जय च तिच्यावर खरच किती प्रेम आहे हे तिला जाणवलं.. जय नेहमी म्हणायचा “प्रेम म्हणजे प्रेम असत...अटींशिवाय केलेलं ते प्रेम असत!!” त्याचा अर्थ तिला उमगायला लागला...

“मलाही काहीतरी करायचं होत.. पण प्रत्येकवेळी राहूनच जात होत! पण मी ठरवलं...वेळ काढून काहीतरी करायच!! तू अनाथ मुल पाहून सैरभैर झालेलं मी पाहिलं आणि तेव्हाच ठरवलं संस्था चालू करायची... आपल बाळ असलाच की तू आईपण अनुभवू शकतोस असं कुठे असत? आपण वेगळा विचार करून जगलो तर काय हरकत आहे? मला माहिती होत,तुला खूप आनंद होईल ह्या सरप्राइज नी! तू खुश आहेस ना? मला तेच हवय.... नेहमी खुश राहा.. मला अजून काही नको... तुला खुश पाहण्यासाठी काहीही करू शकतो मी!! पण ह्यापुढे मी किती दिवस जगेन असले फालतू विचार मला नको आहेत..ओके?”

“हो हो जय!! इतक प्रेम करतोस जय? मला कल्पना नव्हती रे....आणि मी खूप खूप खुश आहे!!! तू माझ्या आयुष्याला एक नवी दिशा दिलीस!! खूप खूप खूप थॅंक यु जय!!” खूप आनंदून गेलेली रितू बोलली..खर तर तिच्याकडे शब्द नव्हते.. जय ने तिला दिलेली ही गिफ्ट अनमोल होती.

जय च्या सरप्राइज नी रितू खूप समाधानी झाली...जय नी हळुवार पद्धतीनी रितू मन जपल होत...तिला स्वतःच बाळ नको होत पण तिला आईपण सुद्धा मिस करायचं नव्हत...त्यासाठी जय ने एक सुंदर उपाय काढला होता.. काही दिवसातच संस्थेचा पसारा वाढायला लागला......मग रीतू नी तिचा सगळा वेळ त्या संस्थेसाठी द्यायचं ठरवलं.... रितू असंख्य मुलांची आई झाली!! ती आई न होता आईपण अनुभवत होती आणि ती खूप समाधानी झाली...

बरीच वर्ष उलटून गेली.. तरी रितू एकदम हेल्दी राहिली... तिच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली... तिला मनासारखं काम करायला मिळाल त्याचा परिणाम तिच्या हेल्थ वरही झाला.. तिच्या मनातून मरणाचा विचार दूर गेला! रितू तिच्या कामात खुश होती... जय म्हणल्याप्रमाणे मरणाचा विचार थांबल्यामुळे रितू च आयुष्य सुंदर झाल... दोघाचे केस खरच पांढरे झाले. दोघांनी आयुष्यात काहीच मिस केले नव्हते.. अगदी रितू ने आईपण सुद्धा!! बरीच वर्ष दोघांना सुखी संसार करत होते.... जय ला दिसल्याप्रमाणे दोघ निवांत झोपाळ्यावर बसून गप्पा मारायला लागले..

“मस्त आहे ना किती आयुष्य... थँक्स जय!! तुझ्यामुळे मी जगायला शिकले.. आणि तू भरभरून प्रेम दिलस मला... समाधानानी सुंदर आयुष्य जागतीये मी..”

“आहे ना आयुष्य मस्त? मी सांगितलेलं ना तुला.. पण तू माझ्यावर विश्वास ठेवायला किती वेळ लावला होतास... आज मध्ये जगण खर जगण असत... आणि आयुष्यात जे नकोय ते करायचं नाही... आयुष्य म्हणजे बर्डन होऊन द्यायचं नाही!”

“हो ना... ए,मला आठवतंय तू सांगितल होतस.. तुला भविष्यातले प्रसंग दिसतात... तू सांगितलेलं तसच आपण झोपाळ्यावर बसून गप्पा मारतोय बघ.. आणि दोघांचे केसही पांढरे झाले आहेत..तू ज्योतिषी सुद्धा आहेस तर..” रितू हसत बोलली..

“अरे हो कि! रितू..मी म्हणालो होतो ना.. तुला खूप वर्ष माझ्या बरोबर राहायचं आहे? मी पाहिलं होत आपल्या दोघांचे केस पांढरे झालेत आणि आपण झोपाळ्यावर बसून गप्पा मारतोय...मला खरच भविष्यातले काही प्रसंग दिसतात......” हसू आवरत जय बोलला

“का हसतो आहेस जय? तुला अस काही दिसलं नव्हत का?”

“हाहा... बरोबर! मला भविष्यातल काही दिसत नाही.. मी भविष्याबद्दल विचारही करत नाही मग मला भविष्याबद्दल दिसेल अस तुला वाटलच कस? हाहा! मला फक्त तुझे नकारात्मक विचार बाजूला सारायचे होते.. मी तुला भविष्याबद्दल सांगितलं आणि तुझा त्यावर विश्वास बसला... आणि माझ काम सोप्प झाल!! तू सारखी मरण कधीही येऊ शकतो बोलत होतीस... मला तुझा तो विचार घालवायचा होता...तेव्हा मला जे सुचल ते मी बोललो होतो.... भविष्याबद्दल चांगल बोलण्यानी समोरच्या व्यक्तीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.. आणि जादू घडते!! तसा माझा अनुभव होता.. मनानी ठरवलं कि अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात... तुझ्या आयुष्यात एका प्रेरणेची गरज होती.. मी तुला सांगितलं तू आणि मी सुद्धा खूप वर्ष जगू तेव्हा तुझ्या मनानी उभारी घेतली... आणि जेव्हा आपली संस्था चालू केली तेव्हा तर तू इतकी खुश झालीस.. तेव्हा तुला जगण्यासाठी नवीन उमेद मिळाली आणि तुझी इच्छाशक्ती काम करायला लागली.. आणि रिझल्ट तुझ्यासमोर आहे.. तुला आधी सारख वाटत होत कि मी कधीही मरेन.. त्यामुळे तुझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक होत होता..मुद्दाम करत होतीस अस मी म्हणणार नाही....पण तुझ्या नकळत... पण जेव्हा तुला आयुष्यात जगण्यासाठी हेतू मिळाला..तुला खात्री झाली तू बरीच वर्ष जगू शकतेस तेव्हा तुझ नवीन आयुष्य चालू झाल.. तुझा जणू पुनर्जन्म झाला....तू नवीन उर्मिनी तुझ आयुष्य जगायला लागलीस.. आणि तुझ आयुष्य बहरत गेल..”

“जय..आय लव यु सो मच!!! तू जादू केलीस खरच!!! माझ्यासाठी तू जाद्दुगर आहेस! तू मला नवीन आयुष्य दिलस.. जगण्यासाठी मला प्रेरणा दिलीस... पण मी तुला काहीच दिल नाही रे...”

“दिलस कि..माझ्याबरोबर इतके वर्ष राहून तू मला खूप काही दिलस... आणि मी सांगितलं होत... प्रेमात अटी आल्या कि नात्यातलं प्रेम हरवून जात! प्रेमात अटी नसतात...प्रेम म्हणजे प्रेम असत...आणि अटींशिवाय असत ते प्रेम असत....”

“आज पटल मला... प्रेम म्हणजे प्रेम असत..तू केलस ते प्रेम असत!!!!!... आय लव यु आणि थॅंक्स....” रितू इतक बोलली. तिचे डोळे पाणावले...आणि तिनी जयचा हातात हातात घेतला आणि जय च्या खांद्यावर डोक ठेऊन कितीतरी वेळ ती शांत बसून राहिली....

-------------------------THE END--------------------------------------------------------------------------------