सुटका पार्ट 11 Sweeti Mahale द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

सुटका पार्ट 11

बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला.

“रात्र रात्र ओरडायचो, अंगावर करंट झेलले, वारंवार दिलेल्या शिक्षेनी मी खूप हळवा झालो होतो. दोन वर्षांनी घरी आलो तेव्हा मात्र मी भूतकाळ मागे ठेवला. आई ने कधी माझ्या शिक्षणासाठी कुठली कमी ठेवली नाही. पण या सगळ्यात ती थकली होती. माझ्या आजारपणा मुळे आम्हाला सतत घर बदलत राहावी लागायची. लोकं नको नको ते बोलायचे. चेटूक - करणी करतात ही लोकं असं म्हनून छि थू करायचे. माझं शिक्षण हे असंच झालं. काही इथे काही तिथे. मुंबईला गेलो तिथे तीन वर्षे काढली. सगळ्यांना आम्ही आमची खोटीच ओळख द्यायचो मग जास्त विचारपूस झाली तरी उत्तर ठरलेली असायची. तुम्हाला सांगितलेलं ही तसच काहीसं आम्ही मूळचे इथलेच, आजोबांचा पूर्वजांनी बांधलेला हा वाडा. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावरच आम्ही पुन्हा इथे आलो. वाटलं होतं की आता सगळं ठीक होईल. आम्ही भूतकाळ मागे सोडून नवीन आयुष्य सुरू करण्याचा विचार करूनच आनंदी होतो. पण तो ही जास्त काळ टिकला नाही, खरं तर बापू ने मला सोडलं खरं पण त्याच्या बालपणीच्या आठवणीतला हा वाडा मात्र त्याचाच राहिला कायमचा.”

“म्हणजे?” माझ्या सुरातला ओघ त्याच्या लक्षात आला.

“म्हणजे तू जे काही अनुभवलं ते सगळं तेच होतं. माझी नियमित औषध गोळ्या चालू असायच्या त्यांचा नेम चुकला ही हळू हळू पुन्हा त्याच दिशेनं वाटचाल सुरू व्हायची. एक चिडखोर व्यक्ती जणू माझ्यात अजून एक अस्तित्व आहे असं भासायचं. आई तो साठा कधी संपू द्यायची नाही. त्या गोळ्यांच इफेक्ट असेल का काय माहीत नाही पण मी प्रमाणाबाहेर जाड झालो. शाळेत खुप सहन करावा लागायचं. शाळेत एक मुलगी जी मला पहिल्या दिवसा पासून आवडायची. तीलाही कधी बोलता आलं नाही. पहिल्यांदा वर्गात आलो आणि तिला पाहिलं, जराशी आगाऊ आणि एकदम खडूस. तरी मला आवडायची कधी बोललो नाही. मी होतो ही असा बेढब जाड कोणत्या तोंडाने बोलणार होतो. कोणीतरी आवडतं, त्याची मर्जी राखण्यात दिवस कमी पडायचा.

“एक मिनिट? मर्जी?” मी आश्चर्याने त्याच्या कडे पाहिलं. त्याची मान खाली होती. तो त्याच शांततेत एका एका आठवणीला उजाळा देत होता.

“एक मिनिट मर्जी म्हणजे कोणाची मर्जी शाळेत तर नेहमी आपण दोघेच असायचो आणि तू कधी? म्हणजे तू माझ्यावर प्रेम करायचा तरी कधीच तस जाणवू देखील दिल नाही.”

मी समजायचं ते समजले आहे हे लक्षात आल्यावर तो हळूच तिथून उठून जायला निघाला.

दगडी चौथऱ्यावर बसलेलो आम्ही दोघे निशब्द होतो. त्याची पाठमोरी माझ्या पासून दूर जाणारी आकृती पाहून मी झटकन उठून त्याचा हात ओढून घेतला. घट्ट मिठी ने आमच्यातल अंतर संपवलं. त्याच्या उष्ण श्वास जाणवत होता. सोबत दोघांच्या शरीराची होणारी धडधड एकमेकांना स्पष्ट ऐकू जाईल अशी वाढली. त्याचा नकळत मानेखाली रुळणार हात वेगळ्याच धुंदीत घेऊन गेला, त्याने हलक्या हाताने केसांना कुरवाळत हळूच मान उचलली, एकमेकांचे उष्ण श्वास एकमेकांत मिसळले. ओठावर टेकलेले ओठ कितीतरी वेळ शिवशीचा खेळ खेळत होते. उरले होते ते फक्त मौन. घट्ट मिठीचा विळखा त्या क्षणी तरी आम्हाला सोडायचा नव्हता. काही वेळ असाच गेला. निशब्द…..

मग ती वेळ आली जेव्हा वेळ काळ आणि प्रसंग याची अचानक आठवण होते तेव्हा उडणारी तारांबळ, जसे विजेच्या झटक्याने एकत्र आलो तसेच झटका लागावं तसे दूर झालो. लाजेने मान खाली घालण्याची वेळ माझी होती. कारणं सुरवात तर मीच केली होती. त्या क्षणी वाटणारी भावना मी शब्दात सांगू शकत नव्हते. पाठमोरी उभी असं लेली आणि लाजेने लाल झालेली मी पुन्हा एकदा शहारले ती त्याच्या मिठिने. पाठमोरी मी त्याच्या भक्कम मिठीत किती सुरक्षित वाटत होतं की क्षणभर वाटलं ही आयुष्य भरासाठी अशीच रहावी.

“तू हे सगळं आधी का नाही बोललास?” पुन्हा एकदा शांत वातावरण मी काहीतरी विषय छेडवा म्हणून बोलले.

“ह…… कोणत्या तोंडाने बोलणार?” त्याच्या स्वरात एक दुःखाची झळ दिसली. “मघाशी थोडा बहकलो. माफ कर पण नात्याला अर्थ ही नाही. मी असा वेडा.”

“अरे…. असं का बोलतोस?” मी त्याच वाक्य तोडत म्हणाले.

“हो आहे मी वेडा. मला फक्त तुझ्या जवळ एकदा व्यक्त व्हायचं होतं. एवढी वर्ष तुझी वाट पाहिली. या क्षणाची मी किती आतुरतेने वाट पाहत होतो. आता मनात काही मळभ नाही. माफ कर पण आपला प्रवास इथपर्यंतच होता. आई, बाबा, आजी, आजोबा, आजी. माझं कुटुंब यातल्या प्रत्येक व्यक्तीने माझ्या समोर जीव सोडला. मी असं ह्य होतो. आजही आहे, काहीच करू शकलो नाही. पण असो, मी आता ते उगाळत बसणार नाही. पण तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खूप सुंदर होता. आपला प्रवास एवढाच.”


“तू…. काय बोलतोयस तू.?” माझ्या आवाजातला कंप स्पष्ट जाणवत होता. हे काय आहे मला माहित नाही. पण जेव्हा पासून तू मझ्या पासून दूर गेलास तेव्हा पासून मी मनाने तुझ्या सोबत असायची, आपली मैत्री खूप आठवायची तुझ दिलखुलास हसणं आठवायचं. मनाने तुझ्या जवळ पोहचायची. आज एवढ्या वर्षांनी भेटलो मी नव्याने तुझ्या प्रेमात पडले. ते वय नव्हतं समजायचं पण आता समजतंय मला परिस्थितीची कल्पना आहे. पण तरीही, साथ देशील? तू जसा आहेस मला मान्य आहे. पुन्हा भविष्यात काही घडलंच तरी मी ठाम पणे तुझ्या सोबत उभी असेल.”

“तो काहीसा अस्वस्थ जाणवला. निघताना सोबत घेऊन निघालेली ती बॅग त्याने गाडी मध्ये टाकली. गाडीचा हॉर्न वाजवून तो फक्त एवढंच म्हणाला, “परिस्थितीच गांभीर्य तुला नाही. मी या स्थितीत तुला स्वीकारू शकणार नाही. माफ कर.”

कुठलाही वाद न घालता मी गाडी मध्ये बसले. तो गाडी घेऊन मला स्टेशन पर्यंत सोडायला आला. ट्रेन मध्ये बसे प्रयत्न आमच्यात काहिच संवाद नव्हता. मला खरं तर राग येत होता. कुणाचा? ते माहीत नाही पण. हुरहूर मात्र नक्कीच होती. गाडी सुटली तो गाडी दिसेनाशी होई पर्यंत तसाच उभा होता. मी स्वतःच्याच विचारांमध्ये गुंग होते. विचार करून माझं डोकं थंड पडलं होतं, जास्त काही स्वतःच असं सुचेना पण एक गोष्ट मात्र मी स्वताशीच पुतपुटले. तुला मी असं इतक्या सहज तरी दूर जाऊ देणार नाही.

गेले दोन तीन दिवस बंद असं लेला फोन उघडला. आई-बाबांना फोन केला तशी कधीच कल्पना दिली असं ल्याने जास्त ओरडा बसला नाही. तरीही नाही म्हणून ऐकावे लागलेच. “आई काळजी करू नको. मी येते लवकरच इकडे नेटवर्क नाही काळजी करू नका. मित्र आहेत सोबत, आम्ही आता पर्वतावर चढाई करणार आहोतं.” असं बोलुन मी फोन ठेवला.

मित्र मैत्रिणीसोबत फिरायला चालले आहे, अशी थाप मारून मी घरून निघालेली. सोबत मोठी टीम आहे आणि कसंलीच भीती नाही हे तर खुप पटवून दिलं होतं. नाहीतरी काय करणार? कोणी शाळेतला मित्र आठवतो म्हणून त्याचा शोध घ्यायला मला एकटीला कोण येऊ देईल? परवानगी मिळणे हे मात्र शक्य नव्हतं.

काही अनुत्तरित प्रश्नाने माझी पाऊलं पुन्हा मागे वळाली. काहीतरी गुंता आहे या सर्वात. तो काही लपवतोय का माझ्या पासून? जे काही आहे मला आता छडा लावायचाच होता. काही तरी गडबडलंय एवढं मात्र नक्की. जात असं ताना काही गोष्टी मात्र लक्षात यायला लागल्या. गावात कुणालाच त्याच्या बद्दल माहिती नाही असं कसं होऊ शकत? गावात गेल्या गेल्या मी आधी रामुच्या घराकडे मोर्चा वळवला. पण जस वाटलं होतं तसच झालं, तो गायब…

काहीतरी गौडबंगाल आहे हे मात्र नक्की झालं.