लहान पण देगा देवा - 3 Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

लहान पण देगा देवा - 3

भाग ३

रमला तर एवढा आनंद झाला होता कि ती ताडकन उठून आंनदाने उड्या मारायला सुरुवात केली.

आणि आम्ही दोघे देखील डॉक्टर साक्षी चा निरोप घेऊन जायला निघालो.

डॉक्टर साक्षी : आजोबा आज्जी नातू येतो आहे या आनंदात औषध घ्याचे विसरू नका, नाहीतर तुमचा नातू माझे कान पकडेल , मी तुमची काळजी घेतली नाही म्हणून.

अगं हो ग माझी राणी काळजीच करू नकोस तुलाच माझ्या घरी घेऊन जातो कायमची अथर्व आला कि, म्हणजे माझा नातू कायम माझ्या कडे राहील.

डॉक्टर साक्षी : आजोबा राहूदे आता तुम्ही जाऊन आराम करा आणि आजी ला पण त्रास नका देऊ ( हळूच लाजून)

आम्ही दोघे देखील हसत तिचा निरोप घेऊन निघालो. रमला तर असं झाला होत कि अथर्व साठी काय करू आणि काय नको.

घरी आल्यावर रमा ने कामाला सुरुवात केली, काय करू आणि काय नको असं तिला झाला होत तिने पहिली लक्ष्मीला घेऊन अथर्व ची रूम साफ करायला घेतली अथर्व ला जे आवडत ते सगळं त्याच्या रूम मध्ये सजवायला घेतलं.

मी तर असा होतो कि बस अथर्व आता तू लवकर ये दोघे मिळून मज्जा करायची, म्हणून पहिला जाऊन कैरोम बोर्ड बाहेर काढला, दोघांच्या देखील त्या कैरोम बोर्ड आणि अंगणातल्या त्या गमती होत्या.

एक एक करून कैरोम पुसत पुसत हसत होतो, तितक्यात रमा आली, आणि माझ्यावर हसू लागली, अहो तो आला नाही आणि तुमची हि अवस्था, तो आल्यावर तर काय करसाल ?

अगं त्याला तर मी शांतच बसू नाही देणार इतक्या वर्षाची सगळी कासार भरून काढणार बघ, कैऱ्या चिंचा, रानात जाणार, मस्त विहिरीत पोहोणार, झोके घेणार, बस तू ये आता अथर्व.

रमा: हो का ? आता विहिरीत उडी मारणार का? चिंचा कैऱ्या काढायला झाडावर चढणार का ?

अहो तुमचं वय काय आणि तुम्ही स्वप्न काय पाहता ?

अगं माझी लाडकी बायको, आपण स्वप्नच पाहू ग पूर्ण होतील तेव्हा होतील, काय करणार वय आणि असं एकटेपण ज्याला कोणी कमी नाही करू शकत, म्हणून तू मला आणि मी तुला, अथर्व म्हणजे आपला दिवाळी बोनस वर्ष्यातून एकदाच नशिबात, ते पण पेंशन सुरु झाली कि तो येईल नाही येईल माहित नाही, त्यामुळे जेवढं आहे तेवढ्यात समाधान मानायचे .

रमा: हे सगळं ठीक आहे, पण आता हे पेंशन काय ?

अगं पेंशन म्हणजे त्याच लग्न, आपली मुलं देखील लग्ना आधी आठवणीने येत होते लग्न झाल्या पासून त्यांची उच्च झाली कि येणार अगदी पेंशन सारखी.

रमा : काय हो यात हि तुम्हाला गंमत सुचते तुम्ही पण ना!!!!!

पण जाऊदे तुमचा दिवाळी बोनस येतो आहे, आनंदात खर्च करा, मला हि द्या हो थोडा, नाहीतर स्वतःच सगळं !!!!!!!!

हो देईल हो तुला पण दोघे मिळून एन्जॉय करू काळजी नको करुस.

बरं ते सोड तू त्याची रूम साफ केली का ? त्या लक्ष्मीला बकुळीची फुल आणायला सांगितली ना, त्याला खूप आवडतात. हो सांगितली आहेत नको टेन्शन घेऊ.

बरं ठीक आहे नाही घेत मी टेन्शन त्याचा फोन आला कि त्याला S T स्टॅन्ड वर घ्याल जातो.

तू माझे कपडे तयार ठेव .

हो सगळं तयार आहे काळजी नका करू. आणि आता सगळं बाजूला ठेवा आणि हे खाऊन औषध घ्या नाही तर डॉक्टर साक्षीला बोलावेल बरं का, मग तीच तुम्हाला बरोबर औषध देऊ शकते.

नको तिला या काम साठी नको बोलावू मी घेतो औषध, आणि तिला बोलवायचं असेल तर अथर्व आला की बोलावं, दोघंच खूप छान पटत.

रमा: हो का पण आता ते लहान नाही राहिले मोठे झाले आहेत, दोघांच्या आवडी निवडी बदलल्या असतील, त्यात आपला अथर्व लंडन ला राहून आला.

हो ग ते पण बरोबर आहे साक्षी तिच्या वडिलांची इच्छा म्हणून इथे थांबली आहे, तो थोडीच कायमचा आपल्या सोबत राहणार आहे. आपल्या मुलांचं येन म्हणजे चार दिन कि चांदणी.

पाहायची आणि आनंदी राहायच.

रमा: अहो तुम्ही असा का विचार करता, आपलीच लेकरं आहेत आठवण आले कि येतील.

अगं हे मला माहित आहे तू पण मनात रुजवूंन घे, स्वतःला त्रास नको करून घेऊ.

माझी रमा अगदी साधी भोळी ग !!!!!!!!