lahan pn dega deva - 7 books and stories free download online pdf in Marathi

लहान पण देगा देवा - 7

भाग ७

साक्षी- अरे अथर्व तू काय बोलत होतास तू फोन वर तू काय झालं काय आहे तुला ?

अथर्व- अगं साक्षी हे बघ माझे घरचे असं आणि तस तू काही सांग ते येणार नाही मग असं काही तरी सांगितलं तर कमीत कमी येतील तरी.

साक्षी- अरे हे सगळं ठीक आहे पण, लग्न !!!!! तू काय त्याला बाहुला बाहुलीचा खेळ समजतोस काय?

अथर्व- नाही ग पण दुसरा काही ऑपशन नाहीना. आणि आजी आजोबा ना आता सगळे जवळ असणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या साठी मी काही करू शकतो.

साक्षी- अरे मी तुझा उपाय चुकीचा आहे असं म्हणत नाही, पण लग्न त्या साठी कमीत कमी आजी आजोबाना तरी आपण काय करतो आहे हे कळलं पाहिजे.

अथर्व- ये नाही हा आजी आजोबाना काही सांगायचं नाही त्यांना हे कळलं तर ते आपल्याला काही करून देणार नाही.

साक्षी- अरे पण लग्न आहे त्या मुलीचा काय दोष जिच्या सोबत तुला लग्न करायचं आहे. एक वेळ ती मुलगी साथ देईल जर तू हे का करतो आहेस तिला नीट समजून सांगितलं तर पण तिच्या घरचे त्यांचं काय ?

अथर्व- अगं खरंखुरं लग्न नाही करायचं, आपण नाटक करणार आहोत सो मुलगी पण खोटी असणार तिच्या घरचे पण खोटे आणि लग्न पण खोटं.

साक्षी- अरे लग्न आहे ते खेळ नाही हे तो. हे चुकीचं आहे, सगळे खूप दुखावतील आणि आजी आजोबाना एक आनंद देण्या साठी हे चुकीचं पाऊल तू उचलणार त्यांना नाही आवडणार. एकतर तू लग्न करायचं हे जर ठरवलं असेल तर खरं खूर लग्न कर नाही तर दुसरा उपाय सुचव. मी तुझ्या ह्या नाटकात मदत नाही करणार.

अथर्व - अगं साक्षी पण लग्न असं इतक्या लवकर सगळं arrange करणं कस श्यक्य आहे. आणि दुसरा काही उपाय मला सुचत नाही, तू तरी काही सुचव.

साक्षी- सोप्पं उपाय तू आजी आजोबाना सांग मला लग्न करायचं आहे माझ्या साठी एक छान, सुंदर मुलगी बघा, या वेळेस परत जाताना तुम्ही पसंत केलेली मुलगी लग्न करून घेऊन जायची आहे. हा सगळ्यात छान उपाय आहे ते तुझ्या साठी छान मुलगी निवडतील बघ म्हणजे विचार कर.

अथर्व- छान उपाय आहे, चालेल उद्या बोलू या आपण आजी आजोबा सोबत.

साक्षी - आपण ? तू बोलणार आहेस मी नाही.

अथर्व- अगं हो ग मीच बोलतो तू फक्त सपोर्ट कर मला.

साक्षी- नक्की करणार रे. काळजी नको करुस, आणि एकदा आज्जी आजोबा हो म्हणाले कि मी सगळी तयारी करते टेन्शन घेऊच नकोस.

अथर्व - चालेल सगळं फिक्स होईल नको टेन्शन घेऊ. आणि फक्त हे सगळं नीट झालं पाहिजे म्हणजे सगळ्या घरच्याना त्यांची चूक समजली पाहिजे. आज ते ज्या प्रकारे वागतात करतात तस जर उद्या जाऊन आम्ही केलं तर काय होईल, हे त्यांना समजलं पाहिजे. आज माझा लग्नाचा एक निर्णय त्यांना हे जाणीव करून देईल हे माझ्या साठी खूप आहे.

साक्षी- अगदी बरोबर बस त्यांना असं वाटायला नको कि आजी आजोबा नि तुला त्यांच्या बाजूने केलं तुला फसवलं.

अथर्व- या वेळेस आजी आजोबा ना मी काही बोलू देणार नाही, हा निर्णय माझा आहे, आणि आज्जी आजोबांच्या आनंदा साठी मी काही करू शकतो.

साक्षी- हो ना अगदी बरोबर बोलतो आहेस, आजी आजोबाना तीळ तीळ तुटताना मी पाहिलं आहे. फोन वाजला कि कायम त्यांना असं वाटत कि त्यांचा मुलांचा फोन आला असेल, गावातील प्रत्येक लहान मोठा त्यांची विचारपूस करतात, पण ज्यांच्या कडून त्यांना जास्त अपेक्षा आहे ते मात्र !!!!!!

अथर्व- अगं खूप त्रास होतो ग जेव्हा आपण आपल्या लोकं पासून दूर असतो, मी रोज अनुभवतो, मला तर असं होत असत कि मला कधी सुट्टी मिळेल आणि सगळ्यांना भेटायला येईल आणि हे असं कस वागतात समजत नाही.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED