भाग ५
अथर्व- आज्जी मी आलो ग , कुठे आहेस तू ?
रमा आजी- अरे माझं बाळ ते आलं का? इतके दिवस लागले यायला, आजी ची आठवण नाही का येत रे? एक साधा फोन सुद्धा नाही करत मला.
अथर्व- अगं आजी खूप आठवण येते पण काय करू तुझा झोपण्याचा वेळ आणि माझा जॉब चा वेळ एक होतो मग कस करणार सांग. म्हणून तर परत आल्यावर पहिला तुझ्याकडे आलो. ते सोड तू कशी आहेस माझी ब्युटी queen.
रमा आजी- ब्युटी queen काय रे आता झालं वय माझं. हातात काठी घेईल काही काळाने .... आणि म्हणे ब्युटी queen. जा पहिला फ्रेश हो तुला छान गरम गरम जेवण वाढते. तुझ्या आवडीचं मस्त आळूची भाजी आणि बाजरीची भाकरी केली आहे.
अथर्व- क्या बात हे, लगेच फ्रेश होतो आणि आलोच तू ताठ वाढ.
घ्या नातू आजी काय भेटले मला तर विसरले सगळे मला तर कोणी विचारत पण नाही.
काय आम्ही एकटे पडलो बुआ.
रमा- हो का चला हाथ धुऊन घ्या लगेच सगळे मिळून जेवण करू.
अथर्व- आजी दे चल लवकर खूप भूक लागली आहे. वाह काय मस्त सुगंध पसरला आहे, दे लवकर.
रमा आजी- घे खाऊन माझं बाळ ते खूप भूक लागली वाटत.
अथर्व- आजी एक नंबर झालं आहे जेवण नेहमीप्रमाणे. ये आजी लाडू बनवलेस ना माझ्या साठी आणि चकल्या?
रमा आजी- हो रे केले आहेत आधी पोटभर जेऊन घे.
बरं अथर्व मला सांग आता किती दिवस आहेस तू गणपती करून जाणार कि तू देखील तुझ्या वडिलांसारखा घोड्यावर.
अथर्व - नाही हो आजोबा छान १५ - २० दिवस राहणार आणि पूर्ण गणपती एन्जॉय करून जाणार.
रमा आजी- चला जेवून घ्या आधी थंड होत आहे सगळं.
डॉक्टर साक्षी- आजोबा घरी आहेत ना?
अरे साक्षी ये बाळा वेळेवर आलीस मस्त गरम जेवण आहे. आणि अथर्व पण आला आहे बघ.
डॉक्टर साक्षी- अरे अथर्व कधी आलास आणि कसा आहेस ?
अथर्व- अगं मी एकदम मस्त आणि तू कशी आहेस? आणि तुझं क्लिनिक काय म्हणत आहे?
डॉक्टर साक्षी- अरे एकदम छान, काका काकू काय म्हणतात येणार आहेत ना गणपती साठी?
अथर्व- ते मला माहित नाही मला असं झालं होत कधी इथे येतो आणि आलो बघ.
तुम्ही मस्त गप्पा मारा मी येतोच जरा बाहेरून चक्कर मारून.
रमा आज्जी - बसा रे तुम्ही गप्पा मारत मी पण आले जरा हे सगळं आवरून.
साक्षी- अथर्व बरं झालं आज्जी आजोबा दोघे नाहीत खूप महत्वाचं बोलायचं होत, मी तुझ्या वडिलांना फोन करणार होते, पण शंभू काका बाहेर भेटले तेव्हा कळलं कि तू आला आहेस मग म्हटलं तुझ्या शीच बोलावं.
अथर्व- साक्षी काय झालं आहे जे तू एवढं सिरीयस होऊन बोलते आहेस सगळं ठीक आहे ना आजी आजोबा तर ठीक आहेत ना? लवकर सांग मला भीती वाटते आहे.
साक्षी- सांगते तू शांत हो. काल आजोबांचा छोटा अकॅसिडेन्ट झाला, त्यांची ट्रीटमेंट तर मी बघते पण काल मी त्यांचं ब्लड सॅम्पल पण घेतलं होत. त्यांचे रिपोर्ट ठीक नाही येत. तरी देखील मी परत एकदा सेकंड ओपिनिअन साठी ते सॅम्पल शहरात पाठवले आहेत. जर ते देखील रिपोर्ट असेच आले तर आपल्यला एक ढोस पाऊल उचलावं लागेल त्या मुळे तू काका काकूंना आणि आत्याला देखील बोलून घे.
अथर्व- साक्षी तू काय बोलते आहेस.
साक्षी- अथर्व उतार वयात आई वडिलांसाठी त्यांची लेकरे खूप हवी हवी शी वाटत पण काका काकू शेवटचे जमिनीच्या कामासाठी आले ते अजून आले नाहीत, तू इथे नसतोस. त्यांच्या मन ला झाल्येल्या जखमा दिसत नाही पण त्याच जखमा शरीरावर घात करतात. म्हतारपण लहान बाळा सारखं असत त्याला फुलासारखं जपायचं असत. तुला समजत आहे ना मी काय सांगते ते.
अथर्व - मीच चुकलो मला londoon जायला नव्हतं पाहिजे, कमीत कमी माझ्या मुळे तरी सगळे आजी आजोबा कडे आले असते.