लहान पण देगा देवा - 8 Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लहान पण देगा देवा - 8

भाग ८

अथर्व- आजोबा कुठे आहेत (दारातून आत येत) आजी तू पण ये कुठे आहेस?

आजोबा- काय रे काय झालं दोघांना एकत्र बोलवत आहेस, ठीक आहे ना सगळं, आणि तू तर साक्षी ला भेटायला गेला होतास ना ? काय भांडण झालं कि काय दोघात जे तिची तक्रार घेऊन आलास.

अथर्व- आजोबा काय तुम्ही पण, आम्ही लहान राहलोत का आता, आणि आमच्यात काही भांडण वगैरे नाही झालं. मला तुमच्या दोघांशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून बोलवतो आहे तुम्हाला.

आजी- असं काय महत्वाचं बोलायचं आहे , जायला निघालास कि काय लगेच? आणि असा लगेच निघणार आहेस कि काय?

अथर्व- आग आजी, आणि आजोबा तुम्ही दोघे मला बोलू देणार आहात का? केव्हा पासून बोलायचं प्रयत्न करतो आहे तुम्ही दोघे बोलून देत नाही.

आजोबा - रमा थांब तो काय बोलतो आहे ते ऐकू मग बोलू आपण, बोल रे काय बोलायचं आहे ते.

अथर्व- आजोबा आजी मला लग्न करायचं आहे आणि माझ्या साठी तुम्ही दोघे मुलगी शोधणार आहे आणि आता परत जाण्या आधी मला लग्न करायचं आहे तर जितक्या लवकर मुलगी शोधणार तितका आपल्यला लग्नाच्या तयारीला वेळ मिळेल (एका दमात सगळं बोलून रिकामा).

(आजोबा आज्जी दोघे हि आश्च्यर्य चकित होत माझ्या कडे पाहत राहतात त्यांच्या reaction समजत नव्हत्या पण हे नक्की होत कि हे ऐकून त्यांना आनंद झाला होता आणि तितकेच कोड्यात पडले होते).

आजोबा- लग्न आणि इतक्या कमी वेळात, ते काय सोप्पं आहे? उगाच उचलली जीभ आणि लावली टाळूला !!!! काय बोलतोस ते तरी माहित आहे का रे तुला?

आजी- अरे लग्न म्हणजे तुमच्या त्या friendship सारखं नसत, केली आणि झाली.

लग्न दोन जीवांचं, दोन मनाचं, दोन परिवाराचं मिलन असत, त्यात तू बाहेर देशात राहणार, तुला तितकीच समजणारी तिथल्या वातावरणात मिळणारी मुलगी हवी, आणि ती जर नाही आली तुझ्या सोबत विदेशात तर, तू येणार आहेस परत इथे तुझ्या सोबत.

अथर्व- आजी आजोबा मला सगळं कळत आहे, म्हणून तर हि जबादारी तुम्हाला दिली आहे, आणि जर तिला माझ्या सोबत नसेल यायचं तर होईल मी इथेच settle , तेवढंच तुम्हाला भेटता येईल, आणि फॅमिली सोबत राहता येईल, खूप एकटा राहिलो आता पर्यंत. आता सगळ्या सोबत राहायचं आहे.

आजी - बोलणं खूप सोप्पं आहे पण तशी नोकरी जर इथे नाही मिळाली तर तुझं तुलाच सगळं कारण लागेल, त्याच काय?

आजोबा - आणि लग्न केलंस कि तिची पण जबादारी त्याच काय?

अथर्व- आजोबा मला सांगा, जर मी असं ठरवलं कि इथेच तुमच्या जवळ राहणार इथल्या जवळच्या मोठं मोठ्या कंपनी मध्ये मला एक चांगली नोकरी मिळेल कि नाही?

आजोबा- अरे खूप चांगल्या मोठ्या नोकऱ्या मिळतील शहरातून लोक येतात इथे नोकरी साठी आणि तू इतका शिकला आहेस, विदेशातून अनुभव घेऊन आला आहेस.

अथर्व- बस ठरलं तर तुम्ही मला मुलगी शोधा, आणि मी नोकरी शोधतो. चला जेवून घेऊ खूप भूक लागली आहे.

आजी- अहो हा काय बोलतो आहे, याच्या डोकयात काय चालू आहे?

आजोबा- आता जेवण करू या उद्या सकाळी परत बोलू या विषयावर त्याच्या शी.

अथर्व- बस आता मी जॉब शोधतो म्हणजे, मला इथे settle होता येईल, online check करतो कोणत्या कंपनी आहेत जवळ,आणि माझ्या profession relate कोणत्या आहेत लगेच apply करतो. इथे फिक्स झालं कि मग तिथे resign देता येईल. फक्त आजोबानी एक छान मुलगी पहिली कि ती आणि मी इथेच राहणार आज्जी आजोबा सोबत. साक्षी ला सांगू का हे सगळं, आता नको उद्या सकाळी सांगतो तिला, आता खूप उशीर झाला आहे, बस माझ्या या निर्णयावर आई बाबा नाराज नाही झाले पाहिजेत, कारण मला बाहेर विदेशात पाठ्वण्या साठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत.