लहान पण देगा देवा - 10 Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लहान पण देगा देवा - 10

भाग १०

अथर्व- साक्षी चल येतेस ना घरी आजी आजोबा शी बोलायचं आहे. मला एकट्याला त्यांना हे सर्व सांगून मनवन खूप कठीण आहे.

साक्षी- अथर्व विचार तू केलास सर्व काही तू ठरवलंस, मी तुला फक्त सपोर्ट करणार आहे, कोणालाही काही समजावणार नाही, ती तुझी जबाबदारी, आणि हो जर या सर्व गोष्टी मुळे आजी आजोबा मला ओरडले तर यादराखा, मी तुझी थोडी देखील मदत करणार नाही. आठवत ना मला तुला एकदा सुट्टी वरून परत जायचं नव्हतं म्हणून किती नाटक केलंस आणि मला पण करायला लावलं, तुझ्यामुळे आजी आजोबा आणि वरून तुझे आई बाबा पण ओरडले मला. त्यामुळे यावेळेस फक्त सपोर्ट मी काही या नाटकाचं भाग नाही बनणार, कबूल असेल तर बोल.

अथर्व- अगं, किती बोललीस दमली असशील बस पाणी पी, आणि हो टेन्शन नको घेऊस तुला कोणताही त्रास होऊ देणार नाही, फक्त काही प्रॉब्लेम झाला तर सपोर्ट साठी तयार राहा, जायचं आता ?

साक्षी- ठीक आहे.

(अथर्व साक्षी आजी आजोबा सोबत बोलण्यासाठी घरी येतात)

अथर्व काही बोलण्या आधीच तावातावात आजोबा त्याच्या जवळ येतात....

आजोबा- काय रे काय नाटक लावलं आहेस, येथे अजून काही दिवस राहायचं असं म्हण, त्या साठी काय हा पोरखेळ लावला आहेस, म्हणे काय तर लग्न आणि इथेच जॉब, आणि काय ग साक्षी तू पण याला मदत करते आहेस वाटत नेहमीप्रमाणे, मला आधीच ओळखायला हवं होत. तुझ्या बाबांचा फोन आला होता लवकर बोलावलं आहे त्याने तुला. लवकर निघायची तयारी कर.

अथर्व- आजोबा मी कोणताही नाटक करत नाही ये, मला खरचं लग्न करायचे आहे, आणि यात साक्षी चा काही एक हाथ नाही ये. मला खरचं लग्न करून इथे तुमच्या सोबत राहायचं आहे, आणि यात चुकीचं काय आहे.

आजी - अरे बाळा चुकीचं असं काही नाही पण, तुझे आई वडील नाही ऐकणार रे, त्यांची पण काही तरी अपेक्षा असेल तुझ्या कडून आणि तू जर इथे थांबलास तर त्यांना नाही आवडणार समजून घे रे.

अथर्व- आजी आजोबा मला समजत आहे पण मला खरचं इथे राहून संसार करायचा आहे. मला आई बाबा इथून घेऊन गेले माझी इच्छा नसताना, तुम्ही जा म्हणाले म्हणून मी गेलो, त्यानंतर त्यांनी मला बाहेर देशात पाठवला तिथे हि मी गेलो, तुमच्या सर्वांची खूप आठवण यायची पण तरी देखील मी काही नाही बोललो, आज मला फक्त एक गोष्ट माझ्या मनासारखी नाही का करता येणार ? का त्यातही आई बाबा सांगतील तसेच मी करायचे का ? (खूप बारीक स्वर करून बोलतो)

आजोबा- नाही रे बाळा असं काही नसत, आई वडील नेहमी सगळं आपल्या लेकरांच्या भल्याचंच करतात, तू परत जा आणि त्याच्याशी बोल ते तुझ्या साठी योग्य मुलगी बघतील अगदी तुला हवी तशी.

अथर्व- पण आजोबा तुम्ही काही माझ्या साठी चुकीचं करणार आहात का? आणि मला तुम्ही निवडलेल्या मुलीशीच लग्न करायचं आहे बस्स.

(अथर्व रागात निघून जातो)

आजोबा- साक्षी बाळ तू तरी समजावं याला.

साक्षी- आजोबा मी काही मदत नाही करू शकत खूप समजावून झालं माझं पण त्याला माझं देखील काही नाही ऐकायचं आहे.

(साक्षी देखील निघून जाते)

रमा आजी- अहो मला नाही वाटत हा समजेल आणि तुम्ही त्याच लग्न नाही ठरवू शकत, काही वर्षांपूर्वी जेवढा तमाशा झाला होता तो पुरेसा होता, तेव्हा अथर्व लहान होता त्याला समज नव्हती, पण जर आज परत जर तुम्ही यात पडलात तर तुम्हाला तुमच्या मित्राला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल, आणि ते शक्य नाही, आपला चिरंजीव तस काही होऊ देणार नाही.

आजोबा- माही आहे मला म्हणून तर त्याला खोटं बोललो त्याच्या वडिलांचा फोन आला होता म्हणून. पण आता काय करणार आपण हे समजत नाही ये.

रमा आजी- मी काय म्हणते आपल्या चिरंजीवाने इथे येऊन तमाशा करण्या आधी आपण अथर्व ला सगळं सांगूयात का?

आजोबा- नको त्याच्या त्या बालिश पानाचा जो परिणाम झाला ते त्याला समजलं तर तो मग मला नाही वाटत इथून जाईल, उलट मी दिलेले वचन पूर्ण करेल.

(अथर्व खूप रागात बाहेर पडलेला असतो वाटेत त्याला सुरेश आजोबा भेटले)

सुरेश आजोबा- अरे अथर्व बाळा, आल्या पासून मला भेटायला आला नाहीस, राघव म्हणाला होता तू येतो आहेस, तुला घेऊन येतो भेटायला पण आला नाहिस रे, आणि बाकी कुणाल काय म्हणतो आहे, हल्ली येत नाहि बरे तो इथे, विसरला कि काय आम्हाला?

अथर्व- (थोडा शांत होत) नाहि हो आजोबा येणारच होतो तुम्हाला भेटीला आणि तुम्हीच भेटलात, आणि बाबा देखील ठीक आहेत कामाच्या व्यापा मुळे नाहि जमत यायला, पण या वर्षी येतील नक्की येतील.

सुरेश आजोबा- हो का माहित आहे मला सगळं, वाहिनीने समोर विचारता येत नाहि म्हणून राघव माझ्या इथेच येऊन फोन करतो बारीक तुझ्या वडिलांना, राघव ची एक चूक त्याला इतकी त्रास देईल माहित नव्हतं त्याला, चूक कसली स्वतःच्या मुलांसाठी घेतलेला चांगला निर्णयच होता तो, पण तुझी आई आणि बाबा ऐकतील तर शप्पत, जाऊदे सोड, तू तरी त्यांचा सारखा वागू नकोस हि अपेक्षा, चल निघतो मी.

अथर्व- आजोबा एक मिनिट कोणता निर्णय, काय झालं होत नीट सांगा मला.......