संघर्षमय ती ची धडपड #०९ Khushi Dhoke..️️️ द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संघर्षमय ती ची धडपड #०९

 

आता मात्र सुनील, शीतल सोबत नॉर्मली बोलतो...... असेच दिवस जात असतात...... शीतल, रोज तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजला जाते...... Obviously लोकल (मुंबईची जान)..... तर, ती जिथून रोज गाडीत बसते, तिथे काही मुलं त्यांनाच बघत असल्याचे तिला जाणवतात..... पण, ती काही बोलत नाही..... असेच काही दिवस जातात....... एकदा शितलची मैत्रीण कॉलेजला येणार नसते.... म्हणून, शीतल एकटीच कल्याण स्टेशनवर गाडीचा वेट करत थांबते...... तेवढ्यात त्याच मुलांमधील एक मुलगा तिच्या समोर येऊन थांबतो..... आणि चक्क तिला प्रपोज करतो....... ती काहीही विचार न करता त्याच्या कानाखाली एक वाजवते..... सगळ्या लोकांना आवाज गेल्याने सगळे त्यांना घेरा करून गर्दी करतात......

शीतल : "काय रे...... तुझा फालतूपणा.... यूट्यूब वर एक - दोन व्हिडिओ बघून तुझ्यासारखे मजनू चालले मागे हा...... रिल आणि रिअल लाईफमध्ये फरक समजेल ना तुला त्यादिवशी तुला मुलींच्या मागे फिरायची गरज पडणार नाही.....���"

 

तिचा आवाज ऐकुन होम गार्ड तिथे येतो....

 

होम गार्ड : "काय झालं मॅडम हा मुलगा त्रास देतोय का.....�"

 

शीतल : "आज तर फक्त प्रपोज केलाय... त्रास देण्याची वेळ मीच येऊ देत नाही.....���"

 

होम गार्ड : "बर मॅडम त्रास दिला तर सांगा आम्हाला.....�"

 

शीतल : "नक्की....�"

 

सगळे निघून जातात..... घडलेला सगळा प्रकार, एक व्यक्ती जाऊन शीतलच्या घरी सांगतो....... शितलचे आई - बाबा काही वेगळच समजून बसतात...... आता हा त्यांच्या मूळ स्वभाव नसूनही, त्यांना तसं वागणं भाग असतं..... कारण, खूप वेळेस अस होतं की, घरच्यांना आपल्या मुलीपेक्षा बाहेरचे आपल्या मुलींविषयी काय सांगतात यावर जास्त विश्वास असतो...... शितलही त्याला अपवाद नव्हतीच.....���

 

शीतलला न सांगताच तिच्यासाठी मुलगा शोधण्याचा कार्यक्रम सुरू होता......�� तिकडे तिचे बारावीचे वर्ष जवळपास संपत आले होते..... परीक्षा येत्या दोन महिन्यांत होणार म्हणून, ती आता पार्लर मधून काही दिवस सुट्ट्या काढून, अभ्यासावर पूर्ण लक्ष देणार होती.....

 

काही दिवसात पेपर झाले..... तिला पुरेसे मार्क्स पडले होते...... ती मनोमन खुश होती..... तिचा निकाल आला हे तिने घरच्यांना अजूनही सांगितले नव्हते...... उद्याच सगळ्यांना आपला निर्णय सांगणार म्हणून, ती आज शांत होती...... सगळी कामं आटोपून ती जाऊन बेडवर पडणार, तोच तिला सूनीलचा कॉल आला....☺️

 

शीतल : "हॅलो.....कोण?"

 

सुनील : " विसरलीस का.... की, नंबर डिलीट केलंस...??�"

 

शीतल : "हा बहुतेक.... कारण, मी दुसरा फोन घेतलय ना तो खराब झालेला.... म्हणून... पण, आवाज ओळखला मी... काय म्हणतोय....??"

 

सुनील : "काही नाही ग सहज.... तुझा रिझल्ट माहित पडला कॉलेजमध्ये..... काँग्रच्युलेशन.....��"

 

शीतल : "थँक्यू...�"

 

सुनील : "नीलमच लग्न ठरलंय... येत्या शनिवारी साखरपुडा आहे..... तुला यायचं आहे..... त्याचसाठी केलाय फोन...☺️"

 

शीतल : "जमल्यास येईल..... नक्की....�"

 

सुनील : "अजून ते.....�"

 

शीतल : "हो बोल ना...."

 

सुनील : "तुला काही सांगायचंय..... पण, तू काय बोलशील ते माहिती नाही.... तुला आवडणार की नाही ...��..?"

 

शीतल : "नाही आवडलं तर, तसं सांगते ना.....बोल तू.....�"

 

सुनील : "लग्न करशील माझ्याशी.....☺️"

 

शीतल : "काय...��� लग्न..... हे कधी ठरलं तुझं??"

 

सुनील : "अ...... हो..... मला तू खूप आधीपासून आवडतेस... पण, आजपर्यंत ते तुला सांगितल नव्हत..... मला माहितीये तू कुणाचाच विचार नाही करत...... पण,......�� लव्ह यू.....��"

 

शीतल : "हे बघ तुझ्या ज्या काही माझ्याविषयी भावना आहेत त्या चुकीच्या नाही म्हणणार मी... पण, मला माझ्या आई - वडिलांच्या मना विरूद्ध काही केलेलं चालणार नाही.... ते जिथं म्हणतील मी लग्न करेल..... आणि तसही तू दुसऱ्या कास्टचा तर, मला खात्री ते नकार देतील.... म्हणून, तू इथेच थांबलेला बरा..... यानंतर मला काहीच बोलायचं नाहीये.....��"

 

शीतलला सुनील आवडतो की नाही हे ही ती स्पष्ट न करता कॉल कट करते..... तो तिकडे निराश होतो... पण, काय करणार ना..... कास्ट आडवी येणं, ही भारतीय संस्कृतीची खूप मोठी देणगी समाज, आजही जपतोय.....��

 

मुलींनी स्वतःची इच्छा बाळगुच नये अस म्हणणारा हा समाज..... काय मग "त्या" समाजाकडून अपेक्षा करायची??

 

वाद नको आणि जीव जायला नको म्हणून, कित्येक मुली तडजोड करतातच..... मग, तडजोड करूनही, त्यांना परत सासर चांगलं मिळाला तर कमावलं..... पण, मग जस शीतलच्या बाबतीत होईल..... बघूच पुढे.....�

 

शीतल, सुनीलला नकार कळवून आता येऊन बेडवर आडवी होते.... आणि तिच विचारचक्र सुरू होतं.....

 

शीतल : "उद्या आई - बाबांना माझा निर्णय सांगून टाकते... मला अजुन तरी लग्नाची इच्छा नाही..... वाटल्यास आता पर्यंत जस मी माझं शिक्षण माझ्याच कमाईतून पूर्ण केलं तसं पुढेही करेल...... ग्रॅज्युएशन झाल्यावर सी. एम. ए. करेल.... म्हणजे, पुढची लाईफ सेट आणि मग मी आई -  बाबांना चांगलं आयुष्य देऊ शकते... त्यांना कायमच सुखात बघायची इच्छा आहे माझी....☺️☺️ असच करते..... उद्या बोलतेच......."

 

अस स्वतःशीच ठरवून ती झोपी जाते..... पण, तिला काय माहित असतं...... उद्याची सकाळ काय वळण घेणार ते....���

 

सकाळी.......

 

सविता आणि शिवाजी तयार होत असतात.....

 

सविता : "चल शीतल तयार हो.... मामाकडे जायचयं.....�"

 

शीतल : "का....���"

 

सविता : "दोन वर्ष संपले... काल निकालही आलेला आम्हाला सांगितला नाही तू..... आज तुला बघायला येणार आहेत..... लवकर तयार हो आणि चल.... आणि आता नकार वगैरे चालणार नाहीये.... मुलगा कॉन्ट्रॅक्टर आहे.... चांगला पगार आहे... चल.....�"

 

शीतल : "आई अग पण..... मला....�"

 

ती समोर काही बोलणार तोच तिची आई.....

 

सविता : "पण, बीन काही एक ऐकणार नाहीये मी.... पुरे आता.... जा तयारी करून ये..... उशीर होतोय.....�"

 

आता ती तरी काय बोलणार...... सगळ्याच मुली स्वतःचा निर्णय मांडू शकत नाहीत..... त्यांना त्यांचा निर्णय सांगून आपल्या घरच्यांना दुखवायचं नसतं..... पण, मग घरचेही का समजून घेत नाहीत हो..... की, आपल्या मुलींची स्वप्न काय.... अरे वीस वर्ष तुम्हाला त्यांची स्वप्न कळली नाहीत मग, नवीनच लग्न होऊन जातील आणि त्या परक्या लोकांकडून काय अपेक्षा की, ते त्यांची स्वप्न त्यांना पूर्ण करूच देतील...... अहो थोडा विचार त्यांच्याही बाजूने करून बघा..... तुम्हाला दुःखी होण्याची वेळच येऊ नये म्हणून, त्यांनी आधीच कितीतरी मुलांना दुखावलं असतं.....�.... नसतं त्यांना घरच्यांविरोधी जाऊन काही करायचं..... पण, मग त्यांनी हीच अपेक्षा आपल्या घरच्यांकडून का करू नये.....?? खरंच ह्या प्रश्नाची उकल अजून तरी मानवजात असेपर्यंत.. जर, कुणाला झालीच ना तर मला नक्की सांगा....��

 

शीतल तयारी करून आई - बाबांसोबत, मामाच्या घरी गेली.... तिथे काहीच वेळात पाहुणे मंडळी आली.... शीतलला दाखवण्यात आले...... मुलांकडच्या मंडळीला शीतल खूपच आवडली मात्र, शीतलच्या मनात तो मुलगा नव्हता..... तिच्या मनात तो तर काय कुणीच नसणार.... तिचं स्वप्न तिला शांत बसूच देत नव्हतं......

 

शीतल : "आई अग बघ ना मुलगा कसाय......!�� नको मला हे लग्न.... तू तरी समजून घे....��"

 

सविता : "काही नाही चांगला कमावतो..... एकदा लग्न झालं की, सगळं होतं नीट.... सगळं आवडायला लागतं नंतर..... चल लवकर लग्नाची तारीख आहे.... काही उलट करू नको म्हणजे मिळवलं....�"

 

शीतल : "आई अग तू अशी कशी बोलू शकतेस.....�� तुझ्या विचारांना किळ लागलीय का.....�� एक आईच आपल्या मुलीचं मन समजणार नाही मग मी तरी अपेक्षा कुणाकडे करायची.....����"

 

सविता : "विचार बदलतात परिस्थिती नुसार..... आणि लग्न तर आज ना उद्या करावेच लागेल ना..... मग आताच का नको..... आम्हालाही मग दुसरे काम असतात.... अशी जवान मुलगी कधीपर्यंत घरी बसवून ठेवणार.... लोक काय म्हणतील....??��"

 

शीतल : "आई अग पण, लोक काय म्हणतील म्हणून, मी का त्याचा विचार करून माझी स्वप्न भंगु देऊ...... समज ना ग मला अजुन शिकायचंय समोर....���"

 

सविता : "तुझं एक ऐकणार नाहीये मी.... लग्न करायचं गप..... आणि जा सासरी.....�� यावर एकही शब्द नको....�"

 

सविता आणि शिवाजी समाजाने घातलेल्या कुविचारांच्या कुंपणात कधीचेच अडकले होते....... आता शितलकडे लग्न करण्यावाचून पर्याय नव्हता.....�� म्हणून, आता तीन, सर्व नशिबावर सोडून दिलं आणि जे होईल त्याला सामोरे जाण्याचे ठरवून ती लग्नाला तयार झाली......

 

क्रमशः