Jodi Tujhi majhi - 31 books and stories free download online pdf in Marathi

जोडी तुझी माझी - भाग 31




गौरवी - तुला बोलायचं आहे ना माझ्याशी!!! ठीक आहे बोल.. पुन्हा तुझी तक्रार नको कि तुझं एकदाही ऐकून घेतलं नाही... बघू तरी अस काय सांगणार आहे तू मला नवीन जे मला माहिती नाही...

विवेक - आता बोलू का? तू बरी हो ना आधी मग बोलूयात ना निवांत... सद्धे तुला आरामाची गरज आहे... उगाच हा विषय नको... त्रास होईल ग तुला...

गौरवी - त्रास आजही होणार आहे, उद्याही होणारच आहे आणि आता मला त्रास होत नाहीय अस वाटत का? तुला पुढे पाहून मी जे विसरायचा प्रयत्न करत होते ते आणखी परत परत आठवतंय मला, स्वतःचाच राग येतोय की एवढं सगळं घडत असतानाही मी इतकी मूर्ख कशी झाले होते की मला काहीच कळलं नाही...

विवेक - नाही ग गौरवी तू मूर्ख नाहीये तू तर खूप समजदार आहेस आणि जे नव्हतं त्यालाही समजूनच घेण्याचा प्रयत्न केला तू... मूर्ख तर मी होतो जे तुझ्यासारख्या मुलीला त्रास दिला, फसवणूक केली... तुझ्या समाजदार पणाचा आणि माझ्यावर असलेल्या प्रेमाचा फायदा घेतला मी..

मागून रुपाली अचानक खोलीत आली... तिच्या हातात फोन होता..

रुपाली - गौरवी काका, काकू निघत आहेत घरून तर तुला काही हवय का इथे... विचारात आहेत...

गौरवी - फक्त एक डार्क चॉकलेट सांगशील...

रुपाली लगेच बाहेर गेली..

विवेक - तुला चॉकलेट हवं तर मला सांगायचं ना मी तर इथेच आहे केव्हाचा... आणि तुला तर चॉकलेट आवडत नाही ना ग मग आता डायरेक्ट डार्क चॉकलेट??

गौरवी - हो अस म्हणतात की चॉकलेट खाल्याने स्ट्रेस कमी होतो... आणि रिलॅक्स वाटतं... म्हणून मागवलंय...

विवेक - अग मग मी पण दिल असत ना तुला आणून ... इतक्या वेळच बोलली नाहीं तू मला..

गौरवी - तुला काही मागावं तो हक्क आता जाणवत नाही विवेक...

आता पुन्हा विवेकला काय बोलायचं सुचत नाही ..

विवेक - आपलं बोलणं अर्धवट आहे अजूनही, तू ठणठणीत झाली की बोलूयात आपण... मी बाहेर थांबतो आणि रुपलीला आत पाठवतो... मी तुझ्याजवळ असलेलं कदाचित तुझ्या बाबांना आवडणार नाही ते जरा चिढले आहेत माझ्यावर...

गौरवी होकारार्थी मान डोलावते... विवेक निघून जातो आणि रुपाली आत येते...

संदीप बाहेरच उभा असतो... विवेकला बघून तो लगेच विचारतो
संदीप - बोलला का वाहिनीशी? काय म्हणाली??

विवेक - अजून सविस्तर नाही बोललो ती ठीक झाली की बोलेल... पण खुप जास्त नाराज आहे ती माझ्यावर... खूप टोकाचा विचार केलाय तिने.. तिला समजावणं थोडं अवघड जाणार आहे मला...

संदीप - तुझं काम पण काही साधं नव्हतं ना.. फसवणूक केलीस लेका तू तिची... आता तुला त्याचा पच्छताप होतोय मान्य आहे पण तुला तिने सहज माफ करावं असं मला सुद्धा वाटत नाही...

विवेक - संदीप तू एक मित्र म्हणून आधार देशील वाटलं होतं...

संदीप - तेच करतोय ना मी, मित्रा आहे म्हणून तुझ्यासाठी प्रयत्न करतोय, तुझ्या ठिकाणी कुणी दुसरं असतं तर कदाचित गालफड लाल केले असते आतापर्यंत...

विवेक - मग माझेही कर, दे मला शिक्षा..

संदीप - ते काम आता वहिनीच करेल... चल असू दे, तुला घरी जायचं असेल तर काका, काकू आले की आपण जाऊन येउ..

विवेक - हो चालेल...

गौरवीची आई बाबा दवाखान्यात येतात... ते आले की रुपाली, संदीप आणि विवेक निघून जातात... रुपाली आता दुसर्यादिवशीच येणार असते... गौरवीची बाबा रात्री दवाखाण्यात थांबायचं म्हणतात... इकडे विवेक आपलं समान संदीपच्या घरून स्वतःच्या घरी घेऊन जातो... लवकरच आवरून डबा घेऊन तो दवाखाण्यात पोचतो... आता संदीपही नसतो त्याच्यासोबत...

रात्रीच्या वेळी पेशंट जवळ एकालाच थांबता येतं, त्यामुळे आता विवेक कि गौरवीचे बाबा हा प्रश्न राहतो..

विवेक - आई बाबा मी थांबतो गौरवीजवळ रात्रभर तुम्ही घरी जा जेवण वगैरे करा आराम करा आणि उद्या सकाळी गौरवीसाठी नाश्ता घेऊन या...

गौ बाबा - नाही मी थांबणार आहे, ज्याला माझ्या मुलीच मन सांभाळता येत नाही त्याच्या भरवश्यावर नाही सोडणार मी माझ्या मुलीला, ती एकटी नाहीय तिचा बाप अजून जिवंत आहे..

विवेक त्यांच्या बोलण्याने दुखावल्या जातो ,पण त्यांचा राग साहजिकच आहे म्हणून तो त्यांना समजून घेऊन पुढे बोलतो..

विवेक - आई बाबा माझी चूक झालीय त्याची शिक्षा मला नियतीच देतेय... हवं तर तुम्ही पण शिक्षा द्या, पण विश्वास ठेवा आता गौरावीला माझ्याकडून कुठलाच त्रास होणार नाही...

गौ बाबा - आम्ही काय शिक्षा देणार तो अधिकार गौरवीचा, पण तिला काही लागलं तर ती तुम्हाला सांगणार नाही म्हणून मी थांबतो..

विवेक - का नाही सांगणार बाबा मी तीच्या जवळच असेल..

गौ बाबा - तस असतं तर चॉकलेट तिनी तुम्हाला मागितलं असत ना आम्हाला आणायला नसत सांगितलं, यावरून कळतं की तिला तुम्ही नकोय ते...

विवेक - बरं ठीक आहे तिलाच विचारुयात, ती म्हणेल तसं...

गौ बाबा - ठीक आहे...

ते आत जाऊन गौरावीला विचारतात, गौरवी "विवेकला थांबू द्या बाबा" म्हणून बोलते... आणि विवेकला जरा बरं वाटतं..

गौ बाबा - ठीक आहे... विवेकला सांगतात नीट लक्ष द्या आणि काही लागलाच तर केव्हाही फोन करा..

अस बोलून ते निघून जातात..

आता गौरवी आणि विवेक दोघेच खोलीत असतात..

विवेक - थँक्स गौरवी, थोडासा विश्वास दाखवल्याबद्दल...

गौरवी - माझे बाबा इथे राहिले असते तर एक मिनीटही झोपू शकले नसते कारण त्यांना दुसऱ्या जागी झोप येत नाही आणि माझ्याजवळ राहून माझ्या काळजीनेही त्यांना झोप लागली नसती, त्यांना bp आणि हृदयाचा त्रास आहे, अस करून त्यांची तब्येत खराब होऊ शकली असती म्हणून मी त्यांना नाही म्हंटल... आणि तू ही नसला तरी चालेल रात्र भर काय गरज आहे तशी पण मी झोपणारच आहे ना...

गौरवीच ऐकून विवेकच आनंद क्षणात मावळला.. पुन्हा निरुत्तर झाला तो...

डॉक्टरांची फेरी झाली... खूप सुधारणा आहे.. उद्या एक शेवटचं चेक अप करून त्याचे रिपोर्ट जर नॉर्मल आले तर तुम्हाला सुटी मिळेल.. अस सांगून गेलेत म्हणजे 2 दिवसांत आता दवाखान्यातून सुटका मिळणार होती..

विवेकने गौरवीचा टेबल लावला, आणि त्यावर डबा मांडला... तिच्याजवळ बसत...

विवेक - चल जेवण करून घे..

गौरवी - मी जेवते माझ्या हाताने... (थोडा विचार करत) तू जेवलास??

विवेक - नाही तू करून घे जेवण तुझं झालं की मग मी करतो..

गौरवी - तू पण घे सोबतच... तस पण मला एकटीला कंटाळा येतो जेवणाचा...

दोघेही जेवण करून घेतात.. गौरवी त्याला म्हणते औषध थोडावेळणी घेईल म्हणून विवेक ही थांबतो... तो आजूबाजूचं सगळं आवरत असतो... तिला फ्रेश वाटावं म्हणून थोडं आवर सावर करत असतो ..

गौरवी - विवेक तू किती दिवस आहे इकडे?

विवेक - तू बरी होऊन आपलं नात पुन्हा पूर्ववत येईपर्यंत..

गौरवी - आपलं नात पूर्ववत येईल की नाही माहिती नाही, मला तुझ्यावर विश्वास ठेवायला सहज नाही जमणार विवेक... आणि बरी तर मी आजही आहे, डॉक्टर बोललात ना सुधारणा आहे, आपल्या नात्याला पुर्ववत आणायच्या घोळात, अस ना होवो की तुझा जॉब चालला जाईल...तू आजही बोलू शकतोस म्हणजे तुला लवकर निघता येईल..

विवेक - हम्म म्हणजे बरीच मेहनत करावी लागणार दिसतेय... हरकत नाही ... तुला काही त्रास आहे का मी इथे असल्याचा??

गौरवी - नाही उगाच तुझं ऑफिस बुडत असेल ना आणि workload वाढेलं म्हणून म्हंटल... आणि हो तू मला सोबत घेऊन जायचा विचार करत असशील तर , मी त्या घरात आणि तुझ्या सोबत पुन्हा येणार नाही, आणि मी जॉब मिळावंला आहे इकडे आता मी तो सोडणार नाही..

विवेक तिच्याजवळ बसून तिचा हात हाती घेत..

विवेक - तुला जॉब सोड म्हणणारच नाहीय मी, आणि हो त्या घरात आता मी पण राहत नाही..

गौरबी - काय?? मग कुठे राहतो तू??


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED