Jodi Tujhi majhi - 33 books and stories free download online pdf in Marathi

जोडी तुझी माझी - भाग 33

विवेक तिला एका टेकडीवर, निसर्गरम्य ठिकाणी घेऊन गेला... तिथे जाताच तिची सगळी मरगळ दूर झाली आणि तिला फ्रेश वाटू लागलं... थोडावेळ निसर्गाच्या, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर विवेक ने आपला विषय हाती घेतला.. टेकडीवर एका मोठ्या दगडावर दोघेही बसले होते... विवेक तिच्याकडे बघत बोलू लागला..

विवेक - गौरवी, मला जे सांगायचं आहे ते बोलू का??

गौरवी - हम्म, त्यासाठी तर आलोय ना... तुझं ऐकून घेणार आहे मी..

विवेक - थँक्स, गौरवी खर तर मी हे सगळं तुला आधीच सांगणार होतो पण ते सांगण्या आधीच तुला ते कळलं आणि तेही खूप विचित्र पद्धतीने... मी आणि आयशा एका पार्टी मध्ये भेटलो जवळपास 4 वर्षाआधी. त्यानंतर तिने पुढाकार घेऊन माझ्याशी बोलणं सुरू केलं, माझा नं. माझ्या मित्राकडून मिळवला... हळू हळू भेटी गाठी, मैत्री आणि मग प्रेम अस घडत गेलं, मला खरच वाटत होतं की ती प्रेम करते माझ्यावर... पण मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं.. ती थोडी स्वप्न बाळगणारी आणि त्यांना पूर्ण करण्या मागे धावणारी होती... तिला मॉडेल बनायचं होतं. काही दिवसांनी मला घरचे लग्ना साठी विचारु लागले, मी सुरुवातीला खूप टाळलं पण नंतर ते खूप कठिण होत गेले आणि कंटाळून मी लग्नसाठी तयार झालो.. मी आयशाला याबाबतीत सांगितलं, तिला किती तरी वेळा लग्नासाठी विचारलं ... पण लग्न करून माझं सगळं करियरची वाट लागेल, माझे स्वप्न धुळीस मिळतील, मी लग्न नाही करणार..असच ती बोलत होती... नंतर तीच म्हणाली तू घरच्यांच्या इच्छेनुसार त्यांनी शोधलेल्या मुलीशी लग्न कर... मी तिला म्हणालो की मग तुझं काय? आणि मी तुझ्याशिवाय कसा राहू? तेव्हा खरच मला वाटत होतं की मी खरं प्रेम करतो तिच्यावर आणि तिच्याशिवाय जगू शकणार नाही.. पण आता कळतंय की ना तिनी प्रेम केलं कधी न मी.. ते फक्त एक आकर्षण असावं.. किंवा अंगवळणी पडलेली एक वाईट सवय... तिने माझा फक्त वापर केला आणि मी मूर्ख तिच्या जाळ्यात खूप सहज फसत गेलो.. असो... पुढे ती बोलली अरे मी तुला कुठे माझ्यापासून दूर जा म्हणतेय... आजकाल विवाह बाह्य प्रेमसंबंध खूप कॉमन आहे.. आपण relationship मध्ये राहुयातच ना.. अस केल्यानी तुझ्या मागची घरच्यांची कटकट दूर होईल.. मी नकार दिला.. तेव्हा तिला मी अस करू शकणार नाही म्हणून बोललो, कुण्या सभ्य मुलीचं आयुष्य बरबाद करायचा मला अधिकार नाहिये.. तिला बराच विरोध केला या गोष्टीवर पण नेहमी प्रमाणे यावेळीही ती मला पटवून देण्यात यशस्वी झाली, खर तर तिची धुंदी होती माझ्यावर त्यामुळे तीचं सगळं ऐकायला लागलो होतो मी.. आणि तुझ्याशी लग्न केलं.. मनात खूप वाईट आणि अपराधीपणा जाणवत होता, म्हणून मी तुला लग्न झाल्यावर हातही नाही लावला, तू मला विचारत राहिली काय झालंय पण मला तेव्हा सांगता नाही आलं, काय सांगणार होतो मी की मी तूला फसवतोय हे?? मला कळत होतं मी चुकीचं वागतोय मला त्याच वाईटही वाटत होतं पण .... आणि नंतर तर काही दिवसांनी इतका निर्लज्ज झालो की ती भावना पण मरून गेली.. आईच्या आग्रहाखातर तुला तिकडे घेऊन गेलो.. पण तुला आमच्याबद्दल कधी काही समजलं तर तू सगळं घरी आणि नातेवाईकांना सांगून देशील याची भीती वाटत होती.. तीच भीती मी आयशाकडे बोलून दाखवली तेव्हा तिने उपाय सांगितला की तिला घरा बाहेरच पडू देऊ नकोस आणि तिच्याशी जास्त बोलू नको ऑफिस च काम आहे म्हणून बाहेर राहत जा फक्त झोपायला घरी जा.. काही दिवसांनी कंटाळून तीच परत निघून जाईल.. तिच्या धुंदीत असल्यामुळे मी हा विचारच केला नाही की तू एक स्वच्छंदी उडणारी परी आहेस आणि मी तुला कैद करू पाहतोय यात तुझ्या भावना किती दुखावतील.. एक दिवस तिने नेहमीप्रमाणेे माझ्याकडे पैसे मागितले पण यावेळी माझ्याकडे नव्हते, मी 4-5 दिवसांनी देतो म्हणून बोललो तेव्हा ती खूप बोलली मला भिकारी वगैरे पण म्हंटली, इतके दिवस माझ्याकडून पैसे लुटत होती आणि तिला मिळत होते यावेळी मी दिले नाही म्हणून तिने सरळ माझ्याशी बोलायचं सोडून दिलं.. मी खूप प्रयत्न केला तीच्याशी परत बोलायचा पण तिने कुठलाच संबंध ठेवायचा नाही म्हणून स्पष्टच सांगीतलं आणि 2 दिवसांत नवीन बॉयफ्रेंड बनवला आणि त्याच्याच भरवश्यावर ती मॉडेल बनली.. कारण त्याची ग्लॅमर वर्ल्ड मध्ये चांगली पोहोच आहे म्हणे आणि त्याच्यामुळे हिला हीच स्वप्न पूर्ण करता आलं.. माझ्यामुळे तिचे दिवस वाया गेलेत अशी बोलली ती... मला खूप अपमानीत झाल्यासारखं वाटलं.. तिचा खूप राग यायला लागला, स्वतःला शांत करायसाठी मी ड्रिंक करायला लागलो.. पण ड्रिंक केल्यावर आणखी राग चढायचा, तिला तिची जागा दाखवून द्यायची म्हणून मी आठवडाभर रोज तिच्या घरापर्यंत जायचो पण मला पाहून ती दरवाजाही उघडत नसे.. खूप राग होता मनात आणि ती दार उघडत नसल्यामुळे आणखी वाढायचा आणि मग पुढे घरी येऊन तुझ्यावर तो राग निघायला लागला... या सगळ्यात मी कधीच तुझा विचारही केला नव्हता की माझ्या या अश्या वागण्याचं तुला किती जास्त त्रास होत असेल आणि तू पण निमूटपणे काहीं तक्रार ना करता सगळं सहनच करत गेली..

गौरवी आणि विवेक दोघांचेही डोळे अखंड गळत होते... गौरावीला आपली फसवणूक झाल्याचं वाईट वाटत होतं तर विवेकला ती फसवणूक केल्याचं..

विवेक पुढे बोलू लागला..

विवेक - पण ज्या दिवशी तू मला विरोध केला आणि माझा अकॅसिडेंन्ट झाला त्यानंतर मात्र मला तुझ्या भावना कळल्या, तुझं प्रेम कळलं.. आणि मी स्वतःला अपराधी समजू लागलो होतो.. तुझा अपराधी.. शांतपणे विचार केल्यावर अस वाटत होतं की मी नक्की तोच विवेक आहे का जो मुलींचा आदर करायचा त्यांना सन्मान द्यायचा.. मी काय केलं हे ज्या मुलीने मला सर्वस्व मानलं तिलाच इतक्या यातना दिल्यात, एक दगाबाज मुलीच्या सांगण्यावरून मी इतका राक्षसी वागलो, मला माझाच राग येत होता, खूप पच्छाताप होत होता... अस वाटत होतं की माझ्या वागण्याची शिक्षा दिली मला देवानी.. एक दिवस मी ठरवलं की मी तुला अंधारात न ठेवता तू बोलली होती तस मैत्रीण समजून तुला माझं सगळं सत्य सांगेल.. आणि त्यानंतर तू जो निर्णय घेशील तो मी मान्य करेल.. पण देवानी जी शिक्षा दिली तेवढी पुरेसी नव्हती म्हणून की काय...पुन्हा त्यादिवशी आयशा घरी आली थोडफार सावरलेलं माझं आयुष्य पुन्हा उध्वस्त करायला आणि मग पुढचं सर्व तुला माहितीच आहे....

एवढं बोलून विवेक थांबला, गौरवी काही बोलतेय का याची वाट बघत होता... पण ती काहीच बोलत नाही म्हणून पुन्हा विवेकच बोलायला लागला...

विवेक - तू निघून गेल्यावर, मी खूप हताश झालो होतो मला तुझ्याशी बोलायचं होतं पण काहीच कळत नव्हतं काय आणि कस बोलू कस समजवून सांगू की मी आता तुझा झालोय, सर्वस्वी फक्त तुझा.. खर प्रेम काय असतं ते मला कळलंय, मी तुझ्यासाठी तुटतोय ग झुरतोय, तुझा निर्णय बरोबरच होता, अश्या राक्षसाबरोबर तू तरी कशी राहणार होती ज्याने तुझी फसवणूक केली.. पण ती तुझीच जादू आहे की तू या राक्षसाला प्रेम करायला शिकवलं, त्याला पुन्हा माणसात आणलं... आणि आता अशी अर्ध्यावर सोडून नको जाऊस.. मला नाही ग जगता येणार आता तुझ्याशिवाय... माफ करण्यालायक गुन्हा नाहीय माहिती आहे तरी मी तुझी माफी मागतोय, मला फक्त एकदा माफ कर गौरवी मी वचन देतो ग मी परत अस कधीच वागणार नाही... माफ करायाचं नसेल तर शिक्षा दे, मार मला हवं तर पण मला सोडून नको ना ग जाऊ.. प्लीज..

तो हात जोडून तिच्या गुडघ्याजवळ बसून बोलत होता तिच्या गुडघ्यावर डोकं ठेऊन तिची माफी मागत होता.. पण गौरवी मात्र काहीच बोलत नव्हती..

------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED