जोडी तुझी माझी - भाग 35 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 35

दोघेही उठतात व निघता निघता..

विवेक - गौरवी मला बदली मिळायला वेळ लागेल आणि तुलाही तुझा वेळ हवा आहे.. मी माझं बदलीच आटोपून इकडे परत आल्यावर सांगितलं तर चालेल का??

गौरवी - चालेल, तुझं तू ठरव..

विवेक - ठीक आहे.. मला भेटत तर जाशील ना ग कधीतरी..

गौरवी - हम्मम..

गाडीवर बसून ते घराकडे निघतात.. घरी रुपाली गौरावीला भेटायला आलेली होती आणि त्यांची वाटच बघत असते..
त्यांना आलेलं बघून रुपाली त्यांच्याकडे येते आणि हळूच बोलते...
रुपाली - अरे वाह.. झालं बोलून?? झालं का मग तुमचं मॅटर solve??

विवेक - नाही अजून.. तुझ्या मैत्रिणीला पुन्हा पटवायला यावेळी फार कष्ट घ्यावी लागणार आहेत मला..

गौरावी - तू केव्हा आलीस??? आणि आल्या आल्या काय सुरू केलंय?? चल घरात बसून निवांत बोलूयात..

विवेक - अ .. गौरवी मी निघतो आता.. उद्या येईल.. उशीर होतोय आई वाट बघत असेल..

गौरवी - हो चालेल , ठीक आहे, बाय....

आणि विवेक बाहेरूनच निघून जातो..

विवेक निघून जातो रुपाली आणि गौरवी दोघीही घरात गौरवी च्या खोलीत येऊन बसतात...

रुपाली - गौरवी काय बोलणं झालं?? सांग ना तुम्ही दोघे सोबत गेले होते म्हणजे तुमच्यामध्ये सगळं ठीक झालाय ना??

गौरवी - नाही ग रुपाली.. त्यानी मला सांगितलं त्याच मागील आयुष्यातील सगळं.. आणि माफीही मागितली पण रुपाली मला त्याला माफी द्याविशी नाही वाटली ग.. माझं प्रेम आहे ग त्याच्यावर खूप प्रेम आहे.. पण म्हणून मी माझा अपमान नाही विसरू शकत... आणि त्याने मला जाणून बुजून फसवलंय ग... अशी सहज कशी माफी देऊ मी त्याला?? माझ्यासाठी इतकं सहज नाहीय हे.. म्हणून मी त्याला वेळ मगितलाय..

रुपाली - मग??? तो काय म्हंटला??

गौरवी - काय बोलणार... ठीक आहे म्हंटला...

रुपाली - बरं मग आता पुढे काय?? म्हणजे कुठे राहणार आहेस इकडे की सासरी??

गौरवी - नाही मी इकडेच राहील जोपर्यंत मी विवेक बद्दल शाश्वत होत नाही तोपर्यंत मी तिकडे राहायला नाही जाणार.. कुणाला काही गैरसमज नको.. हा अधे मध्ये कधीतरी आठवण आली की मी आई बाबांना भेटून येत जाईल पण राहणार नाही...

रुपाली - आणि आता तू इकडे राहशील म्हंटल्यावर आज ना उद्या नक्कीच तुला प्रश्न येणार की नेमकं काय घडलंय तुमच्या दोघांमध्ये तेव्हा काय सांगायचं ठरवलंय तू??

गौरवी - रुपाली मी नाही काहीच सांगणार आहे जे सांगायचं ते विवेक सांगेल... मी तस बोलले आहे त्याला... "तू केलं तूच बोल," मला नाही असं काही सांगून माझ्या आणि त्याच्या आई बाबांची मन दुखावता येणार... आणि आणखी एक अस म्हणजे मी जर सांगितलं तर कदाचित आता जो माझा त्याच्यावर राग आहे त्यामुळे मी विवेक कसा अपराधी आहे हे सांगायचं प्रयत्न करेल... त्यामुळे होऊ शकते भविष्यात तो कुणाच्याच मनात पुन्हा जागा निर्माण करू शकणार नाही खास करून माझ्या वडिलांच्या... पण त्यानी सांगितलं तर तो सगळं व्यवस्थित सांगेल थोडं फार स्वतःला justify करेल त्यामुळे एखादी तरी छोटीशी आशा राहील पुन्हा मन जिंकण्याची...

रुपाली - वाह वाह... ग्रेट... ठीक आहे... काळजी घे उद्या भेटू ऑफिसमध्ये .. येशील ना..

गौरवी - हो म्हणजे काय!! मी खूप कंटाळले आहे आता घरी राहून...

रुपाली - चल मग बाय.. सी यु..

रुपाली निघून गेली.. आणि गौरवी इकडे विवेकच्या आजच्या बोलण्याचाच विचार करत बसली होती.. तिने संधी तर दिली त्याला पण भविष्यात ती त्याला माफ करू शकेल की नाही हेच तिला कळत नव्हतं.. तेवढ्यात आईनी जेवायला आवाज दिला आणि तिची विचार शृंखला तुटली..

इकडे विवेक घरी आला.. त्याच्या आई बाबांनी लगेच गौरवी बद्दल त्याला विचारलं.. त्यांनीही ती ठीक असल्याचं आणि उद्यापासून ऑफिसला जाणार असल्याचं सांगितलं..

आई - बर ती कधी येणार आहे आपल्याकडे राहायला..

आईच्या या प्रश्नावर तर विवेक उडालाच.. आता काय बोलाव त्याला काहीच सुचत नव्हतं.. तो मनातच विचार करत होता
"आता कस सांगू की ती येणार नाहीय इकडे राहायला.. कधी येईल मलाच माहिती नाहीय.. आताच सगळं खरं सांगून देऊ का आईला की नको थोडा वेळ घेऊ.. आणि सगळ्यांना सांगावं लागणार आहे ना मग सोबतच सांगेल ... " त्याचा विचार सुरूच होता तर आईनी त्याला पुन्हा विचारलं

आई - काय झालं?? कधी येणाऱ आहे ती?? आणि काय भांडण झालाय रे तुमच्यात?? तिने एवढा तडका फडकी इकडे येण्याचा निर्णय घेतला.. कशावरून भांडलास तू?? काय केलं तू अस?? अरे काही बोलशील की नाही??

विवेक - ( स्वतःला सावरत) आई मला नाही माहिती ती कधी येणार ते मी बोललो नाही त्या विषयावर.. तूच विचारून घे ना.. आणि मी तर परत जातोय उद्या.. बऱ्याच सुट्या झाल्यात ना आता कामाकडे पण बघायला हवं..

आई - विवेक एक बोलू का?? तुमच्यात खूप गंभीर काहीतरी झालंय अस का वाटतंय मला?? तू अस कर ना रे इकडेच ये ना परत इकडेच कंपनी बघ दुसरी हवं तर.. मी तर म्हणेल की आताच जाऊ नकोस सरळ रिझाईन करून दे आणि इकडे दुसरी कंपनी बघ..

विवेक - आई अस नाही करता येणार मला.. आणि मी येणारच आहे इकडेच कायम राहायला.. आता जातो आणि तिकडंच सगळं व्यवस्थित करून इकडे शिफ्ट होतो .. ठीक आहे ना?? काळजी नको करू आई होईल सगळं व्यवस्थित..

आई - विवेक तूझ्या आणि गौरवी शिवाय आम्हाला कुनीच नाहीय रे.. तू गौरवी सोबत जे झालाय ते लवकर सूरळीत कर.. काय झालं ते तरी सांग म्हणजे लागल्यास मी काही मदत करेल..

विवेक - आई थोडा वेळ दे होईल सगळं नीट..

आई - विवेक मला भीती वाटतेय.. गौरवी सोडून तर नाही जाणार ना तुला... ती खूप चांगली मुलगी आहे विवेक.. इतक्या कमी दिवसांतच किती लळा लागला आहे आम्हाला तिचा.. तिच्याशिवाय आम्हाला पण नाही करमणार..

आणि बोलता बोलतच आईच्या डोळ्यात पाणी येत

विवेक - आई शांत हो.. मी तिला मनवण्याचा प्रयत्न करतोय ग.. होईल सगळं नीट.. तू नको काळजी करू.. थोडा वेळ लागेल .. जाऊ दे ते सगळं सोड.. आज जेवण मिळणार आहे की नाही..

आई - अरे मला वाटलं तू तिकडेच जेवण करून येणार आहेस म्हणून मी तुझा स्वयंपाकच नाही केला..

विवेक - काय अग आई तस असत तर फोन नसता केला का मी तुला.. बर असू दे मी बनवतो काहीतरी..

आई -( थोडस हसत) अच्छा म्हणजे तिकडे गौरवी ने स्वयंपाक शिकवला वाटतं..

विवेक - नाही ग.. ती तर मला किचन मध्ये पण येऊ देत नव्हती.. मी शिकलो होतो आधीच..

आई - बरं बरं ठीक आहे जा हात धुवून ये मी वाढते ताट.. मस्करी करत होते तुझी.. ये पटकन..

विवेक - काय ग आई तू पण .. इकडे कावळे ओरडत आहेत आणि तू तर त्यांना heart attack च देणार होतीस आता.. उपाशीच मेले असते बिचारे.. बर चल खूप भूक लागलीय...

---------------------------------------------------------
क्रमशः