जोडी तुझी माझी - भाग 38 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 38

सगळे डोळ्यात प्राण आणून सासर्या सुनेचा हा प्रसंग बघत असतात.. गौरवी विवेंकच्या बाबांना घेऊन घरात येते आणि आईला म्हणते
गौरवी - आई सगळ्यांना पाणी दे ना ग एकदा... मला थोडं विवेकशी बोलायचं आहे ..

आणि विवेकला एक बाजूला घेऊन जाते..

गौरवी - विवेक तुला आज निघायचं आहे ना बराच काही आवरायचं असेल , तू अस कर तू घरी जा आणि तुझं आवरून घे.. आई बाबा येतील थोडावेळानी..

विवेक - अग पण सगळे चिढले आहेत आणि मी असा निघून गेलो तर सगळ्यांचा राग चुकवण्यासाठी पळून गेला म्हणतील ना मला सगळे..

गौरवी - विवेक मला बोलायचं आहे त्यांच्याशी.. आणि ते तुझ्यासमोर नाही बोलता येणार म्हणून तू जा इथून.. तू इथे राहिला तर आणखी एकेक जण तुझ्यावर त्यांचा राग बरसवेल.. तेव्हा तू जा आता इथून..

विवेक - ठीक आहे पण तू त्यांना सांभाळशील ना ग म्हणजे ... तुला समजत आहे ना माझी काळजी?? मी खूप मोठा धक्का दिलाय त्या सगळ्यांना त्यामुळे ते खूप विचार करतील स्वतःला दोष देत बसतील अशा परिस्थिती मध्ये तब्येत वगैरे बिघडली कुणाची तर... मी थांबतो ना.. हवं तर बाहेर थांबतो..

गौरवी - त्याची गरज नाहीय विवेक.. इतकं ही त्यात कुणी कमजोर नाहीय.. मी म्हंटल ना मी सांभाळते, तू जा आता.. आणि थँक्स..

विवेक - प्लीज गौरवी थँक्स म्हणू नको, मी आधीच किती दुखवलाय तुला आता तुझा थोडा जरी त्रास कमी करू शकलो तरी मला बरं वाटेल .. बर चल येतो मी पण काही लागलं तर लगेच फोन कर..

विवेकही थोडा हळवा झालेला असतो आता, आणि गौरवीच्या सांगण्यावरून तिथून निघून जातो..

तिची आई लगेच पाण्याचे ग्लास भरून सगळ्यांना पाणी देते.. आता गौरवी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते खरं तर सगळ्यांची हलकी समजूत घालण्याचाच तिचा मानस असतो..

गौरवी - विवेकच बोलणं आटोपलंय आणि त्याच्या वागण्यामुळे तुम्ही सगळे चिढला आहात.. आणि साहजिकच आहे ते मी पण तर चिढूनच आले होते ना इकडे जेव्हा मला सत्य कळलं होतं.. पण माझी विनंती आहे तुम्ही सगळे एकदा त्याच्या बाजूनेही थोडासा विचार करावा.. मी त्याला माफी द्या अस म्हणत नाहीये पण त्याला थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा एवढंच.. त्याच्याकडून चूक घडली पण त्याला त्या चुकीबद्दल खूप पच्छताप होतोय.. ते त्याच्या बोलण्यातून वागण्यातून जाणवतंय..

वि आई - हे वागणं खोटं नसेल कशावरून गौरवी जर तो एवढी मोठी फसवणूक करू शकतो तर हे ही खोटंच असेल सगळं.. तो नक्की माझाच विवेक आहे ना? आणि आता मला तरी त्याच्यावर विश्वास करू की नाही प्रश्न पडलाय.. आणि तो कुठे गेला आता पळपुटा??

गौरवी - मी त्याला घरी पाठवलंय, त्याला आज जायचंय ना तयारी करायचीय म्हणून.. आई हे वागणं त्याच खोटं नाहीय आता.. बरं मला तुम्हा सगळ्यांना माझा निर्णय सांगायचं आहे..

गौ बाबा - हो बेटा, सांग तुला काय वाटतंय?? तुला जर सोडचिठ्ठी वगैरे हवी असेल तर आपण केस टाकूयात तशी कोर्टात..

गौरवीच्या बाबांचे हे शब्द कानी पडताच विवेकच्या आईच्या डोळ्यातलं साठलेलं पाणी पटकन बाहेर आलं.. दोन दिवसापासून जी भीती त्यांना वाटत होती ती खरी होताना दिसत होती.. अस झालं तर आपण गौरवीला गमवणार याच त्यांना दुःख वाटत होतं, कारण गौरवीचा बराच लळा त्यांना एवढ्या दिवसांमध्ये लागला होता.. आणि त्या कानात प्राण आणून गौरवीच उत्तर ऐकायला सज्ज झाल्या..

गौरवी - नाही बाबा, कुणी चुकलं म्हणून त्याला सोडून देणं हा पर्याय मला तरी योग्य वाटत नाही, आणि विशषेतः तेव्हा ,जेव्हा तो आधीच त्या चुकीच्या पच्छतापाच्या आगेत जळत आहे.. त्या माणसासाठी ही तशीच सर्वात मोठी शिक्षा असते, आणि आपणही जर शिक्षाच द्यायची ठरवलं तर ती व्यक्ती पुर्णतः तुटून जाईल.. डिप्रेशन मध्ये जाईल.. अशा वेळी एखाद्याच पूर्ण आयुष्यही spoil होऊ शकते.. किंवा ती व्यक्ती वाईट मार्गाला चुकीच्या सवयींना बळी पडू शकते.. आणि हे सगळं आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर घडतांना मी नाही बघू शकत बाबा.. खरं तर ही जी वेळ आहे ना बाबा हीच खरी वेळ आहे, आपल्या पासून काही कारणामुळे लांब गेलेल्या त्याला आपल्या जवळ आणण्याची, त्याला दोन शब्द समजुतीने सांगून पुन्हा आपलंसं करण्याची.. रागानी माणसं दुरावतात बाबा, पण प्रेमाने त्यांना पुन्हा बांधता येत.. आपण जर शिक्षा न देता प्रेमाने वागलो तर त्याला त्याची चूक आणखी प्रकर्षाने जाणवेल आणि तो पुन्हा आपल्यापासून आयुष्यात कधीच लांब जाणार नाही.. जे झालं ते झालं, चूक कुणाकडून होत नाही, माणूस म्हणजे असंख्य लहान मोठ्या चुकांचा पुतळाच असतो, अश्यावेळी योग्य मार्ग दाखवून त्याला आपल्यात आणणं महत्वाचं असतं.. जे झालं ते झालं, मला एक सांगा जून सगळं विसरून नवीन चांगल्या आठवणी तयार करणं योग्य आहे की त्या व्यक्तीला सोडून त्याच त्या वाईट आठवणींना आयुष्यभर उगाळत बसणं योग्य आहे????

वि बाबा - खरं आहे तुझं, अगदी बरोबर बोललीस, पण मग त्याची चुकीची माफी जर त्याला इतकी सहज मिळाली तर त्याला त्याची किंमत उरणार नाही, आणि होऊ शकते तो आपल्याला गृहीत धरून पुढेही अश्याच डोळस चूका करत राहील आणि मी भुललो, धुंदी होती वगैरे असेच कारण देऊन तो मोकळा होईल..

गौरवी - मी कुठे म्हणतेय की सहज माफ करा, त्याला आपल्या माफीची किंमत असायलाच हवी ती मिळवायलाही किती कष्ट लागतात हे कळायला हवं तेव्हांच तो परत ती चूक करणार नाही, मला फक्त एवढं सांगायचं होत की कायमच नात तोडणं हा पर्याय नाही.. म्हणून लगेच माफी द्यावी अस नाही.. आता मी माझा निर्णय सांगते...

मी अजून पर्यंत विवेकला माफ केलेलं नाही, आणि मी करूही शकत नाही मला मनातून त्याला माफ करायला वेळच लागेल, कारण ठेच माझ्या स्वाभिमानालाही लागली आहे, आणि ती ठेचलेली जखम भरायलाही वेळ लागेल, तो वेळ मी स्वतःला द्यायचं ठरवलंय, विवेकला माझा विश्वास परत मिळवता यावा म्हणून संधी हवी होती आणखी एक, मी ती त्याला दिलीय माझ्या काही अटींवर.. आणि त्या अटी त्याने मंजूरही केल्या आहेत.. त्याला जर खरच वाईट वाटत असेल आणि मी त्याच्या आयुष्यात परत हवी असेल तर तो माझा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि माझी माफी मिळवण्याचाही, त्यात त्याला माझ्या माफीची किंमतही कळेल आणि तो माझ्यापासून लांबही जाणार नाही तर उलट आमचं नात आणखी घट्ट होईल.. अस मला वाटतं.. बराच विरह मी सहन केलाय आता त्याची वेळ आहे..

थोडस थांबून तिने सगळ्यांकडे बाघितलं , आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा राग काहीप्रमाणात कमी झाला होता, आणि त्यांच्या डोळ्यात तिच्या बद्दल कौतूक दिसत होतं...

पुढे तीच बोलली

गौरवी - कसा वाटला माझा निर्णय?? बरोबर आहे ना??

सगळ्यांनी सोबतच हो म्हणून सांगितलं.. पुढे

गौरवी ची आई विवेकच्या आईला बोलली,

गौ आई - ताई माझी एक विनंती आहे, जोपर्यत गौरवी विवेकला माफ करणार नाही तोपर्यंत ती आमच्याकडेच राहील..

वि आई - चालेल पण आम्हाला गौरवी ची आठवण येईल..

गौरवी - मी मध्ये मध्ये तुमच्या भेटीला येत जाईल ना, पण खरंच माझी पण हीच इच्छा आहे आई..

वि आई - तुझी इच्छा आहे मग काहीच हरकत नाही , तू येत जा कधी कधी आमच्या भेटीला कधी कधी आम्ही येऊ तुला भेटायला , चालेल ना??

आणि एवढं तापलेला वातावरण आता कुठे थोडं शांत झाल्यासारखं वाटत होतं...

गौ आई - ताई आता तुम्ही जेवण करूनच जा, मी लगेच स्वयंपाक करते..

वि आई - नको नको, विवेक जाणार आहे ना आज, आम्ही त्याच्यावर नाराज असलो तरी त्याला बाय तर करावं लागेल ना.. (आणि थोडस भावनाप्रधान होत)
ताई आम्हाला माफ करा आम्ही पण नकळत गौरवीचे गुन्हेगार ठरलो, विवेक असा वागेल कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं...

गौ आई - त्यात तुमची काही चुकी नाही, प्लीज तुम्ही माफी मागू नका, आणि जर कधी गौरवी कडून कुठली चूक झाली असती तर तुम्ही आम्हाला दोष दिला असता का??

वि आई - गौरवी चूक करणं शक्यच नाही, जो समज एवढं मोठं झाल्यावर पण आमच्या जवळ नाही तो तिच्याकडे आहे.. पण तरी आम्ही तुम्हाला दोष नसता दिला..

इकडे विवेकच्या बाबांनाही वाईट वाटत होतं थोडं, त्यांनीही गौरवी च्या बाबांची माफी मागून घेतली.. आणि निघतो म्हणून विवेकच्या आईला आवाज दिला.. गौरवी ला निरोप देऊन ते दोघही घरी निघाले..


-----------------------------------------------------------
क्रमशः