जोडी तुझी माझी - भाग 39 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 39


गौरवी आणि विवेकच रोजच रुटीन सुरू असतं... गौरवी तिच्या नोकरीत मन लावून काम करत असते आणि विवेक तर कामाच्या बाबतीत आधीपासूनच खूप सिंसीयर असतो..

काही दिवसांनी गौरवीची कंपनी काही कारणास्तव विवेकच्या कंपनीमध्ये merge होते ... पण दोघही या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ असतात.. विवेकला तर गौरवीच्या कंपनीच नाव पण माहिती नसतं.. दोन्ही कंपन्या एकत्र झाल्या असतात पण त्यांचे एम्प्लॉयी त्यांच्या त्यांच्या ठिकाणीच बसत असतात.. विवेकच्या कंपनीच्या 3 ब्रांचेस असतात त्याच शहरात..

४ महिन्यांनंतर....

गौरवी ज्या प्रोजेक्टवर काम करायची तो प्रोजेक्ट पूर्ण होतो आणि पुढे तिला लीड कंपनी मधला प्रोजेक्ट दिल्या जातो म्हणजे विवेकच्या कंपनीमधला.. आणि तिची रेपोर्टइंग कंपनी बदलते, जी विवेकच्या कंपनी आहे तिकडे तिला बसावं लागतं, तिला माहिती होत ही विवेकची कंपनी आहे पण त्याच sitting नेमकं कुठे आहे ते मात्र तिला माहिती नव्हतं म्हणजे जिथे तिला रेपोर्टइंग कराव्याच होत त्याच branch मध्ये की दुसऱ्या ठिकाणच्या ब्रांच मध्ये...

पण नियतीच्या मनात काय असत कुणास ठाऊक, ज्या प्रोजेक्टल विवेक मॅनेजर असतो तोच प्रोजेक्ट तिला भेटतो आणि तीला आता रोज विवेकला रिपोर्टइंग करावं लागणार होतं.. हे आधी विवेकलाही माहिती नसतं आणि गौरावीला सुद्धा.. प्रोजेक्ट मिळाल्यावर विवेक प्रोजेक्टवर काम करणाऱ्यांची यादी बघतो तर त्यात त्याला गौरवीच नाव दिसतं... त्याला विश्वासच बसत नाही, ही इकडे कशी??मी ज्या कंपनीमध्ये आहे तिथे आणि त्याच प्रोजेक्टवर गौरवी कशी काय?? त्याला कळतच नाही.. थोडं विचारपूस केल्यानंतर त्याला कंपनीच्या मर्जिंग ची आणि गौरवी या प्रोजेक्टवर येण्याची सगळी माहिती कळते... तो खूप खूप खुश असतो.. पण जेव्हा गौरावीला हे कळत की तिला आता रोज विवेकला रिपोर्टइंग करावं लागणार आहे तिला खूप राग येतो.. तिला वाटत की विवेक नी जाणूनबुजून हे करवून घेतलाय आहे.. तिला प्रोजेक्ट बदलवून हवा असतो, तास ती बराच प्रयत्नही करते पण तिला दुसरा प्रोजेक्ट मिळत नाही आणि नाईलाजाने त्याच प्रोजेक्टवर काम करावं लागतं...

घरी आल्यावर इकडे विवेक खूप खुश असतो की निदान प्रोजेक्ट बद्दल बोलण्याकरिता तरी बोलेल ती आता रोज.. त्याची उत्सुकता शिगेला पोचलेली असती गौरवीच आवाज ऐकण्यासाठी..

आणि गौरवी ची परिस्थिती मात्र पूर्ण विपरीत असते.. तिचा गैरसमज झाल्यामुळे तिला विवेकचा राग राग येतो.. "मी वेळ मागितला होता ना तरी किती उतावीळ पण आहे हा मला अजिबात आवडलेलं नाहीय विवेकच अस वागणं.. त्याच्या या वागण्यामुळे माफी देण्याची भावना तर लांबच राहिली पण रागही कमी व्हायच्या ठिकाणी आणखी वाढतोय माझा.. काय करू?? त्याला बोलू का?? नको उगाच तो त्याला भाव मिळाल्याचं आनंद होईल .. आणि त्याला जे हवं ते साध्य होतंय अस वाटेल.. नको बोलायला.. " घरी आल्यानंतर फ्रेश होऊन थोडावेळ बाल्कनीत बसून तिचे विचार सुरू असतात.. बऱ्याच वेळानंतर एक सुबुद्धी तिला सुचते.. " जे असेल ते असेल मला माझी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स नाही करायला पाहिजे.. मी अगदी कामापुरतं बोलत जाईल, त्याला वाट असेल की अस करून तो माझ्या जवळ येऊ शकतो तर ते साफ चुकीचं आहे.. जर कधी त्यानी पर्सनल व्हायचा प्रयत्न केला तर मग मी त्याला उत्तर देईल, तोपर्यंत मी शांतच राहील.. कुणीतरी असतंच ना माझा मॅनेजर बस तसाच हा विवेक असेल.." अस ठरवून तीला थोडं रिलॅक्स वाटतं आणि ती हॉल मध्ये येते.. हॉल मध्ये बाबा tv बघत बसलेले असतातच.. त्यांना काळात आज गौरवीच काही बिनसलाय पण ती स्वतःहून सांगेल याची ते वाट बघत असतात.. तिला तिची स्पेस मिळावी एवढंच त्यांव्ह हेतू..

बाबा - ये बेटा गौरवी, काय म्हणते आज कस गेला दिवस??

गौरवी - दिवस तर चांगक होता बाबा पण शेवटचा तास मात्र खूप वाईट होता..

बाबा - का ग काय झालं??

गौरवी आता बाबांना प्रोजेक्ट बद्दल सगळं सांगते.. तेव्हा बाबा तिला समजावत बोलतात..

बाबा - अग पण विवेकनी करून घेतलं हे कशावरून ?? होऊ शकते ना कंपनीने दिल असेल..

गौरवी - अहो बाबा कंपनी एवढे सगळे प्रोजेक्ट सोडून हाच का देईल मला आणि बदलावण्याची मागणी केल्यावर पण मला बदलवून नाही दिला..

बाबा - आता कंपनीला तुझ्या आणि विवेकबद्दल काय माहिती ना.. आणि दुसरा प्रोजेक्ट मिळाला नाही याचा अर्थ नक्की कंपनी कडे तुझ्यासाठी यापेक्षा दुसरा चांगला प्रोजेक्ट नसेल ना.. आणि मी काय म्हणतो तू का एवढं स्वतःला फरक पडू देतेय, अस समज ना की तो फक्त मॅनेजर आहे.. कुणी दुसरा असताच ना तसाच हा आहे..

गौरवी - हो बाबा मी आता तसाच ठरवलंय.. बघू आता उद्या काय होतंय ऑफिसमध्ये..

बाबा - हम्म, आग मी तुला सांगायचं विसरूनच गेलो तुझ्या सासुच फोन आला होता, गौरावीला वेळ असला तर भेटयला यायला सांगा म्हंटल्यात.. आणि नसेल वेळ तर ते दोघे येतील सुटीच्या दिवशी..

तशी गौरवी 8-15 दिवसातून एकदा तरी त्यांना भेटायला जायची.. पण यावेळी जर जास्त दिवस होऊन गेलेत गौरावीला जायला जमलं नव्हतं.. आणि ती विवेकलाही टाळत होती..

गौरवी - ठीक आहे बाबा मी बोलेल त्यांच्याशी...

रात्री गौरवी जेवण करून झोपून जाते, तर विवेकला या खुशीत झोपच येत नाही की उद्यापासून गौरवी त्याच्याशी बोलेल.. तो त्याच विचारात असतो तर त्याला अचानक एक अनामिक भीती वाटू लागते.. त्याच्या मनात भीती वाटू लागते की " गौरवी ला अस तर वाटलं नसेल ना की मी हे मुद्दाम करून घेतलंय, तिचा काही गैरसमज तर झाला नसेल ना.." आता त्याची खुशी मात्र चिंतेत बदलते आणि त्याची झोप पूर्णच उडून जाते..

दुसऱ्या दिवशी ती सकाळीच ऑफिस मध्ये येते..नवीन जागा , नवीन लोक गौरवी अस्वस्थ असते थोडी.. कारण रुपालीचा अजून त्याच कंपनीमध्ये काम सुरू असतं.. विवेकही लवकरच येतो.. नवीन प्रोजेक्टबद्दल सांगण्यासाठी विवेक त्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या सगळ्यांची बैठक घेतो.. त्यात गौरवी सुद्धा असते तिला बघून 2 मिनिट विवेक तिच्यातच हरवून जातो त्याच असं बघणं गौरावीला awkward वाटत पण सृष्टीच्या आजमुळे त्याची तंद्री तुटते.. आणि तो नजर फिरवतो तास गौरवी ला जर बरं वाटतं..

सृष्टी या प्रोजवकटची टीम लीड असते.. तिला विवेक खूप आवडत असतो.. त्याच्या भूतकलाबद्दल तिला काहिही माहिती नसतं, त्याच लग्न झालाय हे सुद्धा तिला माहिती नसतं.. आत येत..

सृष्टी - गुड मॉर्निंग विवेक.. सॉरी थोडा उशीर झाला, चल सुरू करायचा का??

विवेक - अ.. अ.. हो .. take your seat..

आणि विवेक प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती त्याच्या टीमला देतो आणि बाकी documents मेल करतो म्हणून बैठक संपवतो.. सगळे बाहेर निघून जात असतात. त्यात गौरवी पण असते त्याला खूप वाटत एक आवाज देऊन तिला थांबवावं पण अस केलं तर कदाचित तिचा गैरसमज होईल म्हणून तो तिला थांबवत नाही.. ती जात असते आणि हा फक्त तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे बघत असतो..

गौरावीला थोडी भीती असते की हा कदाचित मला थांबवेल का आता पण त्याने तास केलं नाही म्हणून ती रिलॅक्स होते.. आणि कामाला लागते..

सृष्टी सतत काही तरी करण काढून विवेकच्या अवतीभोवती रेंगाळत राहते, हे बघून गौरवीला खूप jelous वाटत असतं.. पण तस चेहऱ्यावर ना दाखवता ती शांत राहते.. गौरवी चा table विवेकच्या केबिनच्या अगदी समोरच असतो त्यामूळे ती त्याला पाहू शकते आणि त्यालाही ती दिसू शकते..

विवेकला खूप वाटत गौरवीशी बोलावं पण तो स्वतःला आवर घालतो फक्त कामा पुरतच तो तिच्याशी बोलत असतो.. गौरवी पण जेवढ्याला तेवढाच बोलत असते.. त्यांच्या ऑफिस मध्ये सगळे जेवण सोबत करतात ही तिथली खासियत असते.. मॅनेजर असो की नवा एम्प्लॉयी सगळी टीम मेंबर एकत्रच बसतात.. गौरावीला वाटत असत की विवेक तेव्हा काही बोलेल पण तेव्हाही तो कामाव्यतिरिक्त काहीच बोलत नाही, पण तीच लक्ष नसताना तो तिला बघत असतो फक्त, त्याच अस सारख गौरविकडे बघणं सृष्टीच्या मात्र लक्षात येतं, गौरवी ला पण कळत असत पण ती दुर्लक्ष करते.. तिला वाटत की हा जेव्हा पर्सनल बोलेल तेव्ह मी त्याला जाब विचारेल पण 8 -9 दिवस असेच जातात विवेक कामाव्यतिरिक्त काहीच बोलत नाही, गौरावीला थोडं नवल वाटतं, तीच्या मनात विचार येतो आपण चुकीचा तर विचार केला नव्हता ना कदाचित विवेकने नसेल या प्रोजेक्ट साठी मला नेमले.. ती सगळे विचार झटकून आपल्या कमला लागते..

गौरावी आल्यापासून विवेक तिच्याकडेच बघतोय किंवा तो तिला जास्त भाव देतोय असं सृष्टीला जाणवतं आणि ती गौरवीचा द्वेष करत असते त्यामुळे ती गौरावीला इतरांपेक्षा नेहमी जास्त काम देत असते..

..

क्रमशः