पहिली युनिट टेस्ट संपली त्यानंतर गणेश चतुर्थी आली ..सर्वांनी खूप मज्जा केली ..सुट्टी च्या दिवशी सर्व मैत्रिणी मिळून गावातील सर्व मंडळांचे गणपती पाहून आल्या ..सरु आणि अंजली ही ..पुन्हा होती तशी शाळा ,घर अभ्यास सुरू झाल.सुट्टी दिवशी मात्र कधी सरु अंजली च्या घरी येत असे कधी अंजली सरुच्या घरी जात असे.शनिवारी शाळेतून घरी जात असताना ..सरूने अंजली ला विचारल ..
सरु : अंजली ,उद्या घरी येतेस का ?
अंजली ने तिला विचारल ..
अंजली : का ग ?
सरु : तुझा फेवरेट कर्ज पिक्चर लागणार आहे उद्या .. बारा ला तुझ्या हिमेश रेशमिया चा..
अंजली ने खुश होऊन विचारल..
अंजली :खर काय सरु ? अरे वा मग तूच ये ना घरी ..उद्या..पाहू ना..पणं अग सरांनी किती अभ्यास सांगितलं आहे..
सरु : अग नको तूच ये ..उद्या घरी नाही कोणी दादा ही नाही आणि आई ही नाही ..मग आपण दोघीच पाहू ..ना तुझ्या घरी मम्मी असेल दंगा करत पिक्चर नाही पाहता येणार ना आणि लिखाणाचं करायचं आहे ना पिक्चर पाहत पाहत करू ना ?
अंजली : अरे हो हे तर लक्षात च आलं नाही माझ्या ..ये पणं खर आहे ना उद्या पिक्चर ?
सरु : अग हो ग..
अंजली : मग ठीक आहे मी उद्या येईन बारा च्या आत..
दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे अंजली सरुच्या घरी बारा वाजण्या आधी पोहाच झाली सोबत वही , पेन अस लिखाणाचं साहित्य ही होतच.
अंजली : ये सरु पिक्चर अजून लागला नाही ना?
सरु : अग नाही अजून बारा ला लागणार आहे अजून दहा मिनट बाकी आहेत ..
दोघी ही मग टीव्ही सुरू करून त्या समोर बसल्या..आणि समोर वही पुस्तकं पेन ,पट्टी ,पेन्सिल असं सर्व साहित्याचा पसारा मांडून ठेवला होता.
पिक्चर सुरू झाला तसं दोघेही एक साथ ये ये असं खुशीत एक साथ ओरडल्या. लिखाण करत करत पिक्चर पाहू लागल्या... जसं गाणं सुरू झालं अंजली लिखाण थांबवून गालावर एक हात ठेवून गाणं पाहू लागली.. टीव्ही त हिमेश रेशमिया हेलिकॉप्टर मधून हीरोइन साठी गाणं गात होता....
माशाल्लाह सुभानल्ला तेरा चेहरा जब से देखा
दील गुम शुदा हुआ वल्ला..
माशाल्लाह सुभानल्ला तेरा चेहरा जब से देखा
दिल गुमशुदा हुआ वल्ला..
फिर ...फिर क्या हूवा?
फिर वो मेरा दिवाना हो गया..पूरा गाना उसने मेरी तरफ देख के गाया। I just could not belived it..
आगे गाओ ना...
आगे...
कुछ लम्हों के बाद जुदा होंगे हम..
दिल में रह जाएंगे, दिल के अरमा सनम ...
पर एक वादा जाते जाते करते जाना ..
दोगे तुम दोबारा मौका दीदार का ..दीदार का..
माशाअल्हा.. सुभानल्ल्ला ..
तेरा चेहरा..
माशाअल्लाह..सुभानल्ला...
अंजलीला हे गाणं फार आवडायचं.. अंजलीला गाणं तसे पाहताना पाहून सरू ही हसू लागली..
सरू: हा हा येईल येईल तुझ्यासाठी ही एक दीवाना येईल..
अंजलीने सरू कडे हसून पाहिलं..
अंजली: ये गाणं आवडतं म्हणजे काय .. माझ्यासाठीही कोणीतरी म्हणावं असं मला वाटत ..असा अर्थ होत नाही.. आणि मला नको कोणी दीवाना बिवाना..
सरु पुन्हा फिल्मी स्टाईल मध्ये बोलली..
सरु : ये हसीना साठी दिवांना तर येईल च ना?
अंजली ने तिच्या कडे जरा डोळे मोठे करून पाहिलं..
अंजली :सरु आज काल काय चाललं आहे तुझं ? एकटीच हसत असतेस ..काय काय बोलतेस ?
अंजली च बोलणं ऐकून सरु पुन्हा गडबडली..
सरु : माझं ? कुठे काय ? काही च नाही ..
अंजली : बर असू दे लक्ष दे अभ्यासा कडे..
सरु : अ..हो हो..
पिक्चर संपला तो पर्यंत त्याचं लिखाण ही झाल होत ..आता अंजली ही तिच्या घरी निघून गेली.
सातवीच्या मुलींनी वर्गात हादगा बसवला होता. पाटावर कलश मांडून त्यावर ती नारळ ठेवून त्याला सजवले होते जास्वंदाची लाल फुले त्याला वाहिली होती त्याच्या पुढे रांगोळी काढली होती. हत्तीचे चित्र काढून ते भिंतीला चिटकवलं होतं. त्याला फुलांचा हार घातला होता. सातवी आठवी व नववी च्या मुली मिळून जेवणाच्या सुटीनंतर संध्याकाळी चारच्या सुमारास शाळेच्या मैदानात हादगा खेळत असत.. दहावी म्हटले की बोर्डाची परीक्षा त्यामुळे दहावीच्या मुलींना हादगा खेळण्याची परवानगी मॅडमनी दिली नव्हती.. पण इतर मुलींना खेळताना पाहून त्यांनाही हादगा खेळू वाटायचं.. एक दिवस सर्व दहावीच्या मुलींनी पाटील मॅडम कडे जाऊन एक दिवस तरी हादगा खेळण्याची परवानगी मागण्याचे ठरवले.. पण मॅडम सोबत बोलणार कोण शेवटी सर्वांनी अंजलीला पुढे केले पाटील मॅडम च्या विषयात अंजली नेहमी पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे त्यामुळे मॅडम तिला नाही म्हणणार नाहीत असं इतर मुलींना वाटलं मग काय सर्व मुली मिळून पोचला पाटील मॅडम कडे.. पाटील मॅडम ऑफिसमध्ये त्यांच्या कामात गुंतल्या होत्या मुलींना आलेल पाहून त्यांनी आपली मान वर करून त्यांना विचारलं ..काय आज काय काम काढले सगळ्या दहावीच्या मुली इथे ऑफिसमध्ये?
पण कोणीच बोलेना सर्व मुली एकमेकीला खुणवू लागल्या.. शेवटी अंजलीने बोलायला सुरुवात केली..
अंजली: मॅडम आम्हाला खेळायचा आहे हादगा.. प्लीज मॅडम एक दिवस..
मॅडम मुलींकडे पाहून हसल्या.. व परत आपल्या कामात लक्ष घालत.. हळूच पुटपुटल्या..
पाटील मॅडम: ठीक आहे जावा पण फक्त एक दिवस..
मॅडम असे बोलतात सर्व मुलींची कळी खुलली सर्व त्यांना थँक्यू म्हणून शाळेच्या मैदानाकडे धावल्या तेथे आधीच सातवी आठवी नववीच्या मुली हादगा खेळण्याची तयारी करत होत्या दहावीच्या मुली आलेल्या पाहून..त्या मुलींना ही आनंद झाला..खिरापती चे डब्बे मध्ये मांडून ..त्यांनी एकमेकांचे हात पकडुन मोठासा गोल केला..सातवीच्या मुली अंजली ला विनंती करू लागल्या...अंजली दीदी प्लीज हादग्या चं गाणं म्हण ना..मुलींनी खूप च फोर्स केल्या नंतर अंजली तयार झाली..
अंजली : ठीक आहे ठीक आहे पणं मला एकच एक ह..मम्मी ने शिकवलं आहे माझ्या ..मी तेच म्हणते अस बोलून तिने हादग्याच एक मजेशीर गाणं म्हणायला सुरू केलं.. अंजली पुढे बोलत होती आणि बाकीच्या गोल करून एकमेकींना टाळी देत गोल फिरत तिच्या मागे ते गाणं गात होत्या आणि ते मजेशीर गाणे ऐकून हसत होत्या बाकीची मैदानावरील मुले ही ते गाणे ऐकून हसू लाग ली होती..
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं..
असं कसं वेड माझ्या नशिबी आलं
वेड्याच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिलं
चेंडू चेंडू म्हणून त्यांनी खेळायला नेलं
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेड माझ्या नशिबी आलं
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिलं
होड्या होड्या म्हणून त्यांनी पाण्यात सोडलं
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेड माझ्या नशिबी आलं
वेड्याच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
के कचरा म्हणून त्यांनी फेकून दिल
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेड माझ्या नशिबी आलं
वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
आळया आळ्या म्हणून त्याने फेकून दिल
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं
असं कसं वेड माझ्या नशिबी आलं
वेड्याची बायको झोपली होती पलंगावर
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळायला नेल.
गाणं संपलं तरी सर्वांचा हसणं चालूच होत.. त्यांनी अजून दोन-तीन गाणी म्हटली.. व नंतर दहावीच्या मुली सोडून इतर मुली आपापल्या डब्याकडे गेल्या डबा हातात घेऊन त्या डब्यात काय आहे हे इतरांकडून जाणून घेण्यासाठी सर्वांची गर्दी सुरू झाली काही मुली दहावीच्या मुलींकडे गेल्या काही मॅडम सरांकडे गेल्या.. सातवीतली स्वाती अंजलीकडे आली..
स्वाती ने डबा अंजलीच्या हातात दिला व तिला म्हणाली
स्वाती: अंजली दीदी सांग काय आहे यात..
अंजलीने तो डबा स्वातीच्या हातातून घेतला व आपल्या कानाजवळ नेऊन थोडा वाजवून पाहिला... पण तिच्या लक्षात येईना मग तिने डब्बा आपल्या नाकाजवळ नेला थोडा वास घ्यायचा प्रयत्न करू लागली ... थोडा विचार करून ती म्हणाली..
अंजली: शेंगदाणे चिक्की..
स्वाती नि तिच् ऐकून नाही अशी मान डोलावली.. मग अंजली परत एकदा डब्बा वाज वून ...पाहू लागली..
अंजली: शेंगदाण्याची लाडू..
स्वाती: हा बरोबर....
.मग स्वातीने डबा उघडून त्यातील लाडू अंजलीला दिला व ती इतरांना देण्यासाठी पळाली त्यानंतर बऱ्याच मुलींनी दहावीच्या मुलींना , सरांना, मॅडम ना खिरापत वाटली.मग शाळा सुटल्याची घंटा वाजली तशा सर्व जण आप आपल्या वर्गाकडे पळाल्या.
क्रमशः
( काही ठिकाणी हादग्याला भोंडला असे ही म्हणतात पणं आमच्या इकडे तर हादगा च म्हणतात म्हणून मी हादगा टाकला आहे ...अलीकडे अशी गाणी मात्र गाणं बंद झाल आहे .. शहरात ल्या मुलींना तर हादगा म्हणजे काय हे ही माहित नसत पणं गावा कडे अजून ही शाळेत असे हादगे बसवले जातात व मुली आवडीने हे खेळ खेळतात)