तुझी माझी यारी - 8 vidya,s world द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी यारी - 8

बराच वेळ सरु ची वाट पाहून अंजली शाळेला एकटीच निघून गेली ..रस्त्यात तिला तिच्या इतर मैत्रिणी ही भेटल्या ..शाळेत ही बराच वेळ झाला तरी सरु आली नव्हती ...बहुतेक सरु आज येणार नाही असा विचार करून अंजली मग शांत बसली ..तेवढ्यात निशा अंजली कडे आली.

निशा : अंजली आज सरु आली नाही का ?

अंजली : हो ग ..मी ही खूप वेळ वाट पाहून मग आले शाळेला..

निशा : काल तुला काही बोलली नव्हती का ?

अंजली : नाही तर काही च बोलली नव्हती ..बघू दुपारच्या सुट्टीत पूजा ला विचारू..

मग दोघी ही वर्गात लक्ष देऊ लागल्या ...दुपारी सर्व जनी जेवायला बसल्या जेवण झाल्या नंतर ...अंजली व निशा पूजा होती तिकडे गेल्या... पूजा तिच्या मैत्रिणी सोबत बॅन्च वर बोलत बसली होती . अंजली ला पाहून सर्वजणी च तिच्या सोबत बोलू लागल्या . अंजलीने पूजा ला विचारले .

अंजली : पूजा , सरू का आली नाही आज , तुला काही बोलली का?

पूजाः अ ग हो ,मी शाळेला येताना गेले होते तिच्या घरी तिला बोलवायला .. पण ती बोलली ती येणार नाही आज तिच डोक दुखत होत .

अंजली : हो का? बर ..

थोडावेळ बोलूण अंजली व निशा त्याच्या त्यांच्या वर्गात गेल्या . आज चव्हाण सरांनी पहिल्या युनिट टेस्ट चे मार्क्स सांगितले व त्यांच्या विषयाला सर्वच मुलांना चांगले मार्क्स पडले होते म्हणून सर आज मुलान वर भारी खूष होते याच संधीचा फायदा उचलत सरांचा मूड चांगला आहे म्हणून सर्व मुलांनी त्याना आज एक दिवस खोळायला सोडाव म्हणून सरांन जवळ हट्ट धरला मग काय सर तयार झाले व त्यांनी दहावीच्या मुलांना खेळायला सोडलं . सहसा कोण तेच शिक्षक दहावीच्या वर्गाला खेळाचला सोडत नसत पण शेवटी मुल सारखा अभ्यास अभ्यास करून कंटाळून जात म्हणून एखाद दिवस .. कोणत्या ना कोणत्या शिक्षकाना त्यांची दया येत असे व ते त्याना मैदानावर खेळायला सोडत . आज ही सगळे मैदानावर गेले होते एका वर्गाला सोडल म्हणून दहावीच्या दुसऱ्या तुकडीला ही गप्प बसवेना त्यानी ही हट्ट केला म्हणून मग त्याना ही खेळायला सोडण्यात आल .

अंजली व तिच्या मैत्रिणी मिळून लपाछपी खेळू लागल्या . रेखावर राज्य आल होत व बाकीच्या सर्व लपून बसल्या होत्या . अंजली एका मोठ्या शा झाडाच्या पाठीमागे लपून बसली होती . तिथे पूजा आली .

अंजली : अग , पूजा तू इथे कशाला आली ? रेखा पकडेल ना मला ?

पूजा : अंजली मला तुझ्या सोबत बोलायचं आहे.

अंजली झाडा आडून थोड डोक बाहेर काढत रेखा कुठे आहे हे पाहतच बोलली .

अंजली : अग नंतर बोल तुला काय बोलायच आहे ते ..

पूजाः नंतर सर्वजण असतात म्हणून मी इथे आले आहे. ..

अंजली ने थोड हसून तिच्या कडे पाहिलं .. व ती बोलली ...

अंजली : ये तुला माझ्या सोबत अस काय बोलायचं आहे . . जे सर्वान समोर बोलू शकत नाही ?

पूजा : मला सरू बद्दल बोलायचं आहे. . ...

आता पर्यंत पूजा च बोलण मजाक समजत असणारी अंजली सरू च नाव ऐकून थोड चकित झाली . ...

अंजली : सरु बद्दल ? का? काय झाल सरूला ?

पूजाः तिला काही झाल नाही .

अंजली : मग ...

पूजा : अंजली तुला सरु ने सुदीप बद्दल काही सांगितल आहे का ?

पूजा ने थोड संकोचत च अंजली ला विचारलं ,

अंजलीने सुदीप च नाव ऐकून आपल्या भुवया थोड उंचावत पूजा ला विचारल ..

अंजली : सुदीप ... कोण सुदीप ग ?

पूजा : अंजली तो आमच्या शेजारी राहतो . कॉलेज मध्ये शिकतो .

अंजली : मग त्याच काय ?

पूजाः अंजली ते ... सरु आणि त्यांच काही तरी चालू आहे अस सर्वजण बोलतात आमच्या इथे ..

अंजली : काही तरी चालू आहे म्हणजे ?

पूजाः अग तो सुदीप आणि सरु एक मेका वर प्रेम करतात अस बोलतात ...

पूजाच बोलण ऐकून अंजली चे डोळे विस्पार ले ...

अंजली : ये पूजा काही ही काय बोलते ? सरु तशी नाही ...

पूजा : अग पण मी खर बोलते आहे. मी ही त्यांना परवा लपून भेटताना पाहिल .. तूला माझ खर वाटत नसेल तर तू तू सरु ला च विचार ...

अंजली आता पूजाच बोलण ऐकून विचारात पडली . . ... तिच मन आता खेळाकडे ही लागेना ... खरच बोलत असेल का पूजा ? सरु च आणि त्या सुदीपच खरच काही असेल का? प्रत्येक छोटया छोट्या गोष्टी साठी तर सरु आपल्या ला विचारते ... मग इतकी मोठी गोष्ट ती आपल्या पासून लपवेल का ? आजच विचारल असत तिला पण आज ती आली च नाही ... ना .. ? अंजली आपल्या च विचारात हरवली होती .तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा वाजली आणि सर्व जण वर्गाकडे धावले..घरी जाताना ही अंजली खूप शांत होती ...तेव्हा तिच्या इतर मैत्रिणी नी तिला काय झालं म्हणून विचारल पणं अंजली ने काही नाही .. डोकं दुखत आहे म्हणून बहाणा बनवला.घरी गेल्यावर ही अंजली सरु चा विचार करत होती ..शेवटी उद्या सरु आल्यावर विचारू अस ठरवून तिने तो विषय बाजूला सरकवला व अभ्यासा मध्ये गुंतून गेली.

दुसऱ्या दिवशी अंजली आणि सरु ची भेट डायरेक्ट शाळेतच झाली ..सरु ला पाहताच अंजली ने आपली बॅग वर्गात ठेवली व पळत सरु कडे गेली ..सरु इतर मुली न सोबत बोलत होती..अंजली ने सरळ तिथे जाऊन तिचा हात पकडला व तिला आपल्या सोबत घेऊन गेली..

सरु : अग अंजली हळू चल ना इतक्या फास्ट कुठे घेऊन चालली तू मला ?

अंजली : मला बोलायचं आहे तुझ्या सोबत ..शाळेच्या मागे मैदानात जाऊ चल..

सरु: अग पणं ..घंटा वाजेल ना ...

अंजली : नाही अजून शाळा भरायला पंधरा मिनिट बाकी आहेत .

मग दोघी ही शाळेच्या पाठीमागे मैदानात गेल्या .

सरु : हा बोल आता ...

अंजली : सरू काल का आली नाहीस ?

सरु : अग काल डोक दुखत होत . ... म्हणून नाही आले .

अंजली : सरु मी खरच तुझी बेस्ट फ्रेन्ड आहे ना?

सरु : अग अंजली अस का विचारत आहेस ?

अंजली : तू सांग आधी ?

सरु : अग हो .

अंजली : मग खर खर सांग सुदीप कोण आहे .... आणि तुझं आणि त्यांच काय घेण देण ?

सुदीप च नाव ऐकून सरु ची धांदल उडाली ...

सरु : तू ... तुला कोणी सांगितल ?

अंजली : मी तुला प्रश्न विचारायला सांगितल नाही सरु सांग लवकर ...

सरुः अग ते ..... ते आमच्या शेजारी राहतात . .

अंजली : ते मला माहित आहे पुढे सांग तुझ आणि त्या च काय घेण देण ...

सरु आता पुरती गोंधळली होती .. काय बोलावं ते तिला सुचत नव्हत ...

सरु नजर चोरत च बोलली ...

सरु : काही नाही ... कुठे काय ?

अंजली : सरु खर खर सांग ... नाहीतर मी तुझ्या सोबत अजिबात बोलणार नाही . .

सरु : अग अंजली ... अस काय करते ...

अंजली : सरु .. सांगतेस की नाही ? की जाऊ मी ?

अंजली रागाने जायला वळली ... तेवढ्यात सरू ने तिला थाबवलं .

सरु : अंजली , थांब थांब सांगते ... ते सुदीप व मी ... मी मी ...

अंजली : काय मी मी पुढे कोण बोलणार ?

सरु : सुदीप आणि मी एकमेका वर प्रेम करतो . ...

सरु एका ओळीत सगळ बोलून मोकळी होते अंजली तर डोळे विस्पारून तिला पाहू लागते तिला वाटल होत ... पूजा खोट बोलली असेल पण ते तर खर निघाल होत .

क्रमश :