Navdurga Part 2 books and stories free download online pdf in Marathi

नवदुर्गा भाग २

नवदुर्गा भाग २

देवीच्या नऊ रूपांची पूजा करणे म्हणजेच नवरात्र साजरे करणे
नवरात्र हा नऊ रंग आणि नऊ दिवसांचा अत्यंत उत्साहवर्धक सण...!!

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव असुन ते देवीशी संबंधित व्रत आहे.
हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते.
वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.
शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते.
शारदीय म्हणजे ते शरद ऋतूच्या प्रारंभी येते.

आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.

निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा असतो.

हिंदू धर्मातील सर्व सण जोतिष शास्त्रावर अवलंबुन असतात.

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.

यामुळे आपल्यामध्ये नवीन शक्ती,नवा उत्साह,नवी उमेद निर्माण होत असते.

बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मानवाच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.

सृष्टीत होणारे परिवर्तन हा दैवी शक्तीचाच खेळ आहे.

आदिमायेची उपासना,यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.

म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते.

सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले
आणि तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले.

देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.

उमा, गौरी,पार्वती,जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून
दुर्गा, काळी,चंडी,भैरवी,चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत

नवरात्रीत देवी प्रमुख देवता असते जी त्या काळात आपल्या नऊ रूपांचे दर्शन घडवते .
शारदीय नवरात्र सप्टेंबर अखेर अथवा ऑक्टोबर सुरवातीस येते.
शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.
नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते असा समज आहे.
आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणाऱ्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे.
आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.
पुराणकाळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा.

अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो.
याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.

निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा असतो.

चित्पावन कुटुंबातील नववधू विवाहानंतर पाच वर्षे अष्टमीला खडे व दोरकाची पूजा करतात

महाअष्टमी महालक्ष्मीव्रत हे एक व्रत या दिवशी करतात.

पूजाविधी असा असतो .

व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी.

तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवावा.

मग महालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा करावी.

देवीला सोळा परींची पत्री व फुले वहावीत.

सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा.

पिठाचे सोळा दिवे करून आरती करावी.

मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा.

मग सोळा दूर्वा आणि सोळा अक्षता हातात घेवून महालक्ष्मीची कथा ऐकावी.

दुपारचे हे पूजाविधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात.

नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात. त्यासाठी तांदुळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात.
तो काजळ कुंकवाने रेखाटतात.
हे काम कडक सोवळ्याने चालते .

त्यानंतर तो मुखवटा सुशोभित मंडपाखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात
उतरंडीवर भरजरी लुगडे नेसवतात.
मग कापडाच्या पिशव्यांचे तयार केलेले हात देवीला जोडतात.
मंगळागौरी प्रमाणेच या पूजेसाठीही अनेक वसोळ्या (सवाष्ण ) बोलावतात.
त्या सर्व मिळून देवीची पूजा करतात.
नंतर आरती केली जाते .
देवीची ओटी भरताना देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असते,कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

देवीची ओटी भरताना दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहातात.

देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करतात.

साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करतात. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरतात. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे प्राधान्याने ओटीत तांदुळाचा समावेश केला जातो.

त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करतात व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करतात.

देवीची आरती झाल्यावर रात्री घागरी फुंकणे हा विशेष कार्यक्रम असतो.
घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात.
यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते.
नवरात्रीच्या वेळेस घागर फुंकणे या प्रकाराला विशेष महत्व आहे.

महानवमी एक तिथीव्रत.
आश्विन शुद्ध नवमीला दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात.
दुर्गा ही या व्रताची देवता आहे.
प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाचे वेळी कुमारिकांना भोजन घालणे
हा या व्रताचा विधी आहे.
आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात.
चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दस-याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे.
दस-याला पौराणिक व ऐतिहासिक महत्वही आहे.
त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात.
साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो.
या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात.

दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात.
रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली
आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला.
रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात.

१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत याला सीमोल्लंघन म्हणत.

या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटली जातात .
परस्परामधील स्नेह कायम राहावा म्हणून ही पाने देताना
“सोने घ्या सोन्यासारखे राहा “असे म्हणले जाते
महाभारतात याच वेळी पांडवांचा बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास काल संपला व त्यांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रे बाहेर काढली होती

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे. या काळात नऊ प्रकारच्या माळा वाहिल्या जातात

पहिली माळ,शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची

दुसरी माळ,अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची

तिसरी माळ,निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांची

चौथी माळ,केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाच्या फुलांची

पाचवी माळ,बेल किंवा कुंकवाची .

सहावी माळ,कर्दळीच्या फुलांची

सातवी माळ,झेंडू किंवा नारिंगीच्या फुलांची .

आठवी माळ,तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची

नववी माळ यावेळी कुंकुमार्चन करतात.
नवरात्रात नऊ रंग असतात.

नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार

भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे.

देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते.

रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED