Navadurga Part 3 books and stories free download online pdf in Marathi

नवदुर्गा भाग ३

नवदुर्गा भाग ३

उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून

रविवारचा रंग केशरी,

चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा,

मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल

बुधवारचा निळा,

गुरुवारचा पिवळा,

शुक्रवारचा हिरवा आणि

शनिवारचा रंग करडा असतो.

या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या सात दिवसाचे रंग ठरवले आहेत.

आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात.

त्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.

मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे.

महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते.

सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा होई.

पेशव्यांनीही पुणे येथील पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गोत्सव मोठ्या थाटामाटात व भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवली होती.

या उत्सवासाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद पेशव्यांनी केली होती .

या नऊही दिवसांत भवानी देवतेची आराधना करून तिच्यासमोर नंदादीप प्रज्वलित करून

तिला नैवेद्य दाखवून पूजा केली जाई.

देवीचे भक्त म्हणून ओळखले जाणारे भुते आणि गोंधळी हे गोंधळ घालून जागर करीत.
देवीचा गोंधळ म्हणजे देवीची पारंपारिक गाणी पारंपारिक वाद्यांच्या आवाजात गायन करून
देवीला जागृत ठेवणे होय .

प्रतिपदेच्या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते अंबेची घटस्थापना होत असे.

उपस्थित जनसमुदाय ’देवीचा उदो’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकत असे .

द्वितीयेला रेणुकाआदी चौसष्ट योगिनींची पूजा करून कस्तुरी मळवट भरून उदो करीत.
तृतीयेला अंबा अष्टभुजा शृंगार करून आसनावर विराजमान होत असे.

चतुर्थीला सरकारवाड्यातील व बाहेरील नागरिक निराहार उपवास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्रार्थना करीत.
पंचमीला श्रद्धेने देवीची पूजा करून लोक रात्रीचे जागरण करीत.
षष्ठीला दिवट्यांचा गोंधळ घातला जाई.
काही वेळा पेशवे स्वतः कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागीत असत.
सप्‍तमीला सप्‍तशृंग गडावर पेशवे जातीने आदिमायेची पूजा बांधत असत.
अष्टमीला देवीपूजनाचे वेळी ’अष्टभुजा नारायणी देवी शेषाद्री पर्वतावर उभी देखिली’ असा देखावा डोळ्यासमोर उभा आहे अशी उपस्थित लोक कल्पना करीत.
नवमीला होमहवन, जपजाप्य, षोडश पक्वान्‍नांचा देवीला नैवेद्य, ब्राह्मण-सुवासिनी भोजन
आणि विडा दक्षिणा देत असत.

दशमीला देवी मिरवणुकीने शिलंगणास जाई.
गावाबाहेर शमीपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन देवी मिरवणुकीने परत येई.
काही कुटुंबात नवरात्रात देवीला कडाकण्या बांधण्याची पद्धतही प्रचलित आहे
मैद्याच्या पिठात साखर घालून कडक पुऱ्या तळतात त्याला “कडाकण्या”असे म्हणतात.
याची माळ करून देवीच्या गळ्यात घातली जाते.

काही घरातून नवरात्रात नऊ दिवस रोज कुमारीकेची पूजा करून तिला भोजन करण्यासाठी बोलावले जाते .
दररोज एक पक्वान्न व कुमारिकेच्या आवडीचे भोजन बनवले जाते.
शेवटच्या दिवशी या कुमारिकेला बांगड्या ,माळ, कपडे ,दागिने अशा स्वरूपात भेट दिली जाते तसेच केळीची फणी अथवा इतर फळे देऊन व ओवाळून त्यांची पूजा केली जाते .
काही वेळेस अनेक कुमारिकांची सुद्धा पूजा केली जाते
शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करून नदीत विसर्जन केले जाते .

नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात.
भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.
नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते
आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात.
आणि भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणली जातात .
दर दिवशी वेगवेगळी खिरापत नेवेद्य म्हणून दाखवुन वाटली जाते
दर दिवशी गाण्याची व खिरापतींची संख्या वाढवली जाते .
पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्व विशेष आहे.
“बहु उंडल” असा भोंडला शब्दाचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.
हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.

गुजरातेत नवरात्रात गरबा खेळला जातो .

गरबा खेळणे म्हणजे टाळयांच्या किंवा बहुधा लाकडी दांड्यांच्या लयबद्ध गजरामध्ये
देवीची भक्तिरसपूर्ण गाणी म्हणणे.
टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी

कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे हा उद्देश असावा.

टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते, अशी श्रद्धा आहे.

टाळ्यांमुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते.

तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्‍त भजने म्हटल्याने

देवीप्रती भक्ती भाव जागृत होण्यास मदत होते.

गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.

यावेळेस छिद्र असलेल्या रंगीबेरंगी मातीच्या घड्यात दिवे लावले जातात

आणि त्याभोवती गोलाकार नाचण्याची प्रथा दिसून येते .

त्याला दांडिया (नृत्य) म्हणतात.

बंगाल आणि बिहार ,ओडीसा ,उतर प्रदेश या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते.

ललिता पंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून, म्हणजे षष्ठीपासून ते दसर्यापर्यंत हा उत्सव चालतो.

महाअष्टमी(दुर्गाष्टमी)ला बकर्याचा आणि महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो.

दुर्गापूजा हा बंगाली लोकांचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे.

सुरुवातीला बांधकाम करणारे गवंडी, सुतार वगैरे लोक विश्वकर्म्याची सार्वजनिक पूजा करतात.

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस दुर्गेचे नवरात्र मानतात.
नवरात्रात नित्य दुर्गापूजा केली जाते.

पूजा करताना घरचे मुख्य पुरुष सकाळी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करतात.
मग सपत्नीक बसून देशकालोच्चारपूर्वक पूजेचा संकल्प करतात.

यावेळेस घरातील महीला त्यांचा पारंपारिक पोशाख
म्हणजे मोठ्या लालभडक काठाची पांढरी शुभ्र साडी
त्या बंगाली पद्धतीने नेसतात.
तसेच कपाळावर मोठा लाल कुंकवाचा टिळा डोळ्यात काजळ आणि भांगात सिंदूर भरतात .

नंतर गणपतीपूजन, स्वस्तिवाचन इ. करून मातीच्या वेदीवर एका कलशाची स्थापना करतात व षोडशोपचारे पूजा करतात.

बंगालमधील अनेक लोक दुर्गेला आपली कुलदेवता मानून तिची नित्य पूजा करतात. ते तिला दुर्गतिनाशिनी म्हणतात. पुराणांत व अनेक तंत्रग्रंथांत दुर्गापूजेचे महत्त्व वर्णिले आहे.

दुर्गापूजेच्या दिवशी संध्याकाळी दुर्गेला प्रिय असणाऱ्या बेलाच्या वृक्षावर तिचे आवाहन करतात.

षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अधिवास नामक विधी करतात. यात देवीच्या निरनिराळ्या अंगांना विविध पवित्र वस्तूंनी स्पर्श करतात व त्यांना पावित्र्य आणतात.

सप्तमीच्या दिवशी देवीच्या पूजेला सुरुवात होते.
प्रथम बेल, डाळिंब, अशोक, हरिद्रा इ. नऊ प्रकारच्या पल्लवांची एक जुडी करतात व ती अपराजिता नावाच्या वेलीने बांधतात.

मग त्या जुडीला स्नान घालून साडी नेसवतात. तिला कलाबहू (कदलीवधू) असे म्हणतात.
ती गणपतीची पत्नी मानली जाते .

उत्सवमूर्तीच्या मांडणीत गणपतीच्या शेजारी तिची स्थापना करतात.
त्यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे महास्नानाचा असतो .

त्यावेळी एका कलशावर आरसा ठेवतात आणि त्यात देवीचे जे प्रतिबिंब पडते, त्यावर स्नानाचे सगळे उपचार समर्पित करतात.
देवीच्या स्नानासाठी थंड व उष्ण जल, शंखोदक, गंगाजल, समुद्रजल, इ. जले,
पंचगव्य, पंचामृत, आणि गोठा, चौक, वारूळ, नदीचे पात्र इ. ठिकाणची माती आणतात.
त्यानंतर देवीची तिच्या परिवारासहित पूजा करतात.
मग तिच्यासमोर पशुबळी देतात.
अशीच पूजा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही करतात.
याशिवाय संधिपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधिकाली करतात.

ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या रूपाची असते.

त्या रात्री गायन, वादन, खेळ यांच्या योगाने जागरण करतात.

यावेळेस सिंदूर खेळा म्हणजे एकमेकांवर सिंदूर उडवणे ,
धुनुची नृत्य म्हणजे मातीच्या भांड्यात नारळाचा काथ्या व विस्तव ठेवला जातो
व त्यानेच दुर्गेची संध्या आरती केली जाते.
यात शंख फुंकणे याला फार महत्व असते.

हे नृत्य सप्तमीला सुरु होऊन अष्टमी पर्यंत खेळले जाते

यानंतर या उत्सवाची समाप्ती होते .


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED