मित्रांचे अनाथाश्रम - भाग १ Durgesh Borse द्वारा नाटक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १

मी समीर, विवेकचा अत्यंत जवळचा मित्र होतो, पण काय ठाऊक कुणास आमच्यातील दरी आता वाढत चालली होती, कारणही काहीसे तसेच होते. एके दिवशी अचानक रात्री नऊच्या सुमारास विवेक चा एक मेसेज आला,

"भेटायचं आहे घरी ये,
जसा आहे, तसाच ये,
गरज आहे खुप तुझी"

मी कसलाही विचार न करता त्याच्या घरी गेलो. त्याने एक बॅग घेतली आणि मला घेऊन बाहेर पडला. आम्ही काळोख्या रात्री रस्त्याने चाललो होतो, पण काहीच बोलत नव्हतो. शेवटी तो एक हॉस्पिटल मध्ये शिरला आणि अमर बद्दल चौकशी करू लागला. नाव कुठेतरी ऐकल्यासारख वाटत होत, वार्डबोय ने इशारा केला त्या दिशेने आम्ही गेलो. रूममध्ये गेलो तेव्हा आमच्याच वयाचा कुणीतरी तिथे एक मुलगा बेडवर पडला होता. नखशिखांत घाव होते त्याच्यावर, आतापर्यंत मी त्याला ओळखले होते, हो तो अमर होता. बाजूलाच त्याच्या एक मुलगा बसला होता, आम्हाला पाहून तो लगेच उठला. त्याच नाव होत संजय.
संजय, "आणली का ? खुप थंडी आहे."
विवेकने त्याला बॅग मधून चादर काढून दिली, ती संजय ने अमरवर टाकली. तितक्यात तिथे डॉक्टर आले आणि तब्येत स्थिर आहे काळजी करण्याची गरज नाही असे सांगून गेले.
विवेक ने सुटकेचा श्वास सोडला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला,"असा का बघतो आहे ?"
मी,"मग काय करू"
विवेक,"Sorry"
मी,"जाऊ दे, अमर ला काय झालं ते सांग आता"
रूममध्ये आम्ही चौघच होतो, म्हणजे तिघेच अमर शांत निपचित पडला होता. हे विवेकच असच असतं, कधीही प्रश्न विचारला की उत्तर नाही द्यायचं म्हणून मान फिरून गप्प बसायचं. मग मी माझा प्रश्नार्थक चेहरा संजय कडे वळवला.
संजय मला सर्व काही सुरुवातीपासून सांगायला लागला.
मी संजय, पाटलांच्या घरातील एकुलता एक मुलगा एक लहान बहीण आहे. बाबा राजकारणात होते त्यामुळे गावात त्यांना खुप मान होता, त्याचा फायदा मलाही भरपूर झाला. मी जे काही मागयचो ते माझे व्हायचे. काका हृदयाच्या झटक्याने गेले त्यानंतर काकू आणि त्यांची दोन मुले आमच्यासोबत राहतात.
लहान असताना आई गेली म्हणून बाबांनी दुसरी केली, रजनी म्हणजे लहान बहीण त्यांच्या पोटची. आई नसली तरी छोट्या आई ने आणि काकूंनी मला आई ची कमी भासू दिली नाही.
कदाचित सख्या आई पेक्षाही जास्त प्रेम त्या माझ्यावर करत असणार, मला तर तसच वाटत. त्याच कारणही तसच आहे, भुकेल्याला एक भाकरीची तशी मला खऱ्या आईची माया माहिती नव्हती म्हणून हेच माझ्यासाठी आईच प्रेम.
घरात मी, बाबा, छोटी आई आणि रजनी, काकू आणि त्यांची दोन मुले असे एकूण सात लोक अगदी "हम सात साथ है" सारखे रहात होतो.
वयाच्या पंधरा वर्षे येईपर्यंत मी अक्षरशः वाया गेलो होतो. दहावीची परीक्षा तोंडावर असताना मी शाळेला टांग देऊन सिनेमे बघणे. बाबांच्या ओळखीमुळे मला आत्तापर्यंत पास करण्यात आले. त्यामुळे मित्र ही तसेच जवळ आले, त्यांच्यावर खुप पैसा उडवला. बाबा कायम म्हणायचे," पेपराच्या लढाईत माझ्या वाघाला कोपीच्या कुबड्याची गरज पडायला नको."
तरीसुद्धा बाबाचं कोण ऐकणार, मला जे करायचं तेच मी केलं. साम दाम दंड भेद जे जे जमेल ते ते करून मी पेपर दिले. दहावीची परीक्षा संपली आणि आमची पार्टी सुरू झाली.
दररोज पार्टी सुरू झाली होती. मला दारू आणि सिगरेट चे व्यसन लागले होते. अश्याच एके दिवशी पार्टी झाल्यावर आम्ही घरी जात होतो. दारूची धुंदी होतीच पण त्यासोबत सिनेमात पाहिलेला हिरो सुध्दा होता. त्यामुळे मोटारसायकल ची गती कधी वाढली ते समजलेच नाही. नको तेच झाले आणि माझा खुप मोठा अपघात झाला. माझे डोळे उघडे होते पण बाकी शरीर हलत नव्हते, सर्व मित्रांना मी पळतांना बघत होतो. त्यांच्यापैकी एकही मला मदत करायला थांबला नाही, माझे डोळे बंद झाले, मी बेशुद्ध झालो.

क्रमशः